भन्नाट ६

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
19 Jul 2011 - 1:55 pm

भन्नाट
भन्नाट २
भन्नाट ३
भन्नाट ४
भन्नाट ५

युवर ऑनर, त्या दिवशी एका रात्रीत ह्या तिघांनी पाच खून आणि दोन बलात्कार करून अख्ख्या मुंबई पोलिस डिपार्टमेंटला हादरवून सोडले. ह्या केसशी संबंधित माहिती आणि इतर डिटेल्स मी साक्षी मध्ये पुढे आणीनच. युवर ऑनर अत्यंत थंड डोक्याने इतक्या खालच्या पातळीचे गुन्हे करून फरारी झालेल्या ह्या आरोपींना शोधण्यात.."

"ऑब्जेक्शन युवर ऑनर !" अमर गरजला.

केस मधले पहिलेच ऑब्जेक्शन आणि तेही दीक्षित प्रास्ताविक मांडत असतानाच.. अब आयेगा मजा.
---------------------------------------------------

अमरच्या ऑब्जेक्शनने मरगळलेल्या आणि गंभीर वातावरणाला तडा गेला. कोर्टात उपस्थित असलेला प्रत्येकजण सावरून बसला. अमरच्या अचानक ऑब्जेक्शन घेण्याने दीक्षित वैतागले. "का का का ... ऑब्जेक्शन का?'

दीक्षितांकडे दुर्लक्ष करून अमर सरळ जज केसरांसमोर जाऊन उभा राहिला. "युवर ऑनर बॅरिस्टर दीक्षित हे माझ्या अशिलांना फरारी म्हणून कोर्टाची दिशाभूल करत आहेत. माझे तीनही अशील हे स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालेले आहेत. पोलिसांच्या कागदपत्रात देखील तशी नोंद आहे. असे असताना त्यांना जाणीवपूर्वक फरारी असणारे असा उल्लेख करून त्यांच्या विषयी कोर्टाचे मत कलुषित करण्याचा हा प्रयत्न आहे." जज केसरांनी एकदा करड्या नजरेने दीक्षितांकडे पाहिले. आधीच लिंक तुटल्याने अस्वस्थ झालेल्या दीक्षितांना काय बोलावे तेच सुचेना. जज केसरांनी वॉर्निंग देण्याआधीच कोर्टाची माफी मागत ते खाली बसले. खाली बसता बसता देखील अमरवर एक जळजळीत कटाक्ष टाकायला ते विसरले नाहीत. अमर मात्र आता सावध झाला होता. आरोपींविषयी कोर्टाचे आणि जनतेचे मत डळमळीत करण्यात त्यांना एक गुन्हेगार म्हणून सादर करण्यात दीक्षितांना बर्‍यापैकी यश आले होते. ऐनवेळी त्यांना मात देणार मुद्दा अमरला सापडला नसता तर दीक्षितांची प्रस्तावना केसमध्ये एक वेगळाच रंग भरून गेली असती आणि अमरचे काम अजूनच अवघड झाले असते. शांत चित्ताने कोर्टाला अभिवादन करून अमर आता बचावाचे भाषण करण्यास उभा राहिला आणि जज केसरांसकट सगळे सावध झाले. जनतेचा लाडका हिरो त्यांचा आदर्श वकील कोर्टापुढे त्याचा बचाव मांडणार होता.

शांत स्वरात अमरने बोलायला सुरुवात केली, "युवर ऑनर आजवर मी कायमच अशा प्रास्ताविकात बोलणे टाळत आलेलो आहे, कायम माझे पुरावेच इतके बोलके असतात की मला उगाचच लंबेचौडे भाषण करून कोर्टाचा वेळ वाया घालवायला आवडत नाही." बोलता बोलता अमरने दीक्षितांकडे एक कटाक्ष टाकला आणि कोर्टात हलकासा हशा पसरला. दीक्षितांनी जळजळीत नजरेने अमरकडे पाहिले आणि मान वळवली. "युवर ऑनर तुमच्या समोर ह्या तीन तरुणांविषयी जे चित्र उभे करण्यात आलेले आहे ते पूर्णतः चुकीचे आणि अर्धवट माहितीवर उभारलेले आहे. खरे काय घडले आहे आणि गुन्हेगार कोण आहे ते मी कोर्टापुढे उघड करीनच. कधी कधी परिस्थिती उपकारकर्त्याला सुद्धा अपकारकर्ता म्हणून समोर कशी आणते ते ह्या केसमध्ये दिसून येईल. माझे अशील हे गुन्हेगार नसून उलट कायद्याचे रक्षकच आहेत हे मी सिद्ध करीनच मात्र तोवर त्यांच्याकडे फक्त आणि फक्त संशयित ह्या नजरेनेच बघितले जावे आणी निर्ढावलेले गुन्हेगार म्हणून नव्हे अशी मी कोर्टाला विनंती करत आहे." आपले छोटेसेच पण परिणामकारक भाषण संपवून अमर खाली बसला. त्याच्या आवाजाने कोर्टावर एक प्रकारची मोहिनीच घातली होती. आधीच मंदार आणि फिरोजबद्दल लोकांना एक प्रकारची सहानभुती होतीच पण दीक्षितांच्या प्रस्तावनेमुळे ज्यांच्या नजरा गढूळ बनल्या होत्या ते देखील अमरच्या मोहिनीखाली येऊन विचार करायला लागले होते.

बॅ. दीक्षित कोट सावरत उभे राहिले. "युवर ऑनर जरी आज आपल्या समोर पाच खून आणि दोन बलात्कार अशा विविध गुन्ह्यांखाली हे आरोपी उभे असले तरी हे सर्व गुन्हे एकाच रात्रीत ह्या तिघांकडून घडले असून हे सर्व गुन्हे एकमेकांशी कुठे ना कुठे जोडलेले आहेत. त्यामुळे ह्या सर्वांचा अंतर्भाव ह्याच केसमध्ये करून त्यावर न्यायदान व्हावे, प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळा खटला घेण्याची गरज नाही असे वाटते."

"आरोपींच्या वकिलाची हरकत नसल्यास मला हे मान्य आहे" जज केसर म्हणाले. अमरने संमतिदर्शक मान डोलवली आणी खटल्याच्या कामाला सुरुवात झाली. "युवर ऑनर, माझा पहिला साक्षीदार आहे 'सुहास झेले'. नावाचा पुकार होताच एक किडकिडीत तरुण पिंजर्‍यात येऊन उभा राहिला. इकडे तिकडे बघत त्याने शपथ उरकून घेतली. "हान तर सुहास झेले तुम्ही कुठे काम करता?"

"सुवास"

"ऑ? हे कुठले कामाचे ठिकाण आहे" दीक्षित भप्पकन ऑफ होत म्हणाले.

"सुवास.. सुवास नाव आहे माझे."

"अहो असे कसे नाव असेल ?"

"का काय हरकत आहे ? आता तुमचे नाव नाही का टकलू ?" सुवास निरागसपणे म्हणाला आणि कोर्टात अक्षरशः: हास्याचा फवारा उडाला.

"दीक्षित नाव आहे माझे !" दीक्षित शक्यतो गरजलेल्या आवाजात म्हणाले, पण त्यांचे गरजणे कोर्टातल्या हास्यात नाहीसे झाले. जज केसरांनी देखील हसू दाबत दाबत कोर्टात शांतता प्रस्थापित केली आणि सुवासला तंबी देण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे पाहिले तेवढ्यात त्याने घाबरून दोन्ही हातच जोडले. "मी काय केले नाही साहेब, हे वकील कोर्टात आले तेव्हा सगळे म्हणाले की "टकलू आला, टकलू आला.." म्हणून मला वाटले की ह्यांचे नावच टकलू आहे." त्याच्या ह्या निरागस खुलास्याने कोर्टातल्या शांततेला पुन्हा तडा गेला आणि आता जज केसरांना देखील हसू आवरेन. पाच मिनिटांच्या प्रयत्नांनंतर कोर्टाचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले.

"तर मिस्टर झेले तुम्ही कुठे कामाला आहात?"

"साहेब मी 'इलियास' मध्ये हिशेब लिहायचे काम करतो."

"तर मला सांगा मिस्टर झेले, ज्या दिवशी खून झाले तेव्हा तुम्ही कुठे होतात? त्या दिवशी इलियास मध्ये काय घडले ते सविस्तर कोर्टाला सांगा."

"साहेब मी नेहमीप्रमाणे आलेल्या बाटल्यांचा स्टॉक चेक करायला तळघराच्या जिन्यांजवळच्या खोलीत गेलो होतो, तेवढ्यात बाहेर वेगाने एक रेसर येऊन थांबली आणि त्यांतून हे समोर उभे असलेले तिघेजण खाली उतरले. आत शिरल्या शिरल्या त्यांनी सरळ एका वेटरला फेकून दिले आणि जणू आधी ठरवले असल्याप्रमाणे त्यांनी तळघराकडे धाव घेतली. वाटेत येणार्‍या प्रत्येकाला त्यांनी सरळ सरळ आडवे केले."

"तळघरात काय घडले हे तुला कळले नसेलच ना?"

"कळले ना साहेब. खाली जोरदार मारामारीचे आवाज सुरू झाल्यावर मी भितभित जिन्यावरून खाली डोकावून पाहिले तेव्हा आतमध्ये जोरदार राडा चालू होता. ह्या तिघांतला तो सगळ्यात दणकट माणूस आहे ना तो जिन्यावरून येणार्‍या प्रत्येकाला सरळ उचलून भिंतीवर फेकत होता ते बघून मी घाबरून वरच थांबलो साहेब." दाराकडे पाहतं झेलेने आवंढा गिळला.

"खालती काय बोलणे झाले ते तू ऐकलेस? ह्याने गफुरला काय धमकी दिली ?"

"ऑब्जेक्शन युवर ऑनर ! सजेस्टिव क्वेश्चन." अमर ओरडला.

"ससटेन्ड ! " केसर म्हणाले. "मी. दीक्षित साक्षीदाराला प्रश्न विचारताना काळजी घ्या. त्याने स्वतः काय बघितले, ऐकले ते कोर्टाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे, तुम्ही त्याला काही सुचवणे योग्य नाही."

"सॉरी युवर ऑनर. मी माझा प्रश्न बदलतो... तर मी. झेले तळघरात झालेले बोलणे तुम्ही ऐकलेत ? नक्की काय बोलणे चालले होते खालती?"

"साहेब खालचा राड्याचा आवाज एकदम बंद झाला आणि कोणीतरी गफुर साहेबांना कोणा नवाबचा पत्ता विचारायला सुरुवात केली. ह्या लोकांना साम गावाहून पळवून आणलेल्या मुली कुठे ठेवल्यात त्याची पण माहिती हवी होती. त्यासाठी त्यांनी गफुर साहेबांचे फार हाल केले." झेलेचे वाक्य संपले आणि तिघांनी अमरकडे चमकून पाहिले. झेले पूर्णपणे खोटी साक्ष देत होता. एकतर तो कुणालातरी वाचवत होता किंवा त्याला दीक्षितांनी व्यवस्थित पढवलेला होता.

"गफुर काही बोलला ? "

"नाही साहेब. ते मला काही माहिती नाही येवढेच म्हणत होते. त्यावेळी ह्या तिघांनी त्यांना विचार करायला एक तासाची मुदत दिली आणि तासाभराने शेजारच्या लॉजवर भेटायला बोलावले. नाही आल्यास त्यांच्या खून करण्याची ह्या तिघांनी धमकी दिली साहेब." अमरकडे एक विजयी कटाक्ष टाकत दीक्षित जज केसरांकडे वळले. युवर ऑनर श्री. गफुर ह्यांच्या हत्येचे कारण ह्या साक्षीमुळे उघड झालेच आहेत. पुढील काही साक्षीत मी हा खून कसा घडला आणि कोणी केला ते समोर आणीनच, मात्र ह्या साक्षीमुळे हे तिघेही गुन्हेगार त्या दिवशी गफुरला भेटायला गेले होते आणि त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती हे समोर आले आहे. दीक्षित खाली बसताच झेलेकडे पाहतं मंद हसत अमर उलटतपासणीला उभा राहिला.

"मी. सुवास.. छान नाव आहे. तर मी. सुवास आरोपी जेव्हा 'इलियास मध्ये शिरले तेव्हा तुम्ही कुठे होतात म्हणालात?"

"साहेब मी तळघराकडे जाणारा जीना आहे ना त्याच्या शेजारच्या खोलीत होतो साहेब. मी खरंच सांगतोय साहेब !"

"अरे ? मी कुठे म्हणतोय तुम्ही खोटे बोलताय म्हणून ? बरं मला सांगा मी. सुवास त्या खोलीला खिडक्या किती आहेत? खोलीच्या आत खोलीच्या समोर ? खोलीच्या बाजूला ?"

"साहेब खोलीला एकच खिडकी आहे जी मागच्या अंगणात उघडते आणि स्टॉकची खोली असल्याने आजूबाजूला प्लायवूड लावून ती बंद केलीये साहेब."

"इंटरेस्टिंग ! मला खरंच आश्चर्य वाटतंय मी. सुवास, की ह्या अशा गुहे सारख्या बंद खोलीत उभा राहून तुम्हाला हे तिघेही रेसरमधून इलियासवार आलेत हे कसे काय दिसले असावे?" ठाणकन अमरचा प्रश्न आदळला आणि सुवास आणि दीक्षितांचा एकदमच आ वासला गेला.

(क्रमशः)

कथासाहित्यिकमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

19 Jul 2011 - 2:02 pm | मृत्युन्जय

अर्रे वा. लव्कर आला ६ वा भाग. उत्कंठावर्धक आहे. वाचतो आहे. छान लिहिले आहे हे.वे.सां.न.

किसन शिंदे's picture

19 Jul 2011 - 2:27 pm | किसन शिंदे

६वा भाग एवढ्या लवकर वाचायला मिळेल हे अपेक्षित नव्हतं...असो, भन्नाट ६ असं पाहील्याबरोबरच सावरुन बसलो.

चिमी's picture

19 Jul 2011 - 2:11 pm | चिमी

आता असेच पुढचे भाग पट्पट टाका. :-)

गणपा's picture

19 Jul 2011 - 2:15 pm | गणपा

मालिका पुर्ण झाल्यावर एकगट्ठा प्रतिसाद दिल्या जाईल. :)

जे बात झकास...

थोडे मोठे भाग टाक रे :)

भाग अजून मोठे टाक रे मित्रा. इतके मस्त जमत चाललेय आणि एकदम ब्रेक लागतोय.

दोन भाग एकत्र टाक यापुढे. अशी फक्त आपली एक विनंती आहे..

बाकी सर्व मस्तच. हातातून खाली ठेवू नये अशा कादंबरीत शिरल्यासारखे वाटत आहे. लगे रहो पराभाय..

स्मिता.'s picture

19 Jul 2011 - 2:24 pm | स्मिता.

हा भाग लवकर आला. असेच पुढेच भाग पटापटा येऊ देत.

वपाडाव's picture

19 Jul 2011 - 2:36 pm | वपाडाव

आंदो....
आंदो....

गणेशा's picture

19 Jul 2011 - 2:54 pm | गणेशा

मस्तच ...

लिहित रहा... वाचत आहे...

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jul 2011 - 2:57 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंय... अब आयेगाच मजा!

प्रचेतस's picture

19 Jul 2011 - 2:58 pm | प्रचेतस

जबरा रे परा
कोर्टसीन अगदी डोळ्यांसमोर उभा केलास.

प्यारे१'s picture

19 Jul 2011 - 3:07 pm | प्यारे१

दणक्या....

विनंती एवढीच की मोठे भाग टाका. आम्ही वाट पाहू.
पावसाळ्यात चालून आल्यावर प्रचंड भूक लागलेली असताना खेकडा कांदाभज्याचा एकच तुकडा काय वात आणतो ते ठाऊक आहे ना?
अथवा पावसात प्रचंड भिजल्यावर कुडकुडत असताना व्हिस्कीचं एकच 'बुच्चन' ढोसायला मिळणं हे काय त्रास देतं?
अथवा रात्री प्रचंड 'इच्छा' झालेली असताना 'दिवटा' ;) हाती घ्यावा लागणं.... जाऊ दे. भावना को समझ. ;) ;) ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jul 2011 - 3:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खाली ते क्रमशः आहे कां ते आधीच पाहिलं...
आहे म्हटल्यावर त्या मानसिक तयारीने वाचला हा भाग!!
पण तरी असेच वाटले की फारच छोटा भाग आहे.
जरा तर मोठा भाग टाका की मालक!!
सारख सारख अस 'क्रमशः' आल की उगाच ती 'दया'ची सिरीयल पाहतो आहे असे वाटते. :(

अवांतरः हा भागही मस्त. उत्कंठावर्धक!! :)

स्वाती दिनेश's picture

19 Jul 2011 - 3:38 pm | स्वाती दिनेश

स्पीड मेंटेंड..
आता मात्र चक्क्यासारखं टांगून ठेवू नको सर्वांच्या उत्सुकतेला..
स्वाती

शाहिर's picture

19 Jul 2011 - 3:39 pm | शाहिर

सु.शि.ळलेला परा !!

भन्नाट भाग.. आता उत्सुकता वाढली आहे. पुढचे भागही पटपट येऊ दे. नाहीतर टांगलेला चक्का खराब होईल.. ;)

- पिंगू

आनंदयात्री's picture

19 Jul 2011 - 7:30 pm | आनंदयात्री

छान आता अगदी रंगलोय या चित्रपटात. पुढचा बहग उद्या ना ?

प्रभो's picture

19 Jul 2011 - 7:39 pm | प्रभो

मस्त!! पुभाप्र.

प्रीत-मोहर's picture

20 Jul 2011 - 8:47 am | प्रीत-मोहर

मस्तच परा.... पुढे?

रामदास's picture

20 Jul 2011 - 11:25 am | रामदास

हम्म ...... अशी मित्रांची नावे टाकण्याची ही पध्दत बरी आहे. आता मी पण माझ्या एका लफड्याच्या ष्टोरीत नायकाचे नाव परीकुमार टाकीन म्हणतो
(हघेहेवेसांन)

प्राजक्ता पवार's picture

20 Jul 2011 - 3:25 pm | प्राजक्ता पवार

छान लिहिले आहे :)

भारी समर्थ's picture

20 Jul 2011 - 5:22 pm | भारी समर्थ

रंजक आणि रोचक....

भारी समर्थ

मनराव's picture

20 Jul 2011 - 5:27 pm | मनराव

वाचतो आहे.........

चिगो's picture

30 Jul 2011 - 11:03 am | चिगो

पन थोडे मोठे भाग टाक की राव..
येकदम स्पीडमधी असलेल्या गाडीला क्काच्चकन ब्रेक मारल्यावानी व्हतंय बग...
लगे र्‍हो...

आंबोळी's picture

30 Jul 2011 - 11:26 pm | आंबोळी

पर्‍या लेका मला वाटले या श्टोरीचा गटारी स्पेशल भाग आज तु टाकशील म्हणून....

नगरीनिरंजन's picture

31 Jul 2011 - 2:06 am | नगरीनिरंजन

मस्त! कोर्टसीन झकास जमतोय!

प्यारे१'s picture

2 Aug 2011 - 11:12 am | प्यारे१

धागा वर आणतोय. पुढचा भाग कधी परा?

मी-सौरभ's picture

4 Aug 2011 - 8:16 pm | मी-सौरभ

पु. भा. प्र.

पल्लवी's picture

2 Aug 2011 - 1:06 pm | पल्लवी

हा भाग वाचायचा राहुन गेला होता, कसा कोण जाणे. असो.
भारी झालंय.

पण लवकर लिही की फुल्डा भाग.
हे म्हणजे बासुंदीची एक वाटी रिचवुन दुसर्‍या वाटीसाठी आठवडा-आठवडा वाट बघावी लागण्यासारखे झाले.
मज्ज्ज्जा इल्ले ! :(

जानम's picture

4 Aug 2011 - 11:52 pm | जानम

हा भागही मस्त...