गारांचा पाऊस

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
3 Jun 2010 - 7:20 pm

परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन! त्या घोंघावणाऱ्या वाऱ्याला, कडकडाट करून कानठळ्या बसविणाऱ्या विद्युल्लतेला व आभाळात दाटून आलेल्या कृष्णमेघांच्या गर्दीला घाबरून परिसरातील पक्षीगणही चिडीचूप... गायब झाले होते. कोणी चुकार, उशीरा जागे झालेले पक्षी जोरजोरात पंख फडकवून येणाऱ्या पावसाच्या चाहुलीने आसरा शोधत हिंडत होते.

मग पुन्हा एकदा ढगांचा एकच गडगडाट झाला. विजेने आकाशात वेगवेगळ्या नृत्यमुद्रा धारण करणे सुरू केले. वाळ्याच्या पडद्याला बांधलेल्या दोऱ्याची गाठ पक्की करण्यासाठी म्हणून मी हात खिडकीबाहेर काढले आणि तोच आभाळातून गारांचा वर्षाव सुरू झाला. काय त्यांचा तो वेग, काय विलक्षण मारा.... आभाळातून जणू कोणी मशीन-गनमधून गोळ्या झाडल्यागत गारा झाडत होते! क्षणभर मला स्वतःच्याच विचाराचे हसू आले. तोवर बघता बघता गारांच्या माऱ्याने बराच वेग घेतला होता. उघड्या खिडकीतून आता त्या घरातही येऊ लागल्या होत्या. त्यांच्या त्या वर्षावात आगळेच रौद्र सौंदर्य होते. न राहवून मी ड्रेसच्या ओच्यात गारा गोळा करू लागले. प्रत्येक गार अगदी पत्री-खडीसाखरेच्या दाण्याहूनही टपोरी.... त्यांना चपळाईने वेचून खाता खाता मन हळूच बालपणात डोकावून आले....

लहान असताना माझ्या आजूबाजूला अंगण होते, अंगणात झाडे होती. सिमेंट काँक्रीटचे रस्ते अजूनही घराला लगोलग चिकटले नव्हते. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल देत जेव्हा जेव्हा असा गारांचा पाऊस पडे तेव्हा सर्व बच्चे कंपनी अंगणात धाव घेत असे. ओल्या मातीच्या गंधाने वेडे होत, आभाळाकडे तोंड करत आ वासून आधी गारा थेट तोंडातच पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला जाई. पण त्या प्रयत्नांत समोर न बघितल्याने एकमेकांशी टक्करच जास्त होई! कधी तर कपाळमोक्ष व टेंगळे! मग आम्हां मैत्रिणींची फ्रॉकचा ओचा पुढ्यात पसरून त्यात गारा पकडायची चढाओढ लागे. जमिनीवर पडलेल्या गाराही धूळ, मातीची पर्वा न करता उचलून घेत बिनदिक्कत खाल्ल्या जात. त्या गार गार बर्फाळ गारांना कडाड कुडूम खाताना येणारा आवाज आणि नंतर बधिर होणारे तोंड यांतही वेगळीच मजा असे. चेहऱ्यावर, उघड्या हाता-पायांवर गारांचा सपासप मार बसत असे. पण एरवी आईने हलकी चापट जरी दिली तरी गळा काढणारे अस्मादिक गारांचा हा मार हसत-खेळत सहन करत असू!

पावसात मनसोक्त भिजून झाले की मग नखशिखांत भिजलेल्या अंगाने, कुडकुडत, पावलागणिक पाण्याचे ओहोळ तयार करत समस्त ओले वीर/ वीरांगना आपापल्या घरी परतत असत. घरी आई किंवा आजी हातात टॉवेल घेऊन सज्जच असे! सर्वात आधी आमची चुकार डोकी टॉवेलच्या घेरात पकडून खसाखसा पुसली जात. अगदी घोड्याला खरारा केल्यागत! कित्येकदा त्यात आमचे चेहरेही खरवडून निघत.... पण त्याला इलाज नसे! मग आमची पिटाळणी स्नानगृहात होई. तिथे ओले कपडे बदलणे, अंग पुसणे, माती-चिखलाचे हात पाय धुऊन कोरडे करणे वगैरे सोपस्कार केले की मगच स्नानगृहाच्या बाहेर येता येई. बाहेर आल्यावर पावसात भिजल्याची खूण म्हणून दोन-चार शिंका सटासट दिल्या की मलाही समाधान मिळे. त्यानंतर ऊबदार स्वयंपाकघरात मऊ जाजमावर मांडी ठोकून समोर आलेल्या उकळत्या हळद-आलेयुक्त दुधाचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा.... पाऊस ओसरला की जुन्या वह्यांचे कागद फाडून त्यांच्या होड्या बनवून त्यांना गटाराच्या वाहत्या पाण्यात सोडायचे....

अनेकदा पावसाच्या स्वागतार्थ घरी भजी तळली जायची.... शेजारच्या उपाहारगृहातील भटारखान्यात दिलेली झणझणीत लसणाची खमंग फोडणी आणि तिचा घमघमाट (माझ्या आजोबांच्या भाषेत 'खकाणा') थेट मस्तकात जायचा.... कधी कोठेतरी कोणी मिश्रीसाठी तंबाखू भाजायला घ्यायचे.... नाकपुड्या हुळहुळायच्या.... पुन्हा दोन-चार शिंका!! उरलेला पाऊस मग बाल्कनीत बसून बघायचा. रस्त्यातील पाण्याच्या डबक्यांमधील तवंगांमुळे निर्माण होणाऱ्या इंद्रधनुष्यी छटा न्याहाळत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही.

शाळा सुटली, आयुष्य पुढे सरकले, मोरपिशी दिवस सुरू झाले. आता जेव्हा गारांचा पाऊस पडायचा तेव्हाही त्या वेचायला, पावसात मनसोक्त भिजायला मजा यायची. पण त्याचबरोबर मनात कोठेतरी एक चोरटा भावही असायचा. इतरांच्या नजरांची जाणीव असायची. अन तरीही त्या चिंब पावसात गारा लुटताना पुन्हा एकदा मन बाल होऊन जायचे... पावसाच्या माऱ्यासरशी आरडत-ओरडत, गारांना हातात झेलायचा प्रयत्न करत वर्षातालावर केलेले उत्स्फूर्त नृत्य.... गारठ्याने कुडकुडत असतानाही पावसाच्या पाण्याच्या डबक्यांत उड्या मारत एकमेकांच्या अंगावर उडवलेले पाणी... आमच्या इमारतीच्या गच्चीवर आभाळाकडे बघत, पावसाला थेट तोंडावर झेलत, हात पसरून गरागरा घेतलेल्या गिरक्या....

आजही ते सारे आठवले. वयाने कितीही मोठे झालो तरी मनाचे वय वाढत नाही हेच खरं! कारण आजदेखील त्या पावसात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करायला मन आसुसले होते. मग घरातच मी एक छोटीशी गिरकी घेतली. तडतडाडतड नृत्य करणाऱ्या गारा ओंजळीत पकडून भरभरून खाल्ल्या. माझे मन भरले तरी गारांचा मारा अजून चालूच होता. बघता बघता समोरच्या नुकतीच खडी घातलेल्या काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्यावर पांढऱ्या शुभ्र गारांची खडी पसरली. तो शुभ्र गालिचा इतका सुंदर दिसत होता म्हणून सांगू! घनदाट काळ्या केशकलापात माळलेले स्फटिकमणीच जणू..... समोरच्या आंब्याच्या झाडाला तर वाऱ्याच्या बेभान तालावर अंग घुसळवत डोलण्याचा, नाच करण्याचा मुक्त परवानाच मिळाला होता! त्याची उन्हाळ्यात धुळकटलेली पाने पावसाच्या वर्षावात हिरवीगार चिंब धुतली गेलेली.... नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... फक्त ती पालवी झाडाच्या माथ्यावरच होती ही गोष्ट अलाहिदा! आंब्याच्या झाडाला लगटून असलेला मधुमालतीचा वेलही वाऱ्याच्या झोक्यांसरशी गदगदा हालत होता.

पावसाने गारव्याची अशी काही बरसात केली की सारी सृष्टीच नव्हे तर मनही त्या सरींमध्ये न्हाऊन निघाले! उन्हाळ्याच्या बेहद्द गर्मीनंतर असा पाऊस म्हणजे चंदनाची उटीच जणू! त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारीही आनंदात दिसत होते. खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्याचे फवारे वाहनांच्यामुळे अंगावर उडत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले पावसाचे कौतुक कायम होते. दुकानदार दुकानातील थंडावलेल्या वर्दळीची पर्वा न करता बाहेर येऊन पावसाचा आनंद लुटत होते. छोट्या मुलांचे पावसात भिजतानाचे आनंदी चीत्कार, आरडा-ओरडा, किलकाऱ्या यांनी वातावरणात अजूनच रंग भरले जात होते.

पाऊस ओसरला, थांबला आणि मग आभाळात पुन्हा पक्ष्यांची गर्दी दिसू लागली. समोरच्या इमारतीच्या टेरेसवर, तारांवर, झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांनी आपापले पंख झटकून 'अंग वाळवणे' अभियान सुरु केले. मावळत्या सूर्याच्या काही चोरट्या किरणांनी परिसराला काही वेळ एका वेगळ्याच छटेत उजळवून टाकले. निसर्गाचा लाईव्ह लेसर शो समाप्त झाला होता. थंड वाऱ्याच्या झुळुकींबरोबर आता एक नवाच चिरपरिचित गंध नाकाला खुणावू लागला होता... कोपऱ्यावरच्या वडेवाल्याने समयोचित ताज्या, गरमागरम बटाटेवड्यांचा घाणा तळायला घेतला होता :-)

-- अरुंधती

वावरजीवनमानमौजमजाप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

3 Jun 2010 - 7:25 pm | अवलिया

चांगला लेख.

कोपऱ्यावरच्या वडेवाल्याने समयोचित ताज्या, गरमागरम बटाटेवड्यांचा घाणा तळायला घेतला होता Smile

छ्या ! गरमागरम कांदा भज्यात जी मज्जा ती बटाटेवड्यात नाही. आणि नंतर मस्त आल्याचा चहा.
आपली आपली आवड.

--अवलिया

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:38 pm | अरुंधती

बटाटेवड्यांची राऊंड झाली की असतेच खेकडाभजीची राऊंड.... त्यावर चहाची फोडणी!
(आमच्या घराजवळचा वडेवाला कांदा महागल्यापासून फक्त बटाटाभजी, मिर्चीभजी व मूगभजी तळतो! :( )
अवलियासाहेब, भजीची खमंग आठवण करून दिल्याबद्दल धन्स! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

4 Jun 2010 - 9:25 pm | टारझन

आवलियाजींनी अरुंधती जींना भजीची खमंग आठवण करुन दिल्याने डोळे पाणावले ,
आणि लेख वाचुन तोंड पाणावले ... :)

- खमंगती(भजी)

मदनबाण's picture

3 Jun 2010 - 7:34 pm | मदनबाण

गारेगार लेख... :)
कित्येक वर्ष झाली मला परत गारांचा पाऊस पहायला मिळालाच नाही !!! :(

नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... फक्त ती पालवी झाडाच्या माथ्यावरच होती ही गोष्ट अलाहिदा! >>>
खी खी खी... ख्या ख्या ख्या. काय हो ताई ठीक आहात ना !!! ;)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:39 pm | अरुंधती

हा हा हा, मी आहे अजून तरी ठीक.... पण खर्रच ती आंब्याची पानं इतकी मस्त मस्त दिसत होती.... मला प्रेमाने त्यांना गट्ट्म स्वाहा करावेसे न वाटले तरच नवल! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

4 Jun 2010 - 8:46 pm | मदनबाण

हा.हा.हा... हो कोवळी पालवी खावी वाटते हे मात्र खरं...
खाली चित्रा ताईने सांगितलेला पाल मी मन मुराद चरला आहे !!! ;)
बाकी तुमच्या वरच्या प्रतिसाद हे वाक्य वाचलं :---
खेकडाभजीची राऊंड>>>
हे काय? वाचाव ते नवलचं... ;)

(पाला-पाचोळा खाणारा वळू) ;)
मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

शुचि's picture

3 Jun 2010 - 7:42 pm | शुचि

सुंदर ललीत लेख : )
>>आजदेखील त्या पावसात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करायला मन आसुसले होते >> : )
लहानपणीचं एक गाणं आठवलं -
टपटपटप काय बाहेर वाजतय ते पाहू
चल ना आई
चल ना आई
त्या पावसात जाऊ

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:43 pm | अरुंधती

शुचि, मला नव्हतं गं माहीत हे गाणं.... आम्ही आपले ''ये रे ये रे पावसा'' करत बसायचो! पावसाकडे बघता बघता पावसाची गाणी ऐकत-म्हणत खरंच इतकी धम्माल येते गं! फुल सेलिब्रेशन! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

भानस's picture

3 Jun 2010 - 7:59 pm | भानस

आमच्याकडे खूप वेळा गारा पडतात पण आयती भजी आणि बटाटेवडा... :( नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... हा हा.... अगदी अगदी. सेम पिंच. तशी पालवी खादडता येत नाही म्हणून पावसाळ्यात येणारी कुठलीही पालेभाजी म्या चरते. :)

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:47 pm | अरुंधती

अगदी अगदी गं भाग्यश्री....
भारतात नाक्यानाक्यावर मिळणार्‍या ब.वडा व भजीचं सुख न्यारंच!
बाकी पावसाळ्यात इथली पालेभाजी चिखल-मातीशी जरा जास्तच सलगी केलेली असल्याने टाळली जाते! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम अरुंधती, आपलं, मस्त लेख!

आमच्याकडे का नाही गारा पडल्या? :-(

अदिती

मेघवेडा's picture

3 Jun 2010 - 9:06 pm | मेघवेडा

वितळल्या असतील.. तापमान भयंकर ना तुझ्या डोक्याचं!! ;)

बादवे, लेखन नेहमीप्रमाणे उत्तम आहेच!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 9:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझं डोकं गरम हे मात्रं खरं!! पण म्हणूनतर गारा पडल्या पाहिजेत ना ... तापमानात फरक असतो तेव्हाच गारा पडतात, जमिनीवर तापमान कमी असेल तर इंग्लंडातल्यासारखा बर्फ पडेल ना रे, लॉर्ड मेवे!

अदिती

मेघवेडा's picture

3 Jun 2010 - 9:34 pm | मेघवेडा

तेच म्हणतोय.. 'तापमानातील फरकाच्या' नियमाप्रमाणे पडल्या खर्‍या पण .. वितळल्या! असो.

बादवे लॉर्ड काय..? ड्युक, मार्किस, अर्ल निदान व्हिस्काऊंट तरी म्हणायचं.. लॉर्ड नको.. ते उगाच राजकारणी झाल्यासारखं वाटतं! ;)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

श्रावण मोडक's picture

3 Jun 2010 - 9:52 pm | श्रावण मोडक

लॉर्ड नको.. ते उगाच राजकारणी झाल्यासारखं वाटतं! Wink
हेहेहेहे... त्यासाठीच तर ती तसं म्हणाली. तू काही राजकारणी नाहीस. तरीही ती तसं म्हणते. म्हणजे... जाऊ दे... इतकं स्पष्टीकरण नको.

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:49 pm | अरुंधती

थॅन्क्स गं अदिती!
तू ये पुण्याला, मग गारांचा पाऊस मिळेल अनुभवायला! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jun 2010 - 12:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पुण्यातच आहे गं अरूंधतीताई, इथे विद्यापीठात गारा दिसल्या नाहीत म्हणून जास्तच रडून दाखवलं! आणि तो रेडीओ मिर्चीवाला गारांचं गारेगार लाईव्ह वर्णन सांगत होता.
आमच्याइथे आम्ही फक्त साठलेल्या पाण्यात फतकन उड्या मारून, आणि रस्त्यातून चालताना खाली झुकलेल्या झाडांच्या फांद्या ओढून अचानक सोडून द्यायचा खेळ खेळलो!

अदिती

असा मस्त गारांचा पाउस पडतोय. मी गॅलरीत बसुन तो बघतोय .
सोबत ओल्ड मंकची चपटी = समाधी अवस्था .................
(चखण्याची लिस्ट खुप मोठी होउ शकते पण कमीत कमी पापड / बॉइल्ड एग/ मांदेली)

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बेसनलाडू's picture

3 Jun 2010 - 9:50 pm | बेसनलाडू

चित्रदर्शी लेखन. जुन्या दिवसांत घेऊन जाणारे. फार आवडले.
(चिंब)बेसनलाडू

चित्रा's picture

3 Jun 2010 - 9:52 pm | चित्रा

छान लिहीले आहे. लेख आवडला.

नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला...
चिंचेचा पाला खाऊन बघा जमल्यास, कोवळा. मस्त लागतो.

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:50 pm | अरुंधती

हा हा हा.... चित्रा, अगं चिंचेचा पाला हा तर माझा आवडता खाऊ आहे! (पण मी बकरी नाही हे आधीच सांगितलं आहे! ;-))
धन्स प्रतिसादाबद्दल!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इन्द्र्राज पवार's picture

3 Jun 2010 - 9:56 pm | इन्द्र्राज पवार

".....पावसाने गारव्याची अशी काही बरसात केली की सारी सृष्टीच नव्हे तर मनही त्या सरींमध्ये न्हाऊन निघाले! ...."

पावसाने आणि गारांच्या वर्षावाने निर्माण झालेला अरुंधतीताईंच्या प्रतिभेचा हा आविष्कार एका सुखद तुषारांचा अनुभव देवून गेला आहे. या वर्णनाशी साम्य राखणारी पु.शि.रेग्यांची एक कविता त्याच क्षणी मला आठवली... कविता खूपच मोठी असल्याने त्यातील बरीच कडवी मला नीट आठवत नव्हती म्हणून तो संग्रह मुद्दाम शोधून काढला....त्यातील हे "गारा नृत्य..."

"तडकते वर जलकणांची संतत धारा :
स्वेदकण हे फुटून येती आतून वर....
क्वचित एकादा फेनधवल
हंसा़कृति मेघ घालतो भासे
झेप खालती - ज्युपिटर जसा -
उष्ण-मृदुल पिसांच्या गर्दीत
विकल लेडा....
दूर कुठे तरी साद उठती तार उत्कट,
'होईन पांखरू; घेईन चोचीनें
कमल-तंतू, देठ कोवळे;
तुडुंब तडागी डुंबत नाचेन -
पंख माझेच जीवनोत्सवी आहेत ध्वज....!'
जडत्व आता इतुके भिनले
तू सहसंवादी चराचराचा.
उरल्या नाहीत काहीच सीमा...
वहाळ, नाले.... पाणीच पाणी ...
अचल परी मनूसाठी तू मत्स्य सत्यसंघ
कारण आहे जीवनी तुला उत्कट आशा.

असे कधी तरी
तुंबळ वायूच्या अट्टाहासात
परिचित श्री चिरपरिचित
रूप दाविते...."

१०४ ओळींची असलेली "वर्षागान" ही पूर्ण कविता जरूर वाचा... फार आवडेल तुम्हाला !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:34 pm | अरुंधती

फार छान कविता दिलीत भाऊ! अवश्य वाचेन वर्षागान! :-) धन्यवाद!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अनिल हटेला's picture

3 Jun 2010 - 10:28 pm | अनिल हटेला

एकदम गारेगार लेख !! :)

(गारोबा) ;)
चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

मीनल's picture

4 Jun 2010 - 3:44 am | मीनल

आत्ताच्या आत्ता हवाय तो बटाटा वडा. गर्मा गरम.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:52 pm | अरुंधती

ये इथं, मग खिलवते तुला गर्मागरम बटाटेवडा व भजी! आमच्या गल्लीच्या कोपर्‍यावर मस्त मिळतात दोन्ही.... सकाळ संध्याकाळ घमघमाट सुटलेला असतो नुसता! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Manoj Katwe's picture

4 Jun 2010 - 5:32 am | Manoj Katwe

वयाने कितीही मोठे झालो तरी मनाचे वय वाढत नाही हेच खरं
हेच खरं

सहज's picture

4 Jun 2010 - 6:16 am | सहज

चला आता भानसताईंनी एक लेख लिहावा मग परत अरुंधतीताईंनी..

चतुरंग's picture

4 Jun 2010 - 7:40 am | चतुरंग

गारा वेचून खाल्ल्याला कित्येक वर्ष झालीत! किती साध्या साध्या आनंदाला मुकतोय असं वाटतं.
गच्च पाऊस पडून गेल्यावर आभाळ उघडतं तेव्हा मला फार आवडतं. सगळीकडे गार हवा, पाऊस पडून गेल्याने खाली बसलेला धूर - धूळ आणि स्वच्छ प्रकाश, एकदम आल्हाददायक असतं वातावरण.
गरमागरम चहा घ्यावा आणि सज्जात, खिडकीत उभं राहून रस्त्यावरची गंमत बघत राहावं..

(नांगराची होडी न जमणारा)चतुरंग

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:56 pm | अरुंधती

पाऊस पडून गेल्यावर काही मिनिटं तरी एक अनाम शांतता जाणवते वातावरणात.... सारं कसं तृप्त, स्वच्छ, लख्ख वाटतं त्या काही मिनिटांत.... मग पुन्हा वाहनांचे हॉर्न्स सुरु होतात... गर्दी वाढते.... आणि ते क्षण नाहीसे होतात!!

चतुरंग, मी पण विसरून गेलेय नांगराची होडी कशी करतात ते! आता फक्त साधी होडी व बंबी बोट करता येते! बादवे, तिला बंबी बोट का म्हणत असतील?? :D :?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मीली's picture

4 Jun 2010 - 7:56 am | मीली

किती छान आणि ओघवते लिहितेस ग तू .मान गये यार!
कालच सकाळ मध्ये गारांचा फोटो पहिला.गारा वेचून खायची मजा वेगळीच!

मीली

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 9:02 pm | अरुंधती

अगं मिली, गारा फक्त वेचूनच नाही तर भांड्यांमध्ये पण जमा करून खाल्ल्या आहेत मी! टणाट्टण आवाज येतो गारांचा.... तडतडाट नुस्ता.... खूप धम्माल येते!:-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्पंदना's picture

4 Jun 2010 - 2:49 pm | स्पंदना

जीव थंड झाला तिकडे पाउस पडला हे वाचुन.

नुसत वाचुन तोन्डाला पाणी सुटल्..गारा काय्..बटाते वडे काय्..जाउ दे अस जीव घेण्(की तोंड घेण) लिहीत जाउ नको ग्..आता वडे वा भजी करावी लागणार.

सुर सुर करत सुरीने कांदे कापणारी
अपर्णा

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 9:00 pm | अरुंधती

कर, कर बटाटेवडे, भजी कर आणि इथल्या गारांची, पावसाची आठवण करत कसेबस्से संपव! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विकास's picture

4 Jun 2010 - 8:48 pm | विकास

चांगला लेख!

लहानपणी गारांच्या पावसांचे खूप आकर्षण असायचे. कारण मुंबईच्या भागात तो कधी अनुभवायला मिळायचा नाही. मग आजोळी गेल्यावर उन्हाळ्यात कधीतरी मिळायचा.

बॉस्टनमध्ये कधीतरी पडतो पण तशी मजा वाटत नाही. :(

दोन वर्षांपुर्वी आम्ही (पती, पत्नी, लहान कन्या) आणि आमच्या घरातील ३ ज्येष्ठ नागरीक असे व्हॅनमधून रमत गमत नायगारा धबधबा बघायला चाललो होतो. बॉस्टन ते नायगारा जवळपास ८-९ तासाचा ऑलमोस्ट सरळ रस्ता आहे. एकदा शहरी भाग सोडला आणि न्यूयॉर्क राज्यात आलो की मोकळे दिसते. आम्ही छान रमत गमत चाललो होतो.

अचानक दूरवर एक जमिनीपासून आकाशात गेलेला मोठा काळा ढग दिसला. आधी वाटले टोर्नॅडो आहे का काय. पण तसे काहीच नव्हते, सुदैवाने! जसजसे पुढे गेलो आणि तो ढग पण उलट बाजूने पुढे येत गेला तस तसा पाऊस येऊ लागला आणि नंतर लिंबाएवढ्या गारा आदळायला लागल्या! आजूबाजूला काहीच नाही, जर गाडीच्या काचा फुटल्या असत्या तर. त्यामुळे टेन्शन! शेवटी हळू हळू बाजूला गाडी उभी केली. एकमेकांचे ऐकायला येत नव्हते इतक्या मोठ्यांनी गारा आदळत होत्या. सर्वच टेन्शनमधे असल्याने कोणीच शंका काढत नव्हते की आता काय होणार... रस्त्यावर दोन तीन इंचांचा गारांचा थर झाला होता. काही मिनिटात तो ढग पुढे सरकला (गाडीच्या मागे गेला) आणि after clouds comes clear weather हे अनुभवले. पुढचा रस्ता जणू काही झालेच नाही इतका छान आणि निरभ्र आकाशाचा होता.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 8:59 pm | अरुंधती

बाप रे! इथे इतक्या कमी प्रमाणात पडतात तरी त्यांचा कसला जबरी वेग, मारा असतो.... आणि लिंबाएवढ्या गारा म्हटल्यावर काय झालं असेल कल्पनाही करू शकत नाही! नशीब, कोणाला व गाडीला काही झालं नाही!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मयुरा गुप्ते's picture

4 Jun 2010 - 9:17 pm | मयुरा गुप्ते

अरुंधती ताई,
लेख खुप छान. पण गारांचा अनुभव थोडा वेगळा आहे. मुंबईत असताना कधीच गारा अनुभवल्या नव्हत्या पण इथे टेक्सास मध्ये आल्यावर वर उल्लेखिलेल्या रोमँटीक गारा मात्र बघायला मिळाल्या नाहीत.
जे काही बघितलं ते अगदी भिषण होतं. कधीहि कुठेही गारा पडतायत असं कळलं कि पोटात धडकी भरते.
वर रेवती ताईंनी सांगितल्या प्रमाणे एक एक गारा गोल्फ बॉल किंवा टेबल टेनीस च्या चेंडु एवढ्या असतील तर नुसता विचार करा...गाडी,घरं,माणसं कश्याचाही मुलाहीजा न बाळगता आकाशातुन शब्दशः दगडांचा वर्षाव. विचार करायलाही वेळ नाही. घरात असु तर बाहेर गेलेल्यांची काळजी, आणि बाहेर असु तर स्वःताची आणि घराची काळजी.
मागच्या वर्षीचे काही फोटोज आहेत. नक्की टाकीन एक दोन दिवसांत.

--
मयुरा.

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 9:29 pm | अरुंधती

हम्म्म्म.... खरंय तुझं मयुरा...
निसर्गाचे मवाळ रूप जसे असते तसेच रौद्र रूपही असते.....कल्पना करवत नाहीए की गोल्फ-टेनिस बॉलएवढ्या गारांचा मारा किती खतरनाक असेल ते!!! :SS :S

आता पावसाचेच बघ ना... जिथे अतिवृष्टी होते, पूर येतात तिथेही लोकांना पावसाला ''रोमँटिक'' वगैरे म्हणावेसे वाटेल तरी का?
तुम्हाला तिथं गारांचा असा भीषण अनुभव येतो हे फार वाईट आहे.... पण शेवटी निसर्ग आहे ना तो!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

5 Jun 2010 - 12:46 am | स्वाती२

छान लिहिलयस अरुंधती. इथे आल्या पासून माझा ही गारांच्या बाबतीतला अनुभव भयानकच आहे.

प्रियाली's picture

5 Jun 2010 - 12:59 am | प्रियाली

मस्त लिहिले आहेस. भजी आणि वडे वाचून भूक चाळवली. :(

मुंबईला गारांचा पाऊस कधी पाहायला मिळाला नव्हता. इथे अमेरिकेत मात्र मिळतो. एकदा टेनिस बॉलच्या आकाराच्या गारांचा मारा खाल्ला आहे आणि मरता मरता वाचलो आहोत.

तो अनुभव येथे वाचता येईल.

चतुरंग's picture

5 Jun 2010 - 1:10 am | चतुरंग

च्या ऐवजी hell storm का? ;)

चतुरंग

प्रियाली's picture

5 Jun 2010 - 1:26 am | प्रियाली

हो हो hell storm च आणि मग वाचल्यावर आम्ही त्याला

"हेल हिटलर" च्या धर्तीवर "हेल स्टॉर्म" असे ही म्हटले ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jun 2010 - 1:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुड वन!

इन्द्र्राज पवार's picture

5 Jun 2010 - 11:23 am | इन्द्र्राज पवार

कोल्हापुर भागात गेली कित्येक वर्षे "गारांचा पाऊस" पडलेला नाही, त्यामुळे आता चौथी, पाचवीच्या वर्गात शिकत असणार्‍या मुलांनी आपआपल्या घरी "गारा म्हणजे काय?" असा प्रश्न विचारला तर आईबापाने त्यांना "बर्फाचे शेंगदाण्याएवढे तुकडे" असे सांगण्याची वेळ आली आहे.

पण "गारा" या अगदी बेसबॉल्/टेनिस बॉलच्या आकाराच्यादेखील असू शकतात हे पाहण्यासाठी ही व्हीडीओ क्लिप पहा ~~

" alt="" />
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अरुंधती's picture

10 Jun 2010 - 7:00 pm | अरुंधती

बाप रे! काय गारा आहेत की चेंडू?
परवाच बहीण त्यांच्या येथे झालेल्या हेलस्टॉर्म विषयी सांगत होती! अराराररा..... फार वाईट प्रकार! :(

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

रेवती's picture

10 Jun 2010 - 7:22 pm | रेवती

आहाहा!
मस्त लेखन! आत्ता लग्गेच गारांचा पाउस पडावा असं वाट्टय!

रेवती