हानामी (花見) : साकुरा

सोत्रि's picture
सोत्रि in कलादालन
2 Jul 2011 - 10:54 pm

हानामी (花見) : साकुरा

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत.

जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~

साकुराचा बहर

हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.

साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.

लाल स्वेटरमधे मी व सौ आणि माझे दोन बछडे जीवाचा साकुरा करताना :D

हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव :)

बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य

माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन (आइ.टी. झिन्दाबाद) हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. 0:)

प्रवासदेशांतरसमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

2 Jul 2011 - 11:19 pm | श्रावण मोडक

धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो सोकाजीराव त्रिलोकेकर :)

आंबोळी's picture

2 Jul 2011 - 11:30 pm | आंबोळी

सहमत!

सहज's picture

3 Jul 2011 - 8:22 am | सहज

धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो सोकाजीराव त्रिलोकेकर!!!!

आत्मशून्य's picture

2 Jul 2011 - 11:32 pm | आत्मशून्य

पण आता कशी परीस्थीती आहे जपानमधे अजूनही Geiger Counter वापरताय काय ?

वर्षभरापुर्वी प्रोजेक्ट संपल्यामुळे जपान, पृथ्वीवरचा स्वर्ग, सोडून परत यावे लागले :( :( :(

त्यामुळे सद्य परीस्थिती माहित नाही. पण मित्रांकडून कळलेल्या माहितीप्रमाणे आता परीस्थिती आटोक्यात आली आहे.

मस्त माहिती आणि फोटो, एखाद्या झाडाचा असा मजा करण्यासाठी उपयोग करावा हे पहिल्यांदाच कळालं.

कुळाचा_दीप's picture

3 Jul 2011 - 7:25 am | कुळाचा_दीप

きれい です ね!!!

सोत्रि's picture

4 Jul 2011 - 3:01 am | सोत्रि

すごいきれいね。。。。。

日本語ができますか。

आम्हाला असं कोड्यात टाकू नका.;)

सोत्रि's picture

5 Jul 2011 - 12:30 pm | सोत्रि

असे क़ोड्यात पडू नका.
'तुम्हाला जपानी भाषा येते का असे विचारले आहे' :)

खरेतर मी एकदम खुष झालो होतो जपानीमधे रिप्लाय बघून, पण नंतर कळले की अतीप्रगत मिपाकरांनी गुगल ट्रांस्लेटर वापरून रीप्लाय केले होते :(

- सोकाजी

आत्मशून्य's picture

23 Jul 2011 - 2:07 pm | आत्मशून्य

मंग काय करनार ? आम्हाला एक तर अनाइम बघून कळत तेव्हडंच जापनेज येतं, जसकी मोशी मोशी सोकाजी सान. किंव्हा हिगुराशी नो नाको कोरोनी..... बसं, सर्ड्याचे धाव कूंपना पर्यंतच :) यापलिकडं फार्स जमत नाय.

पंगा's picture

23 Jul 2011 - 8:28 pm | पंगा

खरेतर मी एकदम खुष झालो होतो जपानीमधे रिप्लाय बघून, पण नंतर कळले की अतीप्रगत मिपाकरांनी गुगल ट्रांस्लेटर वापरून रीप्लाय केले होते

अत्यंत बेभरवशाचा प्रकार. अर्थाचा अनर्थ करायचा असेल, तर जरूर वापरावा. (कोण रे म्हणाला तो, की गूगलवर मराठी पाहिजे, भाषांतरासाठी उपयोगी पडेल म्हणून?) अनेकदा काय वाटेल ते भाषांतर देते. ('Mary had a little lamb'चे हिंदीत भाषांतर 'मेरी एक छोटी सी भेड़ का बच्चा था'??? व्याकरणाचे एक वेळ सोडा, पण कोणत्या न्यायाने?)

होकार आणि नकार यांच्यात पण बर्‍याचदा फरक करता येत नाही. 'वाकारीमास' (समजते) आणि 'वाकारीमासेन' (समजत नाही), दोन्हीचे भाषांतर 'Know' असेच देते.

त्यात परत इंग्रजी नसलेल्या एखाद्या भाषेतून इंग्रजी नसलेल्या दुसर्‍या भाषेत भाषांतर करायचे झाले, तर प्रथम इंग्रजीत (शब्दशः) भाषांतर करून मग पुन्हा त्या इंग्रजीतून दुसर्‍या भाषेत (पुन्हा शब्दशः) भाषांतर करत असावे. (म्हणजे भाषांतरात नेहमीपेक्षा दुप्पट गोष्टी हरवत असाव्यात.) 'झेनझेन वाकारीमासेन' ('काहीही समजत नाही') चे जपानीतून इंग्रजीत भाषांतर 'You've got me' असे करते, जे एकवेळ थोडे अलंकारिक म्हणून ठीक आहे. पण त्याचेच जपानीतून हिंदीत भाषांतर 'तुम मुझे मिल गया है'???

आनंदयात्री's picture

25 Jul 2011 - 3:52 am | आनंदयात्री

बोचकारे सामा देस.

सोत्रि's picture

26 Jul 2011 - 7:12 pm | सोत्रि

सो देस ने...

- そかじ

चित्रगुप्त's picture

23 Jul 2011 - 11:40 am | चित्रगुप्त

अहो, असं काय करता, त्यांना " न्फ्झझ्य्त ब्फज्य नेफ्ग्झेह्त ब्य्लय्र्ज क्ग्बत्रिन, ह्रेओ,ग देइय्रेग्ग्रे, बुसीलोन्गोलफादू ... " असं म्हणायचं आहे, आता कळलं ना नीट ?

कुळाचा_दीप's picture

23 Jul 2011 - 7:59 am | कुळाचा_दीप

だいたい。。にほんごが じょうず ではない、けど にきゅ まで のうりょくしけん を うかえました!

सोत्रि's picture

26 Jul 2011 - 7:17 pm | सोत्रि

ああ。。。二級ですか。素晴らしい。
日本語が上手ですよ二級だから。私は三級です :(

- そかじ

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2011 - 10:27 am | अत्रुप्त आत्मा

ह्या साकुरा पार्ट्या पाहुन,तिथे लोक जसे कोंडाळ करुन बसतात त्यावरुन पुर्वीच्या सारस बागेतलं ओपन लॉन आणी त्यावर भेळ खात बसलेले लोकांचे घोळके आठवले...त्यामुळे या साकुरा लॉनला तिकडची सा-रसं---बाग म्हणावेसे वाटते...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2011 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, भारीच दिसतं हे साकुरा प्रकरण. :)

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

3 Jul 2011 - 11:16 am | मदनबाण

वा... :) सुरेख. :)
किती नाजुक आहेत ही फुले... :)

(花の恋人)

मुलूखावेगळी's picture

3 Jul 2011 - 11:20 am | मुलूखावेगळी

すべての写真写真は素晴らしいです。花見

सोत्रि's picture

3 Jul 2011 - 12:30 pm | सोत्रि

日本語ができますか・

इरसाल's picture

3 Jul 2011 - 9:29 pm | इरसाल

その桜を見るために非常に良い。

सोत्रि's picture

4 Jul 2011 - 2:56 am | सोत्रि

हे वाक्य ट्रांस्लेटर(गुगल) वापरून केले आहे का ? जपानी व्याकरणाप्रमाणे हे वाक्य बरोबर नाही. :(

तुम्हाला ’साकुरा बघून फार छान वाटले असे' म्हणायचे आहे का? तर त्याचे योग्य भाषांतर
その桜を見てとても楽しかった असे होते.

पण प्रयत्नाबद्दल धन्यवाद !

- そかじ(सोकाजी)

मुलूखावेगळी's picture

4 Jul 2011 - 10:16 am | मुलूखावेगळी

हो . मी , त्यात (花見) हा शब्द अ‍ॅड केल्याने गंडलेय :(
कसला प्रयत्न नाहीये लोकलायझशनवर काम करत असल्याने असले उद्योग करते.
तुम्हाला जे वाटले तेच म्हनायचे आहे :)

लेख व फोटो टाssssप!
मी जपानला गेलो होतो तेंव्हां "साकुरा-साकुरा" हे गाणे अतीशय लोकप्रिय होते. (जवळ-जवळ राष्ट्रगीतच आहे असे वाटायचे!)
अद्यापही ते तितकेच लोकप्रिय आहे काय? ते 'कालातीत' गाणे असावे असा माझा समज आहे. खरे आहे ना?
हाना म्हणजे कुठलेही फूल कीं फक्त साकुराचे फूल?
'सई'ताई कुठे नाहींशा झाल्या आहेत? पूर्वी जपानवर खूप मस्त लिहीत असत.....!

सोत्रि's picture

4 Jul 2011 - 10:57 am | सोत्रि

साकुरा नो हाना म्हण़जे साकुराचे फुल. (नो = चा, ची, चे)

- そかじ

सुधीर काळे's picture

5 Jul 2011 - 6:59 am | सुधीर काळे

बरोबर!
आजही "साकुरा-साकुरा" हे गाणे जबरदस्त लोकप्रिय आहे काय? पूर्वी कुठल्याही पार्टीत हे गाणे आणि coal miners वरील एक गाणे (व त्याबरोबरचे समूह नृत्य) फारच लोकप्रिय होते. एकाएकी जपानी लोक ती दोन गाणी (दुसरे नृत्यासह) गायला लागायची व त्यात पुरूष-स्त्रिया व रंक-राव सगळे सहभागी व्हायचे. माझ्या १९७२ सालच्या पहिल्या भेटीत पाहिलेली ही उत्कट लोकप्रियता माझ्या १९९२च्या शेवटच्या भेटीतही तितकीच टिकलेली पाहिली होती. म्हणून या कुतुहलापोटी हा प्रश्न पुन्हा विचारत आहे.

सोत्रि's picture

5 Jul 2011 - 12:50 pm | सोत्रि

हे गाणे युवा पिढीत तेवढे लोकप्रिय नसावे. माझे सगळे जपानी मित्र हार्ड रॉकचे फॅन आहेत.

पण हे गाणे जुन्या पिढीतल्या लोकांमधे अजुनही तेव्ढेच लोकप्रिय आहे. तोक्यो मधे माहित नाही पण सप्पोरोजवळच्या एका खेड्यात माज़्या जपानी मित्राच्या आजोळी गेलो होतो तेव्हा त्याच्या आजीने हे गाणे नाचासहित म्हणून दाखवले होते.

अवांतर: आय मीस जपान सोsssss मच.... :((

पंगा's picture

23 Jul 2011 - 8:07 pm | पंगा

हाना म्हणजे कुठलेही फुल

मग 'हाना-जी' म्हणजे काय? ;)

प्रास's picture

4 Jul 2011 - 10:52 am | प्रास

तुमची साकुराबद्दलची माहिती आणि त्या माहितीशी संबंधीत फोटो आवडले.

अवांतर -

जगप्रसिद्ध 'कोनिका' फिल्म्सचं आधीचं नाव 'साकुरा' असल्याचं आठवतंय....

शाहिर's picture

4 Jul 2011 - 7:18 pm | शाहिर

पु ल. च्या एका प्रवासवर्णना मधे साकुरा चा उल्लेख आला होता ..आज तुमच्या मुळे दर्शन झाले!!

अप्रतिम..
पहिल्यांदाच मला हि माहिती मिळाली..
वाचुन आनंद वाटला..

शुचि's picture

5 Jul 2011 - 2:35 am | शुचि

अप्रतिम!!!

छान फोटो.
आपल्याकडे पूर्वी आवळीभोजन असायचे.
जवळपास राहणारे नातेवाईक अथवा मित्रमंडळींना घेऊन आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन होत असे.
एखादा आवळ्याचा पदार्थ, उदा. आवळ्याची चटणी, मुरांबा असं काहीतरी आवश्यक समजत असत.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jul 2011 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार

जुन्या आठवणी जागवल्यात राव तुम्ही.

जपानला असताना घराच्या ग्यालरीमधून रोज चमचमणारं हाना गार्डन आमच्या दृष्टीस पडायचं. क्वचित जाणंही व्हायचं. ज्याच्याकडे पैसे होते ते दर गुरूवारी जायचे आणि शुक्रवारी रात्री डूलत डुलत परत यायचे. त्यांचा प्रचंड हेवा वाटायचा. आम्ही मात्र बागेच्या दरवाजा पर्यंतच जायचो. तिथेच प्यार्टी करायचो.

मिपावरचे एक काका जपानला तुरुंगात असतात (बहुतेक अजूनही).

जपानला कुठे उतरला आहात? तशीही आता हानामीची चमकदमक खूपच कमी झाली आहे. साधारण साताठ वर्षांपूर्वी स्थानिक निवडणुकात शावोलिन कट्टरपंथींचा वरचष्मा झाला आणि त्यांनी खूपशा बागा कमी करायला लावल्या.

हानामी मातब्बरी तुम्हाला. पण बहुसंख्य स्थानिक जनता त्यामानाने खूपच अरिसक आहे. ६५-७० टक्के अरसिक आणि इतर मात्र रसिक. त्यामुळे तिथे रसिकांवर अनन्वित अत्याचार होतात. त्यात परत राजघराणे मूळ रसिक नाही. बाहेरून येऊन शिरजोर झालेले. स्थानिक रसिकांची अवस्था वाईट आहे. राजाने, एकंदरीत रसिक लोकांचा टक्का कमी व्हावा म्हणून नॉन्-रसिक लोकांना (त्यात बरेच मूळ भारतिय असलेले देशस्थपण आहेत) नागरिकत्व दिले आहे. कोकणस्थांना नागरिकत्व देणारे जापान हे एकमेव हूतूतू राष्ट्र आहे.

वेळ असल्यास नागोयामधे थोडे पायी फिरा. नागोया पोर्टच्याआसपासच्या भागात. तिथे एक सुंदर खानावळही आहे. गुजराती लोकांची, कढी-खिचडी, उंधोयो आहे. प्रसन्न वाटते. तिथली बहुसंख्य दुकाने मारवाडी / भय्या लोकांची आहेत. किराणा मार्केट तर संपूर्ण त्यांच्या हाता आहे. खानावळीतून बाहेर पडलात की उजव्या हाताला चालत गेलात तर हॉटेल गुडमॅड आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक मराठी बारी आहे. बैठकीची लवणी उत्तम चालायची तिथे.

च्यामारी, खूपच आठवणी यायला लागल्या आहेत. आवरते घेतो.

दाबून माजकर्ते

सहज's picture

23 Jul 2011 - 8:20 pm | सहज

परा मिपाचा स्लेजिंगचा अनभिषक्त सम्राट!

:-)

पंगा's picture

23 Jul 2011 - 8:26 pm | पंगा

काय चावले?

सोत्रि's picture

24 Jul 2011 - 7:01 pm | सोत्रि

पर्‍या,

लेका फुटलो की रे हसून हसून
:D
:D
:D

लैभारी.कॉम

- (जुन्या आठवणी आठवणारा) सोकाजी

स्वाती दिनेश's picture

24 Jul 2011 - 1:50 pm | स्वाती दिनेश

साकुरा फेस्टिवलच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
(पराचा प्रतिसाद वाचल्यावर लगेचच शिळ्याही झाल्या.. )
स्वाती