जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक.
अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता. तेवढ्यामुळेच जपानला जाण्याची एक ओढही होती. कधी जायचा योग येइल असे वाटले नव्हते पण नशिबाने जायचा योग आला, दोनदा. त्या देशाच्या एका कंपनीसाठी काही काम करून त्यांच्या ॠणातुन (सुभाषबाबूंना केलेली मदत) काही अंशी उतराई होण्याची संधी मिळाली हे माझे अहोभाग्य.
माझ्या पहिल्या दौर्यातल्या वास्तव्यात त्यांनी तांत्रिक विश्वात केलेल्या प्रगतीचे तोंडाचा आsss करून बघण्यातच बराच काळ गेला. जमिनीखाली सहा थरांमध्ये चालणारी (अचूक वेळेनुसार) मेट्रो रेल्वे, जमिनीखाली एक शहराप्रमाणे असलेले तोक्यो रेल्वे स्टेशन, भुकंपालाही हरविणार्या गगनचुंबी इमारती. हे सगळे अनुभवता अनुभवता हळूहळू त्या शहरात असणारी प्रचंड स्वच्छता जाणावू लागली. कुठेही बघावे तर टापटीप. मग त्याचे कारण शोधता शोधता जपानी लोकांचे निरीक्षण करण्याचे व्यसन लागले (हो... हो! आले लक्षात तुम्हाला काय वाटतेय ते, त्यात जपानी ललनाही आल्याच). पहिल्या दौर्यातले ह्या स्वच्छतेबद्दल असलेल्या जागरुकीचे आलेले काही अनुभव...
एके दिवशी सकाळी ९:०० वाजता ऑफिस गाठताना लागणार्या एका फुटपाथवर टाइल्स बदलायचे काम चालू होते. व्यवस्थित पिवळ्या रंगाच्या पट्ट्या लावून चौकोनी ब्लॉक तयार करून त्यात सर्व सामग्री आणि कामाची आयुधे ठेवून दोघेजण त्यांचे काम मन लावून करत होते. 'काम चालू रस्ता बंद' अशी पाटी न लागता 'तुम्हाला होणार्या असुविधेबद्दल क्षमस्व' असा दिलगीरी व्यक्त करणारी पाटी होती. हे सर्व बघून पुढे निघून गेलो. दुपारी जेवायला बाहेर आलो तर ती पाटी आणि पिवळ्या पट्ट्या गायब आणि तिथे सकाळी काही काम चालू असण्याचे नामोनिशाणही नव्हते. आश्चर्य वाटून गडबडीत निघून गेलो. दुसर्या दिवशी त्याच फुटपाथवर पुढच्या ब्लॉकमध्ये टाइल्स बदलायचे काम चालू होते. परत दुपारी एकदम चकाचक. मग ऑफिसमधल्या एका जपानी मित्राला त्याबद्दल विचारले तर तो चकित होऊन माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेर्याने बघायला लागला व म्हणाला, 'अरे त्या दोन कर्मचार्यांना त्यांच्या ठरविक वेळेत संपेल इतकेच दिले जाते व ते त्याचे नियोजन करून तेवढीच जागा व्यापुन काम पुर्ण करतात. उगाच जास्त काम हाती घेतले तर रस्ता बंद होउन सर्वांचा खोळंबा नाही का होणार?'
बर्याच सबवे मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर टाइल्स लावलेल्या आहेत, छोटे-छोटे चौकोन असलेल्या टाइल्स. एकदा एका रविवारी मेट्रो स्टेशनवर गेलो असताना दिसले की पाणी मारून त्या भिंती धुतल्या जात होत्या. भिंती धुतलेले पाणी जाण्यासाठी जिन्याच्याकडेने जागा सोडून त्यातुन पाणी पाटाच्या पाण्याप्रमाणे निचरा होऊन जाईल ह्याची सोय केलेली होती. त्यानंतर काही वयस्कर माणसे हातात कडक दातांचे ब्रश घेऊन त्या टाइल्समधील छोट्या-छोट्या चौकोनांमधील फटींमध्ये अडकलेली घाण साफ करत होते.
ह्यानंतर माझा ह्या जपान्यांविषयीचा आदर दुणावला आणि मग मी त्यांच्या सामाजिक वागणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यात जाणवले ते म्हणजे त्यांना असलेला त्यांच्या देशाविषयीचा प्रचंड अभिमान. प्रचंड काम करून आपल्या देशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याची महत्वाकांक्षा. देशाच्या अभिमानाला धक्का लागेल असे काही झाले जर हाराकीरीच करतील अशी ही माणसे. त्याची प्रचिती आलेले हे अनुभव...
एकदा मी आणि माझा मित्र सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी जायला म्हणून एका सबवे स्टेशनवर तिकीट काढून गाडीची वाट बघत होतो. वाट बघत असतानाच एका सहकार्याचा ऑफिसातून फोन आला की ऑफिसात यायची गरज नाही. मग तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी एका तिकीटयंत्राकडे (तिकीटयंत्रात तशी सोय असते) जाऊन आम्ही दोघे खटाटोप करत होतो. त्यावेळच्या जपान दौर्यात मला जपानी येत नव्हते. त्यामुळे नेमके काय करायचे हे कळत नव्हते. त्या यंत्राच्या बाजुलाच एक जपानी माणुस उभा होता व आमच्याकडे बघत होता. ही जपानी माणसे तशी फार लाजाळू आणि अबोल असतात (पण त्यांचे रूप हे नामाबीरु किंवा साके प्यायल्यानंतर एकदम विरूद्ध होऊन जाते). तो बराच वेळ आमच्याकडे बघत होता मग जरा धीर करून आमच्याकडे येऊन म्हणाला, 'सॉरी मला इंग्लीश जास्त येत नाही, पण तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का, काही मदत करू का?' आमची अवस्था आंधळा मागतो एक डोळा... अशी झाली. त्याला आमची समस्या सांगितल्यावर त्यानेही बरीच झगडाझगडी केली त्या मशिनशी पण त्यालाही काही जमले नाही. 'एक मिनीट', म्हणून तो गायब झाला. माझ्या बिहारी मित्राने लगेच त्याच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. पाच सात मिनीटांनी तो आला तो एका रेल्वे कर्मचार्याला घेऊनच. मग त्या दोघांनी जपानीमध्ये बरीच काही बडबड केली आणि त्या यंत्रावरही बरेच काही केले. शेवटी यंत्र बिघडले आहे असे सांगुन तो रेल्वे कर्मचारी निघुन गेला. आमच्या दोघांच्या चेहेर्यावरील भाव बघून त्या माणसाने आमचे तिकीट कुठपर्यंतचे आहे ते विचारले. मग त्याने ते तिकीट आमच्याकडे मागितले आणि त्या तिकीटाएवढे पैसे काढून आम्हाला दिले व म्हणाला, 'तुम्हाला ह्या तिकीटाचे पैसे परत घ्यायला स्टेशनमास्तरशी बोलायला प्रोब्लेम येईल मी बघतो काय करायचे ते'. एवढे बोलून वर परत आम्हालाच त्रास झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत सॉरी म्हणाला. हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे पण त्यानेच, मदत करून वर आम्हाला थॅन्क्यु म्हणायची संधी न देता, सॉरी म्हणणे हे लख्ख आठवते आहे. माझा बिहारी मित्र रडला होता त्यावेळी. त्या माणसाने आम्हाला मदत करण्यामागची भावना अशी की ह्या परदेशी लोकांचे माझ्या देशाविषयी गैरसमजानेसुद्धा मत खराब होऊ नये!
एकदा मी धाडस करून एकटाच तोक्यो स्टेशन फिरायला गेलो. ते जमिनीखालचे स्टेशन एवढे प्रचंड आहे की जणू एक शहरच वसले आहे. त्यावेळी भाषा येत नसल्यामुळे आम्ही ग्रुपमध्येच फिरायचो. पण त्यावेळी मी आता सर्व स्टेशन्स समजली ह्या आत्मविश्वासाने (फाजील) एकटाच गेलो. आणि त्या तोक्यो स्टेशनवर हरवलो. काही केल्या कुठे जायचे कळेना. एकही पाटी इंग्रजीत नाही (का म्हणून लावावी?) कोणाशी इंग्रजीत बोलायची सोय नाही. जवळ मोबाइल नाही, भयंकर घाबरून गेलेलो. इकडे तिकडे फिरता फिरता एके ठिकाणी एका दुकानात एक डेंटिस्ट चक्क त्याचा दवाखाना थाटून बसला होता. आता तो जरी डेंटिस्ट असला तरीही डॉ़क्टरच. त्यामूळे त्याला इंग्रजी येत असणार म्हणून मी भयंकर खुष झालो. त्याच्याकडे जाऊन मी, मी हरवलो आहे, मला जपानी येत नाही, मला मोन्झेन नाकाचो ह्या स्टेशनला जायचे आहे, कसे आणि कुठुन जायचे, मदत कराल तर खुप उपकार होतील अशी सरबत्ती चालू केली. त्याने सर्व शांतपणे ऐकून घेतले. मग मला हाताने थांबायची खूण करून कुठेतरी निघून गेला. आता तो एका पेशंटच्या दातातले किडे तसेच वळवळत ठेऊन गेला असल्याने परत येईल ह्याची खात्री होती. गेला असेल नकाशा आणायला असा विचार करून मी शांतपणे बसून होतो. तो डेंटिस्ट १५-२० मिनिटांनी परत आला. त्याच्याबरोबर एक माणूस होता. माझ्याजवळ आल्यावर त्या माणसाशी काहीतरी बोलून मला त्याच्या हवाली करून त्याच्या पेशंटकडे निघून गेला (मला खात्री आहे त्याने त्याच्या पेशंटबरोबरच त्याच्या दातातल्या किड्यांचीदेखिल माफी मागितली असेल दिलेल्या तसदीबद्दल). त्या नविन माणसाने माझ्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली व म्हणाला, 'त्या डेंटिस्टला इंग्रजी थोडे थोडे कळते पण बोलता येत नाही म्हणून तो मला घेऊन आला आहे, बोला मी आपली काय मदत करू?'
ह्या अनुभवांनंतर, ह्या देशात परत यायचे आणि यायचे ते ह्यांची भाषा शिकुनच, त्यांच्याशी संवाद साधायला, ही खुणगाठ बांधूनच परत आलो. आल्यावर पुणे विद्यापिठात जपानी शिकायला सुरूवात कली आणि नशिबाने परत जपानला जायचा योग आला.
ह्या दुसर्या फेरीतील अनुभव पुन्हा केव्हातरी. :)
वाचने
14229
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ...
डानरावांशी सहमत. पण तच वेळी
In reply to छान ... by छोटा डॉन
डानरावांशी सहमत. पण तच वेळी
In reply to छान ... by छोटा डॉन
काय वेळ आली आहे, चक्क
In reply to डानरावांशी सहमत. पण तच वेळी by प्रीत-मोहर
तुम्ही आमच्याशी सहमत झालात
In reply to काय वेळ आली आहे, चक्क by सोत्रि
हे असं काही वाचलं की एक्दम
+१
In reply to हे असं काही वाचलं की एक्दम by शिल्पा ब
अहो साहेब, बहुतेकजण माझ्या
In reply to +१ by प्रास
सुरेख वर्णन...
सुरुवात झकास झालीये सोत्री.
अरे वा..
स्वगता बद्दल +१
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
हम भी ...
एक दिवस असा आणु कि परदेशी लोक
In reply to हम भी ... by अर्धवटराव
मस्त लिहिले आहे.
आवडले.
मस्तच!
लॉस्ट अँड फाऊंड !!
In reply to मस्तच! by दादा कोंडके
कुणाला जपानी गादीचा अनुभव आहे
कुणाला जपानी गादीचा अनुभव आहे
In reply to कुणाला जपानी गादीचा अनुभव आहे by भरत कुलकर्णी
छान लिहिलंय, धन्यवाद.
छानच अनुभव कथन आवडले
छान लिहिलय. सोत्री, पुढच्या
मस्त लिहिले आहे रे सोत्र्या.
(No subject)
In reply to मस्त लिहिले आहे रे सोत्र्या. by मृत्युन्जय
येडचाप नाहि हो...
In reply to मस्त लिहिले आहे रे सोत्र्या. by मृत्युन्जय
मस्त
चैतन्य, अरे तुझ्याकडे पण अजून
In reply to मस्त by चैतन्य दीक्षित
झकास
सोत्रि पेश्श्ल लेख . अजुन येउ द्या
असंबद्ध लेखनाचा निषेध!
योगप्रभु, तुम्हाला झालेल्या
In reply to असंबद्ध लेखनाचा निषेध! by योगप्रभू
साहेब! घ्या की मिटवून...
In reply to योगप्रभु, तुम्हाला झालेल्या by सोत्रि
शेपूट
In reply to साहेब! घ्या की मिटवून... by योगप्रभू
खरं बोललात...
In reply to शेपूट by श्रावण मोडक
एक जपानी कॉकटेल टाकून
In reply to योगप्रभु, तुम्हाला झालेल्या by सोत्रि
+१
In reply to असंबद्ध लेखनाचा निषेध! by योगप्रभू
झकास अनुभव. आवडले !!
झकास लेखन सोत्रि
सही
सुंदर लेख
नुसता चीन नाही
In reply to सुंदर लेख by कपिलमुनी
छान लेख!
छान अनुभव आहेत रे. गेल्या
तुम्ही नेमेके कुठे असता ??
In reply to छान अनुभव आहेत रे. गेल्या by गणपा
माझेही हे निरीक्षण ...
क्र. ६...
सहा चा घोळ
In reply to क्र. ६... by तर्री
आजही
In reply to सहा चा घोळ by विनीत संखे
छान .. आपला देश पाच वर्षे
सोत्री आजवर केवळ प्रतिसादातून
मी थोडं निगेटीव्ह देखील ऐकलं आहे !!
<<तरुणांमध्ये लग्न करुन
In reply to मी थोडं निगेटीव्ह देखील ऐकलं आहे !! by अर्धवटराव
नेमकं कारण ठाऊक नाहि...
In reply to <<तरुणांमध्ये लग्न करुन by शिल्पा ब
होय हे खरे आहे. लिहीतो ह्यावर
In reply to मी थोडं निगेटीव्ह देखील ऐकलं आहे !! by अर्धवटराव
सुरेख
तुमचे लेख नेहमीच छान असतात.
सुंदर लेखन... पुढच्या भागाची
घोर कलियुग...
In reply to सुंदर लेखन... पुढच्या भागाची by मदनबाण
खीक्क
In reply to घोर कलियुग... by वपाडाव
या आफ्रिकन्स लोकांच्या *** *
In reply to खीक्क by सोत्रि
भापो रे... पण अफवांच्या नादी
In reply to घोर कलियुग... by वपाडाव
मस्त धागा
धन्यवाद!
In reply to मस्त धागा by हंस
Roads are full of Idiots या
In reply to मस्त धागा by हंस
खि खि खि
भारतातील प्रतिक्रिया!
In reply to खि खि खि by अर्धवटराव
एक अनुभव..
तुम्ही तुमच्या २वर्षाच्या
In reply to एक अनुभव.. by बिजुरीया
हाच तर फरक आहे भारतात आणि
In reply to तुम्ही तुमच्या २वर्षाच्या by शिल्पा ब
माझा 7 वर्षाचा मुलगा एकटा
In reply to हाच तर फरक आहे भारतात आणि by बिजुरीया
खरेच आहे..अनुभव घेतल्याशिवाय
In reply to माझा 7 वर्षाचा मुलगा एकटा by रेवती
बरोबर आहे. अशा अनुभवांसाठीतरी
In reply to खरेच आहे..अनुभव घेतल्याशिवाय by बिजुरीया
जब्राच
In reply to बरोबर आहे. अशा अनुभवांसाठीतरी by शिल्पा ब
कस्चं कस्चं!
In reply to जब्राच by दादा कोंडके
ते जपान आहे का चीन ?
In reply to बरोबर आहे. अशा अनुभवांसाठीतरी by शिल्पा ब
बस का राव?
In reply to ते जपान आहे का चीन ? by अर्धवटराव
बस का....
In reply to बस का राव? by दादा कोंडके
http://www.youtube.com/watch?
In reply to ते जपान आहे का चीन ? by अर्धवटराव
आवडला.
जपानबाबती मित्राने त्याचा एक
आमच्या आम्रीकेत असं नसतं बॉ!
In reply to जपानबाबती मित्राने त्याचा एक by कानडाऊ योगेशु
खरंय! मित्रा कडुन जी कृती