चाँद तनहा है..

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
4 Jun 2010 - 11:14 am

एके काळी मस्त लाईफ होती.. रोज संध्याका़ळी लायब्ररीत जाऊन नवीन पुस्तक आणायचं.. येईल तसा स्वयंपाक पक्षी: माझ्या नि फ्लॅटमेटच्या पोटावर प्रयोग करणारं काहीतरी बनवायचं.. ती आली की जेवायचं.. त्यानंतरच्या आवराआवरीचं आणि सास-बहू सिरियल पाहाण्याचं काम तिचं!! नि मी पळायचे माझ्या बेडरूममध्ये.. हातात पुस्तक.. नि सोबतीला.. विन ९४.६ वरचं खनक विथ रोशन अब्बास!!!! मस्त गाणी लागायची.. एक वाजेपर्यंत पुस्तक वाचून संपायचं आणि मी दुसर्‍या दिवशी नवीन पुस्तक आणायला सज्ज व्हायचे.. (रोज मला कुठलं पुस्तक द्यायचं म्हणून तिथले लोक बिचारे वैतागले होते).

खनक आम्हा बर्‍याच जणांचा आवडता कार्यक्रम!! त्यात गुरूवारी रोशनऐवजी कुणीतरी यायचं.. एकदा अमीन सयानी होस्ट होते.. नि त्यांनी त्यांच्या त्या टिपिकल आवाजात ओळख करून दिली..मीनाकुमारीने स्वतः लिहिलेल्या नि स्वतःच गायलेल्या गझलांची.... नि वानगीदाखल ऐकवली तिची एक गझल.. "चाँद तनहा है.. आसमाँ तनहा!!!"

माहित नाही ऐकताना नक्की काय वाटलं!!! पण त्या दिवशी पुस्तक पूर्ण नाही झालं.. :( नंतर ते गाणं शोधायचा खूप प्रयत्न केला.. खूप दिवसांनी असेच एकदा यूट्यूबवर Meena kuMaari : I write I recite या नावाने तो पूर्ण अल्बम मिळाला!!! :D

मीनाकुमारी.. शोकांतिकांची नायिका!!! तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बरंच छापून यायचं.. अजूनही कधी कधी येतं.. मला ती खूप आवडायची असे काही नाही.. पण कधी नावडलीही नाही.. तिचा तो खर्जातला आवाज नि आपके पाँव जमीं पर मत रखिए हे मात्र चांगलंच लक्षात आहे!!!! तिची ही गझल ऐकताच मनात एक घर करून गेली.. का? ठाऊक नाही.. कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु:ख सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु:ख काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..

हापिसात यूट्यूब बॅन असणार्‍यांसाठी शब्दरचना येथे देतेयः

चांद तनहा है आसमां तनहा
दिल मिला है कहां कहां तनहा॥

बुझ गयी आस छुप गया तारा
थरथराता रहा धुवाँ तनहा

जिंदगी क्‍या इसी को कहते हैं
जिस्‍म तनहा है और जाँ तनहा॥

(जिथे काया आणि आत्मा देखील परक्यासारखे वागतात.. तिथे इतरांबद्दल काय बोलावं!!!! मी तरी इथं अगदी नि:शब्द!!)

हमसफर कोई गर मिले भी कहीं
दोनों चलते रहे तनहा तनहा॥

जलती बुझती सी रोशनी के परे
सिमटा सिमटा सा इक मकां तनहा॥

राह देखा करेगा सदियों तक
छोड़ जायेंगे ये जहां तनहा!!!॥

या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात.. भलामोठ्या आरशात स्वतःला पाहात उभी असलेली एकाकी रेखा.. नि "मेरे लिए भी क्या होई उदास बेकरार है" हा प्रश्न!!!! :(

संगीतगझलमतशिफारसप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मी_ओंकार's picture

4 Jun 2010 - 12:14 pm | मी_ओंकार

गझलेची चाल ( तरन्नूम) ही अतिशय साधी आणि संथ. पहिल्यांदा ऐकलेली तेंव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या.

या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात..

याबद्दल अगदी सहमत. छान स्फुट.

- ओंकार.

राधा१'s picture

4 Jun 2010 - 12:35 pm | राधा१

वाह!! क्या बात है!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मकीकडून असं लिखाण? पण लिखाण आहे सुंदरच गं मके! तुझ्यामुळे हे गाणं पहिल्यांदा ऐकलं!

अदिती

नंदन's picture

4 Jun 2010 - 12:49 pm | नंदन

लेख. ही गझल प्रथमच ऐकली.

कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु:ख सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु:ख काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..

--- सहमत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

4 Jun 2010 - 12:51 pm | ऋषिकेश

गाणं सुंदर आहेच.. आणि परिचय.. अंदाज ए बयाँ आवडला!

>> जिंदगी क्‍या इसी को कहते हैं
>> जिस्‍म तनहा है और जाँ तनहा॥

या शेरातील पहिली ओळ वाचून का कोण जाणे "mistake that cannot be corrected is called Life" हे वाक्य आठवलं

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

ज्ञानेश...'s picture

4 Jun 2010 - 1:04 pm | ज्ञानेश...

लेख आवडला. =D>
मीनाकुमारी प्रतिभावंत शायरा होत्या. त्यांच्या अनेक गझला वाचनीय/श्रवणीय आहेत.

"आबदा पा कोई इस दश्त में आया होगा,
वर्ना आंधी मे दिया किसने जलाया होगा..."
ही अशीच एक गझल.

अवांतर- 'तनहा' हाच रदीफ घेऊन वरील गझलेच्या जमिनीवर गुलजारसाहेबांनी एक गझल लिहिली आहे. (बहुधा) जगजितने गायली आहे.

"जिंदगी यूं हुई बसर तनहा,
काफिला साथ और सफर तनहा..

अपने साये से चौंक जाते है,
उम्र गुजरी है इस कदर तनहा

दिन गुजरता नही है लोगोमे,
रात होती नही बसर तनहा

हमने दरवाजे तक तो देखा था,
फिर न जाने गये किधर तनहा..."

आनंदयात्री's picture

4 Jun 2010 - 1:05 pm | आनंदयात्री

ओय होय !! क्या बात है मकी !
वाचुन आवडलेली ही दुसरी गझल. याआधी 'चमकते चांद को टुटा हुवा तारा बना डाला" ही वाचुन आवडली होती.

लेख खुपच उत्स्फुर्त झाला आहे (युट्युब ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी बोल देणे वै) ...
अजुन येउ दे !

मेघवेडा's picture

4 Jun 2010 - 1:23 pm | मेघवेडा

व्वा!! छान लिहिलंय.. वर ऋषी म्हणतो तसं 'अंदाज-ए-बयाँ' आवडला!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

श्रावण मोडक's picture

4 Jun 2010 - 1:56 pm | श्रावण मोडक

हे तूच लिहिलं आहेस!
तूच दिली होतीस ही गझल. ऐकली आहे. परत-परतही ऐकली. :)

सहज's picture

4 Jun 2010 - 2:00 pm | सहज

हे का असचं कधीतरी...

प्रभो's picture

4 Jun 2010 - 6:44 pm | प्रभो

मस्त लेख!

चित्रा's picture

4 Jun 2010 - 7:01 pm | चित्रा

गझल आवडली. ओळखीबद्दल धन्यवाद.

भोचक's picture

4 Jun 2010 - 7:27 pm | भोचक

मके, मस्त ओळख. क्या बात है. भावनेला फुटलेले शब्द जणू.
(भोचक)
जाणे अज मी अजर

भानस's picture

4 Jun 2010 - 7:33 pm | भानस

ओळख. गझल अप्रतिम आहेच. चित्रफिती बद्दल खूप आभार.

अरुंधती's picture

4 Jun 2010 - 9:22 pm | अरुंधती

सुरेख ओळख! यूट्यूब लिंकबद्दल धन्यवाद :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मीली's picture

5 Jun 2010 - 12:12 am | मीली

छान लेख!गाणे पण आवडले.
मीनाकुमारी वरून आठवले,तिचे "पिया ऐसो जिया में समाये गयो रे !" पण किती सुरेल आणि सुरेख आहे.

मीली

स्वाती२'s picture

5 Jun 2010 - 12:26 am | स्वाती२

गाणे आधी ऐकले होते. पण असं छान लिहायला काही सुचत नाही. लेख आवडला.