मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाची हालहवाल..

परिकथेतील राजकुमार · · जे न देखे रवी...
काव्यरस
चाललंय काय चाललंय काय.. मिपावर सध्या चाललंय काय.. बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत VRS ची चाचपणी करत आहेत.. कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे... गवि आणि हर्षद पाठीशी आहेत निवृत्ती सोपान शोभत आहेत.. अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते.. मकी आजकाल गायब असते फक्त व्यनीत रममाण असते.. टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत खैरनार आता बिल्डिंग उभारणार आहेत.. निदेंची तब्येत आता सुधारत आहे हुच्चभ्रु विळख्यातून मुक्ती मिळत आहे... सुकांची लेखणी थंड आहे काश्मिराची आग सध्या मंद आहे.. चुचु देखील लिहीत नाही झोपाळ्यावरून म्हणे तिला उतरवत नाही... विजुभौंनी कर्व्यांचा नाद सोडला आहे आता हेगडेवारांचा पुतळा डोळ्यात भरला आहे.. मिपावर आजकाल विनोद नसतात फावल्या वेळात लोक मुलखावेगळीची खव वाचतात.. सहजराव नवाच "उपक्रम" करतात मिपावर 'डेव्हील्स अ‍ॅडव्होकेट' बनतात.. त्यांच्या दुकानाच्या पाट्या श्रावण फोडतात पण खरडींतून भलतेच विनोदी लिहीतात.. कवितक सध्या मागे पडलंय घासूगुर्जींना सांख्यिकीने ग्रासलंय.. पुण्याला कोण भाव देतंय? विचाराने पराचं डोकं चळलंय.. धम्या डोक्याला हात लावून बसलं आहे पोरगं नुकतंच हलकट मिपाकरांच्या अंगा-खांद्यावर खेळून आलं आहे... कुंद्या आमचा आता सावकार होणार आहे गरीब मराठी उद्योजकांना भांडवल देणार आहे... गणपा आमचा थकला आहे सुगरणींच्या गराड्यात हरवत चालला आहे.. क्लिंटन विजुभौंना भेटून आले आहेत बहुदा म्हणूनच सध्या व्यवहारज्ञान शिकवत आहेत... थत्ते चाचा नैष्ठिक मौन पाळणार आहेत 'विचारवंत' शब्दाच्या हकालपट्टीची मागणी करणार आहेत.. नायल्या आमचा डॉल्बी मागवणार आहे प्रा. डॉ. बरोबर वरातीत नाचणार आहे.. स्पा सध्या डोक्यावर पडलाय स्वतःला बोका समजु लागलाय.. इंट्या मात्र प्रगल्भ झालाय संसार सारा माया आहे ओळखून चूकलाय.. प्रकाशराव खूश आहेत महिन्यात १११ कविता फिक्स आहेत.. गणेशा सुद्धा आनंदी आहे १११ प्रतिसाद रेडी आहेत... एकूणच मिपा आता प्रगल्भ होत आहे पुरस्कार समारंभाची तयारी चालू आहे... पहिला पुरस्कार शांततेचा देणार आणि तो म्हणे नैनी - वहिदाला विभागून देणार... एकुणात सगळे मिपाकर सुखात आहेत असल्या फालतू कविता लिहिण्या वाचण्या येवढे निवांत आहेत.

वाचन 18822 प्रतिक्रिया 42