श्लील अश्लील

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
18 Sep 2011 - 1:18 pm

श्लील अश्लील

जन्मताक्षणी मी आईला विचारलं
माते माझा जन्म श्लील की अश्लील
माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील
मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो
मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील
ते एकरवानं उद्गारले
अश्लील अश्लील

शृंगारभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसकविता

प्रतिक्रिया

अभिजीत राजवाडे's picture

18 Sep 2011 - 9:57 pm | अभिजीत राजवाडे

हि श्लील-अश्लीलता प्रत्येक गोष्टी नव्या मार्तडांकडुन आजही थोपली जाते.
भन्नाट विचार.

अविनाशकुलकर्णी's picture

18 Sep 2011 - 10:13 pm | अविनाशकुलकर्णी

जे लिहिले आहे ते कळाले नाहि...
एका माकडीणीचा व तिच्या बेबी चा फोटो पण होता तो पण गायब..

अद्भुतरस...

चित्रगुप्त's picture

19 Sep 2011 - 3:02 am | चित्रगुप्त

दुर्बोधता हे आधुनिक कलेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, असे गंगाधर गाडगीळ की कोणीतरी म्हटलेच आहे....

पाषाणभेद's picture

18 Sep 2011 - 11:57 pm | पाषाणभेद

जे मोठ्यामोठ्या संत महंतांनादेखील जे कोडे सुटलेले नाही त्याच कोड्याचा प्रश्न एका नवजन्म घेणार्‍या बालकाला पडावा यात मोठे आश्चर्य आहे. एकाअर्थाने त्या बालकाची पुढली वाटचाल अध्यात्मिकमार्गावर होणार/ झाली असेल.

नितिन थत्ते's picture

19 Sep 2011 - 8:49 am | नितिन थत्ते

धर्ममार्तंड अश्लील म्हणाले तो "जन्म अश्लील" की विचारलेला "प्रश्न अश्लील"?

(श्लीलशिरोमणी ह भ प श्री दादामहाराजांचा फ्यान) नितिन थत्ते

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2011 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा

@- की विचारलेला "प्रश्न अश्लील"? :bigsmile: ढीशक्याँव..ढीशक्याँव... ए $$$$$ ढीशक्याँव...भागो $$ भागो$$ भागो$$ थत्तेचाचा आ गए,थत्तेचाचा आ गए.. ;-)

Nile's picture

19 Sep 2011 - 9:25 am | Nile

फोटो असल्याशिवाय या पाकृवर प्रतिक्रीया देणार नाही!

चित्रगुप्त's picture

19 Sep 2011 - 1:37 pm | चित्रगुप्त

सुरुवातीला मी वरती एक अर्भक वानराचा फोटो दिला होता, परंतु त्याचा या कवितेच्या विषयाशी फारसा संबंध नाही, असे वाटल्याने तो काढून टाकला आहे. त्यावेळीच हे स्पष्टीकरण द्यायला हवे होते, परंतु राहून गेले.
यात अन्य कुणाचा काही संबंध नाही.

नगरीनिरंजन's picture

19 Sep 2011 - 1:57 pm | नगरीनिरंजन

चित्र गुप्त.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Sep 2011 - 7:44 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. चित्रगुप्त, येवढे वैश्विक सत्य उघड करणारे आणि मनातल्या नसे नसेला पिळवटून टाकणारे हे लिखाण तुम्हाला का आणि कसे सुचले ह्या विषयी देखील थोडे लिहाना.

ऋषिकेश's picture

19 Sep 2011 - 9:26 am | ऋषिकेश

हे आधुनिकोत्तर लेखन आहे का? ;)
असे असल्यास वा वा चान चान!!
तसे नसल्यास कळले नाही असे बिंदास सांगतो :)

श्रावण मोडक's picture

19 Sep 2011 - 10:00 am | श्रावण मोडक

या लेखनात दम आहे असे वाटते आहे. माणसाच्या मूल्यविषयक कल्पनांवर भाष्य असावे हे. पण काय आणि कसे ते नीट सांगता येत नाही.
कॉलिंग घासुगुर्जी!

चित्रगुप्त's picture

19 Sep 2011 - 10:25 am | चित्रगुप्त

या लेखनासंबंधित माझ्या प्रकट व सुप्त मनातील जाणिवांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ते लिहून झाल्यावर इथे देइनच, त्यापूर्वी गुरुजी व अन्य काय म्हणतात, हे जाणून घेउ इच्छितो.

आजकाल तुमचा वेळ अज्जिबातच जात नै का? का हापिसात काम नै? अं?

चित्रगुप्त's picture

19 Sep 2011 - 11:23 am | चित्रगुप्त

अहो, कसले हापिस अन कसले काय...
'रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी', या जमातीतले आहोत आम्ही. जन्मजात फुर्सती पणाचे फुकट धंदे करणारे.

चिंतातुर जंतू's picture

19 Sep 2011 - 2:49 pm | चिंतातुर जंतू
  1. 'आपला तो बाब्या दुसर्‍यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही.
  2. धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.१

१. अधिक माहितीसाठी या पानावर 'Blasphemy and religion' हा भाग वाचावा.

मग यातून निष्कर्ष काय काढता येतील?

  1. कवी चारचौघांसारखाच आहे; अडचण असली तर ती धर्ममार्तंडांची आहे.
  2. ज्याच्या जन्माची धर्ममार्तंडांना अडचण होते असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावा ;-)
  3. ज्यानं टाकलेला फोटो इथे संपादित होतो असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावा लेखकानं स्व-संपादन करून फोटो काढलेला असल्यामुळे लेखक खोडसाळ असावा ;-)
नितिन थत्ते's picture

19 Sep 2011 - 6:33 pm | नितिन थत्ते

ओ मालक,
आमच्या प्रश्नाला उत्तर न देताच निष्कर्ष?

ज्याला अश्लील म्हटलं तो तुमचा जन्म अश्लील होता की तुमचा प्रश्न अश्लील होता (धर्ममार्तंडांच्या दृष्टीने)?

नितिन थत्ते

चिंतातुर जंतू's picture

19 Sep 2011 - 7:57 pm | चिंतातुर जंतू

तुमचा प्रश्न वाचून पंगा मोड ऑन ठेवला आहे. कधीतरी (कार्यबाहुल्य सरल्यानंतर) आणि कसेतरी (क्षमतेनुसार) टॅग बंद केला जाईल उत्तर दिले जाईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2011 - 8:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

1. 'आपला तो बाब्या दुसर्‍यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही.
2. धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.

'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का? माता ही साक्षात प्रेममूर्ती असल्यामुळे आणि कवितेत माता या शब्दाचा अर्थ पुरेसा धूसर असल्यामुळे म्हणीचा दुसरा भाग मातेला लागू पडेलच असं नव्हे.

पण एखादी माता धर्ममार्तंडही असेल तर ...

चिंतातुर जंतू's picture

19 Sep 2011 - 11:57 pm | चिंतातुर जंतू

'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्टे' ही म्हण धर्ममार्तंडांसंदर्भातच जास्त लागू नाही का?

हा आपला पूर्वग्रह आहे असे आमच्या स्वतःच्या उदाहरणावरून जाहीर करू इच्छितो. जे मूर्तिभंजक उदारमतवादी आमच्या आसपास आहेत ते आम्हांस बाब्येच वाटतात.* आता यातून आम्ही धर्ममार्तंड ठरत असू तर जळो तो धर्म. ;-)

* - हां आता आम्हास खुदुखुदू हसणारे काहीजण मूर्तिभंजक नसूनही आम्हास बाब्येच वाटतात ते असो.

चित्रगुप्त's picture

20 Sep 2011 - 1:35 am | चित्रगुप्त

जन्मास येणे अश्लील
प्रश्न विचारणेही अश्लील
म्हणून मार्तंड म्हणाले:
अश्लील अश्लील

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2011 - 7:31 pm | भडकमकर मास्तर

ही कविता सुद्धा मला दुसर्‍या महायुद्धातल्या ज्यू हत्याकांडावर आहे असे वाटू लागले आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2011 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> ही कविता सुद्धा मला दुसर्‍या महायुद्धातल्या ज्यू हत्याकांडावर आहे असे वाटू लागले आहे...

बाप रे...!

कवितेचे रसग्रहण केले तर आम्हा विद्यार्थ्यांना कविता समजायला मदत होईल.
मला या कवितेत कोणाचा जन्म होतोय हेच कळले नाही.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

19 Sep 2011 - 7:48 pm | परिकथेतील राजकुमार

मला या कवितेत कोणाचा जन्म होतोय हेच कळले नाही.

तुम्ही तो 'माकडांची आणि मनुक्षांची एकदा पैज लागते नदी किनार्‍यावर...' हा विनोद ऐकला नसावात,नाहीतर तुम्हाला असा प्रश्नच पडला नसता.

असे करा प्रा.डॉ. , तुम्ही योगप्रभू किंवा सोत्रिंना व्यनी करा. ते फार व्यवस्थीत समजावतील बघा.

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2011 - 9:31 pm | राजेश घासकडवी

ही सहा ओळींची कविता आहे, तिची जातकुळी एखाद्या चारोळीसारखी आहे. किंवा गजलच्या एखाद्या शेरासारखी. मला व्यक्तिशः यापेक्षा मोठ्या रचना आवडतात. किंवा एकावेळी अशा काहींचा संग्रह असावा अशी इच्छा असते.

कविता वाचून पहिल्यांदा आठवला असेल तर मेरीने जीझसला दिलेला व्हर्जिन बर्थ. हा उल्लेख भाषांतराच्या चुकीमुळे आला असं म्हणतात, पण धर्ममार्तंडांना ते जपावंसं वाटलं. मेरीला आपोआपच कौमार्याशी जोडलेलं पावित्र्य त्यामुळे प्राप्त झालं.

गर्भधारणा ज्या प्रक्रियेतून होते तिला अश्लील का बरं म्हणावं? मात्र धर्ममार्तंड, संस्कृतीरक्षक तसं म्हणताना दिसतात हेही खरंच. हे कवीला सांगायचं आहे.

शिल्पा ब's picture

19 Sep 2011 - 10:04 pm | शिल्पा ब

मला कविता प्रकार फारसा आवडत नाही. गाणे आवडते. असो.

बाकी व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते हा प्रश्न जगात कुठेही कोणालाही कसा पडला नाही याचेच आश्चर्य.

बाकी व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते हा प्रश्न जगात कुठेही कोणालाही कसा पडला नाही याचेच आश्चर्य.

ज्यांना पडायचा त्यांना पडलाय.

बाकी पार्वतीने गणपतीला कसा जन्म दिला या कथेवरदेखील आपल्याला प्रश्न पडून गेला असेल असे गृहित धरतो. असो.

शिल्पा ब's picture

20 Sep 2011 - 8:16 am | शिल्पा ब

हो, पण मी लहान असताना " ई ....पार्वती इतकी घाण रहायची की तिच्या मळापासुन छोटा मुलगा बनवता आला? " असं विचारुन धपाटे, शिव्या इ. इ. चा यथेच्छ अनुभव घेतलेला आहे.

मूकवाचक's picture

20 Sep 2011 - 9:39 am | मूकवाचक

उर्दू गझल मधे 'वाईज' च्या नावाने शायर खडे फोडतात त्या धाटणीची वाटते. फारच त्रोटक आहे. त्यामुळे आशय स्पष्ट होत नाही असे वाटले.

व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, याचे उत्तर समर्थांनी दासबोधात देऊन ठेवलेले आहे:

रजस्वलेचा जो विटाळ
त्याचा आळोन जाला गाळ
त्याचाच हा नरदेह केवळ
जाला असे

आता मग यात मातुश्री विवाहित वा अविवाहित, हा प्रश्नच उद्भवत नाही.

टीपः दासबोध वाचायचो, त्याला आता पस्तीस वर्षे उलटली आहेत, त्यामुळे एखाद-दुसरा शब्द इकडेतिकडे झाला असेल, पण अर्थ तोच आहे. नेमका समास व ओवी कोणती, हे लक्षात नाही. जिज्ञासूंनी या निमित्ताने दासबोध चाळल्यास उत्तमच.

शिल्पा ब's picture

20 Sep 2011 - 8:20 am | शिल्पा ब

हल्ली त्याला "टेस्ट ट्युब बेबी" म्हणतात असे ऐकुन आहे...त्याकाळी जर असे ज्ञान भारतीयांकडे होते तर मग पुढे काय झाले? का हे पण पुष्पक विमानासारखं!!

चित्रगुप्त's picture

20 Sep 2011 - 10:48 am | चित्रगुप्त

या कवितेत काही कळले नाही, अश्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या रास्तच आहेत, असे वाटून या कवितेचा धांडोळा घेत आहे:

लहान मुलांना प्रत्येक गोष्टीविषयी खूप जिज्ञासा असते, व त्यापोटी ते खूपसे प्रश्न विचारात असतात, हे आपण बघतोच. या जिज्ञासेची व प्रश्नांची सुरुवात त्यांना बोलता येउ लागल्यावर आपल्याला प्रत्यक्ष प्रश्न विचारू लागतात, तेंव्हा होते, असे जरी भासत असले, तरी त्याचा प्रारंभ जन्म-क्षणापासून वा गर्भावस्थेपासूनसुद्धा होत असेल, असे मला वाटते. विशेषत: ज्ञानेश्वर, मोझार्ट इ. सारख्या प्रतिभावंतांच्या बाबतीत असे घडणे सहज शक्य आहे.

मनुष्याच्या आयुष्यातील अगदी पहिली घटना म्हणजे स्वत:चा जन्म. तेंव्हा पहिली जिज्ञासा स्वत:च्या जन्माबद्दलच असू शकते. या कवितेतील नवजात अर्भक स्वत:च्या जन्माबद्दलच प्रश्न विचारत आहे. ते आपला प्रश्न आईला विचारणार, हे स्वाभाविकच आहे.
.... परंतु त्याने विचारलेला प्रश्न फार विचित्र आहे. अमुक एक गोष्ट श्लील की अश्लील, असा प्रश्न त्याला पुढे अनेक वर्षांनंतर पडू शकतो, परंतु जन्मल्या जन्मल्या असे कसे शक्य आहे?

इथे आपल्याला असा कयास करावा लागतो, की हा प्रश्न त्याच्या मागील जन्माच्या स्मृतीतून आला असावा.

धर्ममार्तंडांच्या उल्लेखामुळे गॅलिलिओ, ज्ञानेश्वर, डार्विन वगैरे आठवतात.

श्लील की अश्लील असा प्रश्न, व धर्ममार्तंडांचे उत्तर 'अश्लील अश्लील' यावरून पूर्व-जन्मातील एखाद्या लेखकाचा, कवीचा, चित्रकाराचा हा पुनर्जन्म असावा, असे वाटू लागते.
या संदर्भात कालिदास, काकोडकर, फ्रॉईड, राजा रविवर्मा, एम एफ हुसेन, यांची आठवण होते.

यातील हुसेन यांचे उदाहरण अगदी अलिकडचे. ते विख्यात चित्रकार तर होतेच, शिवाय कवीही होते. म्हणजे सरस्वतीची त्यांच्यावर विशेष कृपा होती, असे म्हटले पाहिजे. परंतु या सरस्वतीच्या चित्रावरूनच आपल्याला मरणसमयी सुद्धा मायदेशात परतता आले नाही, हे शल्य उरी घेउनच ते गेले. आपण 'श्लील-अश्लील-विवेक' करायला हवा होता, अशी बोचणीही त्यांना लागली असेल.

अश्या परीस्थित नवीन जन्म घेतल्यावर ते काय करतील?
मृत्युसमयी जो विचार, वासना मनात असते, ती पुढील जन्मात तिथूनच पुढे चालू होते, असे सांगितले जाते. त्यामुळे नवीन जन्म घेता घेता त्यांनी आत्ताच हा श्लील-अश्लीलतेचा घोळ मिटवलेला बरा, म्हणून आईला प्रश्न विचारलेला दिसतो. आईने त्यांना प्रेमभराने, आपुलकीने "बाळा श्लील रे श्लील" असे उत्तर दिले.

परंतु खरा प्रश्न धर्ममार्तंडांच्या विरोधाचा आहे, म्हणून ते त्यांनाही तोच प्रश्न विचारतात.
मार्तंडहो, माझा जन्म श्लील की अश्लील? (मार-तंड: मारणारे, तंडन करणारे, इ.इ.)

एरव्ही एक-मेकांचा हेवादावा करणारे, प्रसंगी खून सुद्धा करणारे मार्तंड अश्या प्रसंगी एक होऊन 'एकरवाने' म्हणतात:
अश्लील अश्लील.
(आई प्रमाणे ते 'बाळा', 'रे' असले आपुलकीदर्शक शब्द वापरत नाहीत, तर ताबडतोब अश्लील अश्लील असे ठणकावून सांगतात. जणु तेवढे एकच उत्तर त्यांना ठाऊक असते)

.....असा या कवितेचा अर्थ लावता येतो.
____________________________________________________
परंतु खरोखरच असा सर्व विचार करून, ठरवून ही कविता रचली गेली आहे का? याचे उत्तर "नाही" असे आहे. या कवितेच्या निर्मिती संबंधी आणखी बरेच लिहिण्याजोगे आहे, आणि ते लिहिल्याने काव्यनिर्मिती वा एकूणच कलानिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश पडू शकतो. परंतु वेळेअभावी सध्या इथेच थांबावे लागत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2011 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनःपूर्वक आभार..!!!

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

20 Sep 2011 - 11:00 am | नितिन थत्ते

पुनर्जन्माचं झेंगट लक्षात आलं नाही :( म्हणून जन्म अश्लील की प्रश्न अश्लील अशी शंका मनात आली. :)

ऋषिकेश's picture

20 Sep 2011 - 1:41 pm | ऋषिकेश

म्हटलं ना की हे आधुनिकोत्तर आहे..
वा वा चान चान ;)

विसुनाना's picture

20 Sep 2011 - 3:14 pm | विसुनाना

गौतम ऋषी असते तर कदाचित श्लील-श्लील म्हणाले असते. :)
एनी वे, कविता आवडली.

धनंजय's picture

21 Sep 2011 - 1:36 am | धनंजय

गमतीदार कविता.

(कविता अशी अतिस्पष्ट असली, की मला त्यातून मिळणारा आनंद थोडा कमी होतो. कदाचित चित्र हवे होते. मूळ प्रसिद्धीत दिलेले चित्र मी बघितले नाही. चित्राखाली शीर्षककविता म्हणून चित्र+कविता ही जोडकलाकृती कदाचित बहुपदरी होती.)

खिलजि's picture

7 May 2018 - 1:57 pm | खिलजि

हि कविता तर एखाद्या प्रकांडपंडितालाही मौनव्रत धारण करायला लावेल अशी बनली आहे . कलियुगाची महती

कवितेत उतरली आहे . मला वाटतं पुढचं भविष्यकालीन भाकीतच या कवितेमध्ये आवतरले आहे ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन भाकीतच..

ते नेमके कोणते ? ( कवि महोदयांना त्यात पूर्वजन्म दिसतोय, ते ऋषिकेश म्हणतात आधुनिकोत्तर वगैरे आता आपण भविष्याचे भाकीत बघताय तरी कोणते ?)

खिलजि's picture

8 May 2018 - 1:12 pm | खिलजि

थोड्याच वेळात व्यनि करेन साहेब . जो अर्थ मी घेतला आहे या कवितेतून तो फारच भयानक आहे . इथे जाहीर व्यक्त होणे योग्य नाही . मला वाटतं , हि चार वाक्य पुढे जाऊन खरी होणार आहेत इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि आता तर त्याची सुरुवातही झाली आहे . आपण आजकाल वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांवरुन हे ओळखू शकतो सहज . एकंदरीत कविता जरी छोटी असली तरी खूप गहन आहे .

माहितगार's picture

8 May 2018 - 2:16 pm | माहितगार

भारतीय राज्यघटना महिलांना निवडस्वातंत्र्य देते, आणि जन्माधारीत कोणत्याही विषतेस नाकारते , त्यामुळे सर्व जन्म कायद्याने आणि ज्या गोष्टीत त्या जन्मलेल्या गोष्टीत त्या बाळाची काहीच चूक नाही तेव्हा नैतीकदृष्टीनेही बाळासाठी श्लील असतात. त्या स्त्रीवर -बाळाच्या आईवर - अत्याचार झाला असेल तर अशा अत्याचार करणार्‍या व्यक्तीचे वागणे आणि धर्ममार्तंडांचे व्यक्ती स्वातंत्र्यात अनावश्यक दखलंदाजी करणे अश्लील असते. असा स्पष्ट संदेश देण्यास कवी कमी पडतोय म्हणून तुम्हाला खासगीतून व्यनि पाठवण्याची गरज वाटते आहे का ? या पलिकडे जाऊन काही विशेष अर्थ आपण काढत असल्यास खासगीतला व्यनिची प्रतिक्षा नक्किच आहे .

जन्माधारीत कोणत्याही विषमतेस नाकारते

खिलजि's picture

8 May 2018 - 2:39 pm | खिलजि

व्यनि केलेला आहे उत्तरासहित आणि अशा करतो कि त्याला उत्तरही व्यनीमधूनच मिळेल . इथे मंचावर नको .

सिद्धेश्वर

अक्षय कापडी's picture

7 May 2018 - 6:07 pm | अक्षय कापडी

नाही आवडल मला काहीतरीच श्लील अश्लिल म्हणे

माहितगार's picture

8 May 2018 - 1:25 pm | माहितगार

कवितेत दोन परस्पर विरोधीभाग आहेत, कोणता भाग नाही आवडला , पहिला कि दुसरा ?

कर्नलतपस्वी's picture

30 Nov 2022 - 6:56 pm | कर्नलतपस्वी

कवीता व त्यावरील कविवर्यांच्या स्पष्टीकरणानंतर असे वाटते की साक्षात्काराची ठिणगी पडली व दुर्बोध कवीतेचा जन्म झाला.

समाज श्लील, अश्लील याची व्याख्या काळानुरूप वेग वेगळी करतो. धर्म मार्तंड आपापल्या सोईनुसार अर्थ काढतात.

पुराणात,इतीहासात अनेक अशी उदाहरणे दाखवता येतील की ज्या बाळांच्या जन्माची पार्श्वभूमी एक सारखीच आहे पण प्रत्येकाला वेगवेगळे मापदंड लावले गेले. हे माझे वैयक्तिक मत आहे. गदारोळ माजू नये म्हणून स्पष्टीकरण देत नाही.

बाळाचा जन्म श्लील का अश्लील ठरवण्याचा अधिकार फक्त आईलाच. सांप्रत काव्यात कविवर्य स्पष्टीकरण देताना माऊलींचे उदाहरण देत धर्ममार्तांडांच्या थोतांडकडे लक्ष वेधून घेतात.

कवीतेची दुर्बोधता लक्षात घेता, कविवर्य ग्रेस यांची आठवण होते. वर वर साधे सोपे दिसणारे शब्द वाचताना, वाचक चक्रव्यूहात सापडल्याचा अनुभव करतो. कवीवर्य ग्रेस आपली खंत खालील कवीतेत अशा प्रकारे व्यक्त करतात. शब्दरचना असबंध वाटते. कवीच्या मनात काय विचार असतील याची सहज कल्पना येत नाही व कवीता दुर्बोध वाटते. मी वाचलेली कवीता व कळालेला अर्थ खालील प्रमाणे.

कावळ्यांचा रंग

कुणी आपले म्हणेना
कुणी बिलगेना गळा
कंठ दाटताना झाला
रंग कावळ्यांचा काळा....

नसानसांतून वाहे
फणा उगारून साप,
दूर सावल्यांचा घोळ
माझे नाचवितो पाप...

कुणी आढ्याला बांधली?
रात्र आंधळ्या कौलांची
चंद्र पडला मरून
इथे पहाडाच्या खाली...

ही कविता ग्रेस यांनी बहुतेक त्यांच्या कवितांच्या आलोचनेला त्रस्त होऊन लिहिली असावी. जसे कावळ्याला कोणी आपले म्हणत नाही त्याचा तिरस्कार करतात तसेच त्यांच्या प्रत्येक कविते वर दुर्बोधतेचा आरोप केला. कवीवर्य म्हणतात लोकांना माझ्या कवितांबद्दल सांगून सांगून माझा कंठ दाटून येतो आणि शेवटी माझा रंगही कावळ्याच्या रंगाप्रमाणे काळा पडतो.

तद्वतच वरील कवीता मला वाटते.

चित्रगुप्तांनी निर्माण केलेल्या कूट प्रश्नाला त्यांचे उत्तर माहित असेल तर मग हा खटाटोप कशाला पाहिजे?
धर्म मार्तंड शब्दात धर्म का घुसवला आहे? यात धर्माचे काही देणे घेणे नाही. 'मार्तंड' म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे किंवा समाजात स्वतः चे स्तोम निर्माण केलेले लोक. जीतेंद्र आव्हाड यांची गणना करावी की नाही हे वाचकांनी ठरवावे.