अँबी वॅली - बियाँड दि हेवन !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
30 Mar 2017 - 12:50 am

अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अ‍ॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल.

(आयडेंटिटी सिक्युरिटीसाठी पोस्टमधे नांवं बदलली आहेत)
______________________

`वी मीट अ‍ॅट द साइट ऑफिस सर', रिया म्हणाली.
`वी विल बी देअर इन अनदर टेन मिनीटस' म्हणून पत्नीनं फोन ठेवला. एकाच वेळी रियाची आणि आमची गाडी ऑफिससमोर आली.
`यू विल बी रिलेटेड टू द वॅली आफ्टर सीइंग द टोटल साइट प्लान’ विस्मय म्हणाला आणि मला साइट ऑफिस हा मिटींग पॉइंट का ठेवला ते कळलं.

भारतातली सर्व हिलस्टेशन्स ब्रिटीशांनी वसवली आहेत. भारतीयांनी वसवलेलं, एखादं जगातलं सर्वोत्तम, अत्यंत हाय-फाय पण तरीही कमालीचं सौंदर्यपूर्ण हिलस्टेशन असावं या कल्पनेनं सुब्रता रॉयनी, अकराहजार एकरांवर साकारलेली जादुमयी दुनिया म्हणजे अँबी वॅली सिटी. या अफाट परिसराची हद्द म्हणजे तीन नालाकृती डोंगर आहेत. अँबीचं स्वत:चं एअरपोर्ट आहे, गेली तीन वर्ष जगातलं सर्वोत्तम ठरलेलं गोल्फ कोर्स आहे, सदासर्वकाळ वाहाणारी नयनरम्य नदी आहे, या नदीवर बांधलेली तीन धरणं आहेत, सिनेमात असतात तसे वॉटर स्पोर्टस आहेत, अशक्यप्राय भासावी अशी जायंट अ‍ॅक्वा-बस आहे (जी जमीनीवरुन सरळ पाण्यात शिरते आणि तुम्हाला वॉटर-राइड घडवते), स्वत:च्या खर्चानं सतरा/अठरा किलोमिटर्स लाईन टाकून नॅशनल ग्रीडमधून घेतलेली अखंड पुरवठा करणारी वीज आहे, एकर/ दोन एकर अशा विस्तीर्ण परिसरात वसलेल्या अलीशान विलाज आहेत, सेवन स्टार हॉटेल्स आहेत, एकसोएक स्वीमिंग पूल्स आहेत, अफलातून बांधलेले शॅलेज आहेत आणि पर्यटकांना आत फिरण्यासाठी मर्सिडीज बेंझ गाड्यांची फ्लीट आहे. एवरीथींग इज अ ग्राउंड रिअ‍ॅलिटी !

अँबी वॅली सिटीची झलक ! माइंड यू, एवरीथींग इज अ ग्राउंड रिअ‍ॅलिटी ! हे सगळं जसच्या तसं तिथे आहे. सहाराच्या कोर्ट केसची जरा सुद्धा सावली इथे कशावरही नाही.

_________________

विस्मी, जस्ट टेल मी वन थिंग....वॉट मेक्स अ विस्मी... हू कॅन चेंज इलेवन थाउंजड एकर्स ऑफ लँड इंटू समथिंग विज इज बियाँड द हेवन ? अँबीच्या अलीशान साइट ऑफिसमधल्या ऑडिटोरियममधून बाहेर पडल्यावर, तो विस्तीर्ण परिसर अंतर्बाह्य बदलणार्‍या विस्मयला, मी मनातला नेमका प्रश्न विचारला.

‘सर, देअर इज अ टाइम एवरी फॉर्म इन द एक्झिस्टंस अंडरगोज अ चेंज. वन हॅज टू वेट फॉर दॅट टाइम!’

‘माय गॉड, वॉट अ थॉट मॅन ! आय हॅव कम अक्रॉस अ पर्सन आफ्टर अ लाँग टाइम, हूम आय वूड लव टू लिस्टन अवर्स टुगेदर ! मी अगदी मनापासून म्हणालो.

.

(अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे)

________________________________

.

(एंटर दि अँबी वॅली !)

.

(अँबी रिसेप्शन)

एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्‍या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल !
______________________

.

(आमचा दुमजली शॅले)

.

(पहिल्या मजल्यावरचं सिटींग)

.

(वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड)

.

( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी)

.

(जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा)

.

(सिटींग मधली डायनिंग स्पेस)

.

(डायनींगच्या समोर असलेला बार)

.

(डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन)

.

(स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !)

.

(प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!)

.

(वॉटर स्पोर्टस - जेट्टी)

.

(स्पीड बोट)

.

(क्रूझ)

.

(अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !)

(तिथला विलोभनीय फाऊंटन शो)

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2017 - 1:57 am | पिलीयन रायडर

काही फोटो दिसत नाहीत. अ‍ॅम्बी व्हॅली बद्दल ऐकुन आहे खूप. जकुझी आणि रुम मस्त!

पण तुमचे संभाषण एक तर मराठीत लिहा किंवा इंग्लिश्मध्येच टाईप करा. देवनागरीत इंग्रजी वाचणं शिक्षा आहे अगदी.

सर्व फोटू आवडले. सुब्रता रॉय आणि कोर्ट केसेस बाजूला ठेवले तरी आजकाल भारतात घरातील जमीनी, भिंती लाकडाच्या करण्याचं प्रस्थ आहे असं निरिक्षण नोंदवते ज्याची आपल्याकडील हवामानाला गरज नाही. उगीच निसर्गावर ओझे होते. आमच्याकडील बर्फाळ वातावरणात लाकडी घरे व जमिनी वगैरे गरजेचे असते एवढे बोलून माझे भाषण संपवते.

आजकाल भारतात घरातील जमीनी, भिंती लाकडाच्या करण्याचं प्रस्थ आहे असं निरिक्षण नोंदवते ज्याची आपल्याकडील हवामानाला गरज नाही. उगीच निसर्गावर ओझे होते.

सहमत.

कंजूस's picture

30 Mar 2017 - 6:43 am | कंजूस

फार छान! मला दिसतात फोटो.

प्रचेतस's picture

30 Mar 2017 - 6:45 am | प्रचेतस

व्वाह संक्षी, एकदम दिलखुश केलंत.

आमच्यासाठी अँबी व्हॅली म्हणजे चंद्रासारखी, म्हणजे दिसते पण तिथे पोचले जात नाही. कोरिगडाच्या तटाबुरुजांवर रात्री बेरात्री उभे राहून खालचे अँबी व्हॅलीतले चमचमते लाईट्स बघूनच धन्यता मानत आलोय.

संजय क्षीरसागर's picture

30 Mar 2017 - 12:09 pm | संजय क्षीरसागर

आमच्यासाठी अँबी व्हॅली म्हणजे चंद्रासारखी, म्हणजे दिसते पण तिथे पोचले जात नाही.

सृष्टीच्या कलाकलानं घेत वसवलेली रम्य नगरी म्हणून अँबी वॅली एक अद्वितीय निर्मिती आहे. रस्त्याच्याकडेला जरी थांबलं तरी सुखद सावली, मंद वारा, नयनरम्य वास्तू, कमालीचं वैभव आणि संपूर्ण निर्भयता जाणवते. एखादी अप्राप्य ललना तुम्हाला मोहवते, तिच्या समीप जाऊन, तिच्या बाहूत विसावून सहवासाचा आनंद घेऊ देते आणि तुम्ही तिला प्राप्त करु शकत नसलात तरी काही काल तिच्या समवेत रममाण होऊ शकता हा दिलासा देते, असा काहीसा महौल आहे. वातावरण इतकं जबरदस्त आहे की रात्रीसुद्धा मला झोपणं म्हणजे वेळ व्यर्थ घालवणं वाटत होतं. दीड वाजता झोपूनही मी पुन्हा पहाटे साडेचारला तितकाच ताजेपणा अनुभवला ! तिथल्या पूलमधे दीड तास यथेच्छ जलविहार केला. आणि खाण्यापिण्याची रेलचेल तर अभूतपूर्व होती. सुब्रतोच्या `मेड फॉर द लव ऑफ लाईफ' चा हरघडी प्रत्यय येत होता. आणि सौंदर्यशाली प्रकृतीला एकच म्हणावंस वाटलं `आय कांट लव यू इनफ !'

माझ्या एका क्लायंटचा तिथे शॅले आहे. पुन्हा एकदा तरी आम्ही अँबीच्या दिलकश सहवाचा आनंद नक्कीच घेऊ .

संजय क्षीरसागर's picture

30 Mar 2017 - 12:16 pm | संजय क्षीरसागर

पुन्हा एकदा तरी आम्ही अँबीच्या दिलकश सहवासाचा आनंद नक्कीच घेऊ .

छान आहे! परदेशात गेल्यासारखं वाटलं.

अप्पा जोगळेकर's picture

30 Mar 2017 - 6:57 am | अप्पा जोगळेकर

सुंदर छायाचित्रे.

मारवा's picture

30 Mar 2017 - 8:31 am | मारवा

शॅले अप्रतिम आहे. रुम मधील पेंटींग्ज, पर्दाकारी, रंगसंगती अभिरुचीपुर्ण आहे. कूठेही भडक होत नाही. खिडक्यांतुन डोकावणारा निसर्ग लोभसवाणा आहे. पण युरोपीयन कॅापी ला भेदून जाईल अशी ओरीजीनल डीझाइन ,निर्मीती शक्य असुनही व्यावसायीक दबावात टाळलेली असावी. अर्थात या मर्यादीत फोटोवरून प्राथमिक अंदाज फक्त. अॅम्बी शब्दाचा अर्थ काय असावा ?
इथे एकदा निवांत आठवडा राहु, दिल चाहता है !

अॅम्बी शब्दाचा अर्थ काय असावा ?

आंबवणे गावानजीक आहे म्हणून.

सुबोध खरे's picture

30 Mar 2017 - 9:54 am | सुबोध खरे

अँबी व्हॅलीचा संचालक माझा जुना रुग्ण होता. त्याच्या आग्रहाच्या आमंत्रणावर तेथे जाता आले असते. धनदांडग्या लोकांच्या पैशाचा खेळ होता/आहे.३९००० कोटी रुपयांचा प्रकल्प परंतु एकंदर ज्या तर्हेने हा प्रकल्प उभा केला / राहिला ते वाचून मनात एक तर्हेची अढी बसली आहे.कित्येक वेळेस सरकारी कर दिला नाही. बरीच थकबाकी आहे/ होती. त्यामुळे तेथे गेलो नाही कि त्याबद्दल कुतूहल राहिले नाही.अँबी व्हॅलीला थकबाकी बद्दल सील करण्यात आले होते. दुष्काळात पाण्यावर डेरा जमवून बसल्याबद्दल त्यावर पर्यावरण वाद्यांनी बराच मोहोळ उठवला होता.
सध्या या प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाने जप्तीची टाच आणली आहे. अधिक लिहीत नाही.
इच्छुक लोक तेथे जाऊ शकतात. रुपये १२०००/- चोवीस तासासाठी.
https://www.hopintown.com/activity/Spanish-Cottage---1-Night-Escape-to-A...
रुपये ८४००/- २४ तासासाठी
https://www.hotelscombined.in/Hotels/Search?hotelID=1636503&destination=...

हेमंत८२'s picture

30 Mar 2017 - 2:37 pm | हेमंत८२

खूप छान आहे...
जर कोणी फुकट नेणार असेल तर जाण्यात मजा आहे किंवा ज्यावेळी एकरकमी १२००० खर्चायची औकात होईल त्यावेळेला..

स्पा's picture

30 Mar 2017 - 10:43 am | स्पा

सगळी पाश्च्यात शैली कॉप्य पास्ते मारलेली आहे , वर्जीणाल काही नाही
pinterest वर अशी लाखोने लोकेशन सापडतील

Mumbai Airport चे डिझाईन जसे युनिक आहे तसे अस्सल भारतीय काहीतरी हवे होते
बाकी लेखात उगाच देवनागरी लिपीत इंग्लिश लिहून जो काही सत्यानास केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद

सतिश गावडे's picture

30 Mar 2017 - 11:01 am | सतिश गावडे

वाईट गोष्टींचेही उदात्तीकरण करण्याचे दिवस आलेत तर.

स्पा सर आणि सतीश सरांशी सहमत.

स्पा सर + गावडे सर + अजयाबाई मास्तरिण, अहो काय हे ! हेवण आणि बियाँड दि हेवण असे याची देही याची डोळा पहावयास मिळत असताना कुठे वैचारिक मुक्ताफळे उधळत आहात ? याला म्हणतात कल्पवॄक्षाखाली बसुन नारळ पाण्याची इच्छा करणे ! :प

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]

कवितानागेश's picture

3 Apr 2017 - 11:50 am | कवितानागेश

नारळाच्या झाडालाच कल्पवृक्ष म्हणतात हे शाळेत शिकवत असताना आपण कुठे बाण मारत होतात? ;)
......बाकी चालू द्या!

मराठी_माणूस's picture

30 Mar 2017 - 11:02 am | मराठी_माणूस

"बियाँड दि हेवन " बांधणारे "आत" मधे का आहेत ?

अर्धवटराव's picture

30 Mar 2017 - 11:04 am | अर्धवटराव

खरच खुप सुंदर प्रकरण दिसतय.

किसन शिंदे's picture

30 Mar 2017 - 12:01 pm | किसन शिंदे

सुंदर दिसतंय हे प्रकरण! इथे अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद

मारवा's picture

30 Mar 2017 - 2:04 pm | मारवा

Taj mahal . Tax & Military canteen tax free alchohol

संजय क्षीरसागर's picture

30 Mar 2017 - 3:46 pm | संजय क्षीरसागर

१९९४ ला जेव्हा विस्मय साईटवर आला तेव्हा तिथे आठवड्यातनं फक्त दोनदा एसटी यायची. रस्ता इतका खराब होता की त्याच्या आधीचा एक इंजीअर जॉइनच झाला नाही आणि दुसरा लोणावळ्याहून परत गेला (तिथून अँबी २४ किमी आहे). त्याचं घर म्हणजे पत्र्याची शेड आणि छपराला नारळाच्या झावळ्या. त्याच्याकडे फक्त त्या ११,००० एकराची खरेदीखतं होती. जागा नक्की कुठे आहे, कोणती आहे काहीही कल्पना नव्हती. सकाळी सहाच्या आत तिथल्या हँडपंपवर अंघोळ करायची सक्ती होती कारण नंतर गावतल्या स्त्रीया तिथे पाणी भरायला यायच्या. गावकरी हाताशी धरुन त्यानं आधी संपूर्ण जागेचं डिमार्केशन केलं. मग आयएनेस शिवाजी ते अँबी वॅली असा १७ किलोमिटर्सचा रस्ता सहारानं स्वतःच्या खर्चानं बांधला. कारण त्यावेळी मनोहर जोशी सीएम होते आणि जेव्हा अकरा हजार एकरांवर जगातलं अद्वितीय हिलस्टेशन वसवण्याचं प्रपोजल त्यांचाकडे गेलं तेव्हा त्यांनी तो संपूर्ण प्लान शासनासमोर ठेवला, अनेकानेक चर्चा आणि दुरुस्त्या होऊन तो मंजूर झाला. मंजूर प्लान सहाराकडे देतांना जोशी म्हणाले की मी तुम्हाला सुयश चिंततो पण फक्त एका अटीवर, या प्रकल्पाला शासनाकडून एक रुपयाही आर्थिक मदत किंवा सवलतीची अपेक्षा ठेवू नका !

नंतर सहारनं जगातलं अत्यंत हाय-फाय आणि कमालीचं संपन्न हिलस्टेशन ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्लोबल टेंडर फ्लोट केलं. जगातल्या अत्यंत नामांकित अर्किटेक्ट आणि तत्सम कंपनीजमधून एकसोएक बुद्धिमान व्यक्तींच्या टीम्सनी आपपल्या अफाट संकल्पनाचा पसारा सादर केला. वर्षानुवर्ष चर्चा होऊन शेवटी एका अमेरिकन कंपनीला काम द्यायचं ठरलं. काम मिळाल्यावर त्यांची संपूर्ण टीम लोकेशनवर आली पण निसर्गाच्या त्या रौद्रभिषण तांडवात, तिथे राहून काम करायची त्यांची तयारी नव्हती. मग सहारानं त्यांचा प्लान विकत घेतला आणि गुरेन-बॉबी मुखर्जी अँड असोशिएटसला २००३ मधे इंप्लीमेंटेशनची जवाबदारी सोपवली. या सर्व कामात विस्मी, सुब्रतो रॉयचा राईट हँड होता ! विस्मीला तिथला प्रत्येक गट नंबर आणि त्या विस्तीर्ण क्षेत्राचे एकूणएक काँट्युअर्स माहिती आहेत. त्यामुळे विस्मीनं आमचा मिटींग पॉइंट अँबीचं भव्य प्रवेशद्वार न ठेवता साईट ऑफिस ठेवला आणि तो म्हणाला :

`सर, संपूर्ण साईट प्लान पाहिल्यावर तुम्हाला अँबी वॅली काय आहे याची कल्पना येईल आणि नंतर तुम्ही आत प्रवेश केल्यावर वॅलीशी सहज रिलेट होऊ शकाल'.

विस्मीच्या या कमालीच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनं, ते भव्य साईट ऑफिस आणि तिथली संपूर्ण हिलस्टेशनची अत्यंत कल्पक मॉडेल्स पाहून मी आवाक झालो. तिथल्या ऑडिटोरियमधे आम्हाला अँबी वॅलीवर केलेली अप्रतिम फिल्म दाखवण्यात आली आणि जेव्हा ती फिल्म संपली तेव्हा विस्मी म्हणाला:

`सर, फिल्ममधे तुम्ही पाहिलेली प्रत्येक गोष्ट ही ग्राउंड रिअ‍ॅलिटी आहे. यातली एकही गोष्ट कागदावर किंवा सहाराश्रींच्या (सुब्रतो रॉय) केवळ मनात आहे, अशी नाही'

ते एकून आणि विस्मीची जिगर बघून मी कमालीचा थक्कं झालो ! आणि म्हणालो :

`विस्मी, तू मला फक्त एकच गोष्ट सांग. ही विस्मय नांवाची व्यक्ती कशी घडते ?'

त्यावर विस्मयनं मोठं लाजवाब उत्तर दिलं :

`सर, या अफाट प्रकृतीचं अंग-प्रत्यांग रुपांतरणासाठी उत्सुक असतं, ...आपल्याला फक्त त्या रुपांतरणाची वेळ कळायचा अवकाश असतो'

सृष्टीरुपी स्त्रीच्या अनाकलनीय रहस्यांचा उलगडा झालेल्या व्यक्तीच्या मी समोर होतो.

`माय गॉड ! विस्मी कित्येक वर्षांनी मला भेटलेली तू पहिली व्यक्ती आहेस की जीचा शब्दन-शब्द ऐकत राहावासा वाटतोयं' मी प्रामाणिकपणे म्हणालो.
______________________

यानंतर पोस्टची लेखनमर्यादा असल्यानं पुढचा संवाद लिहीला नव्हता.

साइट ऑफिसवर दुसरा चॉइस ऑफ सॉफ्ट ड्रिंक्सचा दौर झाला तेव्हा आम्ही अँबीत प्रवेश करण्यापूर्वीच अँबीचे झालो होतो. मी अगदी मनापासून म्हटलं :

`विस्मी, तू अँबी-वॅलीत आणि ती तुझ्यात इतके खोल उतरला आहात की जणू एकरुपच झाले आहात. आता ज्या-ज्या वेळी वॅली पुन्हा रुपांतरणाची कामना करेल त्या-त्या वेळी, तू आणि रिया पुन्हा जन्म घ्याल !..... कारण वॅलीला स्वतःच्या रुपांतरणासाठी पुन्हा तुझी मदत लागेल !'

यावर विस्मी प्रसन्न हसला आणि म्हणाला,

`सर, तुमच्या या कौतुकानं मी भारावून गेलोयं....आता आपण वॅलीत प्रवेश करु'

तुम्ही गेलात म्हणजे ते हेवनच झालं असणार. एकही फोटो दिसला नाही हेच आमचं सुदैव!!

अमर विश्वास's picture

30 Mar 2017 - 4:17 pm | अमर विश्वास

<<सगळी पाश्च्यात शैली कॉप्य पास्ते मारलेली आहे , वर्जीणाल काही नाही>>

काही वर्षांपूर्वी अँबी वॅली त राहण्याच्या योग्य आला
अर्थात हेमंत८२ म्हणतात तसा .. कंपनीच्या खर्चाने

तेथे स्विस कॉटेज मध्ये राहिलो ... आता स्विस कॉटेज म्हटले कि पाश्चत्यच असणार .. नाईलाज आहे

अभ्या..'s picture

30 Mar 2017 - 4:20 pm | अभ्या..

मायोव..
कसलं हाय राव.

स्वामीजी आणि बियाँड हेवन म्हणजे...

बासुंदीमधे काकवी घालून व पेढे कुस्करून केलेले पाकातले गुलाबजाम खाल्ल्याचा फील आला.

#फीलींग एकदम गोग्गोड

कंजूस's picture

30 Mar 2017 - 6:15 pm | कंजूस

मला आवडलं हे हेवन. लवासा त्याची भ्रष्ट नक्कल आहे का? कर्नाटकचं विधानभवन खर्चिक म्हणून टीका झालेली. अजून पाहिलं नाहीये. चंदनाचे दरवाजे आहेत.
सुरुवातीला बारा घरं ( त्यावेळी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची) बारा क्रिकेटविरांना फुकट दिलेली होती म्हणतात. सचिन अर्थात आहेच त्यात.
परदेशी बड्या पाहुण्यांचं स्वागत इथे केलं जातं गुपचुप. दिल्लीत असल्यास जयपुरच्या महालांत असतात. थेट हेलिकॅाप्टरने येजा असल्याने कुणास पत्ता लागत नाही.
आम्ही गळे काढून का रडावं?

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 9:05 pm | श्रीगुरुजी

खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. बघून डोळे दिपले. अ‍ॅम्बी व्हॅली म्हणजे एकदम भारी स्थळ दिसतंय.

आमच्यासारख्यांना तिथे ३-४ दिवस रहायची सोय आहे का? सोय असल्यास दररोज अंदाजे किती खर्च येईल?

संजय क्षीरसागर's picture

30 Mar 2017 - 9:35 pm | संजय क्षीरसागर

ही अँबीची वेब साईट आहे, इथून बुकींग होऊ शकेल. जेवण कमालीचं कॉस्टली आहे. माझी कंप्लीटली काँप्लिमेंटरी ट्रीप होती त्यामुळे खर्चाचा नक्की अंदाज नाही.

संजय क्षीरसागर's picture

30 Mar 2017 - 9:38 pm | संजय क्षीरसागर
सतिश गावडे's picture

30 Mar 2017 - 10:44 pm | सतिश गावडे

"काँप्लिमेंटरी ट्रीप"वरुन तुमचे तुमच्या आधीच्या "हेवन" वरील मत आठवले.

त्यावेळी तुम्ही ऑफिसच्या पैशाने "हेवनला" जेवण्याचा अनुभव दुय्यम दर्जाचा ठरवला होता. तुमचा हा आताचा अनुभवही तसाच कॉम्प्लिमेंटरी असल्याने दुय्यम मानावा काय? ;)

अनुप ढेरे's picture

3 Apr 2017 - 10:36 am | अनुप ढेरे

उत्तर मिळालं काय?

सतिश गावडे's picture

7 Apr 2017 - 11:18 pm | सतिश गावडे

ते कसले उत्तर देतायत.

सचु कुळकर्णी's picture

28 Apr 2017 - 7:03 am | सचु कुळकर्णी

उत्तर मिळालं काय?

अप्पा जोगळेकर's picture

31 Mar 2017 - 2:05 am | अप्पा जोगळेकर

नैसर्गिक संसाधनांची लूट करून बांधलेल्या आणि सह्याद्रीचे भुस्काट करणार्‍या असल्या नतद्रष्ट प्रकल्पांना भेट देउ नका.
असल्या दळभद्री उद्योगांमुळेच आज पश्चिम घाटाची वाट लागली आहे.
सगळ्यात तापदायक म्हणजे इथून कोरीगडच्या आसपासच्या जंगलात सोडले जाणारे लेसर आणि ढॅण्चिक मुजिक.
मी कोरीगडच्या परिसरातून हे पाहिले होते. नंतर आरडाओरडा झाल्यावर बंद झाले बहुतेक. नक्की ठाऊक नाही.
प्रकाशचित्रे सुंदर आहेत. त्यांचा आनंद घ्या बास.

मात्र त्यानंतर इतर अनेकांचा जर प्रोजेक्ट मध्ये
प्रामाणीक सहभाग
कठोर परीश्रम
सर्जनशीलता इ.
मानवी गुणांचा मिलाफ होवुन जर एक सुंदर मानवी निर्मीती झाली.
तर ते सर्व बाजुला सारुन सडक्या मुळ पुरुषाकडे दोष देणे तसे चूक नाहीच मात्र
इतर मालक नसले तरी त्या रचनेत जीव ओतलेल्या घटकांच्या कर्तुत्वाची
ही एक उपेकशा आहे.
उदा मिसळपाव या संसथळा. ची निर्मीती केलेल्या मालकांनी (समजा एक काल्पनीक उदाहरण धेतोय ) समजा काही आर्थिक गैरव्यवहार केला असे कळले म्हणुन इथे ज्या कोणी मन लावुन अनेक सुंदर लेख कविता आदी दर्जेदार साहीत्याची निर्मीती केली ती धुळीत मिळाली वा ते सर्व एका झटक्यात व्यर्थ झाले असे मानणे चुक वाटते. कींवा या कारणाने मिसळपाव विषयीच अढी बाळगणे हे म्हणजे जरा जास्तच ग्रेसफुल वाटते. मी ताज बघणार नाही असे कवी ग्रेस म्हणतात त्या टाइप टच्ची

अर्धवटराव's picture

30 Mar 2017 - 11:52 pm | अर्धवटराव

पण सदर उपभोक्त्याने हाच न्याय मोदि-अदानी/अंबानी वगैरे संबंधांवर लावला होता ( व त्यावरुन केजेरीवाल नामक संताचं "कमालीचं" वगैरे धाडस शाबीत करायचा प्रयत्न केला होता). म्हणजे कसं, कि आपण यथेच्च रॉयसाहेबांचा पाहुणचार झोडायचा, पण इतर कुणाला अशी संधी मिळाली तर त्याचं मन !@#$%^&& आणि काय काय. असो. साहेबांबद्दल काँट्रॅडीक्शन्सची कमतरता नाहि :).

अप्पा जोगळेकर's picture

31 Mar 2017 - 2:10 am | अप्पा जोगळेकर

एवढी सुंदर निर्मिती सह्याद्रीच्या मधोमध केली म्हणून त्रास आहे. बाकी काही नाही.
सहाराच्या नोकरांना काय बोलणार ते तर पगारी नोकर. शिवाय पर्यावरण मंत्रालयाकडून युती सरकारच्या काळात हव्या तशा परवानग्या मिळवून घेतल्या असतीलच. असो.

गणामास्तर's picture

31 Mar 2017 - 10:45 am | गणामास्तर

वाह ! मजा आ गया. मस्त सफर घडवलीत संक्षी. जायलाचं हवे कधी तरी.

अवांतर : मुळशी जवळचं 'जलसृष्टी' आणि 'मल्हार माची' हे रिसॉर्ट्स सुद्धा साधारण असेचं आहेत, अँबी इतके मोठे नक्कीचं नाहीत परंतु वर्थ गोइंग.
'जलसृष्टी' पावसाळ्यात बंद असते कारण ते मुळा नदीत असलेल्या एका नैसर्गिक बेटावर आहे जे पावसाळ्यात पाण्याखाली जाते.

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 3:21 pm | संजय क्षीरसागर

मल्हार माचीचे दर एकदम वाजवी होते तेव्हा गेलो होतो आणि मनसोक्त राहून आलो. माझी तिथल्या मॅनेजरशी पर्सनल ओळख होती. पण ओनरच्या डोक्यात हवा गेली आणि त्यानं टॅरिफ ३,५०० वरनं डायरेक्ट १०,००० वर नेलं. शिवाय दोन्ही मील्स पण त्यातनं एक्सक्लूड केली. मग मल्हार माचीवर फुली . जलसृष्टीला गेलो नाही पण साइटवरुन फॅसिलिटीज आकर्षक वाटत नाहीत.

माथेरानचं उशा अ‍ॅस्कॉटपण अत्यंत आवडलेलं ठिकाण आहे पण तिथे पायी भटकायची व्यवस्था इतकी भिकारचोट आहे की पुन्हा जाणे नाही. पाचगणीचं ब्लू कंट्री क्लब पण छाने. अर्थात तिथे टेबल-लँड सोडता बाकी काही नाही.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 9:11 pm | श्रीगुरुजी

माथेरानबद्द्ल सहमत आहे. माथेरान हे अत्यंत Tourist Unfriendly स्थळ आहे. तिथे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे अत्यंत तापदायक आहे. त्यासाठी चालत जाणे, घोड्यावरून जाणे किंवा तिघे ओढतात अशा सायकलरिक्षाने जाणे हे तीनच पर्याय उपलब्ध आहेत. विशेषतः सायकलरिक्षातून एक माणसाच्या वाहतुकीला तीन माणसांचे श्रम लागतात (एकजण पुढुन पोटाभोवती दांडा घेऊन ओढतो व दोघेजण मागून जोर लावून ढकलतात). तिथे सर्व प्रकारची गैरसोय आहे, परंत राहण्याचे दर अवाच्या सव्वा आहेत. आयुष्यात परत कधीही माथेरानला जायच नाही असे ठरविले आहे.

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 3:24 pm | संजय क्षीरसागर

मल्हार माचीचे दर एकदम वाजवी होते तेव्हा गेलो होतो आणि मनसोक्त राहून आलो. माझी तिथल्या मॅनेजरशी पर्सनल ओळख होती. पण ओनरच्या डोक्यात हवा गेली आणि त्यानं टॅरिफ ३,५०० वरनं डायरेक्ट १०,००० वर नेलं. शिवाय दोन्ही मील्स पण त्यातनं एक्सक्लूड केली. मग मल्हार माचीवर फुली . जलसृष्टीला गेलो नाही पण साइटवरुन फॅसिलिटीज आकर्षक वाटत नाहीत.

माथेरानचं उशा अ‍ॅस्कॉटपण अत्यंत आवडलेलं ठिकाण आहे पण तिथे पायी भटकायची व्यवस्था इतकी भिकारचोट आहे की पुन्हा जाणे नाही. पाचगणीचं ब्लू कंट्री क्लब पण छाने. अर्थात तिथे टेबल-लँड सोडता बाकी काही नाही.

गणामास्तर's picture

31 Mar 2017 - 4:04 pm | गणामास्तर

माझीही तिथे पर्सनल ओळख आहे, डिस्काउंट वगैरे चांगला मिळतो जरा अगोदर बुक केले तर.
निवांत राहायला मस्त ठिकाण आहे खासकरून पावसाळा जस्ट संपलेला असताना.
मील्स एक्सक्लूडिंग पॅकेज नाहीयेत आता तिथे, दहा मध्ये सर्व काही इन्क्लुडेड आहे.

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 4:32 pm | संजय क्षीरसागर

मनःपूर्वक धन्यवाद !

फक्त अशी चर्चा करणार्‍यांना हा धागा उपयोगी होईल.

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 3:07 pm | संजय क्षीरसागर

.

(विला इन कंटेपररी स्टाईल. अगेन, नो कंपाऊंड वॉल्स !)

यशोधरा's picture

2 Apr 2017 - 4:33 pm | यशोधरा

लवासा "उभी" करताना स्थानिकांची घरे आणि निसर्ग ह्यांची जशी धूळधाण केली तशी ही व्हॅली "उभी" करताना केली असेलच ना? असेल तर, जलविहार आणि बाकीचे सगळे विहार करताना ह्या कटू सत्याची आठवण होते का?

मला तर कित्येकदा डैनासोरसचे आवाज ऐकू येतात, माळढोक अन हरणे चित्कारतात, कोल्हे लांडगे वाघं आक्रोशतात, गरीब शेतकरी कुटुंबे लाकडी नांगर खांद्यावर घेऊन स्थलांतर करु लागल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसते.
अचानक ट्राफीकच्या आवाजात अन गर्दीत ते केविलवाणे होऊन शांत होतात, मी ही हायवेवरुन घराचा रस्ता गाठू लागतो.
घरातल्या शांततेत ते परत ऐकू येतील, दिसतील ही भीती वाटते. गर्दी चांगलीच. मी एकटा गुन्हेगार नाहीये हा तर दिलासा असतो. :(

संदीप डांगे's picture

2 Apr 2017 - 6:02 pm | संदीप डांगे

समस्त शहरी माणसांच्या जगण्यामुळे निसर्गाचा र्‍हास निरंतर होतच आहे. तेव्हा फुकट दांभिक बाता मारुन कोणाच्या आनंदात हिरीरीने अपराधीभावाचे मीठ घालण्यात लोकांना कोण आसुरी आनंद मिळतो कोण जाणे..?

शहरात राहा की अ‍ॅम्बी वॅली - लवासात, पर्यावरणाचा र्‍हास काही चुकत नाही. महाबळेश्वर ते लेह-लदाख,हिमालयात जाणारे निसर्गप्रेमी पर्यटकही पर्यावरणाच्या नुकसानाला हातभार लावत असतात असे वाचून आहे.

बाजारातून एकही वस्तू विकत न आणणारे, कोणत्याही प्रकारच्या शहरी घरांमध्ये न राहणारे, एक ग्रॅमही कचरा घराबाहेर न जाऊ देणारे, कोणत्याही शहरी सुविधांचा-वाहतूक सोयींचा वापर न करणारे, घरात वीज न वापरणारे, कपडे न धुणारे, एसी-फ्रीज न वापरणारे, प्लास्टीक वस्तू न वापरणारे, पुस्तके न विकत घेणारे, वगैरे वगैरे पर्यावरणास घातक असं सर्व न करणारे कुणी असतील तर त्यांनाच असे पर्यावरणप्रेमाचे उपदेश करण्याचा नैतिक अधिकार असावा.

४३ चौकीमीच्या अ‍ॅम्बीवॅलीत झालेल्या थोड्याशा निसर्गहानीवर तोंडसुख घेणार्‍या, ४८० चौरस किमी च्या क्षेत्रातल्या निसर्गाची प्रचंड हानी करुन उभारलेल्या पुण्यात राहणार्‍या लोकांना या कटू सत्याची जाणीव २४ तास सतत राहत असेल असा माझा भाबडा विश्वास आहे.

असो.

------------------------------

संक्षि, लेख चांगला,
पाश्चात्त्य डिझाइन्स भारतीय भूमीत आवडत नाहीत ते एक आपली चॉइस.

जाणीव आहेच की. तुम्ही म्हणता तेही योग्यच आहे की कुठेही रहा पर्यावरणाचा र्‍हास दुर्दैवाने काही चुकत नाही, ते आहेच पण मुद्दाम उभी असलेली ईको सीस्टीम पूर्णच्या पूर्ण उद्द्वस्त करणं ह्याचा अर्थ तुम्हांला समजत असावा अशी आशा आहे, अपेक्षा नाही. असो.

लोकांना दांभिक वगैरे खुशाल म्हणता आणतुम्हालांला कोणी जराही काही म्हटले की थयथयाट कसा करता?

संदीप डांगे's picture

2 Apr 2017 - 6:48 pm | संदीप डांगे

जाणीव असेल तर चांगलेच आहे की.

बाकी इको सिस्टीम उद्ध्वस्त करण्याबद्दल, तर त्यात मुद्दाम विरुद्ध गरजेपुरते असे काही नसते. स्वतःची ती सात्विक नैसर्गिक गरज आणि दुसर्‍याचा तो आसुरी स्वार्थ असे वाटणे हीच ती दांभिकता. सांप्रत स्थितीतली लोकसंख्या (ज्यात मीही येतोच) व तिच्या गरजा ह्या पर्यावरणावर राक्षसी ताण आहे, अशा परिस्थितीत आपल्याच नाकाला शेंबुड असतांना दुसर्‍याकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही एवढे मला समजलेले आहे, इतरांना समजेलच अशी आशा, अपेक्षा काहीही नाहीत.

लोकांना दांभिक वगैरे खुशाल म्हणता आणतुम्हालांला कोणी जराही काही म्हटले की थयथयाट कसा करता?

जिथे जी लोकं दांभिक वागतात तिथे त्यांना दांभिकच म्हटले जाते, त्याचा अनावश्यक संबध जोडून माझ्यावर थयथयाट करत असल्याचा व्यक्तिगत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

ज्यांनी तुम्हांला इतरांना दांभिक ठरवण्याचा अधिकार दिला, त्यांनी :)

संदीप डांगे's picture

2 Apr 2017 - 6:55 pm | संदीप डांगे

मी कुणावर इथे वैयक्तिक आरोप केले नाहीत, पण माझे प्रतिसाद झोंबल्याने तुम्ही थयथयाट करुन चर्चेला वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपाचे वळण देत आहात असे दिसते. चालुद्या!
धन्यवाद!

पण मी काय म्हणते डांगेसाहेब, सरळ सरळ बिन्धास्त लिहायचं की! अवैयक्तिक रहायची कसरत कशाला म्हणे करायची ती? असो. पुढच्या वेळेस सरळ लिहा, ओके?

साहेब..'s picture

3 Apr 2017 - 9:15 am | साहेब..

स्वतःची ती सात्विक नैसर्गिक गरज आणि दुसर्‍याचा तो आसुरी स्वार्थ असे वाटणे हीच ती दांभिकता

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Apr 2017 - 6:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शहरात राहा की अ‍ॅम्बी वॅली - लवासात, पर्यावरणाचा र्‍हास काही चुकत नाही. महाबळेश्वर ते लेह-लदाख,हिमालयात जाणारे निसर्गप्रेमी पर्यटकही पर्यावरणाच्या नुकसानाला हातभार लावत असतात असे वाचून आहे.

टुमच्याषाठी खाष फष्ट हँड माहिती देतो (ऑल सीइंग आय ला मी माहिती देणं म्हणजे काजव्याने सुर्यासमोर चमकणं अशी कल्पना आहे पण तरी टंकनखाज समजा), बरेचं पर्यटक खास तिकडचा कचरा साफ करायसाठीही मोहिमा काढतात. बरेचं पर्यटक शुन्यं कचरा करतात. अश्या वेळी तुमचं वरचं वाक्यं किती व्हॅलिड आहे?

बाजारातून एकही वस्तू विकत न आणणारे, कोणत्याही प्रकारच्या शहरी घरांमध्ये न राहणारे, एक ग्रॅमही कचरा घराबाहेर न जाऊ देणारे, कोणत्याही शहरी सुविधांचा-वाहतूक सोयींचा वापर न करणारे, घरात वीज न वापरणारे, कपडे न धुणारे, एसी-फ्रीज न वापरणारे, प्लास्टीक वस्तू न वापरणारे, पुस्तके न विकत घेणारे, वगैरे वगैरे पर्यावरणास घातक असं सर्व न करणारे कुणी असतील तर त्यांनाच असे पर्यावरणप्रेमाचे उपदेश करण्याचा नैतिक अधिकार असावा.

ह्यातलं नेमकं तुम्ही काय काय पाळता जेणेकरुन तुम्ही दुसर्‍याला उपदेशाचे डोस पाजायचा नैतिक अधिकार बाळगताय? (मेगाबायटी प्रतिसादांना लागणारी वीज अन प्लास्टिकचा किबोर्ड, इंटरनेटच्या टॉवरना लागणारी वीज). हे तुम्ही पाळत नसाल तर वरचा प्रतिसाद संपादित करुन घ्याल का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असं संतवचन आहे म्हणे.

४३ चौकीमीच्या अ‍ॅम्बीवॅलीत झालेल्या थोड्याशा निसर्गहानीवर तोंडसुख घेणार्‍या, ४८० चौरस किमी च्या क्षेत्रातल्या निसर्गाची प्रचंड हानी करुन उभारलेल्या पुण्यात राहणार्‍या लोकांना या कटू सत्याची जाणीव २४ तास सतत राहत असेल असा माझा भाबडा विश्वास आहे.

नाशिक स्वयंभु शहर आहे काय? म्हणजे मेड बाय नेचर फॉर नीड्स ऑफ नेचर असा काही प्रकार आहे काय? एक सहज माहिती म्हणुन विचारतो. ते तिकडे वायनर्‍या, पेप्सीचे कारखाने वगैरे शंभुमहादेवांच्या पिंडीबरोबर प्रकट झालयं काय? चमत्कारचं म्हणायचा हा. बाबौ यायला पाहिजे बॉ एकदा नाशकात (नै म्हणजे बरेचं वेळा येणं जाणं होतं पण हि स्वयंभु शहरनिर्मितीची माहिती नवी आहे).

(ट्रकमधे डिझेल भराय्च्या लायनीतला १६ वा नंबर(

डायवर जॅक स्पॅरो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Apr 2017 - 8:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आधी समोरच्याला प्रव्होक करुन मग समोरच्याने मुद्दा मांडला आणिसमोरच्याच्या मुद्द्याला प्रतिवाद करता आला नाही की डांगेसाहेब उहेन बोल्टला लाजवतील अश्या वेगाने पळ काढतात असं म्हणायला हरकत नाही.

(२० पेकी १९.९९ लाखाचं डिझेल भरुन हायवेला लागलेला)

डायवर जॅक स्पॅरो

संदीप डांगे's picture

2 Apr 2017 - 8:40 pm | संदीप डांगे

काय हो? अमूक प्रतिसादाला अमूक वेळेत उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम आहे काय मिपाचा?
उगाच टणाटणा उडताय... बसाकी खुर्ची धरुन गप्! आलोच...! मनातले मांडे खावा तोवर...!

मोदक's picture

2 Apr 2017 - 8:41 pm | मोदक

हाय चिमण, कसा हैस? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Apr 2017 - 9:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हाय मोदक.

अरे खुर्ची धरुन बसलोय भावा. चार-पाच ठिकाणी रुमालही टाकलाय. तुझी सीट ठेवायची का आरक्षित करुन? अजुन एखादा रुमाल टाकायला. ७ प्लेटा उडिवल्या बघ मांड्यांच्या. तु खाणार काय एखादी प्लेट? हल्ली स्वस्तं झालेत बरं मांडे. शिवाय बराचं वेळ लागतो दोन प्लेटांमधे. प्रीऑर्डर करुन ठेव ब्रे.

मोदक's picture

3 Apr 2017 - 3:07 pm | मोदक

चि. चिमण यांस,

सनविवि.

सर्व क्षेत्रातील एकमेव फर्स्ट हँड अनुभवी अशा सर्वज्ञ आयडीच्या नादाला लागलास की तुला शेलकी विशेषणे मिळणारच. सवय करून घे.
स्वत: उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करून तोंडावर पडले की हे कैवारी लोक मित्रांच्या मागे भ्याडपणे लपतात आणि कंपूबाजीचे आरोप मात्र दुसर्‍यावर करतात. याचीही सवय करून घे.

..बाकी माणसा-माणसातला फरक बघ.. तुला बेळगांवी मांडे आवडतात, आणि इथे लोकं बेळगांवी लोणी विकायला येतात. पीठ मिसळलेले. ते लोणी पीठ मिसळलेले असले तरी अस्सल असतेच्च. तू उलट प्रश्न विचारलेस की गाय म्हैस जास्ती पाणी प्यायली असेल, गवत खराब असेल किंवा अगदीच उत्तरे नसतील तर खापर फोडायला मोदी सरकार असेलच.
त्यामुळे हॅ हॅ हॅ... असे म्हण आणि बुरखे टरकवायचे काम सुरू ठेव. तुझ्यावरही वैयक्तीक आरोप होतीलच आणि नंतर स्वघोषित बहिष्कार घातला जाईल.

गळवे का सतत ठसठसू लागली आहेत याची कारणे समजून घे. जळजळ असते, द्वेष असतो, चष्मा असतो.

बाकी कसा हैस..?

तुला उपदेशाचे एकतर्फी डोस मिळाले असतीलच. लोकांना सांगे ब्रम्हज्ञान.. ही म्हण हाताशी ठेव. बाकी कोरडे पाषाण लॉजिकल विचार करू शकत नाहीत हे लक्षात घे आणि फाट्यावर मारण्यापेक्षा शक्य तेथे खरे चेहरे जगासमोर आण.

तुझाच मित्र,
मोदक.

ता.क. - परमज्ञानी, अतीविचारी, जनसामान्यांचे कैवारी शहजादेजी यांचा जैजैकार केलास तर तुझीही पोटा पाण्याची चिंता संपून खोट्या प्रतिसादांचे टेराबायटी ट्रक फिरवायचे काम मिळेल. अन्यथा तूच भक्त, तूच दलाल आणि तूच मजबुर ठरशील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2017 - 7:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

:) :) :) :) :) :)!!!

ख्या ख्या ख्या. अचुक. शब्दाशब्दाशी सहमत रे. बाकी गळवं वगैरे वाचुन एक मजेदार दृष्य डोळ्यासमोर उभं राहिलं. असो.
तु कसा हैस रे. काय वाचतोय्स सद्ध्या? मी सद्ध्या माकड, पाचर आणि लाकुडतोड्याची गोष्टं वाचतोय रे. फुटकळ वाचनामधे काविळ आणि पीतज्वरावरचे २१ घरगुती उपाय बाय फरशीवाले बाबा वाचतोय. तुला पाहिजे काय डिजीटल कॉपी.

तुझाचं मित्रं,
कॅप्टन जॅक स्पॅरो

ता.क.: सद्ध्या अस्मितांची गळवे नावाचं पुस्तकं शोधतो आहे. मिळालं तर एक कॉपी विकत घेउन ठेवशील काय? किंडल एडिशन असेल तरी चालेल. अजुन एक म्हणजे सद्ध्या एशियन पेंट्सची एजन्सी घ्यायची असेल तर साधारण किती रुपडे लागतील?

संदीप डांगे's picture

2 Apr 2017 - 9:33 pm | संदीप डांगे

कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला प्रतिसाद!

१. पर्यटक खास तिकडचा कचरा साफ करायसाठीही मोहिमा काढतात. बरेचं पर्यटक शुन्यं कचरा करतात. अश्या वेळी तुमचं वरचं वाक्यं किती व्हॅलिड आहे?
कचरा म्हणजे पर्यावरणाचं नुकसान इतका संकुचित अर्थ घेतल्यामुळे ह्या तुमच्या आर्गुमेंटला अर्थ राहिला नाही. हिमालयातल्या पर्यावरणाची हानी हा खूप मोठा विषय आहे ज्यातला पर्यटकांचा कचरा हा केवळ एक भाग आहे. शून्य कचरा करतो, कचरा साफ करतो म्हणजे आपण फार पर्यावरणप्रेमी आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी अभ्यास वाढवण्याची गरज आहे.

http://www1.american.edu/ted/himalay.htm

Increasing numbers of mountaineers, trekkers, and nature-lovers have been making the annual pilgrimage to these mountains in such volume that the environment's natural equilibrium is in jeopardy. Roads have replaced trees, campsites have replaced meadows - the sign of visitation is everywhere through a trail of non-recyclable rubbish. Wildlife has been squeezed into remote and often desolate areas to escape the influx of humans and to search for a better source of food within a disrupted food-chain ecosystem.

२. ह्यातलं नेमकं तुम्ही काय काय पाळता जेणेकरुन तुम्ही दुसर्‍याला उपदेशाचे डोस पाजायचा नैतिक अधिकार बाळगताय?
ह्यातलं काहीही कोणीही शहरी माणूस करु शकत नाही त्यात मीही येतोच हे तर अध्याहृत आहे हे कसे विसरलात? मी येतोच हे मला चांगलंच माहित असल्यानेच इथे ह्या धाग्यावर पर्यावरणप्रेमाचे औचित्यहीन नकली गळे काढत नाहीये मी. उपप्रतिसादाची घाई केली नसती तर ध्यानात आले असते तुमच्या. बोले तैसा चाले असेच वर्तन आहे हो माझे, आता वंदावीच लागतील माझी पाऊले बघा... संतवचन स्वतःही पाळता की फक्त लोकांनाच ऐकवता?

बाकी ते वीज अन प्लास्टिकचा किबोर्ड, इंटरनेटच्या टॉवरना लागणारी वीज वगैरे उल्लेख करुन तुम्ही माझाच मूळ प्रतिसाद पुढे वाढवला आहे, त्याबद्दल धन्यवाद! तेही मुद्दे घेणार होतो, पण मेगाबायटी मेगाबायटी म्हणून कोल्हेकुई होऊ लागते आजकाल म्हणून सोडून दिले..

३. नाशिक स्वयंभु शहर आहे काय?
असं कधी म्हणालो हो मी? नाशिकच काय, जगातलं प्रत्येक शहर आणि त्यातला शहरी माणूस (त्यात मीही येतोच) हा जागतिक पर्यावरणर्‍हासास तितकाच कारणीभूत आहे हेच माझ्या प्रतिसादाचे सार होते, तुम्हाला तेवढं सुद्धा कळत नाही? आश्चर्य आहे.

पुण्यात राहणारे काही लोक इथे अस्थानी टिका करतांना आणि धागालेखकास शानपणा शिकवतांना दिसले म्हणून आरसा दाखवला फक्त. 'रुप भेसूर दिसले ते मग बोचले आपल्याच कुरुप मनी' अशी अवस्था झाली की काय?

ठिकाय त्यात काय एवढं? इतर शहरातले कोणी लोक आहेत काय इथे शानपणा शिकवणारे, त्यांनाही बोललो हां आता स्पष्ट.. उगी उगी. ललायचं नाय!

माझ्या प्रतिसादाचा उद्देश इतकाच की आनंद व्यक्त करण्यासाठी संक्षिंनी धागा काढलाय, तिथे अस्थानी पर्यावरणप्रेमाचे गळे काढणे म्हणजे कुणाच्या डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्‍या आईला सुनवण्यासारखे आहे. औचित्य काही गोष्ट असते. हीच गोष्ट जिथेतिथे संक्षिंना शिकवण्यात येत असते, त्यांच्या धाग्यावर इतर लोकं तेच करतांना पाहून दांभिकतेचा सोहळा शब्दबद्ध करावा वाटला, कुणाला बोचले असेल तर आय माय स्वारी...

बाकी, डायवरा... चुकीच्या रस्त्यावर, चुकीच्या गीअरमध्ये, चुकीच्या दिशेने ट्रक घालू नये, आक्षिडण होतो असं बघितलंय... तेव्हा जप्पून हां..
उपदेश नै बरं, अंमळ काळजी, लाहान लाहान पोरे मोठ्या मोठ्या गाड्या चालवतात तेव्हा वाटते हो..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Apr 2017 - 10:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्टन! सर्वस्वी हुकलेला प्रतिसाद!

ख्या ख्या ख्या!!!

ह्यातलं काहीही कोणीही शहरी माणूस करु शकत नाही त्यात मीही येतोच हे तर अध्याहृत आहे हे कसे विसरलात? मी येतोच हे मला चांगलंच माहित असल्यानेच इथे ह्या धाग्यावर पर्यावरणप्रेमाचे औचित्यहीन नकली गळे काढत नाहीये मी.

औचित्यहिन गळे काढले नाहित (तुमच्या मते) पण आता हे तुमचचं वाक्यं क्वोट करतो

त्यात मीही येतोच हे तर अध्याहृत आहे हे कसे विसरलात?मी येतोच हे मला चांगलंच माहित असल्यानेच इथे ह्या धाग्यावर पर्यावरणप्रेमाचे औचित्यहीन नकली गळे काढत नाहीये मी.

मग जर का तुम्ही त्याच्या येताचं आहात तर दुसर्‍याला शिकवायची गरज काय? का दुसर्‍याला अक्कल शिकवल्याशिवाय किंवा दुसर्‍याची अक्कल काढल्याशिवाय दिवस जात नाही चांगला? लोका सांगे ब्रम्हज्ञान ची अवस्था असताना दुसर्‍याची ट्युशन घेउ नये साहेब.

बोले तैसा चाले असेच वर्तन आहे हो माझे, आता वंदावीच लागतील माझी पाऊले बघा... संतवचन स्वतःही पाळता की फक्त लोकांनाच ऐकवता?

माझा प्रतिसाद संपादित करायची वेळ येणार नसल्याने मला माझं म्हणणं मागं घ्यावं लागणार नाहीये तस्मात चरणपुजेला आपला पास बरं का. बाकी सतत दुसर्‍याला कारणाशिवाय उपदेशाचे डोस देउन, कारण नसताना मोस्टली स्वमतांध प्रतिसाद देउन, गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल फिरवुन बिनकामाचे प्रतिसाद देउन संतवचनाचे दाखले देणारे आपण कोण टिक्कोजी महाराज म्हणे? आँ.

असं कधी म्हणालो हो मी? नाशिकच काय, जगातलं प्रत्येक शहर आणि त्यातला शहरी माणूस (त्यात मीही येतोच) हा जागतिक पर्यावरणर्‍हासास तितकाच कारणीभूत आहे हेच माझ्या प्रतिसादाचे सार होते, तुम्हाला तेवढं सुद्धा कळत नाही? आश्चर्य आहे.

आँ. मग पुण्याचं नावं घ्यायचं कारण काय म्हणे? का पुण्याचं नावं घेतल्याशिवाय प्रसिद्ध होता येत नाही हि पत्करलेली शरणागती आहे ही? ;)

माझ्या प्रतिसादाचा उद्देश इतकाच की आनंद व्यक्त करण्यासाठी संक्षिंनी धागा काढलाय, तिथे अस्थानी पर्यावरणप्रेमाचे गळे काढणे म्हणजे कुणाच्या डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्‍या आईला सुनवण्यासारखे आहे. औचित्य काही गोष्ट असते. हीच गोष्ट जिथेतिथे संक्षिंना शिकवण्यात येत असते, त्यांच्या धाग्यावर इतर लोकं तेच करतांना पाहून दांभिकतेचा सोहळा शब्दबद्ध करावा वाटला, कुणाला बोचले असेल तर आय माय स्वारी...

छ्या बाबा. इथे तर मोस्टली सगळ्यांनी कौतुकचं केलेलयं. बाकी आता दांभिकपणा म्हणायचा अस्थानी पराक्रम कश्याला करायचा म्हणे?

बाकी, डायवरा... चुकीच्या रस्त्यावर, चुकीच्या गीअरमध्ये, चुकीच्या दिशेने ट्रक घालू नये, आक्षिडण होतो असं बघितलंय... तेव्हा जप्पून हां..
उपदेश नै बरं, अंमळ काळजी, लाहान लाहान पोरे मोठ्या मोठ्या गाड्या चालवतात तेव्हा वाटते हो..

अगदी अगदी. कसं आहे २०-२० लाख कॅश घेउन फिरणारे डायवरं असा प्रकार करतात तेव्हा अंमळ मजा वाटते.

बाकी एकदा रिकामटेकडा मेगाबायटी प्रतिसाद देउन पाहायचा होता. तो द्यायची संधी उपलब्धं करुन दिल्याबद्दल धन्यवाद. पुण्यास याल तेव्हा कळवा. २-४ किलो बाकरवडी खायला घालु. हाकानाका.

संदीप डांगे's picture

2 Apr 2017 - 11:50 pm | संदीप डांगे

मग जर का तुम्ही त्याच्या येताचं आहात तर दुसर्‍याला शिकवायची गरज काय?

>> मी शहरी माणसांत येतो, औचित्यहिन गळे काढणार्‍यांत नाही, परत एकदा हुकलात बरं का...! अभिनंदन.

बिनकामाचे प्रतिसाद देउन संतवचनाचे दाखले देणारे आपण कोण टिक्कोजी महाराज म्हणे? आँ.
>> हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर बरं... ते तर तुम्हीच केल्याचं दिसतंय इथे.

मग पुण्याचं नावं घ्यायचं कारण काय म्हणे?
>> पुणे कुणाला नावावर लिहून दिल्याचे माहित नव्हते. नवीनच माहिती. धन्यवाद!

मोस्टली सगळ्यांनी कौतुकचं केलेलयं. बाकी आता दांभिकपणा म्हणायचा अस्थानी पराक्रम कश्याला करायचा म्हणे?

>>निगेटीव कमेंटी फाट्यावर मारायला सांगायचा पराक्रम तुम्ही केलाच ना, मी त्याच निगेटीव कमेंटीवर टिप्पणी केलीय. आपला तो बाब्या, दुसर्‍याचे ते कार्टे?

बाकी, सेल्फ गोल्स करत राहा, स्कोअरसेटलींगचा सुमार प्रयत्न ओसंडून वाहत आहे तुमच्या प्रतिसादांतून... मज्जा येते आहे. लगे रहो!

अप्पा जोगळेकर's picture

2 Apr 2017 - 10:46 pm | अप्पा जोगळेकर

साहेब,
१. शहरात राहणार्‍या माणसांना पर्यावरणाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.
२. येथील प्रतिसादांच्या औचित्याचे सेन्सरिंग तुम्ही करता.
असे तर म्हणायचे नाही ना.
दांभिकतेच्या तुमच्या व्याख्येनुसार एखाद्या प्राणीप्रेमी माणसाने कुत्रे, मांजरी वगैरे पाळल्या तर त्याला कोंबड्या, मटण वगैरे खाण्याचा अधिकार नसावा बहुधा.
बाकी
पाश्चात्त्य डिझाइन्स भारतीय भूमीत आवडत नाहीत ते एक आपली चॉइस.
हा जसा तुमचा चॉईस तसा डोंगरदर्‍यांमधे कन्स्ट्रक्शन्स आवडत नाहीत हा एक आमचा चॉइस.

संदीप डांगे's picture

3 Apr 2017 - 12:47 am | संदीप डांगे

१. दुसर्‍याच्या आनंदात मीठ कालवण्याचा तरी नाही बॉ... एखाद्या आनंदात असलेल्या व्यक्तीला उगाच अपराधभावाची जाणीव करुन देत असेल तर त्यालाही 'अपने गिरेबान में झांको' चा सल्ला येणारच. वन-वे ट्रॅफिकच हवे आहे की काय?

२. सेन्सारिंग वगैरे नै करत बॉ... मला वाटलं ते बोललो भोचक प्रतिक्रियांवर.. जर त्या भोचक नसतील तर अंगावर घेऊ नये संबंधितांनी.. पण घेतल्या आहेत असे दिसले त्यामुळे मेरी बात में कुच्छ तो दम होयेंगाच... सो सिम्पल!

कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी कोंबड्या, मटण खाणे हा ज्याच्यात्याच्या इच्छेचा व गरजेचा विषय आहे. हे दोन वेगवेगळे असंबंद्ध विषय आहे.

इथला मूळ विषय काय आहे? निसर्गाची अपार हानी करुन लवासा-अ‍ॅम्बी व्हॅली बसवली.. ओके? मग तुमची-आमची शहरे काय कॅप्टन म्हणतात तशी स्वयंभु आहेत काय? ज्याला पर्यावरणहानीचा गिल्ट दुसर्‍याला द्यायचा आगावूपणा करायचा आहे त्याने तो स्वतःलाही बाळगायला लागेल असा विचार केला काय? असा विचार आधीच केला असेल तर तो असला आगावूपणा मूळातच करणार नाही.

हा जसा तुमचा चॉईस तसा डोंगरदर्‍यांमधे कन्स्ट्रक्शन्स आवडत नाहीत हा एक आमचा चॉइस.
>> माझा चॉईस सौंदर्यशास्त्राशी व भारतीयपणाशी संबंधीत आहे. तुमचाही तोच आहे काय?

बरं तुम्हाला डोंगरदर्‍याच कन्स्ट्रक्शन आवडत नाही, त्यासाठी कारणीभूत होऊ नये म्हणून तुम्ही काय करताय? तुम्ही आत्ता जिथे घर घेऊन राहताय, तिथे दोनशे वर्षांआधी काय होतं, पाचशे वर्षांआधी? घर बांधायला दगड-सिमेंट लागलंच असेल ना? तुम्हाला पाणी पुरवठा कुठून होतो, धरणातूनच ना? ते डोंगरदर्‍यातच असतं, बरीच निसर्गहानी होते, धरण बांधतांना. तुमच्या घरापर्यंत बाजारातून सामान येते, ते सामान बाजारात यायला अनेक ठिकाणी डोंगरदर्‍यात कन्स्ट्रक्शन करुनच रस्ते बांधले आहेत. वीज निर्माण करण्यासाठी कोळसा लागतो, तोही असेच डोंगरदर्‍या फोडून काढतात, निसर्गहानी होतेच.

आपल्या (म्हणजे आपल्या सर्वांच्याच) घरातली कोणतीही वस्तू बघा, पर्यावरणाचे नुकसान केल्याशिवाय ती बनतच नाही. तेव्हा आपण कोण दुसर्‍याला जाणीव बिणिव ठेवायला सांगणारे...? स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसर्‍याचं पहा वाकून असं वागणारे दांभिक नै तर काय? दुसर्‍याची ती मौजमजा, आपली ती गरज, दुसर्‍याचे ते क्रूरपणे ओरबाडणे, आपले ते निसर्गाशी एकरुप होणे अशी सेन्सरींग कोणी करत असेल तर काय म्हणाल?

मॅट्रिक्स चित्रपटात एक डायलॉग आहे,
I'd like to share a revelation that I've had during my time here. It came to me when I tried to classify your species and I realized that you're not actually mammals. Every mammal on this planet instinctively develops a natural equilibrium with the surrounding environment but you humans do not. You move to an area and you multiply and multiply until every natural resource is consumed and the only way you can survive is to spread to another area. There is another organism on this planet that follows the same pattern. Do you know what it is? A virus. Human beings are a disease, a cancer of this planet.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2017 - 6:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्या (म्हणजे आपल्या सर्वांच्याच) घरातली कोणतीही वस्तू बघा, पर्यावरणाचे नुकसान केल्याशिवाय ती बनतच नाही. तेव्हा आपण कोण दुसर्‍याला जाणीव बिणिव ठेवायला सांगणारे...? स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसर्‍याचं पहा वाकून असं वागणारे दांभिक नै तर काय? दुसर्‍याची ती मौजमजा, आपली ती गरज, दुसर्‍याचे ते क्रूरपणे ओरबाडणे, आपले ते निसर्गाशी एकरुप होणे अशी सेन्सरींग कोणी करत असेल तर काय म्हणाल?

आणि

१. दुसर्‍याच्या आनंदात मीठ कालवण्याचा तरी नाही बॉ... एखाद्या आनंदात असलेल्या व्यक्तीला उगाच अपराधभावाची जाणीव करुन देत असेल तर त्यालाही 'अपने गिरेबान में झांको' चा सल्ला येणारच. वन-वे ट्रॅफिकच हवे आहे की काय?

काही टोटल लागतीये का? का एकाचं प्रतिसादात एकमेकांना छेद देणारी मतं मांडल्याशिवाय तुमचा दिवस बरा जात नाही.

कप्तां, तुला समजत कसं नाही? 20 लाखाचं आणि इतर स्कोर सेटलींग करायचं म्हणजे...

संदीप डांगे's picture

3 Apr 2017 - 10:33 am | संदीप डांगे

तुमच्याप्रमाणेच जगाला समजता काय यशोधराताई..? चालुद्या.. स्कोअरसेटलींग कोण करतंय हे तर पुरेसं स्पष्ट आहे.

यशोधरा's picture

3 Apr 2017 - 10:54 am | यशोधरा

नाही हो दणगेआहेब, त्या पातळीला मी जात नाही, टी तुमची खासियत आहे आणि आजवर बऱ्याच धाग्यांवर पाहिली आहे, नपेक्षा, काय लिहिलंय हे तुम्ही आधी पाहिलं असतं ना? ह्याच धाग्यावर किती कोलांट्या खाल्यायत ते बघा एकदा, अर्थात, जमल्यासच हं.

असो.

यशोधरा's picture

3 Apr 2017 - 10:57 am | यशोधरा

डांगे*

विशुमित's picture

3 Apr 2017 - 11:25 am | विशुमित

हा हा हा..!!

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2017 - 10:56 am | अप्पा जोगळेकर

कुत्रे-मांजरी पाळणे आणि बाकी कोंबड्या, मटण खाणे हा ज्याच्यात्याच्या इच्छेचा व गरजेचा विषय आहे.
असंबद्ध वगैरे नाही. तुम्हाला गैरसोयीचा वाटला म्हणून टाळले असेल तर ओके.
शिवाय माझे प्रतिसाद तुम्हाला विचारुन 'ओके आहे ना. कोणाला त्रास तर होत नाही ना' असे तपासून घ्यावेत अशी अपेक्षा ठेवू नका.

बरं तुम्हाला डोंगरदर्‍याच कन्स्ट्रक्शन आवडत नाही, त्यासाठी कारणीभूत होऊ नये म्हणून तुम्ही काय करताय?
हा काय फालतू प्रश्न आहे. मला रस्त्यावर ट्रॅफिक सुद्धा आवडत नाही. मग लगेच ही वाहतूक कोंडी टाळायला तुम्ही काय करताय वगैरे प्रश्न विचारायचे का. बाकी ते जाणीव बिणीव ठेवायला कोणी सांगितले असेल तर मला ठाऊक नाही.
मी मला काय आवडत नाही इतपतच लिहिले होते.
तुम्ही इतरांनी कसे प्रतिसाद द्यायला पाहिजेत असे सल्ले देउन वर दुसर्‍यालाच भोचक म्हणत आहात हे रोचक वाटले.

माझा चॉईस सौंदर्यशास्त्राशी व भारतीयपणाशी संबंधीत आहे. तुमचाही तोच आहे काय?
नाही. मला डोंगर आवडतात.

दुसर्‍याची ती मौजमजा, आपली ती गरज, दुसर्‍याचे ते क्रूरपणे ओरबाडणे, आपले ते निसर्गाशी एकरुप होणे अशी सेन्सरींग कोणी करत असेल तर काय म्हणाल?
अस कोणी केल आहे ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2017 - 12:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+२० लाख

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2017 - 12:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरेच्चा हे कसं सुटलं माझ्याकडुन?

२. सेन्सारिंग वगैरे नै करत बॉ... मला वाटलं ते बोललो भोचक प्रतिक्रियांवर.. जर त्या भोचक नसतील तर अंगावर घेऊ नये संबंधितांनी.. पण घेतल्या आहेत असे दिसले त्यामुळे मेरी बात में कुच्छ तो दम होयेंगाच... सो सिम्पल!

चालु दे हा निरर्थक अत्मकुंथन. असं करा एक नथुगुग्गुळाची मात्रा ३ सुलटे आणि ५ उलटे वळसे घालुन दिवसभर चाटण म्हणुन घ्या बरं. लग्गेचं उतारा पडतो स्वमतांधतेच्या आजारावर.

बाकी नेरोलॅक का एशियन ते कळवा. आपण लगेचं एजन्सी मिळवुन देतो.

aaa

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Apr 2017 - 6:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो काय अप्रतिम आहेत हो हे. मस्तं अनुभव शेअर केलाय इथे. बाकी निगेटिव्ह कमेंटिंना फाट्यावर मारा. लेकचे वगैरे फोटो असतील तर तेही येउ द्या.

वरुण मोहिते's picture

3 Apr 2017 - 11:07 am | वरुण मोहिते

बरयाचदा गेलोय ऍम्बी व्हॅली ला . तथाकथित पर्यावरण रक्षकांना एक सांगतो तिथे शेतकरी वैगरे नव्हता हो त्या भागात . कोणाला उजाड उध्वस्त करून तो प्रोजेक्ट नाहीये . निसर्गाची हानी म्हणजे काल काश्मीर मध्ये बोगदा झाला अनेक वर्षांपासून काम चालू होते . तेव्हा म्हणायचं हे गरजेचं आहे . आणि ऍम्बी व्हॅली अली कि म्हणण्याचं निसर्गाचं नुकसान . अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील . लवासा बाबतीत पण तेच आहे . आवाज उठवणारे आता गप्प आहेत नर्मदा आंदोलन वाले . निळू दामले ह्यांचं लवासा पुस्तक वाचा किंवा एकदा खरी परिस्थिती जाणून घ्या. अचानक भाव वाढल्यावर पडीक जमिनीसाठी काय दर लावले . ह्याला कोणी एक जबाबदार नाहीये . सगळेच जबाबदार आहेत . वृत्ती असली कि सगळेच तसं करतात . अजित गुलाबचंद ह्यांच्यासारख्या माणूस हताश झाला लवासा मूळे झालेल्या राजकारणाने . सांगायला खूप गोष्टी आहेत तूर्तास थांबतो .

लवासा पुस्तक वाचले आहे वरुण भाऊ आणि निळू भाऊंची मुलाखतही घेतली आहे त्या पुस्तकाला अनुषंगून. मिपावरचे श्रावण मोडक ही होते तेव्हा उपस्थित. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे निळूभाऊंकडे नव्हती तेव्हा. लवासा विषयावर पर्यावरणतज्ञांचे (वाद्यांचे नव्हेत) लेखही वाचावेत, असे सुचवेन.

वरुण मोहिते's picture

3 Apr 2017 - 11:18 am | वरुण मोहिते

विश्वंभर चौधरींकडून पण ऐकलीये दुसरी बाजू .मी माझ्या दृष्टिकोनातून बोलो. सगळ्याच वेळी पर्यावरण नाही बोलू शकत आपण . फार कमी प्रोजेक्ट महाराष्ट्रात इतक्या विस्तीर्ण जागेवर तयार झालेत . ह्यासाठी म्हटलं . काळजी प्रत्येकाला आहे पण नियम असतात कॉर्पोरेट कंपन्यांना जितकी झाडे तोडली तितकी लावा किंवा पर्यावरण निधी साठी मदत करा असे बरेच ऍक्ट असतात .

यशोधरा's picture

3 Apr 2017 - 11:34 am | यशोधरा

बरं :)

राही's picture

3 Apr 2017 - 12:52 pm | राही

आंबी नदीचे खोरे ती आंबी वॅली असे कोणीतरी सांगितलेले आठवतेय. शिवाय स्पेलिंग मध्येसुद्धा सुरुवातीचा'आ' उच्चार दर्शवणारे डबल ए (दोन ए) आहेत.

ट्रेड मार्क's picture

5 Apr 2017 - 9:27 pm | ट्रेड मार्क

सरांनी एखादी गोष्ट केली म्हणजे भारीच असणार, इतर कोणी केली तर फालतूच. एखादा स्वित्झर्लंडला जाऊन आला तरी त्याचं आयुष्य वाया जात असणार पण सर आंबी व्हॅलीला जाऊन आले म्हणजे आहाहा.... वर गावडेजी विचारत होते "त्यावेळी तुम्ही ऑफिसच्या पैशाने "हेवनला" जेवण्याचा अनुभव दुय्यम दर्जाचा ठरवला होता. तुमचा हा आताचा अनुभवही तसाच कॉम्प्लिमेंटरी असल्याने दुय्यम मानावा काय?". पण आपण कोणाला विचारतोय याचे त्यांना भान नसावे. अहो सर एकटेच काम करत असूनही त्यांच्या असिस्टंटने काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती, आहात कुठे? तुम्ही आम्ही तर एक साधे नोकर आणि कंपनी कुठे तरी पाठवते किंवा पार्टी देते त्यात काय विशेष? फरक लक्षात घ्या भाऊ. सरांनी नुसता श्वास घेतला तरी तो उत्सव असतो आणि बाकीचे श्वास घेतात तो म्हणजे नाईलाज हो. देवाने नाक दिलंय आणि बाहेर हवा असतेच, ती उगाच आत बाहेर करत राहते.

बाकी ते फोटू दिसत नाहीयेत त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही हे जाहीर करतो नाहीतर उगाच इतक्या चांगल्या माहितीपूर्ण आणि समस्त जगाला उपयोगी पडणाऱ्या धाग्यावर अवांतर बोलल्याबद्दल आरोप व्हायचे.

बाकी समस्त मिपाकरांनी हे लक्षात ठेवा की धाग्यावर असे ढिस्क्लेमर लावत जा, नाहीतर सर कुठल्याही धाग्यावर त्यांचा उत्सव साजरा करू शकतात.

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2017 - 10:48 pm | चौथा कोनाडा

सुंदर प्रचित्रे अन सुरेख लेखन !
संक्षीसर, मझा आ गया !व

इथं कधी मिपाकट्टा केला तर सांगा, आपण येका पायावर तैय्यार !

रुपी's picture

5 Apr 2017 - 11:04 pm | रुपी

फोटो छान.. आवडले.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 1:16 pm | संजय क्षीरसागर

१) संदीपचा हा ज्योक अत्यंत आवडला !

डोहाळजेवणाला जाऊन 'आजकाल लोकसंख्या किती वाढली, काय लोकं भसाभसा पोरे काढतात' असे होणार्‍या आईला सुनवण्यासारखे आहे.

पत्नी माझं कोणतंही लेखन वाचत नाही त्यामुळे ज्योक ऐकवल्यावर, ती ज्याम हसली त्याबद्दल संदीपचे विशेष आभार्स.

२) लेखाची लिंक रियाला पाठवल्यावर, केवळ दहा मिनीटात तिचा रिप्लाय आला आणि ती ज्याम खुष झाली. हे पोस्टचं आणखी एक श्रेय.

३) इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांना पूर्ण सहमती दर्शवून सपशेल लोटांगण घालणार्‍यांनी, तो स्कोर इथे सेटल करण्याचा प्रयत्न केला. ३० वर्ष स्टँडींग असणार्‍य प्रोफेशनलला (पूर्वी सुद्धा कधी) असिस्टंटच असू शकत नाही असा दिव्य निष्कर्श काढून आणि इतरही काहीबाही बरळून, पुन्हा एकदा स्वतःची मानसिक दुर्दशा झळकवली त्याबद्दलही आभार्स !

बाकी ते असिस्टंटबद्दल मी नव्हे तर इथे तुम्हीच म्हणालात. फक्त आत्ताच्या क्षणामध्ये जगणाऱ्याने भूतकाळाचे धागे सांभाळून ठेवलेत म्हणायचं तर.

बाकी तुम्हाला अडचणीच्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं टाळण्याची तुमची कला वाखाणण्याजोगी आहे. असिस्टंटबद्दल जो प्रश्न यात विचारला त्यात तुम्ही फिरवून उत्तर दिलंत. वर गावडेजींनी विचारलेला प्रश्न पूर्णपणे टाळलात.

शब्दबम्बाळ's picture

7 Apr 2017 - 8:41 am | शब्दबम्बाळ

छान फोटो!
उत्कृष्ट सोयी सुविधा असणारच आत मध्ये पण यापेक्षा थोडा वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर वायनाड ला जावा!
रिसॉर्ट ची लिंक

एक्दम क्लास! वायफाय वगैरे सोयी देत नाहीत ते अगदी टीव्ही देखील नाही... निसर्गाच्या जवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणे जरा बाजूला ठेऊन मजा घेण्याची कल्पना आहे त्यांची... काही फोटो देतोय खाली बघा.. तुम्हाला आवडेल कदाचित हे ठिकाण!

villa 1

villa 2
याच्या खाली टोटल काच आहे पारदर्शक! आणि खाली खाजगी पूल! :)

bridge

villa

संजय क्षीरसागर's picture

7 Apr 2017 - 9:36 am | संजय क्षीरसागर

बघतो !

जंगली प्राणीबिणी आवडत असतील तर वायनाडचे एक रिसॉर्ट सांगतो. जेथे डायनिंग एरीया आहे तेथेच जवळ एक पाण्याचे तळे आहे. (आणि दोन्हीमध्ये जिवंत विद्युतप्रवाहाचे मजबुत तारेचे कुंपण)

..तर आपण चहा घेत घेत / जेवताना समोर जंगली हत्ती, चितळ, हरीण आणि रानडुकरे वगैरे प्राणी त्यांच्या फॅमिलीसकट पाणी प्यायला येतात.

आणखी अ‍ॅडव्हेंचरची हौस असेल तर त्या रेसॉर्ट वाल्यांनी मचाण बांधून ठेवली आहेत. तेथे जाऊन बसायचे.