सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
23 May 2012 - 9:07 am

विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या दोन्ही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686

http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.

http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.

तिसर्‍या भागात नवव्या डावापासून सुरुवात करायची आहे.
आनंद आणी बोरिस दोघांची गुणसंख्या समसमान आहे. उरलेल्या चार डावात दोघांकडे दोन दोन वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत. कालच्या डावात आनंदने बाजी मारुन आक्रमक झाल्याचे दाखवून दिले आहेच, बोरिस तर पहिल्यापासून शड्डू ठोकूनच खेळतोय त्यामुळे उरलेले चारही डाव रंगतदार होतील अशी आशा आहे.

-चतुरंग

क्रीडाआस्वादलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

24 May 2012 - 6:15 pm | भडकमकर मास्तर

वजीर पटाबाहेरून का?

प्रीत-मोहर's picture

24 May 2012 - 6:16 pm | प्रीत-मोहर

स्वारी स्वारी. हत्ती होता तो.

चतुरंग's picture

24 May 2012 - 6:20 pm | चतुरंग

.

भडकमकर मास्तर's picture

24 May 2012 - 6:25 pm | भडकमकर मास्तर

बी पट्टी उघडी...
सी पट्टीवर दोघांची दब्बल प्यादी.... अनयूज्वल...

रमताराम's picture

24 May 2012 - 6:30 pm | रमताराम

बी पट्ट्यात अडकला. तो हलला तर मागचे सी-५ प्यादे गमावणार तो. (उंटाने ठारच मारला तर.......? प्याद्यांचे स्ट्रक्चर पारच मोडून पडेल बोरिसचे........ चला चेक करून पाहू.....)

अपेक्षेप्रमाणे आनंदने ई प्यादे न हलवता बी प्याद्याने उंट घेतला. बॅक टू बॅलन्स.

भडकमकर मास्तर's picture

24 May 2012 - 6:44 pm | भडकमकर मास्तर

ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..

रमताराम's picture

24 May 2012 - 6:52 pm | रमताराम

आज आपल्याला आनंदचा खेळ अजाबात आवडला नाय. वजीरावजीरी झाल्यावर नि बोरिसने कॅसल मारल्यावर आनंदला मधल्या पटावर घोड्याच्या मदतीने मुसंडी मारण्याची संधी होती.

हॅट्स ऑफ टू बोरिस. वजीरावजीरीमधे मैदान गमावून, खुल्या मैदाना कॅसल करूनही पठ्ठ्याने अनिर्णित राखला गेम.

चतुरंग's picture

24 May 2012 - 6:57 pm | चतुरंग

आज आनंदने काहीतरी चमत्कारिक खेळ केला.मला वाटते त्याची काहीतरी गफलत झाली खेळताना. काही कॅलक्यूलेशन चुकले असावे. ओवर कॉन्फिडन्स नडला की काय? एकूण त्याचा आजचा खेळ आवडला नाही हे खरे.
बोरिसने जिगरबाज खेळ करुन आनंदला बरोबरीत रोखले. टोपी काढली आहे!
उद्या बोरिस पांढरा आहे, जाम मजा येणार!! :)

रमताराम's picture

24 May 2012 - 9:13 pm | रमताराम

१४व्या खेळीअखेर बोरिसने कॅसल केले तेव्हाच आनंदने घोडा ई-५ मधे आणून सी-६ च्या प्याद्यावर हल्ला करायला हवा होता. राजा त्याच पट्टीत असल्याने हत्ती मागे येऊन प्याद्याला आधार देऊ शकत नव्हता. एकमेव पर्याय म्हणजे पांढरा उंट डी-७ ला आणून बसवावा लागला असता त्याला. यातून मागचा हत्तीला बूच बसले असते. मग आनंदला इनिशिएटिव मिळाला असता. आज सारा गेम बोरिसची चाल नि आनंद फक्त प्रत्युत्तर देतोय असाच होता, त्याला स्वतः इनिशिएटिव घेऊन आपली चाल करण्याची संधीच मिळाली नाही.

चतुरंग's picture

25 May 2012 - 12:16 am | चतुरंग

सी ६ च्या प्याद्यावर हल्ला करता येत नाही ते विषारी प्यादे आहे!
कारण - घोडा ई५, मग हत्ती ई८, घोड्याने सी ६ प्यादे मारले की उंट डी७ मधे येऊन घोड्यावर हल्ला करतो आणि त्याचवेळी राजाला काटशह बसून घोडा पडतो! घोडा पुन्हा ई५ मधे येऊन शह काढू शकत नाही कारण तो बिनजोरी आहे आणि हत्तीने मारला जाईल.

त्याऐवजी १७ व्या खेळीला घोड्याने सी प्याद्यावर हल्ला केला (आणि त्याचवेळी स्वतःच्या डी३ मधल्या बिन्जोरी प्याद्याला सपोर्ट दिला असता) असता तर काळ्या हत्तीला डी५ मधून/किंवा उंटाला डी४ मधून सी६ ला सपोर्ट करावा लागला असता. (उंट डी७ मधे जाऊन सपोर्ट करु शकत नाही कारण एफ ७ प्यादे पडते आणि डी८ मधल्या हत्तीवर हल्ला होऊन तो स्वतःच्याच सवंगड्यांमधे चिणून मारला जातो!) :(

मग दुसरा घोडा डी४ मधे आणून बसवणे आणि मग ए३, बी४ अशी प्यादी ठकलून अ७ वरच्या प्याद्यावर हत्ती घालणे असे पर्याय होते असे वाटते. किमान ए३ तरी खेळायलाच हवी होती त्यामुळे घोडा नंतर जो बी ४ मधे येऊन बसला तो आला नसता!

असो. पुढच्या डावात आनंदने "ब्लॅकमॅजिक" करावी असे वाटते! :)

रमताराम's picture

25 May 2012 - 9:15 am | रमताराम

अजून राजा एफ-१ ला सरकलेला नाही इकडे दुर्लक्षच झाले की. :)

सतराव्या खेळीबाबत एकदम सहमत. उंट ए पट्टी आणण्याने फारतर हत्ती बी-१ मधे आणून मग बी प्यादे पुढे सरकवता आले असते, पण यातून मोठी मोहरी पुढे जाण्यास काही फारशी मदत होत नाही. तिथला डेड-लॉक लगेच फुटला असता तरी बोरिसचा काळा उंट परत बाहेर येऊन पटाच्या वरच्या बाजूला मध्यावर परत १४ व्या खेळीनंतरची स्थितीच निर्माण झाली असती. एकच फायदा, आता मी दुर्लक्षलेला राजा कोटात गेलेला असल्याने घोड्याने सी प्याद्यावर हल्ला करता आला असता. आता पांढरा उंट मदतीला येऊ शकत नसल्याने राजाला पुढे येऊन प्याद्याला संरक्षण द्यावे लागले असते. मग कदाचित आनंद मागच्या घोड्याने सी पट्ट्यातील पुढच्या प्याद्यावर मोर्चा लावू शकला असता. पण हे काही फार फायदेशीर झाले नसते, कारण बोरिसने घोडे एक्स्चेंज करून स्थिती परत बरोबरीत आणली असती. त्यामु़ळे मुळातच उंट ए-३ ही खेळी काही फारसे साधणारी नव्हतीच. :( मला तरी त्यामागचे लॉजिक लक्षात आले नाही.

भडकमकर मास्तर's picture

24 May 2012 - 6:55 pm | भडकमकर मास्तर

१२ डावांच्या अखेरीस जर ६-६ गुणांची बरोबरी असेल तर ३० मे रोजी टाय ब्रेकर खेळला जाईल. त्यात २५ मिनिटांचे ४ डाव खेळले जातील प्रत्येक दोन डावांच्या मध्ये १० मिनिटांची विश्रांती असेल. तरीही निर्णय झाला नाही तर ५ मिनिटांचे २ डाव एकूण ५ वेळा (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील, तरीही निर्णय झाला नाही तर 'सडन डेथ' डाव होईल.

हम्म्म्म्म्म्म्म

रमताराम's picture

25 May 2012 - 9:52 am | रमताराम

हा टायब्रेकर हा आचरट प्रकार आहे. अरे बारा डाव खेळूनही तो चॅलेंजर लेकाचा हरवू शकला नाही तर त्या माजी विजेत्याला विजेतेपद राखण्याचा हक्क हवा असे मला वाटते. त्याने ते आधीच मिळवले आहे. ते हिरावून घेण्यासाठी निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध व्हायला हवे चॅलेंजरचे. तसे होत नसेल तर हे टायब्रेकर म्हणजे रडीचा डाव खेळून म्हणजे चॅलेंजरला संधीमागून संधी देण्याचा प्रकार आहे.

चतुरंग's picture

25 May 2012 - 6:09 pm | चतुरंग

हा टायब्रेकर प्रकार पसंत नाहीये. त्यापेक्षा पूर्वी २४ डावांचा सामना असे तसा १६ डावांचा सामना ठेवावा कारण आता प्रायोजक, प्रेक्षक सर्वांनाच २४ -२४ डावांइतका प्रदीर्घ वेळ देणे शक्य नसावे. १६ डावांमधे जर आव्हानवीर काही करु शकत नसला तर आधीच्या खेळाडूनेच जेतेपद राकह्ले असे जाहीर करावे.

(अवांतर - २४ डावांची व्यवस्था येण्याआधी पहिल्यांदा सहा डाव जिंकणारा खेळाडू विजेता घोषित होई. अनिर्णित डाव धरले जात नसत. हा एक कसोटी बघणारा प्रकार असतो. कार्पोव्-कास्पारोव सामना तब्बल ५ महिने आणि ४८ डाव चालला शेवटी ५-३ असा कार्पोवच्या बाजूने स्कोर असताना सामनाधिकार्‍यांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला, आणि कार्पोव विजेता घोषित झाला, त्यांच्या मते प्रदीर्घ ताणाने खेळाडूंच्या तब्बेती बिघडलेल्या होत्या (कार्पोवचे वजन तब्बल १० किलोने कमी झाले होते, परंतु कास्पारोव टुणटुणीत होता!). या वादग्रस्त निर्णयाने कास्परोव चवताळला. त्याच्यामते सोविएत यूनियनला त्यांचे वर्चस्व मोडीत निघत आलेले बघवत नव्हते. कारण कास्पारोव नागरिकत्वाने रशियन असला तरी अर्धा अर्मेनियन - अर्धा ज्यू असल्याने त्याला दुजाभाव केला जात असे.)

भाग ४ प्लीज :)
लिहित नसलो तरी तुमची प्रत्येक प्रतिक्रीया वाचून डाव समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे