क्रांती -- काही असे काही तसे ,,, पुन्हा पुन्हा जगावेसे

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
18 Aug 2011 - 11:34 pm

हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला).

मा. सुरेश भटांच्या आशिर्वाद अगदी सुरुवातीच्या काळात लाभले क्रांतीला आणि जसं काही नदीनं उगमानंतर लगेचच समोरच्या कड्यावरुन झोकुन द्यावं तसं तिनं कविता आणि गझलांच्या विश्वात स्वताला झोकुन दिलं, घरची मोठी लायब्ररी, बाबांचं आपल्या लेकरांना वाचनाचं वेड लावण्याचं वेड, या आणि अशा ब-याच गोष्टींनी या काव्यसरितेला वेग दिला,योग्य वेळी मिळालेलं प्रोत्साहन आणि कौतुकाच्या झ-यांनी ह्या नदीचा विस्तार वाढवला नसेल कदाचित पण त्या पाण्याला वाहतं ठेवलं, त्याला त्याचा मुलभुत गुणधर्म, वाहणं विसरु दिला नाही.

पुढं ही नदी,डोंगर द-यांतुन पठारावर आली तसं वाहण्याच्या गुणधर्माबरोबर कर्तव्याच्या तीरांचा एक नाजुक बंध तिला मिळाला,त्या बंधात स्वताला सुखानं बांधुन घेत आणि त्याच्या सुरक्षित मर्यादांच्या कठिण पणानं अजुन सुखावत ती पुढं वाहत राहिली, आज पर्यंत त्या नदिच्या एका एका वेगळ्या वेगळ्य़ा वळणानं, छोट्या छोट्या खळाळांनं आपल्या सर्वांना मोहित केलं, क्षणभर आपली दुखं, कष्ट विसरायला लावले, आज अशाच काही वळणांचा, आंतरप्रवाहांचा अन त्या डोहातल्या भोव-यांचा एक एकत्रित अनुभव आपल्यासाठी, या रसिकांसाठी सादर केला जातो आहे.

नदीला स्व:ताचं नाव असलं तरी तिच्या प्रवाहातल्या या मोहमयी डोहांना पण वेगळी नावं आहेत, एक आहे
’असे ही तसे हि’ आणि दुसरं ’ अग्निसखा’.

श्री. परांनी इथं माहिती दिलेली होतीच, त्यानुसार क्रांतीच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सात ऑगस्ट, रविवारी नागपुर येथं साजरा केला, त्याचा हा रिपोर्ट.

या दोन पुस्तकांबद्दल थोडं साहित्यिक लिहुन झाल्यावर थोडी तांत्रिक माहिती, हा सोहळा साजरा केला नागपुरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभाग्रुहात, रविवारी संध्याकाळी.

वर फोटोत दिसतंय त्याप्रमाणे प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर यांचे आगमन झाल्यावर, क्रांतीची ज्येष्ठ कन्या अश्विनिनं कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, सुरुवात मा. श्री. गिरिश गांधी यांच्या अतिशय मोजक्या शब्दातल्या अन थेट भाषणानं झाली.

श्री. गिरिश गांधी.

यानंतर दिप प्रजव्लन, सरस्वति पुजन झालं, आणि नंतर मुख्य सोहळा झाला प्रकाशनाचा,

व्यासपिठावरच्या मान्यवरांनी त्या सोनेरी फिती सोडुन चमकणा-या कागदात बांधलेल्या दोन पुस्तकांना त्यांचा पहिला मोकळा श्वास घेउ दिला अन त्या पुस्तकांएवढंच छान अन मोठं हसु क्रांतीच्या चेह-यावर फुलुन आलं,

या कविता, गझला या तिला तिच्या लेकरासारख्याच, पण लेकराला जन्म देताना एक विशिष्ट कालावधि असतो तो माहित असतो, पण हे कविता गझलांचं तसं नसते, त्या आधी मनात, मेंदुत जन्मतात, मग कागदावर उतरतात आणि कालांतरानं पुस्तकरुपात येतात, कविला किंवा कवयित्रिला हे जन्मचक्र तीन वेळा भोगावं लागतं, भोग म्हणुन तो सुखाचा असतो अन वेदनेचाही, पण त्या सर्व प्रवासात हा एक थांबा, एक विसावा फार महत्वाचा असतो.

यानंतर, प्रमुख पाहुणे मा. गझलनवाज श्री, भिमराव पांचाळ उर्फ दादांनी, मराठी गझलांचं विश्व आणि त्यातल्या स्त्री गझलकारांविषयी सुंदर विवेचन केलं, आधीच मराठित गझल हा तसा थोडासा दुर्लक्षित काव्य प्रकार अन त्यात पुन्हा स्त्री गझलकार हे तर दुर्मिळात दुर्मिळ या परिस्थितीवर त्यांनी जे भाष्य केलं त्याचा त्यांना निश्चितच अधिकार आहे. त्यांच्या बोलण्यातुन त्यांच्या या अधिकाराबद्दल समोरच्याला करुन दिली जाणारी नम्र जाणिवसुद्धा जाणवत होती पण गर्व नव्हता, राजानं तो राजा आहे हे समोरच्याला जाणवुन दिलंच पाहिजे पण त्याच्या राजेपणाचा समोरच्याला बोजडपणा न वाटता असं दादांचं भाषण झालं, त्यांनी क्रांतीला शुभेच्छा आणि आशिर्वाद तर दिलेच पण त्याचबरोबर ’ आता थांबशील तर बघ’ असा सज्जड दम पण दिला. या गझलांपैकी काहि गझला ते त्यांच्या गझलगायनाच्या कार्यक्रमात घेणार असल्याचंही त्यांनी सुचित केलं.

कोणतंही लेखन हे फक्त आपल्या मित्र आप्तांनी डोक्यावर घेउन नाचलं म्हणजे चांगलं असं होत नाही, त्या मधलं बरं वाईट निवडायला एक टिकाकार, एक समिक्षक असावा लागतो, ति भुमिका या ठिकाणी डॉ. सुलभा हेर्लेकरांनी पार पाडली, क्रांतीच्या कविता, गझला छान आहेत यात वाद नाहीच परंतु त्या पुस्तकरुपात आणण्यास तिनं जो उशिर लावला याबद्दल सुलभाताईंनी तिचे थोडे कान पिळले.

यानंतर, स्वत: क्रांतिनं दोन शब्द बोलले, खरंतर जिनं तिच्या कवितेतुन एवढं काही बोललं आहे, तिच्याकडुन त्या कविता ऐकण्याचीच अपेक्षा होती अन ती सुद्धा पुर्ण केली तिनं.

सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर अश्विनी व प्रतिक(क्रांतीचा भाचा), यांनी माईकचा ताबा श्री.फड्णीसांच्या कडे आभार प्रदर्शनासाठी दिला,

कार्यक्रम संपत आल्याची जाणिव आणि पुन्हा एकदा आपल्या व्यवहारी जगात जाण्याची लगबग सर्वांच्या चेह-यावर दिसत होती, सर्व उपस्थित रसिक अल्पोपहाराचा अन चहाचा आस्वाद घेत होते, त्याचवेळी, फडणीसांनी दादांच्या म्हणजे भिमराव पांचाळांच्या ’ गरिबाच्या लग्नाला नवरी’ या प्रसिद्ध गझलेबद्दल त्यांना छेडलं आणि त्यांच्या विनंतीला मान देउन दादांनी या प्रसिद्ध गझलेचे दोन कडवी गाउन दाखवली, अन ख-या अर्थानं या सुंदर कार्यक्रमाची अतिशय सुंदर सांगता होणार याची खात्री झाली.

कार्यक्रमाचा प्रत्यक्ष शेवट प्रथमेशनं गायलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीतानं झाली.

या नंतर हॉटेल प्रेसिडेंट इथं झालेल्या कौटुंबिक प्रितिभोजनाच्या समारंभाला अनपेक्षितरीत्या दादांची उपस्थिती सर्वांनाच छानसा धक्का देउन गेली, त्याच वेळी काही इतर प्रख्यात नेट कविंचा प्रत्यक्ष भेटण्याचा योग जुळुन आला.

गझलसाहित्यिकजीवनमानस्थिरचित्रशुभेच्छाअभिनंदनबातमीमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

18 Aug 2011 - 11:38 pm | इंटरनेटस्नेही

उत्तम! कार्यक्रम आणि फोटो दोन्ही ही छान. असे मान्यवर मिपावर आहेत हेच मिपाचं मोठंच भाग्य म्हणायचं!

मस्त अहवाल!!

क्रांतीताईचे पुनःश्च अभिनंदन.

’असे ही तसे हि’ आणि ’ अग्निसखा’ या पूस्तकांच्या यशासाठी मनःपूर्वक शूभेच्छा.

वपाडाव's picture

19 Aug 2011 - 11:42 am | वपाडाव

एकदम असेच म्हंतो...

छान अहवाल. क्रांतीताईंचे परत एकदा मनापासून अभिनंदन.

उत्तम वृत्तांत दिला आहे.
खूप छान वाटलं.

क्रांती.... !! तू ग्रेट आहेसच... :)

क्रांतीताईचं अभिनंदन.. आणि या सविस्तर वृतांत्तासाठी ५०चे आभार. :)

प्यारे१'s picture

20 Aug 2011 - 12:08 pm | प्यारे१

+१

मयुरा गुप्ते's picture

19 Aug 2011 - 3:22 am | मयुरा गुप्ते

क्रांतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन!

पुढील वाट्चालीस अनेकोत्तम शुभेच्छा!

--मयुरा

सिद्धार्थ ४'s picture

19 Aug 2011 - 5:42 am | सिद्धार्थ ४

क्रांतीताईचे अभिनंदन.

सहज's picture

19 Aug 2011 - 8:33 am | सहज

वृत्तांकन आवडले.

प्रचेतस's picture

19 Aug 2011 - 9:16 am | प्रचेतस

क्रांतीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी अनेकानेक शुभेच्छा.
कार्यक्रमाचा अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत सादर केल्याबद्दल ५० फक्त यांचे खास आभार.

स्पा's picture

19 Aug 2011 - 9:34 am | स्पा

असेच म्हणतो
अभिनंदन

क्रांतीजींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी खुप सार्या शुभेच्छा

पल्लवी's picture

19 Aug 2011 - 2:12 pm | पल्लवी

अभिनंदन !!!!!!!

क्रान्ति's picture

19 Aug 2011 - 11:37 pm | क्रान्ति

सगळ्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद.

हर्षद, वृत्तांत खूपच खास लिहिला आहेस. मनापासून आवडला. :)

अभिनंदन क्रांतीताई!
तुझी साडी छान आहे.

चित्रा's picture

20 Aug 2011 - 12:06 am | चित्रा

क्रान्ति,

हार्दिक अभिनंदन! ही पुस्तके नक्की घेऊच.
वृत्तांत आवडला.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Aug 2011 - 12:11 am | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद!

मदनबाण's picture

20 Aug 2011 - 12:15 pm | मदनबाण

क्रांतीताईचं अभिनंदन... :)

क्रांतीतैंचे अभिनंदन !
हा वृत्तांत टाकल्याबद्दल ५० फक्त यांचे आभार. वृत्तांत छान लिहील्या गेला आहे.

नि३सोलपुरकर's picture

22 Aug 2011 - 1:36 pm | नि३सोलपुरकर

हार्दिक अभिनंदन ! क्रांतीताईचे ,पूस्तकांच्या यशासाठी आणी पु.ले.स मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद, हर्षद भाउ अतिशय सुरेख असा सचित्र वृत्तांत !

अन्या दातार's picture

23 Aug 2011 - 12:51 pm | अन्या दातार

क्रांतितैंना शुभेच्छा. असेच अजुन काही मिपाकर पुस्तकरुपात बहरुदेत हिच इच्छा. :)

अवांतरः ५० फक्त यांनी केलेल्या वृत्तांतांचे संकलन करुन एखादे पुस्तक होऊ शकेल काय??

पहिला परिच्छेद आवडला!

क्रांती ताईंचे अभिनंदन. फोटो सुरेख.