डायलॉग इन द डार्क

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
10 Apr 2011 - 11:07 am

असे काय करतोस/तेस, दिसत नाही का? आंधळा/ळी आहेस का? असे बोल आपण इतरांना बोललो असु किंवा ऐकून घेतले असतील. नुकतेच 'डायलॉग इन द डार्क' ह्या प्रदर्शनाबद्दल एका परिचितांकडून कळले. त्यांचा अनुभव रोचक वाटला. त्यामुळे आपणही हे प्रदर्शन 'बघून' नव्हे अनुभवुन यावे असे ठरवले होते.

ह्या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात म्हणायचे तर 'अंधांच्या विश्वाची झलक' ह्या तीन शब्दात वर्णन करता येईल. बरेचदा आपण प्रदर्शन 'पहायला' जातो पण इथे संपूर्ण अंधार असल्याने आपले डोळे काहीच कामाचे नसतात.

डायलॉग इन द डार्क हे प्रदर्शन डॉ. आन्द्रीयास डायनेक्क ह्या जर्मन माणसाने, १९८८ मधे सामाजीक जाणिवेतुन सुरु केलेला उपक्रम आहे. आजवर जगभरातील १५० शहरात हे एक विशेष प्रदर्शन म्हणुन फिरुन आले असले तरी आता जवळजवळ १० देशात हे प्रदर्शन आहे. आजवर साठ लाख लोकांनी हे प्रदर्शन पाहीले आहे व सहा हजार अंध व्यक्तींना यामुळे रोजगार मिळाला आहे.

भारतात हैद्राबाद येथे हे प्रदर्शन पहाता येईल.

तुम्ही, आम्ही व तसेच अंध व्यक्तीला रोज ज्या अनुभवातुन जावे लागते जसे जेवण, भाजी खरेदी, एटीएम मधुन पैसे काढणे, रस्ता ओलांडणे, अन्य लोकांप्रमाणे एखाद्या सहलीचा अनुभव घेणे इ. याचा एक अनुभव घेतल्यावर, आपण आपल्या डोळ्यांवर किती भिस्त ठेवतो हे जाणवले व तसेच स्पर्श, गंध, आवाज यांचे महत्व कळून येते.

आपण ज्या नोटा वापरतो त्यावर अशा काही खुणा आहेत की ज्या आधारे अंध लोक ती नोट किती रकमेची आहे हे ओळखु शकतात ही कधीतरी ऐकलेली माहीती प्रत्यक्ष वापरात आणल्यावर वेगळीच अनुभूती येते. भारतीय नोटा अंध लोक त्यावरील विविध चिन्हांमुळे ओळखु शकतात. जसे २० रु च्या नोटेवर एक उभा आयत असतो, ५०च्या चौकोन, १००रु त्रिकोण, ५०० रु गोल, हजार रु च्या नोटेवर चौकट.

फोटो- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीया. ऑर्ग. इन संस्थळावरुन

प्रदर्शन सुरु होतानाच 'रोल रिव्हर्सल' प्रकार म्हणजे काय हे कळून येते. आत गेल्या गेल्या, आपल्याला काहीही न दिसणे व ह्या प्रदर्शनात आपले गाईड एक अंध व्यक्ती असणे!!! आपण पुढील मार्गक्रमणासाठी सर्वस्वी त्या अंध व्यक्तीवर अवलंबून असतो व अतिशय सफाईने आपल्याला हा प्रवास घडवून आणला जातो. हा अनुभव प्रत्येकाने एकदा घेउन पहावा. ह्या प्रदर्शनाचे नाव देखील अतिशय समर्पक आहे ''डायलॉग इन द डार्क'' प्रदर्शनाच्या शेवटी एका कॅफेमधे अंधारात खाद्यपदार्थ घेउन आपल्या गाईड बरोबर गप्पा मारताना, आपण खरोखर जो संवाद साधत असतो जो बरेचदा आपण आपल्या दृश्य जगात अंध व्यक्तीबरोबर साधत नाही. जेव्हा आपण अंध असतो, तेव्हा आपल्याला सहानुभूतीपेक्षा, मदतीपेक्षा, माहीती व स्वावलंबनाला अनुकूल वातावरण हवे असते हे आधीक प्रकर्षाने जाणवते. अंध लोकांना स्वावलंबी करण्याबरोबरच त्यांचे दैनंदीन जीवन सुकर करण्याकरता समाजाने अजुन बरेच प्रयत्न केले पाहीजेत हे पुन्हा जाणवले. सर्व विद्यार्थ्यांना असे प्रदर्शन दाखवुन भावी इंजीनियर, नेते, डिझायनर्स आधीकाधिक उपकरणे अंधांच्या सोयीसाठी बनवतील अशी या प्रदर्शनांकडून आशा करायला हरकत नाही.

भारतात, हैद्राबाद मधील मिपाकरांनी जरुर भेट द्यावी. भारताबाहेर अन्य देशातही हे प्रदर्शन आहे, जालावर शोध घेतल्यास सर्व माहीती मिळेलच.

समाजजीवनमानतंत्रराहणीअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

10 Apr 2011 - 11:30 am | मदनबाण

चक्क सहजराव लिहते झाले !!! जरा स्वतःला चिमटाच काढुन पाहतो बरं !!! ;)
इतकी छान माहिती इथे दिल्या बद्धल धन्यवाद...

जाता जाता :--- रेल्वे स्टेशनवर एक विचित्र आवाज करणारं उकरण बसवलेलं असतं, त्यामुळे अंध व्यक्तींना त्यांच्या डबा ( अगदी छोटी जागा--- मोटरमनवाली) स्टेशनवर कुठे येते आहे ते कळते.

कुंदन's picture

10 Apr 2011 - 11:35 am | कुंदन

चांगली माहिती.

धन्यवाद सेहेजराव.

प्रभो's picture

11 Apr 2011 - 7:51 pm | प्रभो

+१

नितिन थत्ते's picture

10 Apr 2011 - 12:01 pm | नितिन थत्ते

सुंदर ओळख.

पैसा's picture

10 Apr 2011 - 12:03 pm | पैसा

सहज राव धन्यवाद!

मुक्तसुनीत's picture

11 Apr 2011 - 7:03 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.

लेखन मिनिमलिस्टीक झालेले आहे. जे मर्म आहे त्याचे सूचन करून झाल्यावर निवेदक फार बोलत नाही. हे फार आवडले.

नंदन's picture

10 Apr 2011 - 12:11 pm | नंदन

चांगली माहिती, धन्यवाद!
(अमेरिकेत फक्त अटलांटामध्ये आहे असं दिसतंय.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2011 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगलीच माहिती.

>>>>अंध लोकांना स्वावलंबी करण्याबरोबरच त्यांचे दैनंदीन जीवन सुकर करण्याकरता समाजाने अजुन बरेच प्रयत्न केले पाहीजेत हे पुन्हा जाणवले.

हम्म, सहमत आहे.

भारतीय नोटा अंध लोक त्यावरील विविध चिन्हांमुळे ओळखु शकतात. जसे २० रु च्या नोटेवर एक उभा आयत असतो, ५०च्या चौकोन, १००रु त्रिकोण, ५०० रु गोल, हजार रु च्या नोटेवर चौकट.

माहितीबद्दल धन्यु......!!! च्यायला, नोटा ब-याचदा व्यवहारात पाहिल्या पण त्यावरील चिन्ह कधीच पाहिले नव्हते. पाहिले असले तरी त्याचा उपयोग अंध लोकांसाठी असावा हे माहिती नव्हते. लैच अशिक्षित राहीलो राव मी. :(

-दिलीप बिरुटे

अन्या दातार's picture

10 Apr 2011 - 4:39 pm | अन्या दातार

>>लैच अशिक्षित राहीलो राव मी.
तरिबी डागदर झालासा!! ;)

कृ. ह. घे. वे. सां. न.

तुम्ही, आम्ही व तसेच अंध व्यक्तीला रोज ज्या अनुभवातुन जावे लागते जसे जेवण, भाजी खरेदी, एटीएम मधुन पैसे काढणे, रस्ता ओलांडणे, अन्य लोकांप्रमाणे एखाद्या सहलीचा अनुभव घेणे इ. याचा एक अनुभव घेतल्यावर, आपण आपल्या डोळ्यांवर किती भिस्त ठेवतो हे जाणवले व तसेच स्पर्श, गंध, आवाज यांचे महत्व कळून येते.

आपणास मिळालेली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये आहेत तशा स्वरुपात नसती तर काय झाले असते असा कधीतरी डोळे मिटून शांत बसुन केलेला विचार अलगद वेगळ्या अवस्थेत नेतो आणि काही काळ इंद्रियांना कितीही मोह झाला तरी त्यांचा वापर ते नाहित असे समजुन करायचा नाही म्हणजेच हात हलवायचा नाही, किंवा डोळे उघडायचे नाही, कानावर पडलेले आवाज दूर्लक्षित करायचे आणि स्वस्थ मनात कोणताही विचार करायचा नाही. खुप गोष्टी आपसुक उमजतात. जगाकडे, स्वतःकडे पहाण्याची वेगळी दृष्टी मिळते.

सहज चाळा म्हणून असा केलेला उद्योग नंतर अनेकांशी बोललो तेव्हा मला पक्क्या इडियटाला कळले की ह्याला बौद्ध साक्षीभावाने स्व पहाणे म्हणतात, योगी ध्यान म्हणतात, वेदांती ब्रह्माशी एकरुप होणे म्हणतात तर भक्त देवाशी तल्लीन होणे म्हणतात.

अरेच्या! प्रतिसाद देता देता कुठे मी केवळ शब्दच्छल असलेल्या तथाकथित भारतीय अध्यात्माकडे वळलो? चुकलेच ! असो.

छान लेख. उत्तम माहिती. लिहिते रहा !!!

नितिन थत्ते's picture

11 Apr 2011 - 7:36 am | नितिन थत्ते

>>अरेच्या! प्रतिसाद देता देता कुठे मी केवळ शब्दच्छल असलेल्या तथाकथित भारतीय अध्यात्माकडे वळलो? चुकलेच ! असो.

जुनी ओळख पटवल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर : आत्महत्या केल्यावर शैली आणि व्यक्तिमत्व पुसून टाकायला हवे. नाही का?
.
.
.
.
.
.
(अंतर्ज्ञानी)

पक्का इडियट's picture

11 Apr 2011 - 8:12 am | पक्का इडियट

>>>>जुनी ओळख पटवल्याबद्दल धन्यवाद.

कोणती जूनी ओळख? तुमची आमची काही ओळख आहे काय? होती काय? आपण वैयक्तिक रित्या एकमेकांना परिचित आहोत का ?आपण कधी एकमेकांना भेटलो आहोत का? नक्की काय लिहित आहात तुम्ही ?

>>>>अवांतर : आत्महत्या केल्यावर शैली आणि व्यक्तिमत्व पुसून टाकायला हवे. नाही का?

कसली आत्महत्या? कोणी केली ? आत्महत्या केल्याचा काय संबंध?
माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहित आहात तेव्हा मुळ लेखाशी किंवा प्रतिसादाशी सुसंगत असे काही तरी तारतम्य असुद्या लिहिण्यात !

संपादक मंडळ काय सध्या सुट्टीवर आहे काय?

खुलासा - माझा हा विवक्षित प्रतिसाद लेखाशी अवांतर असल्याची कल्पना आहे. पण वरती श्री नितीन थत्ते यांनी असंबंध्द प्रतिसाद दिल्याने मला हा प्रतिसाद देण्याची वेळ आलेली आहे ह्याचा मला खेद आहे. श्री नितीन थत्ते यांचा लेख व मुळ प्रतिसादाशी संबंधित नसलेला प्रतिसाद संपादित केल्यास माझा प्रतिसाद संपादित/अप्रकाशित केल्यास माझी हरकत नाही.
धन्यवाद.

नेत्रेश's picture

11 Apr 2011 - 9:02 am | नेत्रेश

थत्तेकाकांना तुमच्या प्रतिसादात गुंडोपंत दिसले असावेत.

राजेश घासकडवी's picture

11 Apr 2011 - 9:47 am | राजेश घासकडवी

संपादक मंडळाला घातलेली हाकही ओळखीच्या आवाजातली वाटली. छ्या, आमचे डोळे, कान दगा देत आहेत कदाचित. आम्हीही काही काळ ते बंद करून मनन, चिंतन करावं म्हणतो. खुप गोष्टी आपसुक उमजतील. जगाकडे, स्वतःकडे पहाण्याची वेगळी दृष्टी मिळेल. उगाच शब्दच्छल का करावा?

सहजरावांनी या लेखात दिलेली माहिती आवडली हे वे सां न.

राजेश
नवे वर्ष नवी सुरुवात, नव्या यशाची नवी रुजवात !!!

पक्का इडियट's picture

11 Apr 2011 - 11:26 am | पक्का इडियट

मिसळपावचे अधिकारिक धोरण http://www.misalpav.com/node/13199 इथे वाचता येईल.

त्यातला एक उतारा खाली देत आहे.

४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.

श्री. थत्ते यांचा प्रतिसाद सदर धोरणाचे उल्लंघन करत असूनही अप्रकाशित झाला नाही याचे आश्चर्य वाटून संपादकांना हाक दिली.

आपण संपादक असल्याचे माहित नव्हते अन्यथा आपणास सुचित केले असते. जर आपण संपादक नसाल तर अनावश्यकरित्या मधेच चर्चेत घुसण्याचे प्रयोजन समजले नाही. कदाचित तुमचे चिंतन झाल्यावर तुम्ही ज्ञानामृताचा वर्षाव कराल त्यात ते समजावे. तुर्तास अशी हाक मारणारे अनेक जण आहेत याची नोंद घेतलेली बरी. उदाहरणार्थ - http://misalpav.com/node/17563#comment-305208

कळावे.

खुलासा - सदर प्रतिसाद अवांतर आहे याची मला जाणीव असुन वरील श्री घासकडवी यांचा अनावश्यक प्रतिसाद (धोरणाच्या ४ थ्या कलमानुसार) अप्रकाशित केल्यावर माझा प्रतिसाद अप्रकाशित करावा. धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture

12 Apr 2011 - 5:57 am | राजेश घासकडवी

बाकी चर्चा खरडवहीत.

शरदिनी's picture

10 Apr 2011 - 2:46 pm | शरदिनी

मुक्तक छान.. रोचक

आणि सहजकाकाही लिहिते झाले. :)

चांगला परिचय करुन दिला आहे प्रदर्षना बद्दल. प्रत्यक्षात कधी अनुभवता येईल माहीत नाही.
पण जर कुण्या मिपाकराने भेट दिलीच तर त्यांचा अनुभवही वाचायला आवडेल.

मृत्युन्जय's picture

10 Apr 2011 - 4:35 pm | मृत्युन्जय

पुण्यात कधी येतय त्याकडे लक्ष दिले पाहिजे आता.

स्वाती दिनेश's picture

10 Apr 2011 - 5:27 pm | स्वाती दिनेश

चांगली माहिती,
स्वाती

विकास's picture

10 Apr 2011 - 5:45 pm | विकास

नवीनच माहिती कळली! आणि ते देखील सहजरावांच्या लेखणीतून!! :-)

भारताच्या (आणि इतरत्रही) नोटांवर अशा ब्रेल लिपीतील खुणा असतात हे ऐकून चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले. एटीएम वर अशी ब्रेल लिपी असलेली पाहीली आहे.

थोडी शोधाशोध केल्यावर हा दुवा आणि सी एन एन वरील खालील व्हिडिओ सापडला:

अटलँटामधील प्रदर्शनात चक्क अंधारातलं जेवण असणार आहे!

"...Dining in the Dark, a first of its kind in Atlanta, allows guests to experience a four-course
meal prepared by top chef's from around Atlanta, in total darkness and served by blind or
visually impaired guides...."

(@नंदनः न्यूयॉर्क मध्ये लवकरच हे प्रदर्शन येऊ घातलं आहे असं वरील संस्थळावर कळलं.)

सहज's picture

10 Apr 2011 - 6:46 pm | सहज

हैद्राबाद येथे देखील 'अंधारातले जेवण' सोय आहे. तसेच कॉर्पोरेट वर्कशॉप्स देखील उपलब्ध आहेत. मूळ हेतू हाच की अंधासाठी जितक्या संधी उपलब्ध करुन देता येतील त्याकरता डोळस जगाशी केलेला संवाद (कम्युनिकेशन) डायलॉग इन द डार्क!

स्मिता.'s picture

10 Apr 2011 - 6:14 pm | स्मिता.

सहजराव, एका सामाजीक उपक्रमाची छान ओळख करून दिलीत.
सुदैवाने सर्व ज्ञानेंद्रिये व्यवस्थित असल्याने ज्यांच्याजवळ दृष्टीच नाही अश्यांच्या जगाबद्दल मदत करणे किंवा सहानुभूतीशिवाय जास्त विचार मनात आला नव्हता. पण या प्रदर्शनाची ओळख वाचून खरोखर अश्या व्यक्तींना काय-काय प्रसंगांना तोंड द्यावं लागत असेल याचा विचार करून मन खिन्न झाले.

प्रदर्शनाच्या शेवटी एका कॅफेमधे अंधारात खाद्यपदार्थ घेउन आपल्या गाईड बरोबर गप्पा मारताना, आपण खरोखर जो संवाद साधत असतो जो बरेचदा आपण आपल्या दृश्य जगात अंध व्यक्तीबरोबर साधत नाही. जेव्हा आपण अंध असतो, तेव्हा आपल्याला सहानुभूतीपेक्षा, मदतीपेक्षा, माहीती व स्वावलंबनाला अनुकूल वातावरण हवे असते हे आधीक प्रकर्षाने जाणवते.

या ओळी खूप काही सांगतात.

विनायक प्रभू's picture

10 Apr 2011 - 6:42 pm | विनायक प्रभू

चांगलीच माहीती.
चला सहजराव लिहीते झाले.

आनंदयात्री's picture

10 Apr 2011 - 8:55 pm | आनंदयात्री

माहिती खरेच रोचक आहे. शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद :)

मुलूखावेगळी's picture

10 Apr 2011 - 8:56 pm | मुलूखावेगळी

छान माहिती

हैदराबदला गेले तेव्हा माहित नव्हते. नाही तर जाता आले असते .
आता पुढच्या वेळेस नक्कि जाइल

वेगळेच प्रदर्शन आहे असे दिसते (?).
कल्पना भारीच.
चांगल्या माहितीबद्दल धन्यवाद!

चित्रा's picture

10 Apr 2011 - 9:26 pm | चित्रा

धन्यवाद. ही कल्पना वेगळी वाटली.

प्राजु's picture

10 Apr 2011 - 10:16 pm | प्राजु

अरे वा! एक वेगळीच माहिती.
यातलं काहीच माहिती नव्हतं. धन्यवद सहजराव.

चतुरंग's picture

10 Apr 2011 - 10:30 pm | चतुरंग

अत्यंत कल्पक प्रदर्शन दिसते आहे. नक्कीच बघायला हवे.
नोटांवरच्या खुणा बघितलेल्या स्मरताहेत परंतु त्या या कारणासाठी होत्या हे माहीत नव्हते! धन्यवाद सहजराव.
---------
मागे कधीतरी कुठेतरी वाचलेला किस्सा - दोन अंध नवरा बायकोतला संवाद -
ती (नुकतीच गावाहून परत आलेली असते) : का हो घरी कुणी आलं होतं का?
तो : हो. काल माझे मित्र येऊन गेले.
ती : तरीच, वस्तू जागच्याजागी सापडत नाहीयेत!

वा.. चांगली माहिती माहिती मिळाली
आभार!

ऋषिकेश's picture

11 Apr 2011 - 8:49 am | ऋषिकेश

सहजराव लिहितात तेव्हा...! :)
मस्त माहिती!.. अनुभव घ्यायलाच हवा असे वाटले.
अटलांटात असताना माहिती असती तर गेलो असतो.. संधी हुकली :(

sneharani's picture

11 Apr 2011 - 10:14 am | sneharani

एका वेगळ्याच प्रदर्शनाची मस्त माहिती!

मराठमोळा's picture

11 Apr 2011 - 12:37 pm | मराठमोळा

नविन माहिती.. चांगली संकल्पना.. :)
धन्यवाद!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Apr 2011 - 9:53 pm | बिपिन कार्यकर्ते

हलवून टाकणारा आणि अंतर्मुख करणारा अनुभव!

धनंजय's picture

12 Apr 2011 - 3:43 am | धनंजय

प्रस्पर्शनाची (प्र"दर्शन" कसे म्हणावे?) कल्पना आवडली.

सहज's picture

12 Apr 2011 - 10:43 am | सहज

बरोबर फक्त स्पर्शच नव्हे तर गंध व आवाजाचाही तेवढाच वापर करता आला. उदा. एका ठिकाणी योग्य ते मसाले ओळखणे, एखादी व्यक्ती किती दूर आहे, पाण्याचा प्रवाह, लाटांचा प्रवाह आवाजावरुन (लाट येत असते ते आदळते / संपते त्यातील आवाजातला फरक व मग तो पॅटर्न)अनुभवणे.

अंधारात चालताना सुरवातीला जरा तोल जाणे, गोंधळायला होते, तेव्हा आपसुक आपल्या साथीदाराचा हात आपण धरतो पण हा एक हात धरणे म्हणजे डोळस माणसाचा एक डोळा बंद करणेच आहे हे जाणवते. कारण एका हातात काठी व दुसर्‍याने बाजुची भिंत, झाड इ. अंदाज घेत एकट्याने हा प्रवास करणे अभिप्रेत आहे.

बायदवे हे प्रदर्शन नउ वर्षाखालील मुलांसाठी नाही. त्यामुळे त्याहून मोठी मुले असतील व ती अंधाराला घाबरणार नसतील व नेटाने एक तासभर हा अनुभव घ्यायला तयार असतील तरच त्यांना बरोबर न्या. आणी हो, आत मधे आपल्याला दिसत नसले तरी तिथे केलेली कृष्णकृत्य झाकली जाणार नाहीत कारण नाईट व्हीजन कॅमेरा, क्लोज सर्कीट टिव्हीने संपूर्ण एरीया कव्हर केला आहे.

आता सई परांजपे दिग्दर्शीत स्पर्श, आणी भंसाळीचा ब्लॅक पहायला हवा.

सन्जोप राव's picture

12 Apr 2011 - 5:13 am | सन्जोप राव

वरील (वैयक्तिक आणि वादग्रस्त वगळले तर इतर) प्रतिसादांशी सहमत. हैदराबादला गेल्यावर हे आठवणींने बघायला पाहिजे.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Apr 2011 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुंदर माहिती सहजमामा.

नोटांवरील खुणांची माहिती देखील माझ्यासाठी नविनच. धन्यवाद.

अवांतर :- मिपावर सध्या स्वयंघोषीत जेम्स बाँड आणि प्रभाकर पणशीकरांची गर्दी वाढत चालली आहे.

सुनील's picture

13 Apr 2011 - 4:01 pm | सुनील

बरीच नवी माहिती मिळाली. आणि मुख्य म्हणजे ह्या लेखाच्या निमित्ताने सहजराव लिहिते झाले; हेही नसे थोडके!

प्रकाश घाटपांडे's picture

14 Apr 2011 - 2:09 pm | प्रकाश घाटपांडे

चांगला लेख
अंधांच्या जगातील एक वेगळेपण डोळसांना वेगळीच अनुभुती देउन जाईल यात शंकाच नाही

धन्यवाद सहज ! चांगली माहिती मिळाली.

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 4:51 pm | प्राजक्ता पवार

चांगली माहिती मिळाली .

केशवसुमार's picture

14 Apr 2011 - 7:25 pm | केशवसुमार

सहजशेठ,
चांगली माहिती ..
(वाचक)केशवसुमार