लेखनप्रकार (Writing Type)
मागिल भाग-१५
आणि श्टेजवरून खर्या अर्थानी एक्झिट होतात...
पुढे चालू...
===========================
मग सुरु होतो एक छोटा खेळ..सूनमुखाचा.पण हा ही तयार-झालेला एक विधी आहे. हल्ली एक भलामोठ्ठा आरसा(मंगल-कार्यालयातूनच!) दिला जातो. मग सासूबाई अगदी हौसेनी त्यात आपल्यासह मुलाचा सुनेचा चेहेरा बघतात.फोटुवाले त्यांच्या मागनं खास कलात्मक फोटु घेतात. यात आम्हा गुरुजी लोकांचा पार्ट फक्त मार्गदर्शन करण्याचाच असतो.मग त्यात आधी सासूला,फक्त सुनेला अगदी जवळ घेऊन आरश्यात निरखायला लावणे..कंगव्यानी तिचा भांग पाडल्यासारखं करायला लावणे. भांगात कुंकू भरवणे..इत्यादी गोष्टी पार पडतात. मग आंम्हिही आधिचा झालिचा ताण उतरवायला .." सासूबाई...सूनबाईंना नविन हेअरश्टाइल करवून द्या हं...पहिली न मोडता! " इत्यादी माफक विनोद-टाकतो. वातावरण जरासं हलकं होतं आणि नंतर सासारा सुनेला मुलाला पेढा भरवू लागला..की आंम्ही मधे बसलेल्या सासूकडे निर्देश करत "एक पेढा तिकडेही चालेल हं!" असा अजुन एक बाण सोडतो. या बाणानी मात्र मंडळी खळखळून हसतात. आणि मग यानंतर वधूला गौरीहंरंपूजना पाठवली की तिथून चक्र फिरायला लागतात..ती रुखवताच्या भोजनाची!
रुखवतांचें भोजन हा तर एक संपूर्ण कालविसंगत विधी आहे. वधुच्या दारी लग्न लाववून घ्यायला, दमूनभागून आलेल्या वराकडल्या वर्हाडाला आल्या आल्या द्यायचा श्रमपरिहारी साध्या जेवणाचा बेत-म्हणजे रुखवताचं भोजन! (हो... हे सांगायलाच हवं! नाहितरी आमचा काका म्हणतोच :- "आत्मू..श्टेजवर आपण त्यांचे कलाकार,तिकिटाला साजेसा खेळ करणारे..पण एकदा खाली उतरलो,की हल्ली तुमचं ते कायसं म्हणतात..ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!!!! ते आपल्यालाही जपांयलांच हंवें हों!" ) पण एकदा का साध्या साध्या गोष्टींचे विधी झाले,की त्याच्यासाठी पुरोहितही आले..धर्म/संस्कृती..सारे काहि आले. आणि एकदा का हे सारे आले , की त्यासाठी त्या सार्याचे सारे करणेही आलेच! तेंव्हा चालू नाटकातला हा ही एक (भरीला पडलेला!) प्रवेश आपण पाहू या
प्रतिक्रिया
"रुखवताच्या जेवणाच्या वेळेला
@एक अनुभवसिद्ध सल्ला नवर्या
भारीच
@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके
@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके
आँ? डोके आपटणे प्रकार
=))
मस्त चालू आहे !!
मंभाप्र!!
;-)
आमच्या गुर्जींनी आमच्या लग्नात मंगळसूत्र तांदळाच्या पिशवीत
@दुसर्या गुरूजींनी पाहिलं
त्यांचं म्हणणं होतं की ते अनावधानाने झालं....
बापरे! काय हे! त्यावेळी भांडत
वाचतिये.
मस्स्त्त्त्त्त
गुर्जी ते मागे एकवीस शपथा
हां भाग पण एकदम खुसखुशित.
मस्त आवडलं