माझी भटकंती : उरलंसुरलं

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
14 Nov 2010 - 1:11 am

माझी भटकंती : उत्तराखंड http://www.misalpav.com/node/15232

माझी भटकंती : अंदमान http://www.misalpav.com/node/15257

माझी भटकंती : पुर्वोत्तर भारत http://www.misalpav.com/node/15366

.......नाही हो ! उरलंसुरलं नावाच्या जागी नाय गेलो मी. हाय का नाय, म्हाईत नाय. ;-)

वोक्के मंडळी, माझी प्रवासानुभवाची शिदोरी संपायला आली आहे. चारीठाव जेवल्यावर आपण जशी ताटात उरलेली कोशिंबीर, चटणी, जरासं लोणचं बोटानी चाखून-माखून खातो ना, तसाच हा माझ्या प्रवासातल्या काही ठिकाणांचा आस्वाद तुम्हाला घेता यावा म्हणून हा लेख.. ह्यात मी ह्या कोपर्‍यातून त्या कोपर्‍यात अशा उड्या मारल्यात, झेलून घ्यावं ही विनंती...

हिमाचल हा अतिशय सुंदर प्रदेश.. इथे उंच उंच पर्वतरांगा आणि गर्द हिरवी जंगलं मिळतात तशीच बर्फाळ, ओसाड वाळवंट ही मिळतं. भारतात टक्केवारीनुसार सगळ्यात जास्त हिंदु जनसंख्या असलेल्या ह्या राज्यात, बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च गुरु असलेले दलाई लामा राहतात. दलाई लामा जिथे राहतात, त्या "धर्मशाला" पासून आणखी पुढे गेलं की "मॅकलियॉडगंज" आहे. इथे दलाई लामा मंदीर नावाचं एक बौध्दमंदीर आहे..

ह्या मंदीरात मला भगवान बुद्ध "चोकोपायकडून समाधीकडे" जातांना दिसले... (कृ. ह. घ्या.)

इथेच हे महाराज पण दिसले, आणि मला तर ते "भयानक" आवडले बुवा !!

कोलकात्याला दक्षिणेश्वर मंदीरात गेलो होतो.

प्रचंड गर्दी आणि लांबलचक रांग होती. मला देवाशी गाठभेट आणि संवाद थोडा निवांतपणे हवा असतो. (उगाच "पुढे चला, पुढे चला" नको) म्हणून मग आत न जाता बाहेरुनच हात जोडले. त्या मंदीराच्या प्रांगणात ममतेचं दर्शन घडलं..

छत्तीसगढ हे राज्य आपल्याला माहीत आहे, ते नक्षलवाद्यांच्या बातम्यांसाठी.. त्यातल्या त्यात बस्तर जिल्हा तर कुप्रसिद्धच..
ह्याच बस्तर जिल्ह्यात दोन अतिशय सुंदर असे धबधबे आहेत...

हा तिरथगढ धबधबा.. इथे जवळच एक प्राचिन मंदीर आहे, आणि तुम्हाला दाट जंगलातून (जे अभयारण्यही आहे) प्रवास करावा लागतो इथे जायला..

इथून परत जगदलपूरला आलात की दुसर्‍या दिशेला थोड्या अंतरावर आहेत चित्रकोट धबधबा...

पावसाळ्यात काय अफाट दिसत असेल ना हा? आम्ही गेलो तो दिवस २६ जानेवारीचा, तेव्हापण इतकं पाणी होतं... माझ्या आतला किडा मला काही "येडपोझ"पणा केल्याशिवाय स्वस्थ बसू देईना...

ह्या चित्र-लेखमालेचा शेवट दलाई लामा मंदीरातील ह्या फोटोनी करतोय...

ह्या दिव्यांचे तेज आपणां सर्वांचे आयुष्य प्रकाशमय व आनंददायी करत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

फिर मिलेंगे चलते चलते...!!

मुक्तकप्रवासछायाचित्रणप्रकटनआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विलासराव's picture

14 Nov 2010 - 9:05 am | विलासराव

फोटो आहेत.
धबधबा , दलाई लामा मंदीरातील दिव्यांचा फोटो जास्त आवडला.

अरुण मनोहर's picture

14 Nov 2010 - 11:38 am | अरुण मनोहर

धबधब्याचे फोटो मस्तच

धबधबे आणि खास करुन दलाई लामा मंदिरातला फोटो अतिशय सुरेख आहे, खूप आवडला..

पियुशा's picture

14 Nov 2010 - 3:49 pm | पियुशा

मस्त मस्त् च,

चित्रा's picture

14 Nov 2010 - 4:58 pm | चित्रा

माकडांचा, शेवटचा दलाई लामा मंदिरातील आणि धबधबा हे फोटो विशेष आवडले.

बुद्धाला चॉकोपायचा नैवेद्य बघून फारच गंमत वाटली. :)

नंदन's picture

14 Nov 2010 - 5:24 pm | नंदन

सगळेच फोटो मस्त - शेवटचा दिव्यांचा आणि चित्रकूट धबधब्यांचा विशेष आवडला!

फिर मिलेंगे चलते चलते...!!

--- ये हुई ना बात! आगामी भटकंतीचे फोटो पाहण्यास आणि वर्णन वाचण्यास उत्सुक.

अर्धवटराव's picture

16 Nov 2010 - 12:54 am | अर्धवटराव

अहो तुम्हाला काय गरज उरली त्या दक्षीणेश्वर मंदीरात जायची... कालिकेने तुम्हाला लाईव्ह दर्शन दिलं ना.
शेवटचा "ज्योतसे ज्योत जगाते चलो" तर क्लासच.

सगळेच फोटो अप्रतीम. हि लेखमाला म्हणजे मेजवानी.
पुढली पंगत लवकरच घाला मालक.

अर्धवटराव

चिगो's picture

16 Nov 2010 - 3:12 pm | चिगो

धन्स..
>> हि लेखमाला म्हणजे मेजवानी.
पुढली पंगत लवकरच घाला मालक.
<<

अहो, मेजवानी संपलीय (सध्यापुरती तरी) म्हणून तर "उरलंसुरलं" म्हणतुय..