अँबी वॅली - बियाँड दि हेवन !
लेखनप्रकार
अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल.
(आयडेंटिटी सिक्युरिटीसाठी पोस्टमधे नांवं बदलली आहेत)
______________________
`वी मीट अॅट द साइट ऑफिस सर', रिया म्हणाली.
`वी विल बी देअर इन अनदर टेन मिनीटस' म्हणून पत्नीनं फोन ठेवला. एकाच वेळी रियाची आणि आमची गाडी ऑफिससमोर आली.
`यू विल बी रिलेटेड टू द वॅली आफ्टर सीइंग द टोटल साइट प्लान’ विस्मय म्हणाला आणि मला साइट ऑफिस हा मिटींग पॉइंट का ठेवला ते कळलं.
भारतातली सर्व हिलस्टेशन्स ब्रिटीशांनी वसवली आहेत. भारतीयांनी वसवलेलं, एखादं जगातलं सर्वोत्तम, अत्यंत हाय-फाय पण तरीही कमालीचं सौंदर्यपूर्ण हिलस्टेशन असावं या कल्पनेनं सुब्रता रॉयनी, अकराहजार एकरांवर साकारलेली जादुमयी दुनिया म्हणजे अँबी वॅली सिटी. या अफाट परिसराची हद्द म्हणजे तीन नालाकृती डोंगर आहेत. अँबीचं स्वत:चं एअरपोर्ट आहे, गेली तीन वर्ष जगातलं सर्वोत्तम ठरलेलं गोल्फ कोर्स आहे, सदासर्वकाळ वाहाणारी नयनरम्य नदी आहे, या नदीवर बांधलेली तीन धरणं आहेत, सिनेमात असतात तसे वॉटर स्पोर्टस आहेत, अशक्यप्राय भासावी अशी जायंट अॅक्वा-बस आहे (जी जमीनीवरुन सरळ पाण्यात शिरते आणि तुम्हाला वॉटर-राइड घडवते), स्वत:च्या खर्चानं सतरा/अठरा किलोमिटर्स लाईन टाकून नॅशनल ग्रीडमधून घेतलेली अखंड पुरवठा करणारी वीज आहे, एकर/ दोन एकर अशा विस्तीर्ण परिसरात वसलेल्या अलीशान विलाज आहेत, सेवन स्टार हॉटेल्स आहेत, एकसोएक स्वीमिंग पूल्स आहेत, अफलातून बांधलेले शॅलेज आहेत आणि पर्यटकांना आत फिरण्यासाठी मर्सिडीज बेंझ गाड्यांची फ्लीट आहे. एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी !
अँबी वॅली सिटीची झलक ! माइंड यू, एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी ! हे सगळं जसच्या तसं तिथे आहे. सहाराच्या कोर्ट केसची जरा सुद्धा सावली इथे कशावरही नाही.
_________________
विस्मी, जस्ट टेल मी वन थिंग....वॉट मेक्स अ विस्मी... हू कॅन चेंज इलेवन थाउंजड एकर्स ऑफ लँड इंटू समथिंग विज इज बियाँड द हेवन ? अँबीच्या अलीशान साइट ऑफिसमधल्या ऑडिटोरियममधून बाहेर पडल्यावर, तो विस्तीर्ण परिसर अंतर्बाह्य बदलणार्या विस्मयला, मी मनातला नेमका प्रश्न विचारला.
‘सर, देअर इज अ टाइम एवरी फॉर्म इन द एक्झिस्टंस अंडरगोज अ चेंज. वन हॅज टू वेट फॉर दॅट टाइम!’
‘माय गॉड, वॉट अ थॉट मॅन ! आय हॅव कम अक्रॉस अ पर्सन आफ्टर अ लाँग टाइम, हूम आय वूड लव टू लिस्टन अवर्स टुगेदर ! मी अगदी मनापासून म्हणालो.
(अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे)
________________________________
(एंटर दि अँबी वॅली !)
(अँबी रिसेप्शन)
एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल !
______________________
(आमचा दुमजली शॅले)
(पहिल्या मजल्यावरचं सिटींग)
(वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड)
( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी)
(जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा)
(सिटींग मधली डायनिंग स्पेस)
(डायनींगच्या समोर असलेला बार)
(डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन)
(स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !)
(प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!)
(वॉटर स्पोर्टस - जेट्टी)
(स्पीड बोट)
(क्रूझ)
(अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !)
(तिथला विलोभनीय फाऊंटन शो)

वाचन
34716
प्रतिक्रिया
0