काही 'जपानी' अनुभव

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
18 Jun 2012 - 11:14 pm

जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक.

अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता. तेवढ्यामुळेच जपानला जाण्याची एक ओढही होती. कधी जायचा योग येइल असे वाटले नव्हते पण नशिबाने जायचा योग आला, दोनदा. त्या देशाच्या एका कंपनीसाठी काही काम करून त्यांच्या ॠणातुन (सुभाषबाबूंना केलेली मदत) काही अंशी उतराई होण्याची संधी मिळाली हे माझे अहोभाग्य.

माझ्या पहिल्या दौर्‍यातल्या वास्तव्यात त्यांनी तांत्रिक विश्वात केलेल्या प्रगतीचे तोंडाचा आsss करून बघण्यातच बराच काळ गेला. जमिनीखाली सहा थरांमध्ये चालणारी (अचूक वेळेनुसार) मेट्रो रेल्वे, जमिनीखाली एक शहराप्रमाणे असलेले तोक्यो रेल्वे स्टेशन, भुकंपालाही हरविणार्‍या गगनचुंबी इमारती. हे सगळे अनुभवता अनुभवता हळूहळू त्या शहरात असणारी प्रचंड स्वच्छता जाणावू लागली. कुठेही बघावे तर टापटीप. मग त्याचे कारण शोधता शोधता जपानी लोकांचे निरीक्षण करण्याचे व्यसन लागले (हो... हो! आले लक्षात तुम्हाला काय वाटतेय ते, त्यात जपानी ललनाही आल्याच). पहिल्या दौर्‍यातले ह्या स्वच्छतेबद्दल असलेल्या जागरुकीचे आलेले काही अनुभव...

एके दिवशी सकाळी ९:०० वाजता ऑफिस गाठताना लागणार्‍या एका फुटपाथवर टाइल्स बदलायचे काम चालू होते. व्यवस्थित पिवळ्या रंगाच्या पट्ट्या लावून चौकोनी ब्लॉक तयार करून त्यात सर्व सामग्री आणि कामाची आयुधे ठेवून दोघेजण त्यांचे काम मन लावून करत होते. 'काम चालू रस्ता बंद' अशी पाटी न लागता 'तुम्हाला होणार्‍या असुविधेबद्दल क्षमस्व' असा दिलगीरी व्यक्त करणारी पाटी होती. हे सर्व बघून पुढे निघून गेलो. दुपारी जेवायला बाहेर आलो तर ती पाटी आणि पिवळ्या पट्ट्या गायब आणि तिथे सकाळी काही काम चालू असण्याचे नामोनिशाणही नव्हते. आश्चर्य वाटून गडबडीत निघून गेलो. दुसर्‍या दिवशी त्याच फुटपाथवर पुढच्या ब्लॉकमध्ये टाइल्स बदलायचे काम चालू होते. परत दुपारी एकदम चकाचक. मग ऑफिसमधल्या एका जपानी मित्राला त्याबद्दल विचारले तर तो चकित होऊन माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेर्‍याने बघायला लागला व म्हणाला, 'अरे त्या दोन कर्मचार्‍यांना त्यांच्या ठरविक वेळेत संपेल इतकेच दिले जाते व ते त्याचे नियोजन करून तेवढीच जागा व्यापुन काम पुर्ण करतात. उगाच जास्त काम हाती घेतले तर रस्ता बंद होउन सर्वांचा खोळंबा नाही का होणार?'

बर्‍याच सबवे मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर टाइल्स लावलेल्या आहेत, छोटे-छोटे चौकोन असलेल्या टाइल्स. एकदा एका रविवारी मेट्रो स्टेशनवर गेलो असताना दिसले की पाणी मारून त्या भिंती धुतल्या जात होत्या. भिंती धुतलेले पाणी जाण्यासाठी जिन्याच्याकडेने जागा सोडून त्यातुन पाणी पाटाच्या पाण्याप्रमाणे निचरा होऊन जाईल ह्याची सोय केलेली होती. त्यानंतर काही वयस्कर माणसे हातात कडक दातांचे ब्रश घेऊन त्या टाइल्समधील छोट्या-छोट्या चौकोनांमधील फटींमध्ये अडकलेली घाण साफ करत होते.

ह्यानंतर माझा ह्या जपान्यांविषयीचा आदर दुणावला आणि मग मी त्यांच्या सामाजिक वागणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यात जाणवले ते म्हणजे त्यांना असलेला त्यांच्या देशाविषयीचा प्रचंड अभिमान. प्रचंड काम करून आपल्या देशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याची महत्वाकांक्षा. देशाच्या अभिमानाला धक्का लागेल असे काही झाले जर हाराकीरीच करतील अशी ही माणसे. त्याची प्रचिती आलेले हे अनुभव...

एकदा मी आणि माझा मित्र सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी जायला म्हणून एका सबवे स्टेशनवर तिकीट काढून गाडीची वाट बघत होतो. वाट बघत असतानाच एका सहकार्‍याचा ऑफिसातून फोन आला की ऑफिसात यायची गरज नाही. मग तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी एका तिकीटयंत्राकडे (तिकीटयंत्रात तशी सोय असते) जाऊन आम्ही दोघे खटाटोप करत होतो. त्यावेळच्या जपान दौर्‍यात मला जपानी येत नव्हते. त्यामुळे नेमके काय करायचे हे कळत नव्हते. त्या यंत्राच्या बाजुलाच एक जपानी माणुस उभा होता व आमच्याकडे बघत होता. ही जपानी माणसे तशी फार लाजाळू आणि अबोल असतात (पण त्यांचे रूप हे नामाबीरु किंवा साके प्यायल्यानंतर एकदम विरूद्ध होऊन जाते). तो बराच वेळ आमच्याकडे बघत होता मग जरा धीर करून आमच्याकडे येऊन म्हणाला, 'सॉरी मला इंग्लीश जास्त येत नाही, पण तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का, काही मदत करू का?' आमची अवस्था आंधळा मागतो एक डोळा... अशी झाली. त्याला आमची समस्या सांगितल्यावर त्यानेही बरीच झगडाझगडी केली त्या मशिनशी पण त्यालाही काही जमले नाही. 'एक मिनीट', म्हणून तो गायब झाला. माझ्या बिहारी मित्राने लगेच त्याच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. पाच सात मिनीटांनी तो आला तो एका रेल्वे कर्मचार्‍याला घेऊनच. मग त्या दोघांनी जपानीमध्ये बरीच काही बडबड केली आणि त्या यंत्रावरही बरेच काही केले. शेवटी यंत्र बिघडले आहे असे सांगुन तो रेल्वे कर्मचारी निघुन गेला. आमच्या दोघांच्या चेहेर्‍यावरील भाव बघून त्या माणसाने आमचे तिकीट कुठपर्यंतचे आहे ते विचारले. मग त्याने ते तिकीट आमच्याकडे मागितले आणि त्या तिकीटाएवढे पैसे काढून आम्हाला दिले व म्हणाला, 'तुम्हाला ह्या तिकीटाचे पैसे परत घ्यायला स्टेशनमास्तरशी बोलायला प्रोब्लेम येईल मी बघतो काय करायचे ते'. एवढे बोलून वर परत आम्हालाच त्रास झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत सॉरी म्हणाला. हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे पण त्यानेच, मदत करून वर आम्हाला थॅन्क्यु म्हणायची संधी न देता, सॉरी म्हणणे हे लख्ख आठवते आहे. माझा बिहारी मित्र रडला होता त्यावेळी. त्या माणसाने आम्हाला मदत करण्यामागची भावना अशी की ह्या परदेशी लोकांचे माझ्या देशाविषयी गैरसमजानेसुद्धा मत खराब होऊ नये!

एकदा मी धाडस करून एकटाच तोक्यो स्टेशन फिरायला गेलो. ते जमिनीखालचे स्टेशन एवढे प्रचंड आहे की जणू एक शहरच वसले आहे. त्यावेळी भाषा येत नसल्यामुळे आम्ही ग्रुपमध्येच फिरायचो. पण त्यावेळी मी आता सर्व स्टेशन्स समजली ह्या आत्मविश्वासाने (फाजील) एकटाच गेलो. आणि त्या तोक्यो स्टेशनवर हरवलो. काही केल्या कुठे जायचे कळेना. एकही पाटी इंग्रजीत नाही (का म्हणून लावावी?) कोणाशी इंग्रजीत बोलायची सोय नाही. जवळ मोबाइल नाही, भयंकर घाबरून गेलेलो. इकडे तिकडे फिरता फिरता एके ठिकाणी एका दुकानात एक डेंटिस्ट चक्क त्याचा दवाखाना थाटून बसला होता. आता तो जरी डेंटिस्ट असला तरीही डॉ़क्टरच. त्यामूळे त्याला इंग्रजी येत असणार म्हणून मी भयंकर खुष झालो. त्याच्याकडे जाऊन मी, मी हरवलो आहे, मला जपानी येत नाही, मला मोन्झेन नाकाचो ह्या स्टेशनला जायचे आहे, कसे आणि कुठुन जायचे, मदत कराल तर खुप उपकार होतील अशी सरबत्ती चालू केली. त्याने सर्व शांतपणे ऐकून घेतले. मग मला हाताने थांबायची खूण करून कुठेतरी निघून गेला. आता तो एका पेशंटच्या दातातले किडे तसेच वळवळत ठेऊन गेला असल्याने परत येईल ह्याची खात्री होती. गेला असेल नकाशा आणायला असा विचार करून मी शांतपणे बसून होतो. तो डेंटिस्ट १५-२० मिनिटांनी परत आला. त्याच्याबरोबर एक माणूस होता. माझ्याजवळ आल्यावर त्या माणसाशी काहीतरी बोलून मला त्याच्या हवाली करून त्याच्या पेशंटकडे निघून गेला (मला खात्री आहे त्याने त्याच्या पेशंटबरोबरच त्याच्या दातातल्या किड्यांचीदेखिल माफी मागितली असेल दिलेल्या तसदीबद्दल). त्या नविन माणसाने माझ्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली व म्हणाला, 'त्या डेंटिस्टला इंग्रजी थोडे थोडे कळते पण बोलता येत नाही म्हणून तो मला घेऊन आला आहे, बोला मी आपली काय मदत करू?'

ह्या अनुभवांनंतर, ह्या देशात परत यायचे आणि यायचे ते ह्यांची भाषा शिकुनच, त्यांच्याशी संवाद साधायला, ही खुणगाठ बांधूनच परत आलो. आल्यावर पुणे विद्यापिठात जपानी शिकायला सुरूवात कली आणि नशिबाने परत जपानला जायचा योग आला.

ह्या दुसर्‍या फेरीतील अनुभव पुन्हा केव्हातरी. :)

संस्कृतीप्रवाससमाजजीवनमानराहणीअनुभव

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

18 Jun 2012 - 11:38 pm | छोटा डॉन

भाग-२ ची वाट पहात आहे.
सोत्री, तुझ्याकडे लिहण्यासारखे भरपुर मटेरियल आहे, लिहण्याचा आळस करु नये ही विनंती

- छोटा डॉन

प्रीत-मोहर's picture

19 Jun 2012 - 7:21 am | प्रीत-मोहर

डानरावांशी सहमत. पण तच वेळी उलट चोर...,` ासेही म्ह णते

प्रीत-मोहर's picture

19 Jun 2012 - 7:21 am | प्रीत-मोहर

डानरावांशी सहमत. पण तच वेळी उलट चोर...,` ासेही म्ह णते

सोत्रि's picture

19 Jun 2012 - 9:05 am | सोत्रि

काय वेळ आली आहे, चक्क प्रीमोशी सहमत ह्वावे लागते आहे :-)
-( प्रीमोशी सहमत असलेला ) सोकाजी

प्रीत-मोहर's picture

19 Jun 2012 - 4:26 pm | प्रीत-मोहर

तुम्ही आमच्याशी सहमत झालात यात आश्चर्य नाही वाटले. ;)

करु का तुमच्यासाठी आणलेल्या फेणीची झैरात? करु?

शिल्पा ब's picture

18 Jun 2012 - 11:39 pm | शिल्पा ब

हे असं काही वाचलं की एक्दम भावुक व्हायला होतं. भारतातसुद्धा अतिथी देवो भवं प्रकार आहे पण एका मर्यादेतंच. लोकसंख्या जास्त, भ्रष्टाचार प्रचंड वगैरेमुळे विश्वास कमी असा प्रकार. ते असोच आता.

जपानी अतिथ्याबद्दल बरेच ऐकुन अन वाचुन आहे. खरंच कौतुक वाटतं. उगाच नाही त्यांचा देश भयानक संकटांतुन पुन्हा पुन्हा सावरुन बहुतेक बाबतीत जागतिक दबदबा निर्माण करत.

प्रास's picture

19 Jun 2012 - 11:15 am | प्रास

घ्या, आता आम्ही देखिल शिल्पा ब यांच्या विचारांशी सहमत होऊ लागलोच नै का...!

सोत्रि, भाग २ ची वाट बघतोय, हं काय...!

शिल्पा ब's picture

19 Jun 2012 - 11:20 am | शिल्पा ब

अहो साहेब, बहुतेकजण माझ्या मतांशी सहमतंच असतात पण तेसुद्धा कबुल करायला धैर्य लागतं नै का? ;)
त्यातल्या त्यात शांत धागा निवडल्याबद्दल अभिनंदन. :)

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2012 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी

सोत्री - या लेखनाद्वारे आपण फारच सहजपणे जपान्यांच्या चांगल्या सवयींबद्दल ओळख करून दिलेली आहे. त्या लोकांना चिंकी म्हणून संबोधण्याच्या सवयीने मनात अपराधीपणाची भावना निर्माण झालेली आहे.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

सुरुवात झकास झालीये सोत्री. तुमची लेखनशैली साधी, सरळ असल्याने आवडते.
स्वातीताईच्या लेखमालिकेची आठवण आली. तिनेही असेच मनापासून लेखन केल्याचे जाणवले होते.
माझी एक भारतीय मैत्रिणही जपानबद्दल चांगले बोलते. एक प्रश्न असा पडतो की तिथे स्त्रियांना मानाची वागणूक (घरात) मिळत नाही असे ऐकले आहे ते खरे की काय?
पुढचे लेखन लगेच करावे ही विनंती.

स्वाती दिनेश's picture

19 Jun 2012 - 12:35 am | स्वाती दिनेश

अगदी,
जपानी अनुभवांशी अगदी सहमत!
जपानी मंडळीचे असेच सुखद अनुभव आम्हालाही आले.
स्वाती
स्वगत - चला स्वातीबाई, आळस झटकून जरा 'दुनिया जापानकी' पूर्ण करायचे मनावर घ्या आता!

ऋषिकेश's picture

20 Jun 2012 - 3:13 pm | ऋषिकेश

स्वगता बद्दल +१

अर्धवटराव's picture

19 Jun 2012 - 12:46 am | अर्धवटराव

एक दिवस असा आणु कि परदेशी लोक भारताबद्दल असच कौतुकाने लिहीतील.
बाकी निप्पो बद्दल इतकं ऐकुन आहे कि त्या देशाच्या जवळ्जवळ प्रेमात पडलोय.
सोत्र्यांचा हा अनुभव आजवर ऐकलेल्या जपानी कौतुकाच्या मालिकेतलाच. उत्तम :)

अर्धवटराव

एक दिवस असा आणु कि परदेशी लोक भारताबद्दल असच कौतुकाने लिहीतील.

फर्मास!! नाहीतर एरवी फक्त काळ्या पांढर्‍या रंगातल्या चर्चा आणि वादंगच वाचायला मिळतात.

मुक्त विहारि's picture

19 Jun 2012 - 12:48 am | मुक्त विहारि

दूसरा भाग पण लवकर येवू द्या.

चित्रगुप्त's picture

19 Jun 2012 - 12:51 am | चित्रगुप्त

लिखाण खूपच भावले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
आम्ही भारतीय आपल्या उज्ज्वल परंपरांचा, संस्कृतीचा, संस्कारांचा बाळगतो तो अभिमान किती व्यर्थ आहे, हे परदेशात फिरताना तिथल्या लोकांचे सौजन्य ठायी ठायी बघून जाणवत रहाते.

दादा कोंडके's picture

19 Jun 2012 - 2:11 am | दादा कोंडके

मस्त अनुभव सोत्री!

माझे देखील पहिले वहिले अनुभव हलवून टाकणारे होते.

कुजकट प्रतिक्रियांची भिती असुनही माझा अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाहिये. :)

एक अनुभव: पहिल्यांदाच 'बाहेर' आल्यानंतर सुरुवातीचे दिवस इथली स्वच्छता वगैरे पाहून आश्चर्य ओसरल्यानंतची गोष्ट आहे. ऑफीसला येता जाता रस्त्याच्या कडेला खूप घरांसमोर टेबलावर पुठ्ठ्याच्या बाउल मध्ये फळं, मध, जॅम वगैरे ठेवलेलं दिसत असे. एकदा थोडसं जवळ जाउन बघितल्यानंतर त्याच्याच शेजारी त्यांच्या किमती खडूनं लिहिलेल्या दिसल्या आणि एक पैशासाठी डबा देखील ठेवलेला दिसला! दुसर्‍यादिवशी मग येताना एक मस्त रसरशीत स्ट्रॉबेरीचा डबा घेतला आणि जवळच्या पिगीबँकमध्ये पैसे टाकले.

निटनेटकेपणा, स्वच्छता, कामसूपणा, प्रमाणिकपणा या गोष्टी बघितल्यावर आपण भारावून जातो खरच. आणखी थोडसं लक्षपुर्वक निरिक्षण केल्यावर जपान, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातले या बाबतीतले सुक्ष्म फरकसुद्धा लक्षात येतात.

अर्धवटराव's picture

19 Jun 2012 - 4:13 am | अर्धवटराव

मी ज्या मित्राकडुन जपान-पुराण ऐकलं त्याने जापान्यांचा आणखी एक अनुभव सांगीतला... कि आपली एखादी वस्तु जर हरवली, आणि ति कुठे हरवली याचा अंदाज आपल्याला आला कि तेथील "लॉस्ट अँड फाऊंड" टाईप कार्यालयात जाउन चौकशी करावी. आपली वस्तु सापडण्याचे भरपूर चान्सेस असतात...

अर्धवटराव

भरत कुलकर्णी's picture

19 Jun 2012 - 5:32 am | भरत कुलकर्णी

कुणाला जपानी गादीचा अनुभव आहे का?

छान अनुभवकथन.

कुणाला जपानी गादीचा अनुभव आहे का?
एख्याद्या स्वच्छ, नितळ विहिरीच्या काठाला पाण्यात पाय सोडून शांतपणे मासे बघत तंद्री लागलेली असताना वरुन दाणकन कुणी तरी मुटका मारवा तसे झाले.
ते भडकमकर मास्तर एकदा त्यांचे गुरु जालिंदरबाबांच्यासाठी म्हणून (चिंचवडातन फाफलत जंगली महाराज रोडवर जाउन) त्या जपानी गादीवर झोपुन आलेत म्हणे. त्यांना विचारा.

५० फक्त's picture

19 Jun 2012 - 7:26 am | ५० फक्त

छान लिहिलंय, धन्यवाद.

जाई.'s picture

19 Jun 2012 - 7:40 am | जाई.

छानच
अनुभव कथन आवडले

प्रचेतस's picture

19 Jun 2012 - 8:59 am | प्रचेतस

छान लिहिलय.
सोत्री, पुढच्या भागाची वाट पाहात आहे.

मृत्युन्जय's picture

19 Jun 2012 - 10:15 am | मृत्युन्जय

मस्त लिहिले आहे रे सोत्र्या.

बादवे "प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश" हे काय अजबच? म्हणजे नक्कीच मागासलेला असणार तो देश. प्राची सभ्यता आणि संस्कृतीचा अभिमान वगैरे बाळगतात होय? काहितरीच काय? असा अभिमान बाळगुन कोणाची कधी प्रगती होइल काय? या असल्या फाजील अभिमानामुळेच दोन वर्षापुर्वी भुकंप आणी त्सुनामी आली तिथे. येडचाप कुठले.

श्रीरंग's picture

20 Jun 2012 - 9:59 pm | श्रीरंग

:D :D :D :D

अर्धवटराव's picture

20 Jun 2012 - 10:04 pm | अर्धवटराव

बहुतेक तिथे "अंधांचे" निर्मुलन होते, श्रद्धांचे नाहि. हाच काय तो फरक.

अर्धवटराव

चैतन्य दीक्षित's picture

19 Jun 2012 - 10:52 am | चैतन्य दीक्षित

मस्त अनुभवकथन.
माझा एक अनुभव-
जपानला शिक्षणासाठी २ वेळा जाऊन आल्यानंतर भारतात जपानी-दुभाषी म्हणून नोकरी मिळाली.
नोकरीनिमित्त जपानला जाण्याचा योग आला. जिथे जायचे होते त्या ठिकाणचा पत्ता माझ्याजवळ होता पण प्रत्यक्ष तिथे गेलो नसल्याने नक्की कसे जायचे हे ठाऊक नव्हते. एअरपोर्टवरून टॅक्सी केली टॅक्सीवाल्याला जपानीतून पत्ता सांगितला
पण त्यालाही नक्की कसे जायचे हे कळेना. जिथे जायचे त्याच्या साधारण जवळ पोहोचल्यावर ड्रायव्हरने त्याच्या गाडीत असलेला नकाशा काढला आणि पत्ता शोधू लागला. आणि पत्ता सापडेपर्यंत टॅक्सीचा मीटर बंद ठेवला.

स्वच्छतेच्या बाबत जपानी माणसे जशी काटेकोर आहेत, तशाच अजून काही महत्वाच्या गोष्टी-

जपानी माणूस स्वतःच्या कारने कुठे आला असेल तर मित्राने कितीही आग्रह केला तरि दारू पीत नाही.
दारू प्यायची असे ठरले असेल तर त्या दिवशी तो कारने येणारच नाही.
अगदी रात्री १२ नंतरची वेळ असेल आणि रस्ता पूर्ण मोकळा जरी असेल तरीही सिग्नल लाल असेल तर सहसा कुणी गाडी पुढे नेत नाही. (जपानी तरूण मुले या गोष्टीला अपवाद होत चालली आहेत हा भाग निराळा)
कामाचं अतिशय बारकाईनं नियोजन आणि अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीतही दुसर्‍याला त्रास होणार नाही याची दक्षता हे त्यांचे गुण वाखाणण्याजोगे आहेत.

चैतन्य,

अरे तुझ्याकडे पण अजून असतील तर लिही की अनुभव........ तु म्हणजे आजकाल मुहुर्त बघून लिहायला लागला आहेस......... :P

दिपक's picture

19 Jun 2012 - 11:13 am | दिपक

अनुभव आवडले.

योगप्रभू's picture

19 Jun 2012 - 1:20 pm | योगप्रभू

सोत्री यांचे हे लेखन वाचून निराशा दाटून आली.

तुमचे हे असले असंबद्ध लेखन वाचण्यासाठी आम्ही मिपावर वेळ घालवावा का?

सुंदर जपानी ललना या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याबाबत लेखात काहीच माहिती नाही. जपानी स्त्रिया नवर्‍याशी अत्यंत प्रेमाने आणि समर्पित भावनेने वागतात. या आश्चर्याबद्दल उल्लेखही नाही. गेलाबाजार, साकुरा, सुशी याबद्दल काही वाचायला मिळेल म्हटले तर तेही नाही. उलट मोडकी तिकिटयंत्रे, इंग्रजी न बोलता येणारे लोक असले तद्दन निरुपयोगी किस्से लिहिले आहेत. या गोष्टी इकडे भारतात आम्हाला कायम पहायला मिळतात. त्यात कसलं आलंय नाविन्य?

एक तर ते तिकिटयंत्र तुमच्या उपद्व्यापामुळे मोडले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. एक मराठी आणि एक बिहारी माणूस एकत्र आल्यावर दुसरे काय घडणार? (आम्ही दोघे बराच खटाटोप करत होतो, हे वाक्य वाचून बरेच काही लक्षात आले.) पुन्हा यंत्र मोडून जपान्यांकडून तिकिटाचे पूर्ण पैसे वसूल केलेत.

परकी प्रवाशाला इंग्रजी/हिंदीतून मदत करण्यापेक्षा स्थानिक भाषा शिकणे किती महत्त्वाचे आहे, याचा धडा दक्षिण भारतीय राज्यांइतका उत्तम कुठेही मिळत नाही. याबाबत त्यांची तुलना फ्रेंच लोकांशी होऊ शकेल. पुष्कळदा असाही अनुभव येतो, की भारतीय लोक इंग्रजी किंवा स्थानिक भाषांचे जे खून पाडतात ते ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तेवढ्यात अन्य कामे होऊ शकतात. त्यामुळेच त्या डेंटिस्टने १५ मिनिटांत चार-पाच पेशंट तपासून घेतले असतील आणि मग त्यातल्या त्यात ज्याच्या तोंडाला वास येत असेल त्याला बाहेर आणून 'जरा यांच्याशी इंग्रजीत बोला.' असे सांगून स्वतःची सुटका करुन घेतली असेल.

असो. दुसर्‍या भागातील अनुभव जरा आकर्षक असू द्यात. :)

योगप्रभु,
तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. पुन्हा असा प्रमाद घडणार नाही ह्याची खात्री बाळगा.

असो,
वहिनींची तब्बेत जर ठिक झाली असेल तर त्यांच्या समोरच जपानी ललनांबद्दल चर्चा करु, काय म्हनता :-)

-( जपानी 'योग' जाणणारा) सोकाजी

योगप्रभू's picture

19 Jun 2012 - 2:33 pm | योगप्रभू

<<वहिनींची तब्बेत जर ठिक झाली असेल तर त्यांच्या समोरच जपानी ललनांबद्दल चर्चा करु, काय म्हनता>>

सोत्री. प्रत्येक वेळी इतक्या टोकाच्या धमक्या दिल्याच पाहिजेत का? काही गोष्टी आपापसात समजुतीने मिटवून नाही का घेता येणार? तुम्हाला फार वाकडं बोललोय का? कशाला उगीच 'घेऊन ये बॉसला. बोलतोच त्याच्या समोर' अशी भाषा वापरायची? :)

श्रावण मोडक's picture

19 Jun 2012 - 5:28 pm | श्रावण मोडक

शेपूट? आणि म्हणे योगप्रभू. योगही नाही, प्रभुत्त्वही नाही. ;-)

योगप्रभू's picture

19 Jun 2012 - 5:52 pm | योगप्रभू

<<शेपूट? आणि म्हणे योगप्रभू. योगही नाही, प्रभुत्त्वही नाही.>>

'संसारी' या एका पदवीत वरचं सगळंच अध्यार्‍हत आहे देवा! :)

कपिलमुनी's picture

19 Jun 2012 - 3:01 pm | कपिलमुनी

याची भरपाई करा लौकर ;)

छोटा डॉन's picture

19 Jun 2012 - 3:57 pm | छोटा डॉन

प्रभुंशी सहमत.
अ‍ॅक्युअली मी आधीच हे लिहणार होतो पण उगाच 'अतुलनीय भारत' ह्या संकल्पनेला धक्का लागेल म्हणुन विचार सोडुन दिला होता.
सोत्री, आता दुसरा भाग ह्याच थीमवर येऊद्यात ;)

- (मॅगी क्यु प्रेमी)छोटा डॉन

डॉ अशोक कुलकर्णी's picture

19 Jun 2012 - 3:03 pm | डॉ अशोक कुलकर्णी

झकास अनुभव. आवडले !!

जे.पी.मॉर्गन's picture

19 Jun 2012 - 3:33 pm | जे.पी.मॉर्गन

तू जपानच्या फोटोंमधून होणार्‍या ओळखीपलिकडे खूप वेगळं सांगतो आहेस. जपानचं "व्यक्तिमत्त्व" उलगडून दाखवतो आहेस.

भाग २ च्या प्रतीक्षेत.

जे पी

आबा's picture

19 Jun 2012 - 3:56 pm | आबा

छान अनुभव आहे...
दुसर्‍या भागाची वाट पाहतोय !

कपिलमुनी's picture

19 Jun 2012 - 4:22 pm | कपिलमुनी

जपानी माणसे अजब रसायने आहेत ..

यांच्या सैन्याचा चीन मधल्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकून अंगावर काटा येतो

स्पंदना's picture

21 Jun 2012 - 6:09 am | स्पंदना

कोरिया पण येतो त्यात. अगदी परवापर्यंत कोरिया जपान कडे त्यांनी केलेया स्त्रीयाम्वरिल अत्याच्यारा बद्दल माफिनामा मागत होत. पन अक्षरशः लक्षसुद्धा दिल गेल नाही.
अर्थात हे राजकारण झाल. सामान्य माणसांच वागण केंव्हाही प्रशंसनियच.
छान लेख.

पैसा's picture

19 Jun 2012 - 5:37 pm | पैसा

पुढचा भाग लवकर येऊ दे!

छान अनुभव आहेत रे.
गेल्या जन्मीची पुण्य कर्मेच ही जी ज्याची तुम्हाला असल्या चान चान देशात कामानिमित्त फिरता येते.
नाही तर आम्ही..इथेले अनुभव सांगण्याची छाती होत नाही.

बादवे या धाग्यामुळे स्वाती ताईच्या जपानी लेखमालेची आठवण झाली.

अर्धवटराव's picture

19 Jun 2012 - 10:46 pm | अर्धवटराव

अनुभव वाईट असले तर नक्की शेअर करा गणा भाऊ... गोमुखात बोट घालुन थंडगार वाटण्याचा अनुभव तरी वाचेल पब्लीकचा.

अर्धवटराव

विनीत संखे's picture

19 Jun 2012 - 6:18 pm | विनीत संखे

मी काही महिन्यांच्या जपानी वास्तव्यात केलेल निरीक्षण ...

१. जेवताना कमी बडबड करणे. लक्ष पूर्णतः बाऊल मध्ये असणे. पहिल्या घासाअधी जेवणाचा वास घेणे.
२. बोलताना संख्यांना बोटानीसुद्धा दर्शवणे.
३. कार्टून्सना आणि कॉमिक्स (अ‍ॅनिम आणि मांगा टून्स) साहित्य म्हणून मानणे. त्यांना खूप सिरियसली घेणे.
४. दहा मिनिटांनी झालेला ऊशीर खालील गोष्टींत गणला जाऊ शकतो...
४.१ गुन्हा.
४.२ पैसे परत.
४.३ अजागळपणा आणि झीरो बिझिनेस सेन्स.
५. स्त्रियांसाठी वेगळा इलेक्ट्रॉनिक्स विभाग.
६. पुरूषांसाठी परकर आणि ब्रा. तरूण पुरूषांनी नाजूक मेकप करणे.
७. आपल्या मुलांमध्ये कुठलीही एक कला नक्कीच बाणवणे.
८. भारतीय जेवणास हीन मानणे. जेवण खूप शिजवणे हा जपानी पाककलेत एक दुर्गुण मानला जातो.
९. मासे किंवा माशांचा वास स्युशीत असणे गरजेचे. मासे नसतील तर वासासाठी स्युशीत समुद्री शेवाळ वापरले जाते.
१०. जेवणाबरोबर हिरवा चहा घेणे.

तर्री's picture

19 Jun 2012 - 8:00 pm | तर्री

ही ओळ आणि ६ हा नंबर ह्यांचा घोळ झालाय का ?
बाकी निरीक्षणे सूक्ष्म आहेत.

विनीत संखे's picture

19 Jun 2012 - 9:07 pm | विनीत संखे

नाही हो... आपसूकच सहाशी तो मुद्दा मांडला...

गूगलवर "Japan bra for men" सर्च करावे आणि साक्षात दिव्य पाहावे.

नाजूक दिसण्याशी त्याचा संबंध असावा ...

अर्थातच सरसकट सगळे जपानी पुरूष असे असतात हे मानू नये... आजही जपानी सुमो मल्ल माझे अत्यंत फेवरीट आहेत.

jaypal's picture

19 Jun 2012 - 11:55 pm | jaypal

अर्थातच सरसकट सगळे जपानी पुरूष असे असतात हे मानू नये... आजही जपानी सुमो मल्ल माझे अत्यंत फेवरीट आहेत.>>>>>>>>>>>>>>>

JAGOMOHANPYARE's picture

19 Jun 2012 - 9:06 pm | JAGOMOHANPYARE

छान .. आपला देश पाच वर्षे जपान्याना चालवायला देऊ या.. जपानी राष्ट्रपती आणला तर?

सोत्री आजवर केवळ प्रतिसादातून ओळख झालेली लेखन खरंच इतकं अप्रतिम आहे तर लिहा की राव

(सोत्रींच्या लेखनाच्या प्रतिक्षेत असलेला) चाफा :)

जपानमध्ये कुटुंब व्यवस्था मोडकळीला यायच्या मार्गावर आहे असं ऐकतोय... तरुणांमध्ये लग्न करुन घर-संसार चालवण्याची इच्छा कमी होत चालली आहे, जन्मदर रोडावला आहे, वृद्धांची संख्या अमाप वाढते आहे आणि जपानला पुढील काहि वर्षात जपानी ह्युमनरिसोर्स ची कमतरता प्रखकतेने जाणवेल, वगैरे वगैरे.... अर्थात, तसं असेल तर आम्हि तिकडे जायला अगदी एका पायावर तयार आहोत ;) तेव्हढं त्सुनामी-भुकंप-महागाईचं बघा म्हणाजे झालं :D

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

19 Jun 2012 - 11:01 pm | शिल्पा ब

<<तरुणांमध्ये लग्न करुन घर-संसार चालवण्याची इच्छा कमी होत चालली आहे

का बरं? काय प्रॉब्लेम आहे नेमका?

अर्धवटराव's picture

20 Jun 2012 - 12:04 am | अर्धवटराव

पण २४ तास व्यग्र असल्यामुळे घर-संसारासाठी जो एक निवांतपणा लागतो त्याची वानवा असावी... आर्थीक जवाबदार्‍या टाळण्याचा कल असावा...

अर्धवटराव

होय हे खरे आहे. लिहीतो ह्यावर पुढच्या भागात.

-(घर संसाराची दुर्दम्य ईच्छा असलेला) सोकाजी

सुनील's picture

19 Jun 2012 - 11:26 pm | सुनील

हा तसेच डॉ अशोक कुलकर्णी यांचा हा धागा वाचून अगदी सद्गदित झालो!

जपानमध्ये पोलिस खाते असते का असा एक प्रश्नदेखिल डोक्यात येऊन गेला ;)

असेच अजून अनुभव येऊद्यात!

अवांतर - ५-६ वर्षांपूर्वी जपानशी काही कामानिमित्त संबंध आला होता. त्यांची काटागाना नावाची लिपी युनिकोडात उपलब्ध असल्यामुळे त्या लिपीतील फायली एन्क्रीप्ट करता येत परंतु त्यांची कांजी युनिकोडात उपलब्ध नसल्यामुळे त्या लिपीतील फायली एन्क्रीप्ट करता येत नव्हत्या, असे अंधुकसे आठवते आहे. सध्या काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही.

तुमचे लेख नेहमीच छान असतात.

सुंदर लेखन...
पुढच्या भागाची वाट पाहतोय... (जरा ललनां विषयी "डिटेल" मधे लिहावे)
बाकी जपानी स्त्रियांना जपानी पुरुष नवरा म्हणुन हल्ली आवडत नाही म्हणॅ ! स्त्रियांचे स्वतःचे दुकान, हॉटेल असेल तर सरळ हे पुरुष त्यावर कब्जा करतात असे ऐकुन आहे,म्हणुन जपानी स्त्रिया इंपोर्टेड नवरा सोधतात ! श्रीलंकेत तसेच भारतात येउन असे पुरुष त्यांनी निवडले आहेत.मला वाटत...त्यांनी बिहारी (बोधगया) नवरे सुद्धा कटवले आहेत. (संदर्भः- http://alturl.com/43uwf)
जपानी लोकांनी चित्र विचित्र खेळाचे सुद्धा शौकीन आहेत. ते इतके विचित्र आहेत की विचारु नका ! मी असे काही व्हिडीयो तूनळीवर पाहिले आहेत... तो व्हिडीयो पाहुन तर... इथे तो व्हिडीयो द्यावा ? की नको असा अजुन विचार करतोय ! फार विचित्र, आणि भयानक आणि दु:खाची परिसिमा ओलांडणार आहे. ;)
असो एक दुसरा व्हिडीयो इथे देतो... तो पाहुन घ्या ! नको... ती लिंक दिली तरी तो व्हिडीयो (वरती उल्लेखलेला) पाहता येउ शकतो. त्यामुळे कोणी "तो" व्हिडीयो इथे टाकण्याची विनंती केल्यास / अथवा व्यनी केल्यास लिंक देण्याची सोय करण्यात येईल.

वपाडाव's picture

20 Jun 2012 - 12:02 pm | वपाडाव

>>>बाकी जपानी स्त्रियांना जपानी पुरुष नवरा म्हणुन हल्ली आवडत नाही म्हणे !!>>>
-या आफ्रिकन्स लोकांच्या *** * **....

सोत्रि's picture

20 Jun 2012 - 12:28 pm | सोत्रि

हा हा हा...
:-) , :-) ,:-)
-(वप्याच्या भावना पोहोचलेला) सोकाजि

मदनबाण's picture

20 Jun 2012 - 12:38 pm | मदनबाण

या आफ्रिकन्स लोकांच्या *** * **...
ख्या ख्या ख्या खीक्क... ! ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jun 2012 - 2:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे

भापो रे... पण अफवांच्या नादी फार लागू नये बाबा...

हंस's picture

20 Jun 2012 - 9:46 pm | हंस

सोत्रि, सुभाषचंद्र बोसांची रक्षा ज्या "रेंकोजी मंदिरात" ठेवल्या आहेत त्या मंदिराला भेट दिली कि नाही?, असो मार्चमध्ये मी ह्या ठिकाणी जाऊन आलो, तो क्षण माझ्या जीवनातील अतिशय उत्कट क्षण होता. त्याची काही प्रचि खाली देत आहे.

आता तिकीटयंत्रात ज्या स्लॉटमधुन तिकीट बाहेर येते त्याच स्लॉटमध्ये जर न वापरलेले तिकीट आत सरकवले कि तेवढे पैसे परत मिळतात त्यामुळे तुम्हाला ज्या कटकटीला सामोरे जावे लागले त्याचा प्रश्नच येत नाही.
आणि अनुभवाचे म्हणाल तर, परवाच बँकेमध्ये सायकलवर जात असताना, एक स्त्री आपल्या दोन लहान मुलांबरोबर रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नलला थांबली होती, तिच्याबरोबर असणारा तिचा मुलगा हा फुटपाथवर खेळत होता, मी तेथुन जात असताना तो मला आडवा आला, ते पाहून त्याची आई अतिशय खजील झाली आणि तिने मला कमीतकमी ४-५ वेळा "सुमिमासेन" म्हणजे माफ करा म्हटले, आणि हे कमी कि काय तिच्या बरोबर असणारी तिची लहान मुलगी वय वर्ष ३-४ अतीशाय गोड हसुन "सुमिमासेन" म्हणाली, मी आवक् च झालो! इतक्या लहान वयात सिव्हिक सेन्सची असणारी समज आणि आईवडीलांची शिकवण ह्यांना मी मनोमन नमस्कार केला, आणि नकळत ह्या प्रसंगाची भारताशी तुलना करु लागलो.

सोत्रि's picture

20 Jun 2012 - 10:13 pm | सोत्रि

हंस तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीयेय, दोनदा गेलो पण कॅमेरा बरोबर नव्हता त्यामुळे फोटो नव्हते.
ह्या फोटोंसाठी तुमचा गुलाम ह्यापुढे मी !!!

आता तिकीटयंत्रात ज्या स्लॉटमधुन तिकीट बाहेर येते त्याच स्लॉटमध्ये जर न वापरलेले तिकीट आत सरकवले कि तेवढे पैसे परत मिळतात त्यामुळे तुम्हाला ज्या कटकटीला सामोरे जावे लागले त्याचा प्रश्नच येत नाही

त्यामुळेच हे "हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे" असे म्हटले होते ऑलरेडी!

- (नेताजींचा पुतळा आठवून डोळे ओले झालेला) सोकाजी

मृत्युन्जय's picture

21 Jun 2012 - 11:31 am | मृत्युन्जय

Roads are full of Idiots या जाहिरातीची आठवण झाली. :)

अर्धवटराव's picture

20 Jun 2012 - 9:58 pm | अर्धवटराव

>>...आणि नकळत ह्या प्रसंगाची भारताशी तुलना करु लागलो.
--- क्यो बे, अंधा है क्या.. आयला माझीच गाडी (सायकल असली तरी) भेटली काय जीव द्यायला, बापाचा रस्ता आहे का, माजलेत साले....

अर्धवटराव

<क्यो बे, अंधा है क्या.. आयला माझीच गाडी (सायकल असली तरी) भेटली काय जीव द्यायला, बापाचा रस्ता आहे का, माजलेत साले...>
अहो हे म्हणण्या आधी ती मायमाउली कंबरेला पदर खोचुन, केसांचा आंबाडा बांधुन बरोबर माझ्या सात पिढ्यांचा उध्दार करत म्हणाली असती "अरे ये मसण्या, तुह्या डोळ्यांच्या खाचा झाल्यात व्हय? तुला दिसना व्हय माहा बबड्या खेळतोय ते? डोळे फुटलं का रे डुचक्या........................." :)

बिजुरीया's picture

21 Jun 2012 - 3:39 pm | बिजुरीया

सोत्रिंचे लेख वाचनिय आणि सहज-सुंदर असतात यात काहि शंका नाही..

जपान आणि जपानी लोकांबद्दल आदर असलेल्यांपैकी मी एक. म्हणून मला माझा एक अनुभव इथे नमुद करावासा वाट्तोय...
माझा छोटा तेव्हा 2 वर्षाचा होता आणि तो घरिच असायचा म्हंजे आम्ही त्याला शाळेत नव्हते घातले.. मोठा मात्र तिथल्या शाळेत जायचा..
एका दुपारी मोठा शाळेतून यायच्या तासभर आधि मी छोट्याला घेऊन जवळच असलेल्या किराणा दुकानात जाण्यासाठी घरातून निघाले..खाली आल्यावर माझ्या छोट्याला पार्कमधेच खेळायचे होते..दुपारची
वेळ असल्यामुळे पार्कमधे दोन जपानी छोट्या मुलीन(6-7वर्षाच्या असतील) व्यतिरिक्त कोणी नव्हते.मला
वेळ नसल्यामुले(मोठा शाळेतून परत यायच्या आत परतायचे होते) मी त्याला पार्क मधे ठेवून दुकानात गेले पण थोड्याच वेळात पाउस पडायला लागला म्हणून मी गडबडीत दुकानातून बाहेर निघाली.
इकडे पार्कमधे पाऊस येउ लागल्यावर त्या दोन मुली घरी न जाता, रडणार्या माझ्या छोट्याचा हात पकडून दुकानाच्या दिशेने येत असलेल्या मला दिसल्या.मला पहाताच त्याचा हात सोडून त्या झाडामागे लपून त्याला माझ्यापर्यंत पोचेपर्यंत पाहात रहिल्या..मी छोट्याला विचारल्यास त्याने फक्त झाडाकडे बोट दाखवले. मी तिकडे पाहिले तेव्हा फक्त गोड हसून त्या त्यांच्या घरी निघून गेल्या.
खरेच,मदत करनारी जपानी मोठी माणसे तर खूप भेटली परंतु त्या छोट्या अनोळखी जपानी मुली
माझ्या कायम लक्षात राहिल्या..

शिल्पा ब's picture

21 Jun 2012 - 9:26 pm | शिल्पा ब

तुम्ही तुमच्या २वर्षाच्या मुलाला पार्कात खेळायला सोडुन तुमचे कामं उरकायला गेलात? कमाल आहे?
आणि हे असे मदत करणारे छोटे सगळीकडेच असतात हा अनुभव आहे.

बिजुरीया's picture

22 Jun 2012 - 7:24 pm | बिजुरीया

हाच तर फरक आहे भारतात आणि जपानमधे...भारतात मुलाला सोडून नाही जावु शकत...तिथे सोसायटीत आणि पार्कमधे मुलाना कसलीही भिती नसते..माझा 7 वर्षाचा मुलगा एकटा मेट्रो ट्रेन ने रोज शाळेत जायचा..आपल्याकडे ट्राफिक चे नियम पाळणारे क्वचित भेटतात..अपघात आपल्याकडे सामान्य गोष्ट झालेली आहे..तिथे खूप क्वचित घडतात अपघात.
आम्ही ज्या दान्चीत (सोसायटी)राहायचो तिथे सात बिल्डिंग्ज होत्या.. प्रत्येक बिल्डिंग्अला 10 ते 12
मजले आणि प्रत्येक मजल्यावर जवळ्पास 100 घरे होती..विचार करा तिथे किती लोक राहात असतिल..
मदत करनार्या जपानी मुली सम्पुर्णपने अनोळखी..त्याना आपली भाषा नाही समजत ..आणि त्याहि छोटयाच..पण तरिहि त्याच्यासोबत आल्या.सामान्यपणे काहि मुले पावसात खेळताना आपल्यातच दंग झालेली असतात..त्याना आजुबाजुला काय चाललेय याचे भानही राहात नाहि.

म्हनून ..जपान्यांसाठी हा अनुभव नसु शकेल पण भारतीयांसाठी नक्कीच तो अनुभव असु शकतो..

तुम्ही तुमच्या २वर्षाच्या मुलाला पार्कात खेळायला सोडुन तुमचे कामं उरकायला गेलात? कमाल आहे?

कोणत्याही भारतीय आईला हा प्रश्न येणे साहजिक आहे.. पण ते दुकान पार्क च्या समोरच आहे..
मी काही खूप लाम्ब गेली नव्हती कामे उरकायल..

माझा 7 वर्षाचा मुलगा एकटा मेट्रो ट्रेन ने रोज शाळेत जायचा
मी असे ऐकले होते की मुलांनी आपापल्या मार्गाने शाळेत जाणे येणे व्यवस्थित करावे म्हणून त्यांना आईवडीलांकडून त्याप्रकारे सराव करून घेतला जातो. त्याबद्दल काही सांगू शकाल का? अशाप्रकारची सुरक्षितता, शिस्त याचा अनुभव घेतल्याशिवाय विश्वास बसणे एरवी अवघड जाते. सगळे अचंबित करणारे आहे.

बिजुरीया's picture

22 Jun 2012 - 10:56 pm | बिजुरीया

खरेच आहे..अनुभव घेतल्याशिवाय खरे नाही वाटणार..पण एक नक्कि जो तिथे राहून आला तो जपान आणि तेथिल लोकांच्या आदरातिथ्याने प्रभावित झाल्याशिवाय राहनार नाही..
आम्हीतरी आसा काही सराव करून घेतला नव्हता..तिथली सुरक्षितता,आणि शिस्तीबद्दल खात्री झाल्यावरच त्याला एकट्याला पाठवायला सुरुवात केली होती..

बरोबर आहे. अशा अनुभवांसाठीतरी जपानात काही दिवस जायला हरकत नाही.
हे असं आबादीआबाद असल्यानेच का काय जपानी पोलिसांना काहीच काम नसतं म्हणे. म्हणुन मग ट्रेनमधे गर्दीच्या वेळी लोकांना ट्रेनमधे कोंबायला - ढकलायला पोलिस फोर्स वापरतात असं युट्युबवर पाहीलंय.

दादा कोंडके's picture

23 Jun 2012 - 1:21 am | दादा कोंडके

तुमची प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्या समृद्ध अनुभवविश्वाची साक्ष देत असते. :|

शिल्पा ब's picture

23 Jun 2012 - 1:31 am | शिल्पा ब

कस्चं कस्चं! :shy:

अर्धवटराव's picture

23 Jun 2012 - 1:45 am | अर्धवटराव

पोलीसांनी लोकांना ट्रेन मध्ये कोंबण्याची क्लीप बहुदा चीनची आहे, जपानची नाहि.

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

23 Jun 2012 - 1:47 am | दादा कोंडके

ते तुमच्यासाठी. आमच्यासाटी चीन, जपान, कोरीया सगळ एकच. :)

अर्धवटराव's picture

23 Jun 2012 - 2:08 am | अर्धवटराव

>>बस का राव
-- ते राव च्या अगोदर कंसात अर्धवट लिहायचं राहुन गेलं का? ;)

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

23 Jun 2012 - 2:10 am | शिल्पा ब

http://www.youtube.com/watch?v=b0A9-oUoMug

http://www.youtube.com/watch?v=ldx7RBWOCxs&feature=fvwrel

http://www.youtube.com/watch?v=tx52f32toX0&NR=1&feature=endscreen

कदाचित हेच हे चीन, कोरीया वगैर पण असेल... मिपापब्लिक फारच विद्वान बॉ!!

कलंत्री's picture

22 Jun 2012 - 2:59 pm | कलंत्री

लेख आणि प्रतिक्रिया आवडल्या.

कानडाऊ योगेशु's picture

23 Jun 2012 - 1:06 am | कानडाऊ योगेशु

जपानबाबती मित्राने त्याचा एक मजेशीर अनुभव सांगितला होता.
जपानी लोकांच्या शिस्तशीरपणाबद्दल त्याने असे सांगितले कि समजा बसस्टॉपवर बाप,आई व मुलगा असे फक्त तिघेच जण असतील तर उभारतानाही ते व्यवस्थित रांगेत उभारतील व रिकाम्या बसमध्येही ते रांगेतुनच चढतील :)
तर असाच आमचा हा मित्र एका बर्यापैकी गर्दी असलेल्या बसस्टॉपवर उभा होता.आता सगळेच जपानी रांगेत उभे आहेत म्हटल्यावर हा ही शहाण्यासारखा रांगेत उभारला.बस येताना दिसली सगळे जपानी ढिम्म.रांगेतुनच चढायचे म्हटल्यावर कोण कशाला घाई करेल.पण मित्राचा आतला "देसी" चुळबुळ करु लागला.बस स्टॉपला लागल्यावर पठ्या जपान बिपान सारे विसरुन भारतात व तेही मुंबईत असल्याप्रमाणे रांग मोडुन बसमध्ये घुसला.आतुन त्याने खिडकीतुन बाहेर पाहीले तर सारे जपानीही रांग बिंग मोडुन बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.
थोडक्यात काय तर एक देसी किसी भी जपानीयोंको देसी बना सकता हय.!

आमच्या आम्रीकेत असं नसतं बॉ! समजा एखादा असा रांग मोडुन शिरायला लागला तर तिथल्यातिथेच बोलतील किंवा मग अशा नजरेने बघतील की ज्याचं नावं ते! वर पुन्हा आपल्या नातेवाईक अन मित्रांना हा किस्सा (हे लोकं बघा कसे वागतात म्हणुन) सांगतील ते वेगळंच!

बाकी मजेची गोष्ट सोडली तर तुमच्या मित्राचा किस्सा किंवा एकुणातच बेशिस्तीचं वागणं हे काही योग्य नाही हे आमचं मत.

कानडाऊ योगेशु's picture

23 Jun 2012 - 10:23 am | कानडाऊ योगेशु

खरंय!
मित्रा कडुन जी कृती घडली ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती.

पण इतकं मनाला लावुन घेऊ नका हो.
ते म्हणतात ना कि ऐसे बडे बडे शहरो मे.. वगैरे वगैरे..