झांज..

Primary tabs

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
1 Feb 2008 - 3:18 am

प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या

पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली
चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली

गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे
गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली

हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला
कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली

ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली
गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली

वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली
दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली

कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे
बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली..

-ऋषिकेश

कवितागझलमुक्तकविडंबनआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2008 - 3:48 am | llपुण्याचे पेशवेll

विठ्ठलभक्त
डॅनी
पुण्याचे पेशवे

सुनील's picture

1 Feb 2008 - 5:55 am | सुनील

लय कुठे कुठे किंचित चुकते पण कल्पना चांगली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

1 Feb 2008 - 7:56 am | विसोबा खेचर

वा ऋषिकेशा,

वाचून अगदी प्रसन्न वाटलं!

ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली
गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली

या ओ़ळी सुरेख!

आपला,
(वारकरी) तात्या.

ऋषिकेश's picture

1 Feb 2008 - 7:48 pm | ऋषिकेश

तात्या, धनंजय प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार!

सुनीलराव,
मलाहि आता जाणवतय... काहि ठिकाणी खटकतेय रचना, पण तेव्हा एकदम सुचले म्हणून लिहिलं :) तरीही आवडल्याचं कळवल्याबद्दल आभार

-ऋषिकेश

प्राजु's picture

1 Feb 2008 - 8:15 pm | प्राजु

गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे
गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली

ही ओळ खूपच आवडली.

- प्राजु

चतुरंग's picture

2 Feb 2008 - 3:17 am | चतुरंग

मंडळी,

ऋषिकेशची, "झांज" ही सुंदर कविता वाचली.
मात्रांचा ठेका कुठेतरी चुकतोय असे वाटल्याने ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली आणि ही गज़ल पुन्हा एकदा सादर करत आहे.

पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली
चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली

तेलवाती ह्या निरांजनी लावून झांज आली
गजरात माऊलीला ती घेऊन झांज आली

हरीनाम आसमंती ते भारुन झांज आली
कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली

वैष्णवांच्या कोलाहली ही गर्जून झांज आली
अबीर गुलाल बुक्क्यात रंगून झांज आली

वारीच्या रिंगणाला ओढ लावून झांज आली
आली दिंडी वेशीवरी हे सांगून झांज आली

इंद्रायणीच्या सोहळ्या मोहरुन झांज आली
बेहोष वाळवंटी आज नाचून झांज आली..

चतुरंग

ऋषिकेश's picture

2 Feb 2008 - 3:27 am | ऋषिकेश

ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली

हा तुमचा विनय झाला.. उगाच काय लाजवता राव! अहो त्या एकमेकांत अडकलेल्या उत्फुर्त शब्दांमधून तुम्ही कसदार काव्य तयार केलंत आणि म्हणताय "थोडी" सुधारणा.. कल्पना काय हो छप्पन सुचतात होऽ, त्या लयबद्ध करणं, मात्रांत बसवणं आणि तरीहि हवं ते पोहोचवणं हे येरागबाळ्याचं काम नै भौ... तुमच्यासारख्यांचीच जातिवंत प्रतिभा हवी त्याला :)

आधीच सांगितल्याप्रमाणे.. हि कविता फार फार आवडली :)!!!!

-(येरागबाळा)ऋषिकेश

सुनील's picture

2 Feb 2008 - 3:27 am | सुनील

ऋषिकेश यांच्या मूळ कवितेतील आशय तोच ठेवून "मात्रेत बसवलेली" संपादीत आवृत्तीदेखील आवडली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमोद देव's picture

2 Feb 2008 - 10:36 am | प्रमोद देव

ऋषिकेश ह्यांच्या मूळ रचनेत सुधारणा करून चतुरंग ह्यांनी त्यांचे 'चतुरंग' हे नाव सार्थ केले.
आधीच्या काव्यात अर्थ होताच पण गेयता नव्हती. चतुरंग ह्यांनी ते काम अगदी नेटकेपणे साधलेले आहे.
ऋषिकेश आणि चतुरंग ह्या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन!

प्राजु's picture

2 Feb 2008 - 9:45 pm | प्राजु

दोघांचेही अगदी मनापासून अभिनंदन... एक उत्तम काव्य तयार झाले आहे.

- प्राजु

चतुरंग's picture

3 Feb 2008 - 2:42 am | चतुरंग

सुनील, प्रमोदकाका, प्राजू, स्वतः ऋषिकेश याचे अभिप्राय वाचले. उत्साह वाढला. धन्यवाद!

चतुरंग

स्वाती राजेश's picture

3 Feb 2008 - 3:35 pm | स्वाती राजेश

प्राजु टीचर च्या हाताखाली उत्तम विद्यार्थी तयार होत आहे..
मस्त वाटले.

गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे
गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली
या ओळी आवडल्या.

बक अप....