संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
30 Jun 2009 - 1:45 pm

टीप : लेखात आलेले विचार अथवा असंबद्ध विधाने ही केवळ वैयक्तीक माझ्या वैचारीक कल्लोळामधुन आली आहेत, त्याचा कुणी सर्वसंमत अर्थ काढुन कॄपया गैरसमज करुन घेऊ नये. तसेच लेखातला बराच भाग हा विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे, पण ते मनातले विचार आहे तसे उतरवले असल्याने त्याला पर्याय नाही

"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म, संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" - इति : एक आंतरजालीय मित्र
"अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई
"चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र
"समोर दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" - इति : बाबा
" पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र
"पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका
" आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का ? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी
" भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र.
" तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र

??
????
म्हणजे काय ?

म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ?
मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ?

तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे.
लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या.
पुढे मग शिक्षणाचे, नोकरीचे व्याप मागे लागले, घर ही सुटले. ह्या काळात आडवेतिडवे वाचन आणि चर्चाही बर्‍याच झाल्या. लहानपणी असलेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा आंतरीक ओढीमुळे म्हणा पण "धर्म नक्की काय सांगतो" ह्यावर बरेच काही ढुंढाळले व पचवुन घेतले. "अहं ब्रम्हास्मी, तत्वमसी. मी सर्व चराचरात आहे" वगैरे वाक्ये भुरळ पाडु लागली. हा काळ बराच मोठ्ठा होता, यादरम्यान वेळ न मिळाल्याने म्हणा अथवा तसे पुर्वीसारखे वातावरण न जमल्याने पुर्वीसारखी "पुजेला बसण्याची" गोडी राहिली नाही. शिवाय देवाच्या जवळ जायला पुजाच करायला हवी व त्यासाठी संस्कॄत श्लोकच म्हणायला हवे हा जो गोड गैरसमज होता तो आता पुर्ण संपला होता. मात्र देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ होतीस, इनफॅक्ट जास्तच तीव्र झाली होती.
मग जेव्हा केव्हा घरी जायचो तेव्हा हे तात्विक वाद नक्की असायचे, घरी फक्त लोळुन आराम करु वाटत असायचा व घरच्यांचा आग्रह वेगळाच. मात्र कधी कधी माझ्या "पुजा न करण्याचे" लॉजीक जेव्हा इथे " मी नास्तिक झालो" असे लावले गेले तेव्हा हमखास तात्विक चर्चा घडायच्या. शेवटी "तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही" ह्या ब्रम्हवाक्यात झाली की मी निमुटपणे उठुन पुजेला बसायचो, आजही बसतो ...
म्हणजे "मी एका जागी बसुन केलेया मंत्रोच्चाराच्या घोषात केलेल्या पुजेवर माझी "अस्तिक असणे वा नास्तिक असणे" अवलंबुन आहे" हा विचार माझ्या मनाला त्रास देऊन जातो....

आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो. मग हळुहळु मोठ्ठा झालो, शाळा सोडुन बाहेरच्या जगात आलो. "गीतेच्या तत्वज्ञानाची" हळुहळु ओळख पटु लागली, गीता किती महान गोष्टी शिकवते हे ही लक्षात येऊ लागले.
पण मन पुन्हा भुर्रकन मागे गेले, अरे आमच्या शाळेने आमच्याकडुन ४-४ अध्याय पाठ करुन घेण्यापेक्षा २ श्लोक व्यवस्थित अर्थासह सांगितले असते तर तेच उत्तम होते हे ही उमगले. आजही मला "इदं तु ते गुह्यतमं..." अशी सुरवात करुन दिली की आख्खा अध्याय म्हणता येतो पण त्याचा अर्थ नाही सांगता येत. मग असे पांगळे "पाठांतर" व ते ही "संस्काराच्या नावाखाली" जे लहानपणी माझ्यावर ठासवले गेले त्याला आज माझ्या दॄष्टीने काहीच किंमत उरत नाही. आमची शाळा खरेतर "तमसो मा ज्योतिर्गमय" हे ब्रीद घेऊन चालणारी, पण खरे आवश्यक ज्ञान देण्यात शाळेची नक्की गल्लत होत आहे असे आज वाटते.
आजही तेच चालु आहे, कधीमधी गावाकडे गेले आजही तसेच गीतेचे अध्याय तोंडपाठ म्हणुन दाखवणारे विद्यार्थी दिसतात, ह्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माझे विस्तॄत म्हणणे मांडले की "लहानपणी असा नव्हतास रे तु, आता अचानक असा का संस्कारांना तुझा विरोध आहे ?" असा संपुर्ण चुकीचा अर्थ लावतात ....
माझा विरोध खरोखर संस्कारांना आहे ? की संस्काराच्या नावाखाली नुसते अंध पाठांतर करुन घेण्याला ? संस्काराचा जर अर्थच समजत नसेल तर ते संस्कार काय कामाचे असे माझे म्हणणे चुक आहे ?

तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्‍या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्‍यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ?

लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्‍याच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्‍याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्‍यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो.
पण मी आजही जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा प्रसादाला जातो, पुजेच्या सारंजामापाशी बसलेले त्या घरातले कर्ते अथवा एखाद्या वयोवॄद्ध आजी/आजोबांना पाहुन मला कसेनुसेच होते, मी आपला मुकाटपणे नतमस्तक होतो व प्रसाद घेतो. त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे "अवघे सार्थक झाले" हे समाधान वाचताना त्यांच्या समस्यांचे जहाज हाच विश्वास वर आणेल ह्याचीही खात्री असते.
मात्र तरीही मला माझा सत्यनारायण पुजेच्या महत्वावर विश्वास नसणे व म्हणुन मी "धार्मिक नसणे" हा संबंध कळत नाही...

देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो.
आज मात्र तितकीशी ओढ नाही, देवळातल्या मुर्तीची तर कधीच नव्हती. मात्र पुर्वी जे हवेहवेसे वाटायचे ते वातावरणही आज न राहिल्याने मला आज देवळात जाणे ह्या उपचाराला तितकेसे महत्व देऊ वाटत नाही. देवावरची श्रद्धा तर तितकीच आहे जितकी पुर्वी होती. मात्र आज देवळात गेल्याने तिथले अवडंबर आणि प्रस्थ पाहुन संताप आणि चिडचिड वाढते, ज्या हेतुसाठी मी कधीकाळी देवळात जात होतो तो हेतुच आता उरला नसेल तर मला देवळात जाणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. शिवाय देवळात जाणे म्हणजेच देवावर श्रद्धा असणे हे गुणोत्तर कधीच पटले नाही, तेव्हाही नाही आणि आता तर मुळीच नाही.
जातायेताना रस्त्यावर दिसणार्‍या कोपर्‍याकोपर्‍यातल्या मंदिरापाशी थांबुन दर्शन घेणे, सकाळी कितीही गडबडीत असलो तरीही दर गुरुवारी साइमंदिराची आरती गाठणे, दर चतुर्थीला ट्राफिक ज्यॅम करुन गणपतीची आरती करणे वगैरे गोष्टींचे मला कधीच आकलन झाले नाही व ह्या गोष्टी कधीही करु वाटल्या नाहीत.
मग सध्याच्या देवळातल्या कमर्शियलायझेशन, गर्दी, आरडाओरड वगैरेला कंटाळुन तिकडे जायला खुष नसलेला मी अचानक "नास्तिक" कसा ठरतो ?
देवावरची म्हणजे सुप्रिम पॉवरवर असलेली मनातील श्रद्धा ह्याला काहीच किंमत नाही का ?
पण,
पण आजही मी कोणी मनापासुन आणि तळमळीने देवळात चलण्याचा आग्रह करीत असेल तर जरुर देवळात जातो, बरोबरच्याच्या चेहर्‍यावरच्या दिसणार्‍या समाधानातच मला बर्‍याच वेळा देव दिसतो व माझ्या देवळातल्या देवाच्या दर्शनाचे सार्थक होते....

आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्‍या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते.
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.
ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? उलट मी तर ऑलरेडी गावाकडे "नास्तिक, धर्मबुडवा, वरच्या वार्‍याला लागलेला" वगैरे म्हणुन बदनाम आहे, मग ही लोकं माझ्या का पाया पडत आहेत ?
पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, निदान केवळ मी त्या गावचा आहे म्हणुन वयाने मोठ्ठ्या लोकांनी माझे पाय धरणे तर साफ नामंजुर आहे. माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर तडजोड म्हणुन जास्त वाद न वाढवता मी आपला समोरच्याला मान देऊन वाद संपवतो, मनात काय आहे हा भाग अलहिदा.
तर लोकांच्या मते इथेही मी माझे "संस्कार विसरत चाललो आहे" , चालायचेच ...

खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ?
कुणाला एखाद्याला चुकुन पाय लागला तर मी पटकन रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याच्या पाया पडुन घेतो हे संस्कार नव्हे का ? इथे मला आपण त्याला चुकुन लाथ मारली आहे व त्याची आपण दखल घेऊन माफी मागितली आहे हे दाखवणारे "पाया पडणे" हे जर संस्कार असतील तर मी का ते विसरलो आहे ?
आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघायच्या आधी पुर्वी आई जे हातावर "दही-साखर" द्यायची त्याची आठवण होते, हे काय फक्त वरवरचे आहे का ?
रोज सकाळी आन्हिके उरकताना आपोआप "गणपतीस्तोत्र" मुखातुन बाहेर पडते, त्यामागचे देवदेव वगैरे सोडले तर ते म्हणताना त्या तालातुन व ध्वनीतुन मला मिळणारा आनंद व सुख मला दिवसभरासाठी एनर्जी देते हे खरेच आहे.
कुठलाही नवा कपडा घेतला तर त्याला आधी पाणी दाखवुन मगच तो अंगावर चढवावा ह्या संस्कारामागचे शास्त्रिय कारण मला पटल्याने ते नाकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मग मी सध्या जे करतो ते संस्कार नव्हेत काय ?
असो.

अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ?
कारण, ऑलरेडी इथे समाज आणि आमच्या आसपासचे आम्हाला "नास्तिक, धर्म न मानणारा, देवावर श्रद्धा नसणारा" वगैरे ठरवुन मोकळे झाले आहेत ...

थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ...
चालायचेच ...!!!!

- समाप्त -
( खरे तर ह्या शब्दाला काही अर्थ नाही, आयुष्यातल्या २० वर्षातले असे अनुभव केवळ १०० एक ओळीत लिहणे व वर समाप्त म्हणणे हे संस्कारहीन ठरते. तुर्तास इथे विश्रांतीसाठी थांबतो. मुड आला तर एखाद्या प्रतिसादात अजुन खरडेन .... )
धन्यवाद ...!!!

संस्कृतीधर्ममुक्तकविचारमत

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

30 Jun 2009 - 2:55 pm | मेघना भुस्कुटे

:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2009 - 3:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

विजुभाऊ's picture

1 Jul 2009 - 12:31 pm | विजुभाऊ

धर्म देव ह्या वैक्तीक बाबी आहेत त्या कोणीच कोणावर लादू नयेत
ह्या सर्व गोष्टी मानवनिर्मीत आहेत. देव ही संकल्पनासुद्धा मानवनिर्मीत आहे.
गालीबच्या भाषेत सांगायचे तर " दिल बहलाने के लिये गालीब खयाल अच्छा है"
धर्म हा प्रमाण मानायचा तर नक्की कोण धर्म प्रमाण मानायचा
"तस्मात युद्धस्च भारत" म्हणणारा कृष्ण प्रमाण मानायचा की शत्रुला सुद्धा क्षमा कर म्हणणारा येशु ?
दिवस भर प्रार्थना कर आणि रात्री जिवापुरते खा म्हणणारा महंमद की सूर्योदयानन्तर अन्नभक्षण हे पाप आहे म्हणणारा महावीर?
अन्याय करणाराला अन्याय करु देत. विठोबा तुझी काळजी घेईल म्हणणारा भागवत धर्म की मग अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा पापी म्हणणारा इस्लाम.
चातुर्वर्ण्य आणि त्याची तारीफ करणारा मनू श्रेष्ठ मानायचा की समानतेची जाण निर्माण करणारा इस्लाम मोठा मानायचा.
शूद्रांना शिक्षण नाकारणारा मनू चांगला की शिका संघटीत व्हा म्हणणारा धम्म?

अवलिया's picture

1 Jul 2009 - 1:14 pm | अवलिया

अर्धवट माहितीवर आधारीत असलेला बिनडोक प्रतिसाद.

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jul 2009 - 2:14 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jul 2009 - 6:14 pm | llपुण्याचे पेशवेll

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विजुभाऊ's picture

3 Jul 2009 - 10:12 am | विजुभाऊ

अर्धवट माहितीवर आधारीत असलेला बिनडोक प्रतिसाद.
१००% सहमत.
अवलिया साहेब आणि बिपीनभौ आपण या आणि इतर बर्‍याच बाबतीतले जाणकार आहात.
मी बिनडोक आहेच त्या शिवाय का एवढे प्रश्न पडले असते ?
असो. वैयक्तीक चिखलफेक करण्याची सवय नाही तरिही माझ्या शंकांचे निरसन आपणासारख्या जाणकार त्रिकाल आणिसर्व ज्ञानी माणसाने करावे ही विनन्ती.
मी बिनडोक असलो तरिही उघडपणे जसा आहे तसा वावरतो. सर्वाना मूळच्याच नावानेच भेटतो. उगाचच अ‍ॅनानिमिटीचा वायफळ आग्रह ठेवत नाही
असो. आपण मी विचारलेल्या सर्व शंकांचे आपण बहुशृत असल्याकारणे नीट मुद्देसूद निरसन करालच. अन्यथा आपण केवळ गालीप्रदान करणे आणि भेटलाच आहे तर ठोकुन काढुया या अर्थाने उगाच निव्वळ वायफळ प्रतिसाद देणार्‍या लोकांपैकीच आहात असेच होईल

सूहास's picture

30 Jun 2009 - 3:35 pm | सूहास (not verified)

स॑स्कार,संस्कृती,श्रध्दा,कर्मका॑डे आणी विश्वास या॑ची सा॑गड घालणे खरोखरच अवधड गोष्ट आहे....
जरा कुठे कमी पडल तर नास्तीक,पराचा मॉडर्न..जास्त झाल की अ॑धश्रध्दाळु,जुनाट-बुरसट विचारी .

सुहास

पाषाणभेद's picture

30 Jun 2009 - 3:56 pm | पाषाणभेद

कोणी काही म्हणो पण तुम्ही खरे संस्कारी आहात.
तुम्ही कोणाला दुखवत तर नाही ना.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विसोबा खेचर's picture

30 Jun 2009 - 3:57 pm | विसोबा खेचर

देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" - इति : बाबा

डॉनराव, मी आपल्या बाबांशी सहमत आहे..!

श्रद्धेला पर्याय नाही..

तिरंग्यावर, पंढरीच्या विठोबावर, लालबागच्या राजावर, माझ्या देशावर, माणसाच्या माणूसपणावर, सहृदयतेवर, सृजनशीलतेवर, आईवर, गाण्या-खाण्यापिण्यावर, मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर, मला आवडणार्‍या सर्व गायक-वादकांवर - साहित्यिकांवर - अभिनेते/अभिनेत्रींवर, अनेकानेक अज्ञात चित्रकारांवर, मूर्तीकारांवर, मिपावर, मिपाकरांवर,

अ‍ॅन्ड लास्ट बट नॉट द लीस्ट - नियतीवर!

माझी नितांत श्रद्धा आहे!

आपला,
(श्रद्धाळू) तात्या.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

30 Jun 2009 - 6:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

तात्याशी सहमत
फक्त हे सोडुन बरं मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर,;)

( देवभोळा ) घाशीराम **************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

नितिन थत्ते's picture

30 Jun 2009 - 4:05 pm | नितिन थत्ते

हा तर माझा चर्चेचा आणि वादावादीचा आवडता प्रांत. पण काय करणार? डॉनरावांनी इतकं तंतोतंत माझ्याच मनातलं लिहिलंय की मला काही लिहायलाच नको.

(विश्वातल्या कुठल्या सुप्रीम पॉवरवर मात्र विश्वास नाही...तशी गरज वाटत नाही)

(श्लोक पाठ असण्यापेक्षा वागणूक चांगली असणे म्हणजे संस्कार असे मानणारा) खराटा

मेघना भुस्कुटे's picture

30 Jun 2009 - 4:45 pm | मेघना भुस्कुटे

खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात.

त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.

मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.

पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?

म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?

आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.

असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.

आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.

आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.

विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.

परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.

म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.

हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.

पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

छोटा डॉन's picture

30 Jun 2009 - 5:03 pm | छोटा डॉन

मी पुढच्या माझ्या एखाद्या प्रतिसादात मेघनाचा, संवेदचा लेख आणि त्यावर सेन च्या प्रतिक्रिया ह्याची लिंक देणारच होतो.
आता मेघनाने आख्खा लेखच दिल्याने प्रश्न मिटला ...

मेघनाचा व संवेदचा लेखही फार सुंदर आहे. सेनच्या प्रतिक्रियाही मस्त.

मागच्या पुणे भेटीत झालेले मित्रांबरोबरचे वाद आणि उपरोक्त लेख हेच माझय ह्या लेखामागची प्रेरणा ठरले असे म्हणायला हरकत नसावी.
धन्यवाद मेघना ...!!!

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

श्रावण मोडक's picture

30 Jun 2009 - 6:13 pm | श्रावण मोडक

डॉन, मेघना,
उत्तम! मनःपूर्वक वाचलं. मूळ लेख विचारप्रवर्तक, त्यावरची अत्यंत संयत, पण तितकीच विचारप्रवर्तक प्रतिक्रिया. अगदी उत्तम. तुमचे अभिनंदन करणार नाही. अभिमान वाटतो म्हणेन.
धर्म, त्याच्याशी निगडीत परमेश्वर, त्याच्याशी निगडीत नियती या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवून स्वतःकडे पाहिल्यानंतर आपण माणूस आहोत, माणसाची विचार करण्याची शक्ती वापरतो, विवेकाचा अवलंब करतो असे वाटते का? वाटत असेलच... एखाद-दुसऱ्या प्रतिक्रियेत चुकलोही असू, कारण माणूसच आहोत. आणि तसे वाटत असेल ना, तर धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता यांचा विचार कशाला करायचा? या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवूया असे का म्हणतो? कारण, या साऱ्या चर्चेत कुठं तरी धर्म, परमेश्वर, नियती या तिन्ही गोष्टी अपौरूषेय ठरतात. त्या तिन्ही गोष्टी अपौरुषेय नाहीत, अशी धारणा झाली तर बरेच अवकाश खुले होते विचार करण्यासाठी. कारण या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.
अशाही स्थितीत, मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो. माझी आई पूजा करते. तिच्या पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी तिचा देव माझ्या जगण्याच्या आड येत असेल तर मी त्यापासून वेगळा होतो. कटाक्षाने वेगळा राहतो. अशावेळी "थांब रे, आमटी फोडणीला टाकायची आहे," असे ती म्हणाली तरी मी चटणी-पोळी, ताकभात खाऊन मोकळा होतो. हे वागणे मातृभक्तांच्या लेखी वावगे असेल... पण माझ्या दृष्टीने नाही. मी तिला त्रास देत नाही. मी आमटी-भात न खाता ताकभात खाल्ला याचा तिला त्रास होत असेल का? असेलच. पण तिच्या श्रद्धेची तिने मोजलेली ती किंमत आहे. आमटी-भाताऐवजी ताकभात ही माझ्या अश्रद्धतेची मी मोजलेली किंमत असेल. हे असे वागावे का? ज्याने-त्याने आपापल्या धारणेप्रमाणे ठरवावे. या वर्तणुकीचा आग्रह धरणे अयोग्य नाही, पण धरता येतोच असे नाही. अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
परवाचाच किस्सा आहे - एका मित्राच्या कार्यालयात नवे मॅकबुक आले. गणेशाची प्रतिमा ठेवून सहकाऱ्यांनी मी पूजा करावी असा आग्रह धरला. मी नकार दिला. म्हटलं, आधी इथं असलेल्या मुलींच्या हातून पूजा करा. मग मीही करतो. हा मान पुरूषाचाच हे मला खोडून काढायचं होतं. मुलींनी पूजा केली, मग मीही उदबत्ती ओवाळली (इथं अश्रद्धांच्या लेखी मी दांभीक ठरतोय).
मेघना, पितळी मूर्तीवर पाय असा प्रसंग अनेकांच्या जगण्यात घडतो का? बहुदा घडत असावा. असंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं आहे. गणपतीचा फोटो फोडण्याचं कृत्य. अशाच वादातून. पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.
उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2009 - 6:42 pm | प्रकाश घाटपांडे

सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.

मी पण असेच करतो. पुर्वीपेक्षा ताठरपणा कमी झालाय. पण शासकीय कार्यालयात सत्यनारायणाची पुजा केली जाते त्याला माझा विरोध असतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अशी शासकीय पुजा असु नये हे माझे मत. सत्यनाराणाची पुजा कोण करतो? ज्याला आपल्यातला खोटेपणा डाचत असतो तो. मग ती बोच कमी करण्यासाठी सत्यनारायण घालायचा. त्यापेक्षा सत्याची पुजा करा! (जी आजच्या जीवनात॑ अशक्य आहे) अशा कानपिचक्या ऑफिसमध्ये द्यायचो. सत्यनारायणाचा प्रसाद मला शिरा म्हणुन खायला आवडतो हे बहुतेकांना माहित होते. त्यांच्या घरी गेल्यावर तु शिरा म्हणुन खा बाबा! पण ये घरी असा प्रेमळ आग्रह असायचा. अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. मग असा विक्षिप्तपणा का करा असा विचार करतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

30 Jun 2009 - 6:47 pm | श्रावण मोडक

धर्म, परमेश्वर, धार्मिकता या पूर्णपणे वैयक्तिकच बाबी. त्या तशाच रहाव्यात. सरकारी कार्यालयच कशाला, माझा तर त्यांना खासगी कार्यालयातही विरोध असतो. त्याच भूमिकेतून त्या कार्यालयातील मुलींच्या हातून अग्रपूजा. किमान तेवढीच आपल्या सद् सद् विवेकाला टोचणी टाळण्याची कृती.

घोडीवाले वैद्य's picture

1 Jul 2009 - 12:25 am | घोडीवाले वैद्य

संपादित.

चतुरंग's picture

1 Jul 2009 - 12:28 am | चतुरंग

नाहीतर लगाम घालावा लागेल! ;)

(मोतद्दार)चतुरंग

छोटा डॉन's picture

30 Jun 2009 - 7:03 pm | छोटा डॉन

धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.

+१, असेच म्हणतो.
उपरोक्त गोष्टी ह्या पौरुषेय आहेत आणि जेव्हा त्यांची निर्मीती झाली तेव्हा त्याला स्थळ, काळ, वेळ ह्यांचे परिमाण होते. अशा परिस्थीतीत त्या आजही आहे तशाच योग्य आहेत का ह्याचा उहापोह नको का करायला ?
समजा करायला गेलो तर आमच्या नशिबी "अधर्मी" ठरणे आले, भले ते भंपक का असेना. शिवाय भंपक म्हणणारे १० लोक नसतात तर हजारोंच्या संख्येने असतात.

इनफॅक्ट आपला हिंदु धर्म ह बराच चिकित्सेला आणि संशोधनाला वाव देतो म्हणुन आम्हाला त्याचे कौतुक आहे. आपण हिंदु धर्मात अवश्य संशोधन करुन कालबाह्य परंपरा आणि रुढी ह्या प्रवाहातुन काढु शकतो म्हणुन तसे करण्याला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.
उदा : सति प्रथा, विधवांचे हक्क , जातीभेद ह्यावर बरीच चिकित्सा झाली आणि आज आपण परिणाम आणि सुधारणा पाहतो आहोत.
मग हे आता इथेच थांबवायचे का ?
आपल्या धर्मातल्या कित्येक उदात्त आणि महान गोष्टी अजुन जनसामान्यांपर्यंत पोहचल्याच नाहीत, बहुतांशी तो वर्ग अजुन खेदाने कर्मकांडातच आणि अंधविश्वासातच अडकुन पडला आहे हे सत्य नाही का ?
म्हणुन विष्लेषण हे आवश्यक ठरते, त्याला होणार्‍या विरोधाची कल्पना आहेच आणि त्यासाठी मानसीक तयारीही आहेच की, इथे फक्त काय काय करता येईल ह्यासंबंधी जार चाचपणी चालु आहे ...

मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.

हो , हे सुद्धा मान्य.
मात्र हे मला प्रत्येकचवेळी जमेल असे नाही. मी कितपत अलिप्त राहु शकतो हे सांगणे कठिण आहे.
खरे सांगायचे तर "तुला करायचे ते कर, मी येणार नाही" हे मला जमत नाही, समोरचा एखादा चुकीचा अथवा अनावश्यक वागतो आहे हे जेव्हा दिसते तेव्हा मी अलिप्तपणे बाजुला होण्याऐवजी त्याला ४ गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न करतो.
बहुदा हेच अनावश्यक आणि अनवॉरंटेड ठरत असावे ...

शिवाय माझे सामिल न होणे किंवा होणे ह्यावर समजा माझे "सामाजिक स्थान" अथवा "रिलेशनशिप्स" ह्यावर परिणाम होत असेल तर काय करावे ? काही वेळा नुसते "त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव" असे सांगणे शक्यही नसते व बरोबरही नसते.
अशा वेळेस मी तुर्तास गुपचुप त्यात सामिल होण्याचा मार्ग स्विकारतो, ते मनाला पटत नाही हे माहित असुनही, तडजोडच म्हणावी लागेल ह्याला, पण करावी लागते.

अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.

+१, अगदी परफेक्ट ...
समतोल साधणे महत्वाचे आहे ...

सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.

ह्यावर एक वेगळा, विस्तॄत प्रतिसाद लिहीन ...
निमीत्त सत्यनारायणाचे मात्र ह्या अनुषंगाने गरिब वर्गाला आर्थिकदॄष्ट्या परवडत नसतानसुद्धा केवळ सामाजीक कर्तव्य म्हणुन पार पाडाव्या लागणार्‍या कर्मकांडावर भाष्य करेन ...

पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.

ह्यावर बहुदा मला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आपला स्टान्स पटतो आहे मात्र अफार अवघड आहे असे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पाहतो कसे जमते ते ...!!!

उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?

:)
हा हा हा, ५० जाऊ देत पण अजुन काही जणांकडुन "कन्ट्रक्टिव्ह प्रतिसादांची" अपेक्षा मात्र जरुर आहे ...

मोडकसाहेबांचा प्रतिसाद आवडला ..!!!
धन्यवाद.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

भोचक's picture

30 Jun 2009 - 6:53 pm | भोचक

डॉन तुझा लेख उत्तमच. पण मेघना तुझा प्रतिक्रियात्मक लेख म्हणजे माझ्या मनीचेच सारे काही मांडलेस. १०००००००० टक्के सहमत....

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2009 - 5:37 pm | प्रकाश घाटपांडे

उत्तम मनोगत, डॉनराव (यवढ भारी लिवल्यावर डॉन्या कस काय म्हणायच) जणु काही आमच्या मनातल बोल्लास. मेघनाचा प्रतिसादाने बहार आणली. समाधान पाव्लो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विनायक प्रभू's picture

30 Jun 2009 - 6:44 pm | विनायक प्रभू

एक आभासी स्वर्गारोहणाने अस्वस्थ झालेला हाच तो डॉन का?

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2009 - 7:15 pm | प्रकाश घाटपांडे

आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूस च आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली.
अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला
ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक."
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2009 - 8:06 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हीच खरे धर्मश्रद्ध हा डॉ.नरेंद्र दाभोलकारांचा दै.सकाळ मधील लेख इथे वाचता येईल
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भोचक's picture

30 Jun 2009 - 8:07 pm | भोचक

मी ज्या घरात वाढलो तिथे कट्टर म्हणावं असं धार्मिक वातावरण नव्हतं. आई-वडिल कट्टर धार्मिक होते असं नाही, पण त्यांनी कधी काही सक्ती केली नाही. लहानपणी कधी तरी आठवलेकाकांकडे परवचा म्हणायला आई-बाबा पाठवायचे. पण तो परंपरागत धार्मिक संस्कारांचा भाग असावा. त्यावेळी हे का? असे प्रश्न पडले तरी विचारायचे कुणाला? हा प्रश्न होता. पुस्तकाचं दुकान असल्याने धार्मिक पुस्तकं भरपूर होती. त्यातली बरीचशी वाचली होती. त्यातली शंकरासंदर्भातली पुस्तकं वाचल्यानंतर हा किती पांचट नि स्त्रीलोलुप देव होता, अशी प्रतिमा मात्र मनात तयार झाली होती. ती आजही कायम आहे. ती त्यावेळी कुणाकडे व्यक्त झाली मात्र नाही.

पुढे नाशिकला आल्यानंतर वाचन वाढलं. त्याचाही प्रवास फार रंजक झाला. माझा देवावर विश्वास, श्रद्धा होती का हा मलाही पडलेला प्रश्नच. पण देवावरचा विश्वास उडण्याऐवजी त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची याची कारणं शोधण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या शोधातच मुळ विश्वासच डळमळीत झाला. ओशो वाचनात आले नि त्यांनी पार आधीचं 'संस्कारीत' प्रतिमाविश्व उध्वस्त करून टाकलं. इतरही काही मंडळींनी हेच केलं. मग भरपूर प्रश्न पडायला लागले. मतं तयार व्हायला लागली. (खरं तर कुणाची तरी घेतली गेली.आपील मतं खरोखरंच आपली असतात की...?) मनात तोपर्यंत तयार झालेल्या महिमामंडित प्रतिमांचा शेंदूर पार सुटायला लागला. मग या वाचनातून एक बंडखोरी सुरू झाली. कुठल्याही धार्मिक कार्यातील चुका काढून दाखविण्याची नि त्यावर तावातावाने चर्चा करण्याची सवय लागली. नातेवाईकांत आपण वाचलेल्या 'चार बुकातलं' काही सांगितलं, की तेही 'आ' वासून निरूत्तर होऊन बघायचे. 'अतिशहाणा' हे बिरूदही त्यामुळे मिळालं. पण त्याचवेळी याला आपल्यापेक्षा जास्त कळतं असा त्यांच्या नजरेतला भावही उगाचच स्वतःचा अहं वाढवून जायचा.

मी तेव्हा नास्तिक होतो का? हा मलाही आज प्रश्न पडतो. नास्तिकतेच्या जवळ कुठेतरी होतो, असं वाटतं, पण आस्तिक्यपण पूर्ण सुटलं होतं, असंही नाही. कारण लग्न करताना त्यातल्या विधीत वायफळ खर्च करावा असं वाटत नव्हतं. पण लग्न 'संस्कारीत' व्हावं असं मात्र वाटत होतं, म्हणून प्रबोधिनीच्या पद्दतीने का होईना, पण चार मित्रांच्या उपस्थितीत असं 'संस्कारीत' लग्न नक्की केलं. हे संस्कार केले नसते तर काय झालं असतं? नक्कीच काही नाही. पण किमान तेवढे संस्कार हवेच, हा आतापर्यंतच्या पारंपरिक संस्कारांचा पगडा त्यावेळीही सुटू शकला नाही. त्याचवेळी नवं घर घेतलं, तेव्हा वास्तुपूजा मात्र केली नाही. पूजा केली ती साधी. सत्यनारायणाची. त्या पुजेवरही विश्वास होता असं नाही. कारण जहाजाच्या बिनडोक कथेवर काय विश्वास ठेवणार? पण पु्न्हा तीच भूमिका घरावर काही एक संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून चार गोष्टी व्हाव्यात.

खरं तर माझा आस्तिक्य-नास्तिक्यमध्ये झुलणारा 'मोरू' झाला होता. पण मग वरकरणी दिसणार्‍या माझ्या नास्तिक्यवादी भूमिकेला मी थोडं बंडखोरीचं परिणाम देऊ लागलो. जे धार्मिक संस्कार करायचे त्याला काही वेगळा एंगल द्यायचा असं करायला लागलो. मुलगी झाल्यानंतर पाचपावलीला मंत्रपठणाला मी महिला पुरोहितांना बोलावलं ते त्यातूनच. मग माझ्या या दृष्टिकोनाचे कट्टर विरोधक असेलले माझे काका त्या निर्णयावरही नाराज झाले. पण त्यांच्या नाराजीपेक्षा त्यांच्या नाकावर टिच्चून मी मला हवं ते केलं, याचा आनंद (?) वाटला.

त्याला पार्श्वभूमीही वेगळी होती. आई गेली तेव्हा याच काकांशी एकदा सामना झाला. आईचा दहावा करताना विधी करा पण त्यातला भोजनाचा भाग गाळा नि ते पैसे आधाराश्रमाला द्या अशी सूचना अस्मादिकांनी केली नि काका प्रचंड संतापले. ढेरपोट्या नि बाहेरून केवळ जेवायला बोलवलेल्या ब्राह्मणांना (माझ्या आईशी ज्यांची काहीही 'गाठ' नसलेल्याना) जेवायला घालणं मला कसंसंच वाटत होतं. काकांच्या आक्रमकपणाला मीही तितकाच आक्रमक होऊन प्रतिवाद केला. पण वडिल नि भावाने नमते घेऊन काकाशरण मार्ग अवलंबला. मग या सगळ्या विधींत मी आपला कृत्रिमरित्या वावरलो. पुढे चुलत भाऊ गेला, तेव्हाही याचाच रिपीट परफॉर्मन्स झाला.

पण मी नास्तिक आहे का? की आस्तिक हा मलाही पडलेला प्रश्न. मधल्या काळात नास्तिकपणाच्या टोकाला गेलेला मी आता तिथून थोडा वळालो. विरोध कोणताच करत नाही, पण स्वतःहून कोणतीही धार्मिक गोष्ट करण्याकडे कल नसतो. त्यामुळे कुणाच्या चुकीच्या पद्धतीलाही विरोधही फारसा करत नाही. वटसावित्रीपासून कुठली पूजा करण्याची कधीही सक्ती, इच्छा व्यक्त करत नाही. घरी कधीही पुजा सहसा करत नाही. बायकोने खूप आग्रह केला तरच. तीही धार्मिक आहे असंही नाही. पाळीच्या काळात मंदिरात जाणं तिलाही वावगं वाटत नाही. नि मलाही. याचा अर्थ धार्मिक अकर्मता अंगी बाणलीय असंही नव्हे. पण बिनडोक न पटणार्‍या प्रथा, परंपरा नाही पाळायच्या हे मात्र ठरवलंय. ऐकणारं कुणी असेल तर त्यामागची भूमिका समजावूनही सांगतो. पण त्याला पटावीच हा आग्रह नसतो. तावातावाने भांडण्याची हौसही आता जिरलीय.

त्यामुळे स्वतःपुरतं जे चांगलं वाटलं ते करतो. जेथे चांगलं वाटतं,(भलेही ते मंदिर असो वा मशीद) त्यावेळी तिथं जातो. मन प्रसन्न करणारं ऐकावसं वाटलं तर ऐकतो. शंकराचार्यांच्या ओम पूर्णमिदं ची अध्यात्मिक अनुभूती छान वाटते. अथर्वशीर्षाची वर्णनं मी सृष्टीला लावतो. (या अर्थाने देवाच्या जागी मी निसर्ग रिप्लेस केलाय, असं म्हणता येईल.)

बाकी मी आस्तिक-नास्तिक, धार्मिक की अध्यात्मिक हा मलाही पडलेला गुंता आहेच. ही गुंतवळ सुटत नाही नि सोडवतही नाही.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

आवडीने वाचतो आहे.

घाटावरचे भट's picture

30 Jun 2009 - 10:25 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो. (कारण आम्हाला एवढं आणि असंच म्हणता येतं आणि याच्यावर मात्र आमची अढळ श्रद्धा आहे.)

विकास's picture

30 Jun 2009 - 10:01 pm | विकास

चांगली चर्चा आहे. तुर्त जागा राखून ठेवत आहे. काही तासांनी अधिक लिहीन.

मयुरा गुप्ते's picture

30 Jun 2009 - 10:19 pm | मयुरा गुप्ते

मुख्य लेख आणि प्रतिसाद विचारपुर्ण, मोठा प्रतिसाद टंकायला जरा वेळ लागेल.तुर्तास प्रतिसाद राखुन ठेवते.
(सगळ्या विचारांच्या कल्लोळाला शब्दांमध्ये बांधयला स्वःतासाठी घेतलेला वेळ)
--मयुरा.

अवलिया's picture

30 Jun 2009 - 10:31 pm | अवलिया

वाचत आहे.

--अवलिया

यशोधरा's picture

30 Jun 2009 - 11:01 pm | यशोधरा

मीही.

नितिन थत्ते's picture

30 Jun 2009 - 11:12 pm | नितिन थत्ते

उच्च चर्चा.

मेघना, भोचक, श्रावण सार्‍यांचेच प्रतिसाद अतिशय उत्तम.

डॉनरावांच्या मूळ लेखातला एक मुद्दा घेऊन पुढे जातोय.
ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ?

नास्तिकपणा किंवा अधार्मिकपणाचे अनेक पैलू आहेत. एक पैलू धर्म आंणि कर्मकांडे यांना विरोध या अंगाने जाणारा असतो. या पैलूत आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बसू शकतात. म्हणजे देव आहे असे मनातून वाटणारे पण तो या दगडाच्या किंवा इतर मूर्तीत आणि कर्मकांडात नाही असे वाटणारे आस्तिकही यात येतात. डॉनराव हे अशा स्वरूपाचे आस्तिक (पण लौकिकार्थाने अधार्मिक) असावेत असे वरील वाक्यावरून वाटते.

काही जण आस्तिक पण असतात आणि कर्मकांडांना ही हरकत नसते. पण या कर्मकांडांना पॉझिटिव्ह वळण द्यावे असे वाटणारे आणि तसा प्रयत्न करणारे असतात. वर कोणीतरी आश्रमाला दान देण्याविषयी लिहिले आहे.

काही जण खरोखरच नास्तिक म्हणजे देव नाहीच अशा मताचे असतात. मेघना ही अशा पैलूतील अधार्मिक आणि 'ठार' नास्तिक असावी असे वाटते.

मी पण बराचसा मेघना टाईपचा नास्तिक आहे. अर्थात मी मूर्तीला लाथ मारेन की नाही हे सांगता येत नाही.

मी अनेकदा वडिलधार्‍यांच्या इच्छेसाठी काही धार्मिक गोष्टी करतो. त्यामागे बहुधा 'माझा नास्तिकपणा या समोरच्या व्यक्तीला दु:ख देण्याइतका महत्त्वाचा आहे का?' हा दृष्टीकोन असतो. देवळात जाऊ असे अशी व्यक्ती म्हणाली तर मी जातोही किंवा नाहीही जात. कधी बरोबर जातो पण देवळाच्या बाहेरच थांबतो. थोडक्यात माझे प्रत्यक्ष वागणे माझ्या दृष्टीकोनाशी नेहमीच सुसंगत असतेच असे नाही. पण सत्यनारायण घाल किंवा मुद्दाम जाऊन कुलदैवताचे दर्शन घेऊन ये असे त्या व्यक्तीने सांगितले तर नक्कीच करणार नाही.

माझी नास्तिकतेची पूर्वपीठिका अशी. देव या संकल्पनेचा काहीही अर्थ सांगितला तरी 'विश्वातील घटनांचे नियंत्रण करणारा आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम हव्या तशा प्रकारे घडवू/बदलू शकणारा' हा अर्थ देवाच्या संकल्पनेपासून कधीही दूर करता येण्यातला नाही. कारण हा अर्थ काढून टाकला तर देव असला काय आणि नसला काय? बहुतेक आस्तिकांनाही अशा देवाचे माहात्म्य वाटणार नाही. तर वरील प्रकारची क्षमता बाळगणारी कोणतीही शक्ती या विश्वात नाही असे मी मानतो.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

अन्वय's picture

30 Jun 2009 - 11:31 pm | अन्वय

आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले

घाटे यांना स्यूडो म्हणणे चुकीचेच आहे. कारण जो खरा विज्ञानवादी असतो. तोच दैववादी असतो, अशी माझी धारणा आहे. अशी धारणा होण्यामागेही एक घटना आहे.

माझ्या एका मित्राचे जवळचे नातेवाईक रुग्णालयात होते. ते कोमात होते. वय अधिक असले, तरी त्यांना वाचविण्यासाठी त्या कुटुंबाचे खूप प्रयत्न सुरू होते. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते जगणे शक्‍य नव्हते. विशेष म्हणजे तो मित्र निरीश्‍वरवादी होता. आम्ही डॉक्‍टरांना भेटलो. ते म्हणाले. तुम्ही त्यांना घरी नेले, तर बरे होईल. तो मित्र मात्र तयार नव्हता. डॉ. आजोबा वाचलेच पाहिजे, असं तो वारंवार विनवत होता. त्यावेळी डॉक्‍टर फटकन म्हणाले, माझे प्रयत्न सुरूच आहेत. बाकी सर्व ईश्‍वराच्या हाती. हे ऐकल्यानंतर तो मित्र सटकलाच. म्हटला, डॉक्‍टर असून ईश्‍वराचा हवाला देता.

डॉक्‍टरांनी त्याचे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाले, डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे. कारण मला माहिती आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्यावर जगातला कोणताच डॉक्‍टर नियंत्रण ठेवू शकत नाही. ही शक्ती एकाच गोष्टीत आहे. तिला आपण ईश्‍वर म्हणतो.

मित्र गपगार झाला. बोलण्यासारखे काही त्याच्याकडे राहिलेच नव्हते.
तो शांतपणे उठला आणि आजोबांजवळ जाऊन त्याने त्यांचा हात हातात घेतला. त्याचवेळी आजोबांच्या ओठाची थोडी हलचाल झाली. पुढे काही दिवस मी त्याच्याबरोबर रुग्णालयात जात होतो. चार दिवसांनंतर आजोबा शुद्धीवर आले.

आता बोला.

विसोबा खेचर's picture

1 Jul 2009 - 12:02 am | विसोबा खेचर

डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे.

क्या बात है..!

बोला गणपतीबाप्पा मोरया..!

आपला,
(गणेशप्रेमी) तात्या.

स्वगत : हम्म! भाग्यश्रीच्या शब्दात सांगायचं तर आता हा धागा हायजॅक करू की काय?! ;)

थोर थोर विचारवंतांची रेवडी उडवायला जरा मज्जा येईल! :)

जाऊ द्या झालं! देवदेवतांच्या मूर्त्यांवर पाय देऊन तुडवणं सुरू आहे. आपण कशाला उगा मध्येच पडा! साला कुणाचा तरी पाय आपल्याही टाळक्यावर पडायचा!:)

तात्या.

विसोबा खेचर's picture

30 Jun 2009 - 11:46 pm | विसोबा खेचर

ईश्वरी अस्तित्वाबद्दल साशंक असणार्‍यांचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली! :)

असो,

थोरामोठ्या विचारवंतांची ही वैचारिक गंगा अशीच वहात राहो..! :)

तात्या.

अन्वय's picture

1 Jul 2009 - 12:08 am | अन्वय

खरंच ना तात्या.
उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते.
त्यातलीच ही चर्चा आहे. चालू द्यात. प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!

चतुरंग's picture

1 Jul 2009 - 12:20 am | चतुरंग

उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते.

विरोधी मते असली तरी आपण वापरलेल्या अधोरेखित शब्दांसारखे दुसर्‍या प्रतिसादकर्त्यांना मानहानीकारक शब्द वापरणे योग्य नव्हे! जरा जपून लिहा. विचारपूर्वक लिहा.

(सूचक)चतुरंग

अन्वय's picture

1 Jul 2009 - 12:40 am | अन्वय

कु़णाचीही मानहानी करण्याचा हेतू नाही.
तुम्हाला पटत नसले, तरी ते वैश्विक सत्य आहे.

घाटावरचे भट's picture

1 Jul 2009 - 12:44 am | घाटावरचे भट

त्याचं काय आहे अन्वयराव, इथे षड्ज ऋषभापासून वेगळा न काढता येणारे, विद्वत्ता पाजळणारे बरेच लोक आहेत. आता सगळ्यांची लेव्हल तुमच्याइतकी तर नसणार ना... पण बाकी काही म्हणा, कानाखाली वाजवून लगेच हात जोडून समोर उभं राहाण्याची तुमची ष्टाईल आवडली बॉ आपल्याला.

विसोबा खेचर's picture

1 Jul 2009 - 12:21 am | विसोबा खेचर

प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय.

हो बुवा! एकंदर प्रकार गंमतीशीर आहे खरा! :)

आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!

येस्स! :)

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jul 2009 - 12:12 am | llपुण्याचे पेशवेll

कोणी काय मानावे आणि काय नाही यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही.
परंतु मी तर म्हणेन मी धार्मिक आहे (म्हणजे डान्या ज्या पद्धतीचा धार्मिक नाही त्या पद्धतीचा मी आहे) कारण मी त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामागची भूमिका काय आहे हे शोधायचा प्रयत्न करतो आणि शेवटी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नियम सर्वत्र लागू आहे असे मला वाटते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या या उत्क्रांतीचे टप्पे पार करत आल्या आहेत असे मला वाटते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचल्यावर माझा अंदाज बरोबर आहे असेही वाटले. जसे पूर्वी लैंगिकसंबंध माणसाचे देखील पशुवत होत. आई आणि मुले देखील शरीरसंबंध करीत असत परंतु जसा जसा समाज विकसित होत गेला तसे तसे बंधने वाढत गेली. व आताच्या काळात एक सुजाण भारतीय पुरुष तरी आपल्या आईबद्दल शारीरीक संबंधाची वासना ठेवणार नाही असे वाटते. जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे.
ज्या गोष्टी आज मला घरी सांगितल्या जातात त्या सर्वच टाकावू असतात असे नाही किंवा सर्वच सरसकट योग्य असतात असंही नाही. किंवा परिस्थितीनुसार उपकारक किंवा अपकारक असू शकतात. उदा. माझी आई पाळीच्या वेळेस बाजूला बसत असे, त्यामुळे घरातली कामे उदा. स्वैपाक, भांडी, केर-वारे इ. मी, माझा दादा, माझे बाबा वाटून घेऊन करत असू. त्याचा सर्वात मोठा फायदा मला अमेरिकेत आल्यावर झाला तो असा की माझा स्वैपाक मला व्यवस्थित बनविता येत असे. खाण्यासाठी बाहेर पैसे खर्च करायची किंवा पा.कृ. ची पुस्तके धुंडाळण्याची वेळ आली नाही.
तसेच आपल्या पापपुण्याच्या संकल्पना यादेखील माणसाने वाईट वागू नये यासाठी त्याला घालण्यात आलेली भिती आहे असे मला वाटते, आणि म्हणून ते योग्य वाटते.
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते. त्यामुळे एखादी धार्मिक गोष्ट मला पटली नाही तरी मी ती पाळतो. त्यावर जास्तीत जास्त विचार करून ती का करावे असे म्हटले असेल याचा शोध घेतो. केवळ कोणीतरी लिहीले सांगितले म्हणून माझ्या संस्कृतीत सांगितलेली एखादी गोष्ट मी टाकाऊ मानत नाही.
तसेच जी जी संतचरित्रे मी आजवर वाचली त्यात त्या त्या संतानी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, उपासना श्रेष्ठ हेच सांगितले आहे. आणि तेवढे कारण मला''देव' मानायला पुरेसे आहे.

बाकी सुचेल तसे पुढे लिहीत राहतो.
(१७६१मधला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

धमाल मुलगा's picture

1 Jul 2009 - 11:26 am | धमाल मुलगा

काय बोललात साहेब!

स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते.

=D> =D> =D> =D> =D> =D>

आवडले. असेच म्हणतो.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

आनंदयात्री's picture

2 Jul 2009 - 10:58 am | आनंदयात्री

काय बोल्लात मालक !!! एकच नंबर !!

जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे.

ते व्यक्तिस्वातंत्र्य वैगेरे वाल्यांनी तुमचा प्रतिसाद वाचलेला दिसत नाहीये ..

भाग्यश्री's picture

1 Jul 2009 - 12:10 am | भाग्यश्री

डॉन.. लेख फार आवडला! माझ्या मनात अगदी असंच येत असतं सारखं! मी जरा श्रद्धाळू आहे! पण त्यासाठी रोज देवळात गेलेच पाहीजे, देवाचे नाव घेतलेच पाहीजे, पन्नासदा येताजाता नमस्कार केला पाहीजे असं मला मुळीच वाटत नाही..
माझी आज्जी अगदी टोकाची सोवळं ओवळं पाळणारी! लहानपणापासून तिचे कर्मठ वागणे डोळ्यासमोर होते, विचार करू लागल्यावर ते कधी पटले सुद्धा नाहीत.. सुरवातीला मी तिला फार त्रास दिला.. हे असंच का? तसं का नाही! जेवणाच्या आधी शिवायचे नाही हा तर मला अस्पृश्य करून टाकणार प्रकार वाटायचा.. पण हळूहळू माझेच विचार बदलले.. म्हणजे जे जे आपल्याला पटत नाही, तिथे तिथे विरोध हा केलाच पाहीजे असं वाटणं कमी झाले.. त्यामुळे आजुबाजुची लोकं कमी दुखावली जातात.. आणि मला तेच हवंय.. त्यांना न दुखवता स्वतःला जे हवंय ते करणे..
मी श्रद्धाळू कशी आहे मग? मी नास्तिक नाही आहे, आणि टोकाची आस्तिकही नाहीये.. मी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. खरं तर आता विचार येतोय देव म्हणजे कुठला? एक कुठलीतरी अनाम शक्ती, की वेगवेगळ्या मूर्ती ? मी मूर्तीपूजक नाही आहे, परंतू त्याचवेळेस मला खूपदा मूर्तीकडे पाहून शांत वाटते..
आमच्या पुण्याच्या घराच्या शेजारी आम्ही कॉलनीतल्या सर्व लोकांनी खपून विठ्ठल मंदीर बांधले.. त्याच्या निर्मितीपासून इन्वॉल्व्ह झाल्याने खूप जिव्हाळा वाटतो त्या मंदिराचा.. त्या गाभार्‍यात मिळणारी शांतता कुठेही मिळत नाही.. गणपतीच्या कुठल्याही मूर्तीसमोर गेल्यास मला केवळ शांत शांत वाटते! पण म्हणुन मी दिवसातून हजारवेळा नाही जात..
देवपूजा करताना, संस्कृत श्लोक, आरत्या, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला मला फार आवडते. पण एखाद दिवस नाही झाले यातले काही तरी बिघडत नाही..
मला असं वाटतं, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीशी आपण कसे वागू तसं काहीसं माझं देवाबरोबर होते.. रोजचा कॉन्टॅक्ट नसला तरी काही बिघडत नाही.. पण कधीतरी तिथे जाऊन मन मोकळे केले, शांत केले की बरे वाटते.. त्याचबरोबर, माझ्या आयुष्यात जे जे काही होत आहे ते ते केवळ माझ्याच प्रयत्नांनी होत आहे असंही मला म्हणता येत नाही! पण मी ती 'पांडुरंगाची कृपा' , गणपतीचा आशिर्वाद आहे इत्यादी म्हणु नाही शकत.. थोडक्यात मी त्या प्रांतात गोंधळलेली आहे.. जसं जसं अजुन जास्त वाचन होईल तशा काही गोष्टी उलगडतील असं समजून मी सद्ध्या शांत आहे..
पण तू एक अतिशय उत्तम मुद्दा, उत्तम प्रकारे मांडलास त्याबद्दल अभिनंदन..अतिशय संयत लेखन करणे, कधीही तोल जाऊ न देणे हे संस्कारीपणाचेच लक्षण आहे डॉनराव!

http://www.bhagyashree.co.cc/

अनामिक's picture

1 Jul 2009 - 2:08 am | अनामिक

भाग्यश्रीच्या मताशी अगदी सहमत. मीही जरा श्रद्धाळू आहे, पण त्यासाठी देवळातच गेलं पाहीजे किंवा वडीलधारी म्हणताहेत तसे कर्मकांडं केलेच पाहीजे असे कधीच वाटत नाही. असे असले तरी कुणाला तसे करण्यापासून परावृत्तही करत नाही. कारण, प्रत्येकाची आपली श्रद्धा असते.... कुणाची दगडातल्या देवात तर कुणाची कोण्या दुसर्‍या ठिकाणी. याठिकाणी मला मेघनाच्या आईचं मेघनाने मुर्तीवर पाय दिल्यावरचं उत्तर पटते.... कुणाच्या विश्वासाची, श्रद्धेची पायमल्ली करणे चुकच. तुमचा विश्वास नाही तर नसू देत, पण ज्यांचा आहे त्यांच्यात अडथळा न बनणेच योग्य!

माझ्या घरीही (भाग्यश्रीप्रमाणेच) आजीमुळे कडक सोवळे (अजूनही) पाळले जाते. पुजा/जेवणाच्या आधी न शिवण्याच्य नियमाने तर खूप चिड यायची! मी आईला म्हणायचोही की आजीच्या नकळत पारोश्या अंगाने मी किंवा ति कशाला शिवलो अर आजीला थोडीच कळणार आहे... तरी तू अगदी काटेकोरपणे का पाळतेस हे सगळं? ... त्यावर ती म्हणाली, सहज शक्य आहे असे करणे... पण असे करून काय साध्य होणार? आजीचा असलेला विश्वास तो फक्त तोडल्या जाणार... एक छोटासा नियम तो, ज्याने तुला किंवा कोणालाच काही त्रास होत नसेल तर सोवळ्याचे ते आहे म्हणून उगाच अवडंबर माजवण्यापेक्षा, निमुटपणे पाळलेले काय वाईट?

सांगायचा मुद्दा हाच की कुणाची श्रद्धा तुमच्या आड येत नाही ना? मग त्याला विरोध केलाच पाहिजे का? तुमचा कर्मकांडावर विश्वास नाही तर नसू देत... लोक त्यामुळे आपल्याला नास्तिक म्हणून मोकळे होत असतिल तर होऊ देत बापडे.... आपण, आपला देव (किंवा अजून काही), आणि आपल्या भावना स्पष्टं आहेत ना... मग झालं तर! मग कुणी देवाला स्वेटर घातलं काय किंवा सोन्याचा मुकूट अर्पण केला काय, मला त्याचा काही फरक पडत नाही.

डॉन... खूप सुंदर लिहिला आहेस लेख. कुठेही तोल गेलेला नाही!

-(श्रद्धाळू) अनामिक

नितिन थत्ते's picture

1 Jul 2009 - 12:11 am | नितिन थत्ते

एकदम आठवलं. हल्ली सुशिक्षित लोकांच्यात डोळस श्रद्धा असा एक गंमतीदार शब्द प्रचारात आला आहे. माझ्यामते एकदा श्रद्धा म्हटली की त्यात डोळस आणि अंध असं काही नसतं

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

नंदन's picture

1 Jul 2009 - 12:22 am | नंदन

डॉनरावांचा लेख आणि मेघना, श्रावण, भोचक यांचे प्रतिसाद आवडले. आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे मान्य करण्यास खर्‍या विज्ञानवाद्याला अडचण नसावी. पण या अज्ञाताच्या नावाखाली धर्माच्या नावावर खपवल्या जाणार्‍या अनेक गोष्टींमुळे प्रतिक्रियात्मक म्हणून एक जवळजवळ तितकीच कट्टर मनोवृत्ती तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर श्रावण यांनी स्पष्ट केलेली भूमिका ("एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.") संतुलित वाटते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

1 Jul 2009 - 12:29 am | विसोबा खेचर

आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे

अरे सांगतोस काय मेल्या नंदन सायबा?!

मला तर काही काही लोकान्ची बुद्धी घोड्यापुढे धावतांना दिसते तिच्यायला! :)

तात्या.

लिखाळ's picture

1 Jul 2009 - 12:34 am | लिखाळ

मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.
ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? ..... पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, ....

अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा :) असे नमस्कार घ्यायला फार सावधानता लागते. ती नसेल तर आपण समोरच्याचा नमस्कार देवाकडे वळवावा आणि लगेच समोरच्याच्या पाया पडून टाकावे. हे उत्तम ! (असे माझे मत)

बाकी देव, श्रद्धा याबाबत बरेच काही चांगले लिहिले आहे. काळजीपूर्वक आपली मते तपासत राहणे हे चांगलेच असते. मते बदलतसुद्धा असतात. बदलाचे एकदा जसे स्वागत होते तसे पुन्हा सुद्धा व्हावे. तेव्हा संकोच होऊ न द्यावा. सर्वांचे प्रतिसाद सुद्धा भारी आहेत.

सध्या माझ्याकडून भर घालण्यासारखे काही नाही. रामाच्या ईच्छेने तसे काही असेल तर लिहिनच !

-- लिखाळ.
जुने ठेवणे मीपणे आकळेना - समर्थ.

विसोबा खेचर's picture

1 Jul 2009 - 12:43 am | विसोबा खेचर

लिखाळगुरुजी,

अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा

अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?! :)

काय म्हणता?

बाकी आमचे तुकोबा बिच्चारे भाबडे हो! त्यांना ठायी ठायी विठोबा दिसत असे..! :)

असो..

आपला,
(विठ्ठलप्रेमी) तात्या.

लिखाळ's picture

1 Jul 2009 - 12:49 am | लिखाळ

अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?!

बरोबर. पण जेव्हा समोरचा विठोबाला नमस्कार करतो आहे असे आपण मानतो तेव्हा (स्वतःसाठी विठोबा अस्तित्वात नसला) तरी समोरच्याच्या असलेल्या विठोबाला आपण क्षणभर मान्यता देतोच ना. त्या नसलेल्या पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा :)
(हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही.)

-- लिखाळ
विठोबासी शरण जावे। निजनिष्ठा नाम घ्यावे - संत तुकाराम (चित्रपटातले)

विसोबा खेचर's picture

1 Jul 2009 - 12:57 am | विसोबा खेचर

पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा

असं म्हणता? बरं बरं! :)

हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही.

हम्म! तर्क, रॅशनल थिंकिंग वगैरे वगैरे! आपण तर या शब्दांनादेखील पार घाबरतो भैय्या! :)

तात्या.

--
माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळीशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत, ना पार..
विठ्ठला, तू वेडा कुंभार!

राघव's picture

1 Jul 2009 - 1:40 am | राघव

१-२ शंका उगाच मनात आल्यासारख्या वाटतात -

१. (भगवंत) आहे अशी श्रद्धा असणारा तो आस्तिक अन् (भगवंत) नाही श्रद्धा असणारा तो नास्तिक.
- पण, भगवंत आहे, त्याच्याच ईच्छेने सगळे घडते अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा आस्तिक म्हणता येईल काय? तसेच भगवंत नाही अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा नास्तिक म्हणता येईल काय? :)
- श्रद्धा दोन्ही बाजूंनी नाही काय? एका बाजूची अंध अन् दुसर्‍या बाजूची डोळस कशी होईल?

२. धर्म ही संकल्पना कशासाठी अस्तित्वात आली? ती नसती तर काय झाले असते? कर्मकांडं-रूढी-परंपरा कशासाठी अस्तित्वात आल्यात? कर्मकांडं-रूढी-परंपरा म्हणजेच धर्म का? किंवा हे सर्व न पाळणं म्हणजे धर्म का?
- मी स्वतः अजूनही वरील प्रश्नांच्या उत्तरांजवळ नाही पोचू शकलो ब्वॉ. तसे यम -नियमांबद्दल वाचले होते थोडेसे. पण ते वाचून वाटले की इतर धर्मांत देखील या पेक्षा काही वेगळे सांगीतलेले नसावे.

३. पौरुषेय-अपौरुषेय म्हणजे नक्की काय? (फारच बाळबोध प्रश्न असे वाटू नये म्हणजे झाले रे राघवा!!)
- मला वाटते यावर चर्चा करण्यासाठी आधी भगवंत आहे हे मान्य करावे लागेल. मनोभुमिका सारख्या पातळीवर आल्याशिवाय चर्चा करणे अयोग्य.

मला स्वत:ला असे वाटते की आपण कोणत्याही गोष्टीचा कार्यकारणभाव जाणून मग पटले तर तसे वागावे. मी देवळात जातो. कशासाठी? ते एकदा शोधले की मग त्यावर चर्चा करण्याची गरज राहील असे वाटत नाही. तसेच मी पूजा करतो. व्रतं-उपास-तीर्थयात्रा करतो. हे सर्व मी का करतो हे शोधणे योग्य. तसे केले म्हणजे इतरांशी तुलना करण्याचा संभव उरणार नाही. :)

(भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा असलेला) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

मृदुला's picture

1 Jul 2009 - 1:41 am | मृदुला

हा धागा सगळा वाचला. "माझिया जातिचे मज मिळो कोणी" प्रकारचा आनंद मिळाला. श्रावण यांच्याशी सहमत; कोणाच्या श्रद्धाविषयाच्या आड मी येत नाही आणि माझ्या मतांच्या आड कोणाच्या श्रद्धा येऊ देत नाही.
मी साधारण ११ वर्षांची असताना खूप विचार करून (!) देव असणे शक्य नाही असे ठरवले. आता त्यावर वीसेक वर्षे उलटून गेल्यावर कधी कधी असे वाटते की एखादी अशी आंधळी श्रद्धा असती तर बरे झाले असते का? कसे वाटले असते, असे कुतूहल वाटते. पण अश्या विषयात, एकदा एका दिशेने चालू पडल्यावर परतीची वाट नाही. कदाचित, सश्रद्धांचेही असेच होत असावे. जसे मला लोकांना देव आहे हे पटतेच कसे याचे मनोमन आश्चर्य वाटते, तसे त्यांना देव नाही वाटणारे लोक नीट विचार करत कसा नाहीत याचे आश्चर्य वाटत असावे.

न राहवून खालच्या ओळी. मूळ विषयाशी असंबंध.
वर एका प्रतिसादात (बहुधा भोचक यांच्या) उत्क्रांती शब्दाचा वापर त्यांनी प्रगती या अर्थाने केला आहे. पशुवत आचरणातून नागरीकरणाकडे असे काहीसे. उत्क्रांती म्हणजे प्रगती नाही. उत्क्रांती म्हणजे मोठा बदल. तो चांगला की वाईट, प्रगती की अधो, हे त्या शब्दात नाही.

यशोधरा's picture

1 Jul 2009 - 2:02 am | यशोधरा

लेख वाचला, त्यावरच्या प्रतिक्रिया, अभिप्रायही वाचले. चर्चेसंबंधात मलाही माझे काही विचार तपासून घ्यावेसे वाटले, म्हणून हा पोस्टप्रपंच.

मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. कदाचित माझ्या समजूतीची गल्लत असेल, मी नाकारीत नाही. लेख 'संस्कार' ह्या मूळ विषयापासून सुरु होत होत, आस्तिकता/ नास्तिकतेची वळणं घेत, धर्म ह्या विषयाला स्पर्ष करुन (इथे जगण्याचे तत्वज्ञान, पद्ध्त ह्या अर्थी हिंदू धर्म म्हणायचे आहे का धार्मिकता ह्या अर्थी? दोन्ही खूप वेगळ्या बाबी आहेत), रुढी आणि त्या अनुषंगाने येणारे आचार, विचार, पद्धती येथवर येऊन पोहोचतो. ह्या पैकी नक्की चर्चा कशावर? की सगळ्यांच बाबींवर? कारण प्रथमदर्शनी पाहता एकमेकांशी निगडीत वाटणार्‍या ह्या सर्व बाबी भिन्न आहेत, असं मला वाटत.

उदाहरणार्थ: संस्कार आणि त्यावरुन आस्तिक वा नास्तिक असण्याचा मुद्दा.

संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल?

उदा: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थित: l हे नुसते पाठ करुन संस्कार निश्चित होणार नाही, पण, ह्या मागचा अर्थ समजावून जर हे स्तोत्र म्हटले तर, संस्कार जरुर होतील. सर्व जगात मातृरुपाने देवी वास करते आहे. म्हटले तर साधे वाक्य आहे, म्हटले तर आईचा मान का राखावा ह्याची शिकवण आहे. कधीकधी बुद्धीप्रामाण्यवादाचेही झापड लागू शकते. देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्‍याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? आडवे तिडवे वाचन आणि चर्चा करणार्‍याला हे प्रश्न कधी पडत नाहीत का? किंवा, गीतेमध्ये सांगितले आहे,

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः l
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ll
एतैर्विमुक्त: कौंतेय तमौद्वारेस्त्रिभिर्नरः l
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ll

(गीता १६.२१ आणि २२ - चू भू माफ करा काही असेल तर)

थोडक्यात, काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची ३ दारे आहेत. हे विकार आत्म्याचा विनाश करतात, तेह्वा यांचा त्याग करावा. हे अर्जुना, ह्या तीन तमोद्वारांतून (तमोगुणांमधून) मनुष्य सुटला म्हणजे तो स्वतःला कल्याणकारी आचरण करतो व परमगतीला प्राप्त होतो.

ह्यातला अध्यात्माचा भाग - परमगती वगैरे, स्वर्ग, नरक- सोडून देऊ हवे तर, पण हा उपदेश, संस्काराचा भाग नाही का? कशातून किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे एका मर्यादेनंतर आपले आपणच ठरवायला नको का? असो.

माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक.

तुकोबाराय म्हणतात,

अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll
आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll
परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll
परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll

हेच ना संस्कार?

अवांतरः हुश्श!! हिंदू धर्म (तत्वज्ञान) आणि रुढींना धर्म मानून धर्म ह्या संकल्पनेला झोडपण्याविषयी नंतर... क्रमशः, क्रमशः :D :P

विसोबा खेचर's picture

1 Jul 2009 - 2:06 am | विसोबा खेचर

मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात.

हम्म!

देसी डोळे परि निर्मिसी
तयापुढे अंधार
विठ्ठला तू वेडा कुंभार..! :)

तात्या.

प्रमेय's picture

1 Jul 2009 - 4:35 am | प्रमेय

मला या विषयावर एक लेख लिहायचा होता, पण राहून जात होते.

१. संस्कार हे मनावर करायचे असतात कारण मन हे चंचल असते. ते काबूत ठेवणे ही समाजाची (टिकण्यासाठी आणि पुढील पिठीवर दॄढ करण्यासाठीची) गरज आहे. याद्वारे आपण आपले स्वातंत्र अंशतः गमावून समाजात आपली जागा मिळवतो. म्हणजेच आपण काही विशिष्ट प्रकारे न वागायचे मान्य करतो आणि इतर गोष्टींकडे लक्ष देतो.

२. समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था...

३. काही गोष्टी मात्र मनुष्य मूळ प्राणी स्वभावाने करतोच. याचाच अर्थ असा की, आपण अजून पूर्ण सामाजिक(माणसाळलेले) झालो नाही आहोत. जर एखादे कुत्रे जंगलात हरवले तर ते जंगली बनते व माणसाळलेले राहत नाही कारण जगण्यासाठी माणसाळलेले राहण्याची त्याची गरज संपलेली/नष्ट झालेली असते.

४. आपल्या समाजातल्या अशा कितीतरी गोष्टी ह्या जुन्या नियमानुसार आहेत असे मी मानतो. जेवढा समाज जास्त जुना/प्राचीन तेवढ्या त्यात जास्त चूकीच्या समजूती किंवा कालबाह्य समजूती.

५. आता एवढ्या प्रस्तावनेनंतर मूळ मुद्दा असा की,
जर आपण काही चुकीच्या समजूती झुकारल्या तर आपण नास्तिक ठरत नाही. तसेच केवळ दुसर्‍यासाठी त्या मान्य करण्याने अस्तिक ठरत नाही.

६. जेवढी ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे तेवढीच ती समाज आणि काळ सापेक्षपण आहे.

७. त्यामुळे धर्म हा व्यक्तिगत बनला पाहिजे आणि समाजाने त्याला हो म्हणले पाहिजे.

८. हिंदू धर्मात(की संस्कॄती?) कितीतरी चाली-रिती आहेत ज्या नसण्यामुळे आपण जास्त प्रगत बनू. फक्त धर्मसुधारणा करून न थांबता सुधारित धर्म् आचरणात आला पाहिजे.

९. का आपण १० लोक मिळून सांगू शकत नाही, की आम्ही असा असा हिंदू धर्मावर आधारित पण सुधारित समुदाय काढला आहे आणि सरकारने त्याला नवा धर्म म्हणून मान्यता द्यावी. यात नवे ग्रंथ, पुस्तक असेल, नवी न्याय समाज रचना असेल. ही मान्यता मिळाल्यावर तो धर्म/जात म्हणून पुढच्या पिढीला मिळेल आणि सामाजिक विषमता दूर होण्यास सुरुवात होइल. जसे जास्त अनुयायी तशी कमी विषमता.

बाकी परत...

नितिन थत्ते's picture

1 Jul 2009 - 8:43 am | नितिन थत्ते

>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था...

१०० % असहमत. असल्या रूढी कोणत्याही काळात/जगात अयोग्यच. त्याची काही कारणे असलीच तर ती एका गटाने दुसर्‍या गटावर वर्चस्व गाजवणे हीच होती. आणि हे कोणत्याही जगात/काळात स्वीकारार्ह असता कामा नयेत.
(निदान जी उदाहरणे दिली आहेत ती तरी तसल्या प्रकारची आहेत)

बाकी तुमचे म्हणणे बरेचसे मान्य.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

1 Jul 2009 - 9:09 am | विकास

>>>१०० % असहमत.

आपल्या असहमतीशी सहमत. विशेष करून जी उदाहरणे दिली आहेत त्यासंदर्भात नक्कीच असहमती आहे.

बाकी आधी लिहायची इच्छा होती पण वराती मागून घोडं नको असे वाटते. :-)

प्रमेय's picture

2 Jul 2009 - 12:00 am | प्रमेय

>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था...

मी आपला विरोध समजू शकतो. पण वरील वाक्यात मी कुठेही असे म्हटले नाहीये की त्या रूढी बरोबर होत्या.
त्या काळी तथाकथित उच्च वर्गाचे महत्व टिकण्यासाठी आणि इतरांचे दमन करण्यासाठी या चाली रिती होत्या असे आपण म्हणतो हेच बरोबर आहे.
पण मूळ प्रश्न असा की, जर हे कारण चूक होते/आहे, तरीपण त्या काळी समाजाने ते प्रकार वापरलेच ना? जिथे कुठे सुरूवात झाली असेल, तिथेच त्याला विरोध करून हाणून का पाडले गेले नाही? याचाच दुसरा अर्थ असा की, समाजाने ते स्वीकारले (यात सर्वजण आले. आपण ४थी, ५वीच्या पुस्तकात वाचत नाही का, अस्पॄशता, सती आणि बालविवाह या त्याकाळी समाजाला लागलेली वाळवी होती. म्हणजेच ती काही फक्त विशिष्ट सामाजिक वर्गात नसून सर्व थरांत होती.) यात त्या समाजाची कितीही दांभिकता असली तरी हाच समाज आपला पूर्वज आहे हे मान्य करावे लागते.

आता चिकित्साच करायची झाली तर असे म्हणता येइल की, सती पध्दत ही त्याकाळी मागे उरणार्‍या विधवा स्त्रीयांची विल्हेवाट लावण्याची सोय होती. आजच्या काळात हे नक्कीच क्रूर आहे. पण लक्षात घ्या की, माझ्या प्रतिक्रियेत मुद्दा २ व ३ हे याचा विचार करतात. एकेकाळी मनुष्य जमात प्राण्यांकडून शिकत असे. जसे काही सस्तन प्राणी वर्गांत वॄध्द, आजारी व परावलंबी प्राणी हे प्रवासात मागे पडतात आणि इतर श्वापदांकडून मारले जातात तशी काहीशी प्रथा मनुष्याने उचलली. उदाहरण द्यायचे तर,आफ्रिकेतील जमातीत नात्यात लग्न करणे उचित समजतात.
त्यामुळे असे म्हणता येइल की, ज्या घडामोडी आपण आत्ता पाहतो आहोत त्या पुढे चांगल्याकडे घेऊन जावोत.

धमाल मुलगा's picture

1 Jul 2009 - 12:03 pm | धमाल मुलगा

मोठा गहन आणि उत्तम विषय आहे.
असा विषय चर्चेला घेतल्याबद्दल श्री.डानराव ह्यांचे अभिनंदन.

अश्या गहन विचार करणार्‍या थोर विचारवंतांच्या मांदियाळीतले बरेचसे आमचे स्नेही आहे ह्याचा आम्हाला मोठा अभिमानच वाटतो. छान! असेच मोठे व्हा...उत्तम नाव कमवा....आम्हाला तुमचा अभिमान आहे. :)

बाकी,आपणा सर्वांना त्या सर्वशक्तीमान अश्या जगनियंत्या परमेश्वराने साक्षात त्यालाच "काय रे, बोल तू आहेस का? दे ऊतर" असे विचार करण्याची बुध्दी देऊ केली, किती तो थोरपणा त्या देवाचा. :)

असो, साक्षात ज्ञानोबा माऊलींनी म्हणलंच आहे, "जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात"
ईश्वरवाद्यांना ईश्वर मिळो,
निरिश्वरवाद्यांना तो नसण्याच्या आपल्या विचारांचं समाधान मिळो,
सगुण उपासकांना त्यांच्या इष्ट देवतेचा कृपाप्रसाद लाभो,
निर्गुण उपासकांना "कोऽऽहम्"चे उत्तर मिळो
......प्राणिजात!!!

बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली :)

बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्‍यांना एक जाहीर आव्हान करतो,
असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?

ह्यावर कोणी इतक्यांदा घासून गुळगुळीतच नव्हे तर बुळबुळीत झालेलं लंगडं उत्तर देऊ नका..."मी माझ्या धर्माबद्दलच बोलणार" वगैरे...पुष्कळ झालंय आत्तापर्यंत हिंदूधर्मावर तोंडसुख घेऊन. आता येऊद्या इतर धर्माबाबत!!!! आहेत..मुस्लीम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, ज्यू आहे पुष्कळ आहेत.
थोर विचारवंतांकडून ह्या सर्व धर्मांतल्या अनिष्ट प्रथांबद्दलही कळु द्या आम्हा मुर्ख गरीब अज्ञानी बहुजनांस !

बोला, पुंडलीक वरदा हऽऽरी विठ्ठल...
ज्ञानेश्वर माऽऊली...ज्ञानराज माऽऊली.....तुकाराम :!!!!!!!!!!!!१

-(भडक्क भगवा) ध.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

घाटावरचे भट's picture

1 Jul 2009 - 12:43 pm | घाटावरचे भट

बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली

मौज नाही वाटली, तर इतके दृढ श्रद्धाळू लोक आहेत हे पाहून छान वाटलं, आणि अशी दृढता माझ्या श्रद्धेमधे केव्हा येईल असा प्रश्नही मनात उत्पन्न झाला. शेवटी श्रद्धा कशावरही असू दे, ईश्वराच्या असण्यावर नाहीतर ईश्वराच्या नसण्यावर, देवावर नाहीतर फक्त स्वतःवर, श्रद्धा असणं महत्वाचं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवलं - 'माणसांमाणसांत जर काही फरक असेल तर तो या श्रद्धेचा. श्रद्धेचं अस्तित्वच माणसाचं लहानमोठेपण ठरवते. तेव्हा श्रद्धा बाळगा.' (हे मूळ विंग्रजी वाक्यांचं तोकडं भाषांतर आहे, तेव्हा चूभूदेघे).

- भटोबा

धमाल मुलगा's picture

1 Jul 2009 - 12:49 pm | धमाल मुलगा

छान बोल्लात भटोबा...

एकदम काठावरचे भट झालात की. ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

श्रावण मोडक's picture

1 Jul 2009 - 6:16 pm | श्रावण मोडक

बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्‍यांना एक जाहीर आव्हान करतो,
असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?

आव्हान देताहात हे खरं, पण त्याची गरजच नाही. डॉन यांचा लेख, मेघना, मी किंवा भोचक यांची प्रतिक्रिया आणि नंतर त्यावर त्यांना पुष्टी देणारे प्रतिसाद यावरून ही चर्चा झाली आहे. एक गोष्ट पाहताहात का, या सगळ्यात प्रत्येकाने स्वतःचे विश्लेषण केले आहे. ते व्यक्तीगत विश्लेषण आहे. सश्रद्धांच्या संदर्भात केलेले आत्मविश्लेषण आहे. स्वतःला तपासण्याची ती कृती आहे. येथे हे सारे करताना या मंडळींसाठी सश्रद्धांमध्ये केवळ हिंदूच आहेत असे तुम्ही गृहीत धरता आहात, कारण त्यांनी लिहिताना त्यासंदर्भातील दाखले देत लिहिले आहे. पण तुम्ही हे विसरू नका, की त्यात केलेले भाष्य हे न पटणाऱ्या, तर्काच्या कसोटीला न उतरणाऱ्या गोष्टींवर (ही धारणा त्या-त्या लेखकाची आहे) आहे. आणि ही मंडळी त्या अर्थाने धर्म मानतच नसल्याने, पण त्यांची टीका धर्म (विशिष्ट धर्म नव्हे) ही संदर्भचौकट घेऊन येणाऱ्या गोष्टींवरच असल्याने, ती इतर धर्मांतील अशा गोष्टींना लागू होतेच. आम्ही अधार्मिक ठरतो ना ते सगळ्या धर्मांच्या लेखी. इस्लाम, ख्रिश्चन किंवा अन्य कोणताही. अगदी बौद्धांच्या लेखीही ठरूच.
आम्ही आमच्यावरच टीका केली ती तुम्ही अशी लावून घेऊ नका. आव्हानाच्या भाषेपेक्षा सरळसोट प्रश्न जरूर करा. ही तात्कालीक प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलीतच कशी हे समजेनासे झाले आहे. :)
आता माझ्यापुरते बोलायचे तर...
ख्रिश्चन, इस्लाम, (तुम्ही म्हणता म्हणून) हिंदू (मी म्हणेन वैदिक धर्म), बौद्ध, जैन (इत्यादी, कुठला राहिला असल्यास त्यावरून पकडाल तुम्ही) या सगळ्या धर्मांमध्ये तर्कावर न उतरणाऱ्या, माणसाने आज जिथंपर्यंतची प्रगती साध्य केली आहे त्या प्रगतीतून आलेल्या अनुभवांती ज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या गोष्टी आहेत. त्या त्याज्य आहेत. हे सगळे धर्म त्या - त्या रुढी-परंपरांपुरते भंपक आहेत.
विज्ञानाच्या अनुषंगाने मानवी बुद्धीच्या सध्याच्या क्षमतेतदेखील या विश्वाच्या काही रहस्यांची उत्तरे मिळत नाहीतच. त्यामुळे ती विज्ञानाची मर्यादा आहेच. विज्ञान हेही त्या अर्थाने धर्मासारखेच मर्यादित आहे. दोघांच्या मर्यादांचा आवाका वेगळा. पहिल्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने पहिल्याला पवित्रेबाज आव्हान देण्यात अर्थ नाही. कारण अशा वेळी त्यांच्या-त्यांच्या बौद्धीक क्षमतांच्या पलीकडे असणारे प्रश्न सामान्य माणसाकडून आले की त्यांची पंचाईत होते. हे ध्यानी घ्या की असे प्रश्न तज्ज्ञांपेक्षा सामान्य माणसालाच अधिक पडतात. त्याच्याकडचा तो एरवी रेअर असलेला कॉमन सेन्स अशा वेळी पूर्ण जागा असतो. अशा प्रश्नांपुढे आपला विचार तर्काच्या कसोटीवर उतरवण्यात हे दोन्ही वादी कमीच पडतात. मग त्यांचे-त्यांचे क्षेत्र पार झूटच आहे असा भ्रम पसरण्यास वेळ लागत नाही.
आणि खरं सांगायचं तर या ज्या मर्यादा आहेत ना, धर्म किंवा विज्ञानाच्या नव्हेतच. त्या आहेत माणसाच्या मर्यादा. कारण धर्म असो वा विज्ञान, हे दोन्ही माणसाच्याच बुद्धीतून, कल्पनेतून जन्माला आले आहेत. त्याच्या बुद्धीच्या मर्यादांची चौकट त्या संकल्पनाला लागलेली आहेच. माणूसच ती आतून ढुशा मारून विस्तारत असतो. ही चर्चा किंवा अशा इतर चर्चा म्हणजेच या ढुशा आहेत. विचारविश्वाचीही उत्क्रांती होत असते. त्या उत्क्रांतीमध्ये या ढुशा देण्याच्या प्रक्रिया होतातच.
विठ्ठल, माणसाचा माणसाला नमस्कार वगैरे उल्लेख वर आले आहेत. एक गोष्ट मांडतो - सच्चा वारकरी जो असतो ना, तो एकादशीच्या दिवशी गाभाऱ्यातील विठ्ठलाचे दर्शन घेत नाही, तो त्या दिवशी खरं तर मंदिरात जातच नाही. मंदिराबाहेर राहून तो कळसाकडे पाहून नमस्कार करतो. त्या दिवशी विठ्ठलच वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी कळसावर आलेला असतो, असे मानले जाते. पुरेशी बोलकी आहे ही गोष्ट श्रद्धा आणि अश्रद्धा, देव असणे आणि देव नसणे आणि धर्म व अधर्म यासंदर्भात भाष्य करण्यासाठी. त्या वारकऱ्याची ही श्रद्धा आहे, विठ्ठल माझे दर्शन घेतोय, मी त्याचे घेतोय. कारण हा विठ्ठल लोकांच्या मनात आहे. तो त्या मूर्तीत नाही. मूर्ती ही केवळ प्रतिक आहे. त्या प्रतिकापाशी वारकरी लीन होतो हे ठीक. पण त्याचवेळी "कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी," हेदेखील आहेच. चोखा त्या पायरीशी गेला हे विसरता येत नाही. हे सारं व्यामिश्र आहे. त्याची आपल्या नेहमीच्या पद्धतीनं कृष्ण-धवल उत्तरं निघत नसतात. आजच्या बुद्धीची ती मर्यादा आहे.
आईनस्टाईनच ना, म्हणाला होता की, माणसाची बुद्धी ही केव्हाही त्याच्यापुढे असणाऱ्या समस्या सोडवण्याच्या गरजेपेक्षा थोडी मागेच असते. किंवा माणसापुढच्या समस्या या नेहमी त्या घडीच्या त्याच्या बुद्धीक्षमतेच्या थोड्या पुढेच असतात. हे विसरून कसं चालेल?
तारतम्य (म्हणजेच विवेक म्हणूया) ही माणसाची मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेच्या जोरावरच तो इतर जीवांपेक्षा वेगळा ठरत गेला आहे. तोच हरपला की काय होते त्याचे दाखले या चर्चेत काही प्रतिसादांतून दिसतात.

नितिन थत्ते's picture

1 Jul 2009 - 12:56 pm | नितिन थत्ते

चला, आता चर्चा बंद करायला हवी.
कारण इतर धर्मांतील अनिष्ट प्रथांबद्दल आपण काही बोलत नाही. (आपल्याला इतर धर्मांबद्दल पुरेशी माहिती आहेच कुठे? आपण आपले आपल्या आसपासच्या समाजात जे पाहतो त्यावरच बोलतो. माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते).
या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही. पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे.

या धाग्यावरही इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल कोणास माहिती असेल आणि लिहायचे असेल तर आडकाठी नाहीच आहे.

इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात. अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे. कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता. आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

धमाल मुलगा's picture

1 Jul 2009 - 2:41 pm | धमाल मुलगा

माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते

नक्की? खात्रीलायक?? अगदी कन्फर्म???
शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ :)

>>या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही.
नाकारलेलेही कुठे दिसत नाही बॉ. आणि हो, हिंदू धर्मच ह्या अनिष्ट रुढी-परंपरांना हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्‍यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो.

>>पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे.
चर्चा थांबवण्याबद्दल कुठे काय म्हणालंय कोण? आम्ही ह्याच धाग्यात इतर धर्मांवर बोला असं म्हणालो आहोत काय?

आम्ही फक्त असं म्हणालो की आजवर बर्‍याचदा हिंदूधर्मावर टिकात्मक लेखन झालंय, इतर धर्मांबाबतही थोर विचारवंताचे ज्ञानकण आम्हा मूढांच्या पदरात घालावे :)

अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे.

अशी आणखी किती उदाहरणं आहेत? आणि उठसुठ हिंदूधर्माला बोल लावणारे किती आणि कितीदा 'फुल थ्रॉटल' असतात? पहा, विचार करा, आनंदी रहा :)

कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता.

हो ना! मग इथे काय फक्त आणि फक्त हिंदूच आहेत का? की अनुभव विश्व फक्त हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवलंय? तसं असेल तर निधर्मी/सेक्युलरगिरी कुठे गेली? :)

आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल.

बरोबर!
पण आम्ही कधी म्हणालो की केरळातल्या ख्रिश्चनांबद्दल किंवा उत्तरप्रदेशातल्या मुस्लीमांबद्दल बोला? जिथल्या हिंदूंना नजरेसमोर ठेऊन त्या रुढींवर टिका केली तशीत तिथल्याच अहिंदू रुढींवर बोला की. :)

>>इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात.
सलमान रश्दी, तस्लीमा नसरीन ही नावं कुठं ऐकल्यासारखी वाटताहेत, नै का बॉ? :) काय झालंय बरं त्यांचं?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

नितिन थत्ते's picture

1 Jul 2009 - 3:54 pm | नितिन थत्ते

>>शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ

तुम्हाला या सार्‍या गोष्टींची माहिती जर आहे तर तुम्ही लिहा ना त्यातल्या अनिष्ट गोष्टींबद्दल. आम्हाला नाही तेवढी माहिती मुसलमानांबद्दल... म्हणून आम्ही नाही लिहू शकत. तुम्ही लिहा. मी तर कुठल्या धर्माबद्दल लिहिलेच नव्हते. देव या संकल्पनेबद्दल लिहिले होते.

मी समजा हिंदूंच्या एका अनिष्ट रूढीविषयी लिहिले असेल तर लगेच मी दुसर्‍या धर्मातल्या एका रूढीबाबत लिहिलेच पाहिजे असा हट्ट का? मी एखाद्या रूढीविषयी लिहिले तर ते हिंदू धर्मावरील टीका नसून त्या रूढीवरील टीका असते. ती रूढी कोणत्याही धर्मात असेल तरी मी तिच्यावर टीकाच करेन. बालविवाह कोणत्याही धर्मात आक्षेपार्हच आहे.

>>हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्‍यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो.

हे तर ख्रिश्चन धर्मातही आहे. पाश्चात्य जगाची प्रगती (इथे प्रगती कशाला म्हणायचे हा फाटा फोडू नये) ही धर्माला आव्हान देण्याच्या प्रक्रियेतूनच सुरू झाली आहे. आणि आता धर्मावर टीका करणार्‍याला विषाचा प्याला घ्यायची शिक्षा केली जात नाही. मुस्लिम धर्मात हे कदाचित आज कमी प्रमाणात असेल पण पुढे ते होणारच नाही असे नव्हे.

अजून एक गोष्ट. समजा मी एखाद्याच्या रस्त्यावरील प्रत्येक देवळाकडे/चर्चकडे पाहून नमस्कार करण्याच्या सवयीवर टीका केली तर ती त्या विशिष्ट कृतीवर टीका नसून त्या व्यक्तीच्या मानसिक परावलंबित्वावरची टीका असेल.

धर्मावरील आमचा आक्षेप हा अनेक अन्यायकारक गोष्टींना तो समर्थन पुरवतो हे आहे. त्यामध्ये सर्वच धर्म येतात.

(अवांतरः आपण येथे वकिली युक्तिवाद करायला जमलो नाही. त्यामुळे विशिष्ट शब्द पकडून बोल्ड करून आव्हाने द्यायची गरज नाही.)

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

यशोधरा's picture

1 Jul 2009 - 2:46 pm | यशोधरा

>>भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक

श्रद्धाळू लोक विचारी नसतात का?

यशोधरा's picture

1 Jul 2009 - 1:16 pm | यशोधरा

धर्म आणि रुढी एकमेकांपासून अतिशय भिन्न अशा संकल्पना आहेत.
धर्मामध्ये एक विशिष्ट तत्वज्ञान सांगितलेले असते, जगण्याची, वागण्याची विशिष्ट अशी प्रणाली सांगितलेली असते. आपल्या मूळ रुपात कोणताही धर्म खूप व्यापक आणि सहिष्णू असतो.

मुळात हिंदू धर्म हा "धार्मिकता" ह्या अर्थी धर्म नव्हे. ती एक जीवन प्रणाली आहे. ह्यात प्रत्येक मताला स्थान आहे. आस्तिकता, नास्तिकता, सगुण, निर्गुण, निरीश्वरवाद... यादी वाढतच जाते, म्हणूनच हिंदू वेगवेगळे पंथ मानू शकतात, त्यांची दैवतंही वेगळी असू शकतात. एकच देवाला वा प्रेषिताला मानायला हवं अशी सक्ती इथे नाही. जन्माने वा कर्माने हिंदू असून, हिंदू धर्माविषयी माहिती न करुन घेता, काही अभ्यास न करता, धर्माला नावं ठेवायची मुभाही इथेच आहे, ह्याच धर्मात. आताआतापर्यंत असं कोणी केलं तर केवळ धर्मांधतेने कोणी अश्या टीकाकांराना त्रास पोहोचवल्याचं ऐकीवात नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची पूर्ण मुभा हे हिंदू धर्माचं अतिशय अभिमानस्पद वैशिष्ट्य आहे.

राहता राहिल्या रुढी. ह्या व्यक्ती निर्माण करतात आणि सामाजिक जीवनात रुढी जन्म घेतात आणि नष्टही होतात. रुढी निर्माण होण्याची कारणं बर्‍याचदा समाजावर मूठभर लोकांचा वरचष्मा रहावा म्हणून निर्माण केल्या जातात. त्या नाहीश्या व्हायलाही हव्यात, पण रुढी म्हणजे धर्म, असे गृहीतक धरुन, म्हणून धर्माला का झोडपावे? हे म्हणजे, हाताला घाण लागली तर, घाण साफ करण्याऐवजी हात कापून टाकूया म्हणण्याप्रमाणेच झाले ना?

पक्या's picture

1 Jul 2009 - 1:47 pm | पक्या

हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच.
ही जी काय शक्ती आहे माझ्या मते तीच देव. तिची वेगवेगळी रुपे माणसाने निर्माण केली की खरोखरीच अशी रुपे आहेत ते मला माहित नाहि पण त्या शक्तीवर माझा विश्वास आहे.
ह्या शक्तीला / देवाला कर्मकांडाच्या बंधनात अडकवले माणसाने.
कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2009 - 2:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

यातले "कोट्स" वगळता बाकी सर्व माझी, एका व्यक्तीची व्यक्तीगत मतं आहे. त्यामुळे प्रतिवादात झोडपायचं असेल तरीही कृपया समस्त निरीश्वरवादी गटाला झोडपू नये.

हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच....
... कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.

ब्रह्मांड जर कोणी निर्माण केले तर त्याला/तिला/तेला कोणी निर्माण केलं? एकदा ब्रह्मांड निर्माण झालं हे मान्य केलंत की आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले याचं उत्तर देणारी मोठी लेखमाला मी लिहू शकते. (सॉरी, सध्या अजिबात वेळ नाही, जमेल तसं लिहेन, मागणी असेल तरच!)
ब्रह्मांड कसं निर्माण झालं याचंही उत्तर विश्वरचनेचा अभ्यास करण्यार्‍यांकडे आहे (मला ते समजलं आहे असा माझा दावा नाही). कसं निर्माण झालं याचं उत्तर विज्ञान देतं, पण का निर्माण झालं याचं उत्तर विज्ञानात मिळेलच असं नाही. तिथे मात्र तर्क इ. इ. गोष्टींची गरज पडेल.

सृष्टीनिर्माणकर्त्याचं अस्तित्त्व हा मलातरी चक्राकार खेळ वाटतो. कशावरून हे ब्रह्मांड, ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली? आणि मग या निर्मिकाला कोणी निर्माण केलं? आणि निर्मिकाच्या निर्मात्याला कोणी निर्माण केलं .... ही साखळी संपणारच नाही.

काही थोडी वेगळी उदाहरणं देते:
१. पूर्वी असं मानत एका कासवाच्या पाठीवर (किंवा ग्रीसमधे असाल तर हर्क्युलिसच्या पाठीवर) पृथ्वी आहे असं मानत. मग ते कासव (/हर्क्युलिस) कुठल्या पृष्ठभागावर विसावलं आहे? या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे, की पृथ्वी अंतराळात आहे, आणि सूर्याशी गुरूत्वाकर्षणाने बांधली आहे.
२. जेव्हा सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात हे अमान्य होतं, तेव्हा अतिशय किचकट अशा ग्रहांच्या कक्षा आखून (एपिसायकल्स) , ग्रह पृथ्वीभोवती फिरतात असं मानायचे. ६ ग्रहांसाठी २८ (का जास्त) एपिसायकल्स होती. एक चुकीचं गृहीतक हटवलं, आणि ६ ग्रहांसाठी १ नियम लागू करता आला. पुढे तो नियम सगळ्याच गुरूत्वीय बंधक वस्तूंसाठी लागू होतो असं लक्षात आलं.

निष्कर्षः आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी.

माझी देवाविषयीची धारणा: मी निरोगी असताना, दुसरा आजारी पडू नये; किंवा दुसरा ठणठणीत असताना मी आजारी पडू नये असा काही नियम नाही. आजारी माणसाला औषधं, जास्तीची काळजी इ.ची गरज असते. तसंच काही लोकांना नित्यनियमाने किंवा अडीअडचणीत एका मानसिक आधाराची गरज असते, ती गरज "देव" किंवा "ती विवक्षित शक्ती आहे ही धारणा" भागवतात. देवाच्या अशा प्रकारच्या अस्तित्त्वामुळे काही लोकं, खरंतर बरेच लोकं, सुखात रहातात. (अडचणीच्या काळात माझ्यासाठी हीच गरज मित्रमंडळ, नातेवाईक, कलिग्ज भागवतात.) माझ्यालेखी देव आहे, पण तो या आस्तिक लोकांच्या डोक्यात आहे, अगदी I think, so I am, याच चालीवर!
जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही.
किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. अनेक आस्तिक मित्र-मैत्रिणीही जिवलग आहेत. पण माझ्यावर देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची सक्ती मला चालत नाही.

मेघना भुस्कुटे's picture

1 Jul 2009 - 2:48 pm | मेघना भुस्कुटे

अर्थातच संपूर्ण सहमत!

सनविवि's picture

1 Jul 2009 - 5:29 pm | सनविवि

मी पण अदितीशी सहमत. १ वर्षापूर्वीपर्यंत मीही आस्तिक होतो. म्हणजे कधी नीट विचारच केला नव्हता मी आस्तिक का आहे ह्याचा. आणि जेंव्हा मी तो केला तेंव्हा लक्षात आलं की एका आस्तिक कुटंबात वाढणे हेच त्याच्यामागचे एकमेव कारण आहे. देव ही संकल्पना मला मनापासून नाहीच पटत.

आस्तिक लोकांबद्दल आपली काहीच तक्रार नाही. फक्त सारखं आम्हाला re-convert करण्याची धडपड सोडून द्या!

शाहरुख's picture

4 Jul 2009 - 9:55 am | शाहरुख

>>जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही.
किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो.

मला काय वाटते हे नीट लिहायची अक्कल असती तर मी असेच काहीसे लिहिले असते !!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jul 2009 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार

बाप रे थोर थोर लोकांचे मोठे वाद चालले आहेत, म्या पामराने लिहावे की नको ?

लिहितोच...

देव आहे का नाही ? आस्तीक नास्तीक हे मला खरच कळत नाही. मी स्वतः कधी रोजची पुजा वगैरे करत नाही. गणपती मात्र श्रद्धेनी अगदी गुरुजींच्या आवाजातली कॅसेट वगैरे लावुन बसवतो.

माझ्या आजीला सांधेदुखीचा त्रास व्हायचा. योग्य ती ट्रीटमेंट, व्यायाम वगैरे करुनही कधी कधी हा त्रास उफाळुन यायचा, तेंव्हा आपण रामरक्षा म्हणली की हा त्रास कमी होतो अशी तिची श्रद्धा होती.

बर्‍याचदा ती हा प्रयोग करायची मग काही वेळाने तीच्या चेहर्‍यावर एक वेदनामुक्त समाधानी सुखी भाव यायचे आणी ती मनोभावे रामाला नमस्कार करायची.

मी सुद्धा लगेच नमस्काराला हात जोडायचो. तीच्यापुरते का होईना मी देवाचे अस्तीत्व मान्य केलेले असायचे.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

यशोधरा's picture

1 Jul 2009 - 2:58 pm | यशोधरा

>>जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही.

अदिती, तुझा बहुतांश प्रतिसाद पटला. देव मानणं वा न मानणं हे व्यक्तीसापेक्ष. मान्य. असं धरून चालू, की देव आहे. मग काय त्याने सांगितलय की माझ्या नावावर भांडा? तो भांडणार्‍यांचा दोष की देवाचा? भांडणं देवाच्या प्रेमाने होत असतील, असंही नसत! अशी भांडणं बहुतांशी धूर्त लोक त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी लावतात, आणि विचार न करता, झापडबाज जनता त्याला बळी पडते. ह्यात देवाचा काय दोष? जनतेच्या अज्ञानाचा, माहिती नसल्याचा फायदा घेऊन आपापसात तेढ पैदा करुन दिली जाते. सगळे मानवी खेळच ना? उदा: रुढींना धर्म समजणे, मानणे.

तसंच हे भांडणं होतात म्हणून देव आवडत नाही, असं म्हणणं झालं की.

आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. :) जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2009 - 3:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!

माझ्या आधीच्या प्रतिसादात व्याकरण आणि/किंवा भाषेची चूक आहे.

माझ्यासाठी देव ही काही (बर्‍याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. एक नुसती संकल्पना असू शकत नाही, तिच्यासाठी एका मेंदूची गरज असते आणि नुसता मेंदूही असू शकत नाही, त्यासाठी एका (मानवी) शरीराची गरज असते. (हाच तर्क "ती शक्ती म्हणजे देव" याही बाबतीत लावता येईल.) मुद्दा हा, की जेव्हा अशी सक्ती होते तेव्हा ती संकल्पना, पक्षी: तो माणूस, मला आवडत नाही.

देवाला माझ्या लेखी स्वतंत्र अस्तित्व नाही, त्यासाठी एका मेंदूची आणि (मानवी) शरीराची आवश्यकता आहे (किंवा एखादा शब्दकोषतरी)! आणि यशो, तुझा तर्क मान्य, जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचा रागतरी कसा येणार?

थोडं अवांतर: माझं निरीश्वरवादी असणं हे (माझ्यामते) "सिमेट्रीक" आहे. उदा: मला एक झोळी आवडली म्हणून मी ती घेतली, अगदी रोज वापरते. त्या झोळीवर "हरे कृष्ण हरे राम" असं लिहिलेलं असूनसुद्धा मला त्याचा फरक पडत नाही. मला झोळीशी मतलब आहे, त्यावरच्या लिखाणाशी नाही. ते लिखाण नसतं तरी मला फरक पडत नव्हता, तर ते लिखाण आहे म्हणूनही मला फरक पडू नये.

यशोधरा's picture

1 Jul 2009 - 3:21 pm | यशोधरा

>>जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. >> :)

संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का? :) कारण तीच संकल्पना अजून काही जणांना मान्य असेल, पण ती इतरांनीही मान्य करावी असा त्यांचा आग्रह नसेल. मग दोषी कोण? संकल्पना की ती राबवणारे?

असो. मुळातच चर्चा नक्की कशावर हा माझा सुरुवातीचा प्रश्न तसाच आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2009 - 3:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का?

एक गृहीतक चुकतं तेव्हा आख्खा डोलारा कोसळतो, जसा एपिसायकल्सचा डोलारा कोसळला! :-)

(किंवा, गणितात जेव्हा एखादी अगदी साधी वाटणारी गोष्ट सिद्ध करतात, उदा. शून्य एकापेक्षा लहान आहे, तेव्हा सुरूवात करताना एक शून्यापेक्षा लहान आहे, किंवा दोन्ही सारखेच आहेत असं मानतात. आणि मग डोलारा कोसळतो ते दाखवतात. असो. माझं वाचन फार काही नाही, त्यामुळे माझ्या मर्यादित माहितीमधून हे एक उदाहरण दिलं.)

असो... देव आणि धर्म या दोन गोष्टींचा संबंध नाही असं माझं आणखी एक मत. तेव्हा डॉनराव, चर्चा नक्की कशावर करायची आहे, देवावर का धर्मावर??

लिखाळ's picture

1 Jul 2009 - 3:53 pm | लिखाळ

नक्की चर्चा कशावर !
डॉनरावांनी 'जनातले मनातले' मध्ये स्वतःच्या मनातले विचार मांडले आहेत. लेख या स्वरूपात ते विचार असतानासुद्धा चर्चा कशावर? हा प्रश्न अप्रस्तुत वाटतो. विषय निघाला म्हणून सदस्य एकमेकांत चर्चा करत असावेत.

पाहा समोर दिसत असून उमज पडत नाही. देवाच्या बाबतीत असे होत नसेल कशावरून. तर्काच्या घोड्यावर स्वार झाले की रस्त्यातल्या अनेक गोष्टी धुरळ्यात अंधूक होतात असे वाटते. (हे आपले उगीच बरे का :) !)

अदिती,
विवेकानंदांची ज्ञानयोगावरील वाख्याने आहेत. त्यामध्ये ईश्वरविषयी कल्पनांचा प्रवास, आणि बरेच काही चांगल्या पद्धतीने मांडले आहे. वाचले नसल्यास जरूर वाचावे.

--लिखाळ.
जुने ठेवणे मीपणे आकळेना -समर्थ.

सूहास's picture

1 Jul 2009 - 3:24 pm | सूहास (not verified)

खर तर ईतर मान्यव॑राच्या मध्ये ईथे कडमडायच नव्हत ..पण जरा काही निदर्शनास आणुन देत आहोत..

बाबा॑नो आणी बाया॑नो,
काही कारण नसताना, तावातावाने,शब्द-पाल्हाळ लावुन, वाद-विवाद स्पर्धेच "सत्यनारायण" घालुन.
आपण एक-दुसर्‍यास मिपाच्या माध्यमाने " आस्तिक कि॑वा नास्तिक व्हायला सा॑गत आहात"

आमच्या साठी दोन्ही सारखेच

नास्तिक म्हणतो देव नाही ..सोडुन देतो..
आस्तिक म्हणतो देव आहे .मान्य करतो.सोडुन देतो...

देव आहे की नाही हे कोणी शोधत नाही...का ? का ? सा॑गा ना...लई जिकीरीच काम ना ??
कुठ आता तपश्चर्येला बसणार...

जरा दमान घ्या...

सुहास