(एका अपरिमेयाचे मुक्तसुनीत)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
13 Apr 2011 - 10:51 pm

साक्षात 'पाय' वर कविता करणार्‍या आमच्या घासू गुर्जींचे पाय पकडून! ;)
<:०()8=<

(वर्तुळ)

मी पहिल्यांदा हा आकारबंध
वस्रपटलांच्यामध्ये केला स्थानबद्ध
केव्हापासून जागलिये खाद्यपिसासा

मुक्ततुंदिलरेखी वलयरेषेपलिकडे
खाद्यकणग्राही रसनापटापलिकडे
घडले असे गारुड

निशा'चर' जगतात शीतकपाटाच्या
दारापल्याड मुक्त केकावलीचा
दिसलाय भरलेला आवाका

आवाक्याबरोबरच विस्तारलं एक
जिव्हालौल्यसाधक दोंदाकारप्रसारक
तुमानवेधी "शून्य"

त्याच्या क्रीमगर्भरोलांचा
नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा
तो तनःचक्षुसाक्षात्कारच

वजनउंचीवर्गछेद जो बीएमायगुणोत्तरी
वजनकाट्याच्याही पल्याडी
अपरिमेयसंख्यामय,

जडशरीरभयकारी 'पायां'ना
पुरते गोठवणारे
हे "शून्य"...

-('पूज्य')रंगा

हास्यअद्भुतरसकविताविनोदवाङ्मयमुक्तकविडंबनजीवनमान

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

13 Apr 2011 - 11:02 pm | राजेश घासकडवी

मी इकडे ठ्यॉ ठ्यॉ हसतोय, आणि माझे अमेरिकी ऑफिसमेट विचारताहेत, 'काय शेअर करणार का?'

'जिव्हालौल्यसाधक दोंदाकारप्रसारक' काय...'क्रीमगर्भरोलांचा' काय...'जडशरीरभयकारी 'पायां'ना' काय... एकेक शब्द वाचून धमाल आली...

फुलटॉस दिला तरी यू हॅव टू पुट इट अवे असं आपले थोर कॉमेंटेटर सांगत असतात. इथे तुम्ही तो मैदानाच्या बाहेर मारलाय.

पूज्य रंगा हेही भारीच.
सलाम तुम्हाला.

प्राजु's picture

13 Apr 2011 - 11:09 pm | प्राजु

ठ्ठ्यॉ!!!!!!
वा वा वा!! चालूद्या नीलबेरीसामयिक!!

मेघवेडा's picture

13 Apr 2011 - 11:15 pm | मेघवेडा

जोर्दार्र!!

प्रभो's picture

13 Apr 2011 - 11:15 pm | प्रभो

हुच्च विडंबन!

रेवती's picture

13 Apr 2011 - 11:18 pm | रेवती

त्याच्या क्रीमगर्भरोलांचा
नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा
हे सगळ्यात जास्त आवडले.
बाकीचे विडंबनही जमले आहे.

टारझन's picture

14 Apr 2011 - 10:49 am | टारझन

असली बात नच्छ !! घरातल्या घरात प्रतिसाद देउन रडीचा डाव नकोय ;)

रंगाभाय .. तुमचे शब्दसामर्थ्य , त्याला वृत्तात बसवायची हातोटी आणि त्या मागची गोलाकार प्रेरणा .. सर्वांना हातपाय जोडतो .

- लंबगोल

चित्रा's picture

15 Apr 2011 - 3:59 am | चित्रा

..तुमचे शब्दसामर्थ्य , त्याला वृत्तात बसवायची हातोटी आणि त्या मागची गोलाकार प्रेरणा .. सर्वांना हातपाय जोडतो .

असेच म्हणते.
बेफाम विडंबन.

चित्रा's picture

15 Apr 2011 - 3:59 am | चित्रा

..तुमचे शब्दसामर्थ्य , त्याला वृत्तात बसवायची हातोटी आणि त्या मागची गोलाकार प्रेरणा .. सर्वांना हातपाय जोडते .

असेच म्हणते.
बेफाम विडंबन.

श्रावण मोडक's picture

13 Apr 2011 - 11:19 pm | श्रावण मोडक

दंडवत देवा!!!

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 11:26 pm | पुष्करिणी

सह्ही म्हण्जे सह्हीच !!

पैसा's picture

14 Apr 2011 - 9:36 am | पैसा

अत्युच्च आदर्श विडंबन!!!
(मूळ कवितेतला पायच्या किमतीचा आकृतीबंध जसाच्या तसा सांभाळलेला आहे त्याबद्दल तुम्हाला हजार "प्रतिसाद"!)

सूड's picture

14 Apr 2011 - 7:15 pm | सूड

+१

Nile's picture

14 Apr 2011 - 12:27 am | Nile

ह्या शून्याचा प्रभाव नुकताच आम्हालाही जाणवू लागला आहे. च्यायला, कोठल्याही समीकरणात टपकतोच. अशी विडंबंन रोज वाचायला मिळाली तर अतीवापराने त्याचं अस्तित्व कमी होईल का?

भडकमकर मास्तर's picture

14 Apr 2011 - 12:32 am | भडकमकर मास्तर

हहहहह.. क्रीमगर्भरोल...
मज्जा आली...

अवांतर :: हल्ली रंगाबाबूंना ते व्यायाम, बी एमाय, तुंदिलतनु पासून सुघटनापर्यन्त वगैरे वगैरे विषय फार अपील कर्तात बुवा... त्यांचे याच विषयाला वाहिलेले एक संपादकीयही आठवले...

हेच म्हण्तो!
पूज्य विडंबन! :-)

गणपा's picture

14 Apr 2011 - 1:00 am | गणपा

हा हा हा....
रंगाशेठ साष्टांग दंडवत.

नगरीनिरंजन's picture

14 Apr 2011 - 3:52 am | नगरीनिरंजन

हुच्च! तुमानवेधी शून्य!! =))

असुर's picture

14 Apr 2011 - 4:15 am | असुर

सं प लो ! ! !

रंगाकाका, पाय पाठवा आपले, खरडवहीत लावायचे आहेत. :-)

©º°¨¨°º© खाद्यकथेतील तुंदिलकुमार ©º°¨¨°º©
आमचे खाद्य
Only Dairytales Have Happy Butterings

विंजिनेर's picture

14 Apr 2011 - 6:20 am | विंजिनेर

खल्लास! मजा आली.

तर्री's picture

14 Apr 2011 - 6:43 am | तर्री

मूळ काव्य आणि हे तुमान वेधी काव्य...समसमा...जबरदस्त.

गणेशा's picture

14 Apr 2011 - 2:42 pm | गणेशा

असेच म्हणतो

प्रीत-मोहर's picture

14 Apr 2011 - 6:46 am | प्रीत-मोहर

जबरदस्त विडंबन!!!!

प्यारे१'s picture

14 Apr 2011 - 10:20 am | प्यारे१

अत्युच्च....

ह्याला 'विडंबन' म्हणू नये असा एकोळीचा प्रस्ताव आम्ही मांडतो.
मूळ कवितेला कुठल्याही प्रकारे छेद न देता इथे हे एक नवकाव्यच जणू उभे राहिले आहे.

त्यामुळे विडंबन म्हणणे नामंजूर.

स्वगतः हे पू. रंगाकाका अजून थोडे अनाकलनिय झाले तर शरदिनी चा कविता व्यवसाय (धंदा म्हणणार होतो पण नको) बसेल की!

रामदास's picture

14 Apr 2011 - 11:01 am | रामदास

एखाद्या बॅट्समनला त्याची लय सापडल्यासारखे वाटले.अर्थात समोरून डिलीवरी पण हाप्पीच आलीच होती.

केशवसुमार's picture

14 Apr 2011 - 12:17 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
विडंबन एकदम झक्कास!!
(जडशरीरभयकारी)
तुम्ही लिहिते झालात हे उत्तम!! आता थांबू नका..

मूकवाचक's picture

14 Apr 2011 - 8:17 pm | मूकवाचक

पु.ले.शु.

नंदन's picture

14 Apr 2011 - 12:34 pm | नंदन

त्याच्या क्रीमगर्भरोलांचा
नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा
तो तनःचक्षुसाक्षात्कारच

वजनउंचीवर्गछेद जो बीएमायगुणोत्तरी
वजनकाट्याच्याही पल्याडी
अपरिमेयसंख्यामय

_/\_ ख ल्ला स!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Apr 2011 - 2:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नमस्कार ...

("पाय"प्रेमी) अदिती

स्मिता.'s picture

14 Apr 2011 - 2:30 pm | स्मिता.

वाचून हसून खपले! अल्टिमेट!
आधीच गुरूजींच्या कवितेतले शब्द नीट उच्चारण्याचा प्रयत्न करत होते, त्यात तुमचे हे नवीन शब्द... मराठी भाषा किती समृद्ध झाली या २ कवितांमुळे ;)

त्याच्या क्रीमगर्भरोलांचा
नीलबेरीसामायिक पेस्ट्रीचा
तो तनःचक्षुसाक्षात्कारच

वजनउंचीवर्गछेद जो बीएमायगुणोत्तरी
वजनकाट्याच्याही पल्याडी
अपरिमेयसंख्यामय,

मला हे २ कडवे फार आवडले. क्रीमगर्भ रोल, नीलबेरी पेस्ट्री... अहाहा...

रमताराम's picture

14 Apr 2011 - 2:38 pm | रमताराम

जबराट.

अवांतरः 'जाल-ढसाळ' पुप्याच्या कवितेमुळे निर्माण झालेल्या कवितेच्या नव्या आकृतीबंधाचे टार्‍याने 'कविताभाभी' असे नामकरण केले. आता या 'पाय' 'शून्य' आदि गणिती संकल्पनाभोवती काव्यसौंदर्याची नवी परिमाणे देणार्‍या कवितेला गणिती कविता किंवा शॉर्टकटमधे 'गणिका' म्हणावे का?

विसुनाना's picture

14 Apr 2011 - 3:05 pm | विसुनाना

वाहवा! ना विडंबन हे, मुळापासूनी नवनवोन्मेषशालीन आहे आविष्कार

'केकावली' हा शब्द फार्फार आवडला.

चेतन's picture

14 Apr 2011 - 3:55 pm | चेतन

विडंबन नेहमीच्या सुट्ण्यावर असलं तरी मस्त झालय

चेतन

अवांतरः विडंबनात ३.१३१७६० संख्या विसरलात काय आणि वर्तुळच्या ऐवजी गोल कसं वाटलं असतं
अतिआवांतरः (आकार म्हणजे काय?)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Apr 2011 - 4:58 pm | बिपिन कार्यकर्ते

मायला^२ :(

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2011 - 6:13 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍याच ! यक नंबर.

मुस्तफासुर
---------------------------------
'काका' म्हणाले खिशातली बिडी बदला, आम्ही म्हणालो 'फुर्र'!!!

धनंजय's picture

14 Apr 2011 - 9:08 pm | धनंजय

वाहावा. मी वरच्या या प्रतिसादकांशी सहमतीप्रदर्शनाचे कार्य करण्याबद्दल ठरवलेच.

चतुरंग's picture

15 Apr 2011 - 5:26 am | चतुरंग

(आ'भारी')शून्यरंग

पक्का इडियट's picture

15 Apr 2011 - 11:49 am | पक्का इडियट

कडक !!

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Apr 2011 - 12:16 pm | llपुण्याचे पेशवेll

झक्कास झक्कास झक्कास.

लिखाळ's picture

15 Apr 2011 - 8:21 pm | लिखाळ

जोरदार !!
टाळ्या !!

क्रान्ति's picture

18 Apr 2011 - 8:04 pm | क्रान्ति

दंडवत!!!!!!!!!!!!

हे मूळ काव्यापेक्षा जास्त जवळचं आणि आवडीच्या प्रांतातलं, अगदीच खास! हसूनच पोट दुखल्यामुळे रोल, पेस्ट्री लांबच ठेवावे लागणार! :)

सुहास..'s picture

19 Apr 2011 - 9:15 am | सुहास..

_/\_

या उप्पर काही बोलु शकत नाही .