मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
20 May 2011 - 8:56 am

काश्मीरचे आणि बर्फाचे एक अतुट समीकरण आहे. जसे मल्लिकाचे आणि कॉण्ट्रोवर्सीचे किंवा शोभा डे चे आणि फटकळपणाचे किंवा सिद्धुचे आणि असंबंद्ध प्रतिक्रियांचे, अर्चना पुरणसिंगचे आणि पातळविजयम मधल्या राक्षसासारखे हसण्याचे, मनमोहन सिंगांचे आणि हताशपणाचे, राहुल गांधींचे आणि बालिश प्रतिक्रियांचे, काँग्रेसी सरकारचे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे, गणपाचे आणि पाककृतींचे, सचिनचे आणि शतकांचे, धोनीचे आणि हेलिकॉप्टर शॉटचे अगदी तसे. काश्मीर म्हटल्यावर डोळ्यासमोर पहिल्यांदा बर्फ येतो. (कधीकधी हातात एके ४७ घेतलेला, तोंडाल मफलर गुंडाळालेला अतिरेकीही येतो पण ती गोष्ट वेगळी)

काश्मीरमध्ये बर्फ तसा सगळीकडे बघायला मिळतो. पण घाउक प्रमाणात बर्फ बघायचा असेल, बर्फात खेळायचे असेल तर सोनमर्ग आणि गुलमर्गला पर्याय नाही. एखाद्या कापसाच्या गिरणीत कापूस पिंजुन टाकुन द्यावा तसा तिथल्या पर्वत शिखरांवर बर्फ सांडलेला असतो.

गुलमर्ग - सोनमर्ग चा हा बर्फ संपुर्ण काश्मीरमध्ये पसरला आहे. वितळुन पाण्याच्या रुपात. काश्मीर खोर्‍यातल्या सिंधु, झेलम, शेषनाग, लीडर, रावी, चिनाब इत्यादी नद्यांचा उगम या बर्फातलाच. त्यातील झेलम, चिनाब, सिंधु इत्यादी नद्या पाकिस्तानत वाहत जातात. बाकी पाकिस्तानमध्ये उगम पावणार्‍या नद्याच नाहीत. भारतात उगम पावलेल्या नद्याच पाकिस्तानात पोचतात. या नद्या कश्मीरच्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहेत. कुठल्याही रस्त्याने जाताना चहुकडे पसरलेली हिमशिखरे, बाजुने वाहणार्‍या नद्या आणि चिनार, देवदार आणि काश्मीरी विलोची झाडे कमालीची स्वर्गीय अनुभूती देउन जातात

आपल्याकडच्या संथ वाहते गंगामाई सारख्या नद्या नाहीत या. यांच्या पाण्याला प्रचंड जोर असतो. आपल्या वाटा धुंडाळत जेव्हा या नद्या काश्मीरच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये खळाळत सुटतात तेव्हा समोर येणारी प्रत्येक भिंत कोलमडुन पडते, शिळा झिजतात, वाटा आपोआप रुंदावतात

सोनमर्ग - गुलमर्ग ही दोन्हीही विरळ वस्तीची गावे. १२ महिने तिथे राहता येणे तर केवळ अशक्य. हिवाळ्यात ९०% हुन आधिक रस्ते बंद होतात आणि जगाशी संपर्क तुटतो. शिवाय थंडीमुळे तिथे राहणेही अशक्य होते तेव्हा तेथील लोक तात्पुरते इतरत्र स्थलांतरीत होते. बर्फ थोडा कमी झाला की पर्यटकांच्या आशेने परत स्वगावी परतणे होते.

या अशक्यसा भासणार्‍या अनारोही पर्वतरांगांमध्येच आपल्या सैन्याला रॉक क्लाइंबिंगचे शिक्षण दिले जाते. एवढ्या खडतर तपस्येतुन जेव्हा ते तावुन सुलाखुन बाहेर पडतात तेव्हा गुलमर्ग हिमाच्छादित पर्वत रांगा सुद्धा खुज्या भासत असतील.

या बर्फाचा सदुपयोग भारत सरकारने करुन घेतला नसता तरच नवल (भारत सरकारही कधीमधी बरे काम करतेच की). गुलमर्गच्या या बर्फ राज्यात सरकारने स्कीईंग प्रेमींसाठी नंदनवन उभारले आहे. म्हणजे तसे ते निसर्गानेच उभारलेले आहे पण भारत सरकारनेही थोड्याफार सुविधा पुरवुन त्यात आपला हातभार लावला आहे. नोव्हेंबर ते जुन हा गुलमर्गचा पीक सीझन. आजुबाजुला बर्फाचे प्रचंड साम्राज्य पसरलेले असुनसुद्धा. कारण याच काळात जगभरातील स्की प्रेमी इथे येतात स्कीइंगसाठी आणि बर्फात मनमुराद खेळण्यासाठी. त्याकरिता भारत सरकारने येथे आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची केबल कार (इथे त्याला गोंडोला म्हणतात) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे:

केबल कार २ टप्प्यांवर उभारली आहे. पहिला टप्पा १०००० फुटांचा - कुंगदूरी आणि दुसरा टप्पा १४००० फुटांचा आफरवात. हा गोंडोला जगातला सर्वाधिक उंचीवरचा गोंडोला आहे आणि तो जागतिक दर्जाचा आहे हे नक्की. १४००० फुटांवर गेल्यावर स्वर्ग फारसा दूर नसतो आणि स्वर्गीय सौंदर्य तर तुमच्या नजरेच्या टप्प्यात असते. इथेच मी माझ्या आयुष्यातला पहिला हिमवर्षाव अनुभवला. भुरुभुरु अंगावर सांडणार बर्फ, कुंद वातावरण, उणे तापमान अश्या वातावरणात माणूस भारुन गेला नाहितरच आश्चर्य :

आफरवातपासुन लाइन ऑफ कंट्रोल दिसते. फक्त एक किमीवर. अर्थात बर्फात एक किमी पाय ओढत चालणे ही काही सोप्पी गोष्ट नाही. त्यात वरुन बर्फ पडत असेल, दुपारी ३ वाजता अंधारुन आले असेल आणि कुठल्याही क्षणी बर्फाचा वर्षाव सुरु होउ शकेल असे वातावरण असेल तर मग तर पुढे जाण्याची हिंमत करताच येणार नाही. त्यामुळे आम्ही तिथवर जाउनही एकाही पाकड्याला कंठस्नान न घालता परत आलो. आमच्याकडे पर्याय होता, भारतीय सैन्याच्या जवानांकडे तो पर्याय नाही. हाडे गोठवणार्‍या थंडीत तिथे त्यांना राहवेच लागते. उन्हाळा असो अथवा हिवाळा. पुर्वी हिवाळ्यापुरते दोन्ही बाजुंकडुन शस्त्रसंधी असायची. सैन्य बर्फातुन काही काळतरी थोडीफार माघारी जायचे. पण ९८ मध्ये पाकिस्तानी सैन्याने भि**** पणा केला, आणि ही संधी साधुन लाइन ऑफ कंट्रोल ओलांडली. तेव्हापासुन सैन्य मरणाच्या थंडीतही इथे आणि इतर हिम्शिखरांवर तैनात असते.

१४ हजार फुटांवरचा भारतीय सैन्याचा हा तळ:

आणि प्रतिकुल परिस्थितीत पाय रोवुन उभ्या राहणारर्‍या सैन्याची तात्पुरती निवासव्यवस्था करणारे पर्वतरांगांच्या मध्यात विसावलेले हे बंकर्सः

भारतीय सैन्याच्या विजिगुषु वृत्तीला, असामान्य सहनशतीला, अफाट साहसाला आणि दिङ्मुढ करणार्‍या पराक्रमाला एक कडक सॅल्युट ठोकत हा भाग संपवतो. इति बर्फ अध्याय संपुर्णम.

प्रवासभूगोलछायाचित्रणविचारलेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 May 2011 - 9:12 am | प्रचेतस

एकदम देखणे नेत्रसुखद फोटो व तितकेच सुरेख वर्णन.
प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण प्राणपणाने करणार्‍या भारतीय जवानांच्या धैर्याला सलाम.

विकास's picture

20 May 2011 - 11:58 pm | विकास

असेच म्हणतो! एकदम मस्त फोटो आलेत!

पैसा's picture

22 May 2011 - 10:55 pm | पैसा

अप्रतिम!

प्रमोद्_पुणे's picture

20 May 2011 - 9:17 am | प्रमोद्_पुणे

रे एकदम गार गार वाटले. खरेच आपले जवान तिथे कसे रहात असतील. जवानांना सलाम आणि दंडवत.

रेवती's picture

20 May 2011 - 9:53 am | रेवती

चांगले फोटू आणि वर्णही!
आपल्या सैनिकांना सलाम!
शेजार्‍यांनी शस्त्रसंधीची संधी गमावली............ते लोक तसेही विश्वास ठेवण्याजोगे नाहीतच........त्यामुळे आपल्या सैनिकांना जास्त कष्ट करणे आले.
तुमची लेखमाला आवडली. आता काश्मिर पहायला नाही गेले तरी चालण्यासारखे आहे.

आज फोटो दिसले...
खतरनाक रे भावा...
सगळे फोटो झकास.. आणि वर्णन सुद्धा

सचिनमिसलप्रेमी's picture

20 May 2011 - 10:55 am | सचिनमिसलप्रेमी

औसम. डोळ्यान्चे पारणे फिटले. कश्मिर सैर घडवल्याबद्दल धन्यवाद.

सगळच एकदम लै है.

५० फक्त's picture

20 May 2011 - 11:02 pm | ५० फक्त

फोटो आणि वर्णन दोन्ही एकदम मस्तच, फक्त एक विनंती आहे शेवटचे दोन फोटो काढुन टाका, त्याचे कोण कसे उपयोग करेल माहीत नाही. अर्थात हे फोटो इथं असल्यानंच हे घडेल असं नाही, पण एक शंका आहे म्हणुन.

बाकी पुढचे भाग लवकर टाका ही विनंती.

मृत्युन्जय's picture

21 May 2011 - 2:17 am | मृत्युन्जय

काही फरक पडणार नाही. तिथे फोटो काढायला बंदी नव्हती त्या अर्थी काही धोका नसावा. शिवाय असेही बरेच लोक फोटो काढत होते आणि गूगलबाबाला साकडे घातले तर बरेच फोटो बघायलाही मिळतील. हे फोटो जगात बर्‍याच लोकांकडे असतील आणि अतिरेक्यांना हवे असेल तर आतापावेतो त्यांनी तिथे जाउन फोटो काढुन आणलेही असतील.

प्यारे१'s picture

21 May 2011 - 1:44 am | प्यारे१

आज पहिल्यांदाच पाकिस्तानचा राग नाही आला.

इतका सुंदर प्रदेश, एवढं निसर्गसौंदर्य आपल्याकडं असावं असं कुणाला नाही वाटणार? ;)

अर्थात सुंदर प्रेयसीचा सांभाळ करायला सक्षम प्रियकराची भूमिका आपले सैनिक ठामपणे बजावत आहेतच.

मृत्युन्जय's picture

21 May 2011 - 2:14 am | मृत्युन्जय

पाक्व्याप्त काश्मीर याहुन सुंदर आहे म्हणतात. पण हावरटपणाला अंत नसतो. असेही पाकव्याप्त काश्मीर त्यांचे नसताना तिथे घुसुन बसले आहेत. आतातर आपला भागही त्यांना हवा.

निशब्द झालोय.
तुमचे मनापासुन आभार.

अआणि पाकव्याप्त काश्मिर याहुन सुंदर आहे हे मी ही ऐकले आहे.

मला वाटते "वर्टीकल लिमीट" मध्ये त्याच हिमालयाचा भाग आहे.

वाहीदा's picture

22 May 2011 - 3:09 pm | वाहीदा

खुदाऐ बरतर तेरी ज़मीं पर,
ज़मीं की ख़ातिर ये जंग क्‍यों है ?
हर इक फतह-ओ- ज़फ़र के दामन पे,
खूं-ऐ-इंसां के रंग क्‍यों है ?
ज़मीं भी तेरी, हैं हम भी तेरे,
ये मिल्कियत का सवाल क्‍या है ?
ये क़त्‍लो-खूं का रिवाज क्‍यों है ?
ये रस्‍मो-जंगो-जदाल क्‍या है ?
जिन्‍हें तलब है जहां भर की..
उन्‍हीं का दिल इतना तंग क्‍यों है ?
--- साहिर लुधियानवी

ख़ुदा-ऐ-बरतर : सर्वशक्तिमान ईश्‍वर (O superior God, bartar means superior, high, excellent, used as an adjective here for God)
फ़तह-ओ-ज़फ़र : विजय व जीत
मिल्कियत : मिळकत property, land, possession
क़त्‍ल-ओ-खूं : हत्‍या, मारधाड , मारकाट
जंगो-जदाल : लड़ाई-युद्ध
तलब : तहान

विलासराव's picture

23 May 2011 - 10:30 am | विलासराव

..

विलासराव's picture

23 May 2011 - 10:28 am | विलासराव

आणी फोटोही.
मी २००४ ला गेलो होतो तेव्हा पहिला टप्पा १०००० फुटांचा - कुंगदूरीला गेलो होतो आणि दुसरा टप्पा १४००० फुटांचा आफरवात राहीला तो आज पाहिला.
धन्यवाद.

नगरीनिरंजन's picture

23 May 2011 - 10:45 am | नगरीनिरंजन

मस्त! अतीव सुंदर!

मुलूखावेगळी's picture

23 May 2011 - 1:32 pm | मुलूखावेगळी

मस्त रे फोटु अप्रतिम

मृत्युन्जय's picture

23 May 2011 - 5:45 pm | मृत्युन्जय

आधीच्या भागांच्या लिंका इथे डकवत आहे:

ttp://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १

http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २

http://misalpav.com/node/18021 - मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर

सूड's picture

23 May 2011 - 5:45 pm | सूड

भर उन्हाळ्यात बर्फाचा नुसता धागा बघूनच गारगार वाटतंय. फोटो झकासच !!

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2011 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर

गुलमर्ग पासून पुढे डोंगर वाटेने खिलनमर्गकडे रस्ता जातो. गुलमर्ग-खिलनमर्ग वाट डोंगरदर्‍यातून जाणारी त्यामुळेच घोड्यावरून पार करावी लागते. अर्ध्या वाटेत एक धाबा लागतो. उंच उंच वृक्षराजींच्या पायथ्याशी खाटा टाकलेल्या असतात आणि एका तंबूत स्वयंपाक घर. तिथे मिळणारा राजमा आणि आलू परोठा अतिशय रुचकर होता. आणि त्या थंड, सुखद वातावरणात आणि घोड्यावरच्या प्रवासाने शरिरातील हाड अन् हाड बोलत असताना मिळणारा विसावा आणि राजमा/आलू पराठा......क्या बात है.

मृत्युन्जय's picture

24 May 2011 - 3:23 pm | मृत्युन्जय

आम्हाला असा ढाबा नाही पण एक छोटेसे रेस्टॉरंट श्रीनगर - सोनमर्ग रस्त्यावर लागले होते. बाजुनेच सिंधु खळाळत वाहत होती. एका बाजुला बर्फाचा डोंगर होता तिथे बर्फ खेळता येत होता. बर्फ, झाडी, हिरवळ आणि सिंधुचे अतिशुद्ध पाणी. वाह क्या कहने. एवढ्या नितांत सुंदर वातावरणातले रेस्टॉरंट मी आजवर कुठेही बघितलेले नाही. तिथे काढलेले काही फोटो:

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 11:51 am | मृत्युन्जय

मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः

मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957

मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973

मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019

मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061

मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085

मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104

मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162

मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309

सुंदर लेखमाला आणि हे नतर चे दोन्ही फोटो पण छान.
आणि तुम्ही माफी काय मागताय? उलट लेखमाला वर आणल्याबद्दल आम्हीच तुमचे आभार मानायला हवे. सुंदर वर्णन आणि सुंदर फोटो, अजुन काय हवं?

सध्या प्रचंड उन्हाळा असताना हे बर्फाचे फोटो बघुनहि बर वाटतय.
मस्त फोटो.

सध्या प्रचंड उन्हाळा असताना हे बर्फाचे फोटो बघुनहि बर वाटतय.
मस्त फोटो.

सध्या प्रचंड उन्हाळा असताना हे बर्फाचे फोटो बघुनहि बर वाटतय.
मस्त फोटो.

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2015 - 1:01 am | श्रीरंग_जोशी

वर्णन अन फोटोज आवडले.

दोन फोटोज माझ्याकडून...

सोनमर्ग
Sonmarg

गुलमर्ग
Gulmarg

मृत्युन्जय's picture

15 May 2015 - 1:57 am | मृत्युन्जय

दोन्ही फोटोज खतरनाक आलेत. दिल बाग बाग हो गया.

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2015 - 2:01 am | श्रीरंग_जोशी

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गेल्यामुळे बर्फ अगदी डोंगरांच्या पायथ्यांपर्यंत होता. पण ट्युलिप गार्डन सोडल्यास श्रीनगरमधली एकही बाग बहरलेली नव्हती. इथे अमेरिकेत एवढा बर्फ उपलब्ध असूनसुद्धा आयुष्यातले पहिले स्किइंग गुलमर्गलाच केले :-) .

मृत्युन्जय's picture

15 May 2015 - 10:15 am | मृत्युन्जय

सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांना पुनःश्च धन्यवाद.

गर फ़िर्दौस बर रुए ज़मीन अस्त, हमीं अस्त, हमीं अस्त, हमीं अस्त।
अगर इस धरती पर कहीं स्वर्ग है, (तो वो) यहीं है, यहीं है, यहीं है।

आजची स्वाक्षरी :-
आरटीओ दलालांकडून वर्षांला ८०० कोटींपेक्षा जास्त फस्त!
मुंबईत ‘पंधरावं वरीस धोक्याचं', १५ वर्षांखालील १८५ मुलींचा गर्भपात

मृत्युन्जय's picture

15 May 2015 - 10:38 am | मृत्युन्जय

खरे आहे. म्हणून लेखमालेची सुरुवातच या वाक्यांनी केलेली आहे :)