संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....
"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म, संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" - इति : एक आंतरजालीय मित्र "अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई "चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र "समोर दिसणार्या आणि जाणवणार्या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" - इति : बाबा " पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र "पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका " आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का ? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी " भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र. " तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र?? ???? म्हणजे काय ? म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ? मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ? तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे. लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या. पुढे मग शिक्षणाचे, नोकरीचे व्याप मागे लागले, घर ही सुटले. ह्या काळात आडवेतिडवे वाचन आणि चर्चाही बर्याच झाल्या. लहानपणी असलेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा आंतरीक ओढीमुळे म्हणा पण "धर्म नक्की काय सांगतो" ह्यावर बरेच काही ढुंढाळले व पचवुन घेतले. "अहं ब्रम्हास्मी, तत्वमसी. मी सर्व चराचरात आहे" वगैरे वाक्ये भुरळ पाडु लागली. हा काळ बराच मोठ्ठा होता, यादरम्यान वेळ न मिळाल्याने म्हणा अथवा तसे पुर्वीसारखे वातावरण न जमल्याने पुर्वीसारखी "पुजेला बसण्याची" गोडी राहिली नाही. शिवाय देवाच्या जवळ जायला पुजाच करायला हवी व त्यासाठी संस्कॄत श्लोकच म्हणायला हवे हा जो गोड गैरसमज होता तो आता पुर्ण संपला होता. मात्र देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ होतीस, इनफॅक्ट जास्तच तीव्र झाली होती. मग जेव्हा केव्हा घरी जायचो तेव्हा हे तात्विक वाद नक्की असायचे, घरी फक्त लोळुन आराम करु वाटत असायचा व घरच्यांचा आग्रह वेगळाच. मात्र कधी कधी माझ्या "पुजा न करण्याचे" लॉजीक जेव्हा इथे " मी नास्तिक झालो" असे लावले गेले तेव्हा हमखास तात्विक चर्चा घडायच्या. शेवटी "तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही" ह्या ब्रम्हवाक्यात झाली की मी निमुटपणे उठुन पुजेला बसायचो, आजही बसतो ... म्हणजे "मी एका जागी बसुन केलेया मंत्रोच्चाराच्या घोषात केलेल्या पुजेवर माझी "अस्तिक असणे वा नास्तिक असणे" अवलंबुन आहे" हा विचार माझ्या मनाला त्रास देऊन जातो.... आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो. मग हळुहळु मोठ्ठा झालो, शाळा सोडुन बाहेरच्या जगात आलो. "गीतेच्या तत्वज्ञानाची" हळुहळु ओळख पटु लागली, गीता किती महान गोष्टी शिकवते हे ही लक्षात येऊ लागले. पण मन पुन्हा भुर्रकन मागे गेले, अरे आमच्या शाळेने आमच्याकडुन ४-४ अध्याय पाठ करुन घेण्यापेक्षा २ श्लोक व्यवस्थित अर्थासह सांगितले असते तर तेच उत्तम होते हे ही उमगले. आजही मला "इदं तु ते गुह्यतमं..." अशी सुरवात करुन दिली की आख्खा अध्याय म्हणता येतो पण त्याचा अर्थ नाही सांगता येत. मग असे पांगळे "पाठांतर" व ते ही "संस्काराच्या नावाखाली" जे लहानपणी माझ्यावर ठासवले गेले त्याला आज माझ्या दॄष्टीने काहीच किंमत उरत नाही. आमची शाळा खरेतर "तमसो मा ज्योतिर्गमय" हे ब्रीद घेऊन चालणारी, पण खरे आवश्यक ज्ञान देण्यात शाळेची नक्की गल्लत होत आहे असे आज वाटते. आजही तेच चालु आहे, कधीमधी गावाकडे गेले आजही तसेच गीतेचे अध्याय तोंडपाठ म्हणुन दाखवणारे विद्यार्थी दिसतात, ह्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माझे विस्तॄत म्हणणे मांडले की "लहानपणी असा नव्हतास रे तु, आता अचानक असा का संस्कारांना तुझा विरोध आहे ?" असा संपुर्ण चुकीचा अर्थ लावतात .... माझा विरोध खरोखर संस्कारांना आहे ? की संस्काराच्या नावाखाली नुसते अंध पाठांतर करुन घेण्याला ? संस्काराचा जर अर्थच समजत नसेल तर ते संस्कार काय कामाचे असे माझे म्हणणे चुक आहे ? तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ? लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्याच्या चेहर्यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो. पण मी आजही जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा प्रसादाला जातो, पुजेच्या सारंजामापाशी बसलेले त्या घरातले कर्ते अथवा एखाद्या वयोवॄद्ध आजी/आजोबांना पाहुन मला कसेनुसेच होते, मी आपला मुकाटपणे नतमस्तक होतो व प्रसाद घेतो. त्यावेळचे त्यांच्या चेहर्यावरचे "अवघे सार्थक झाले" हे समाधान वाचताना त्यांच्या समस्यांचे जहाज हाच विश्वास वर आणेल ह्याचीही खात्री असते. मात्र तरीही मला माझा सत्यनारायण पुजेच्या महत्वावर विश्वास नसणे व म्हणुन मी "धार्मिक नसणे" हा संबंध कळत नाही... देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो. आज मात्र तितकीशी ओढ नाही, देवळातल्या मुर्तीची तर कधीच नव्हती. मात्र पुर्वी जे हवेहवेसे वाटायचे ते वातावरणही आज न राहिल्याने मला आज देवळात जाणे ह्या उपचाराला तितकेसे महत्व देऊ वाटत नाही. देवावरची श्रद्धा तर तितकीच आहे जितकी पुर्वी होती. मात्र आज देवळात गेल्याने तिथले अवडंबर आणि प्रस्थ पाहुन संताप आणि चिडचिड वाढते, ज्या हेतुसाठी मी कधीकाळी देवळात जात होतो तो हेतुच आता उरला नसेल तर मला देवळात जाणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. शिवाय देवळात जाणे म्हणजेच देवावर श्रद्धा असणे हे गुणोत्तर कधीच पटले नाही, तेव्हाही नाही आणि आता तर मुळीच नाही. जातायेताना रस्त्यावर दिसणार्या कोपर्याकोपर्यातल्या मंदिरापाशी थांबुन दर्शन घेणे, सकाळी कितीही गडबडीत असलो तरीही दर गुरुवारी साइमंदिराची आरती गाठणे, दर चतुर्थीला ट्राफिक ज्यॅम करुन गणपतीची आरती करणे वगैरे गोष्टींचे मला कधीच आकलन झाले नाही व ह्या गोष्टी कधीही करु वाटल्या नाहीत. मग सध्याच्या देवळातल्या कमर्शियलायझेशन, गर्दी, आरडाओरड वगैरेला कंटाळुन तिकडे जायला खुष नसलेला मी अचानक "नास्तिक" कसा ठरतो ? देवावरची म्हणजे सुप्रिम पॉवरवर असलेली मनातील श्रद्धा ह्याला काहीच किंमत नाही का ? पण, पण आजही मी कोणी मनापासुन आणि तळमळीने देवळात चलण्याचा आग्रह करीत असेल तर जरुर देवळात जातो, बरोबरच्याच्या चेहर्यावरच्या दिसणार्या समाधानातच मला बर्याच वेळा देव दिसतो व माझ्या देवळातल्या देवाच्या दर्शनाचे सार्थक होते.... आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते. मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले. ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? उलट मी तर ऑलरेडी गावाकडे "नास्तिक, धर्मबुडवा, वरच्या वार्याला लागलेला" वगैरे म्हणुन बदनाम आहे, मग ही लोकं माझ्या का पाया पडत आहेत ? पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, निदान केवळ मी त्या गावचा आहे म्हणुन वयाने मोठ्ठ्या लोकांनी माझे पाय धरणे तर साफ नामंजुर आहे. माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर तडजोड म्हणुन जास्त वाद न वाढवता मी आपला समोरच्याला मान देऊन वाद संपवतो, मनात काय आहे हा भाग अलहिदा. तर लोकांच्या मते इथेही मी माझे "संस्कार विसरत चाललो आहे" , चालायचेच ... खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ? कुणाला एखाद्याला चुकुन पाय लागला तर मी पटकन रिफ्लेक्स अॅक्शनने त्याच्या पाया पडुन घेतो हे संस्कार नव्हे का ? इथे मला आपण त्याला चुकुन लाथ मारली आहे व त्याची आपण दखल घेऊन माफी मागितली आहे हे दाखवणारे "पाया पडणे" हे जर संस्कार असतील तर मी का ते विसरलो आहे ? आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघायच्या आधी पुर्वी आई जे हातावर "दही-साखर" द्यायची त्याची आठवण होते, हे काय फक्त वरवरचे आहे का ? रोज सकाळी आन्हिके उरकताना आपोआप "गणपतीस्तोत्र" मुखातुन बाहेर पडते, त्यामागचे देवदेव वगैरे सोडले तर ते म्हणताना त्या तालातुन व ध्वनीतुन मला मिळणारा आनंद व सुख मला दिवसभरासाठी एनर्जी देते हे खरेच आहे. कुठलाही नवा कपडा घेतला तर त्याला आधी पाणी दाखवुन मगच तो अंगावर चढवावा ह्या संस्कारामागचे शास्त्रिय कारण मला पटल्याने ते नाकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मग मी सध्या जे करतो ते संस्कार नव्हेत काय ? असो. अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ? कारण, ऑलरेडी इथे समाज आणि आमच्या आसपासचे आम्हाला "नास्तिक, धर्म न मानणारा, देवावर श्रद्धा नसणारा" वगैरे ठरवुन मोकळे झाले आहेत ... थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ... चालायचेच ...!!!! - समाप्त - ( खरे तर ह्या शब्दाला काही अर्थ नाही, आयुष्यातल्या २० वर्षातले असे अनुभव केवळ १०० एक ओळीत लिहणे व वर समाप्त म्हणणे हे संस्कारहीन ठरते. तुर्तास इथे विश्रांतीसाठी थांबतो. मुड आला तर एखाद्या प्रतिसादात अजुन खरडेन .... ) धन्यवाद ...!!!
In reply to (विषय दिलेला नाही) by मेघना भुस्कुटे
In reply to (विषय दिलेला नाही) by मेघना भुस्कुटे
In reply to हे सर्व मानवनिर्मीत by विजुभाऊ
In reply to अर्धवट by अवलिया
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
In reply to अर्धवट by अवलिया
In reply to देवाचे by विसोबा खेचर
In reply to खूप वायफळ by मेघना भुस्कुटे
In reply to खूप वायफळ by मेघना भुस्कुटे
In reply to डॉन, मेघना, by श्रावण मोडक
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.मी पण असेच करतो. पुर्वीपेक्षा ताठरपणा कमी झालाय. पण शासकीय कार्यालयात सत्यनारायणाची पुजा केली जाते त्याला माझा विरोध असतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अशी शासकीय पुजा असु नये हे माझे मत. सत्यनाराणाची पुजा कोण करतो? ज्याला आपल्यातला खोटेपणा डाचत असतो तो. मग ती बोच कमी करण्यासाठी सत्यनारायण घालायचा. त्यापेक्षा सत्याची पुजा करा! (जी आजच्या जीवनात॑ अशक्य आहे) अशा कानपिचक्या ऑफिसमध्ये द्यायचो. सत्यनारायणाचा प्रसाद मला शिरा म्हणुन खायला आवडतो हे बहुतेकांना माहित होते. त्यांच्या घरी गेल्यावर तु शिरा म्हणुन खा बाबा! पण ये घरी असा प्रेमळ आग्रह असायचा. अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. मग असा विक्षिप्तपणा का करा असा विचार करतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to बदल by प्रकाश घाटपांडे
In reply to खासगी, वैयक्तिक by श्रावण मोडक
In reply to तुझा धर्म कोणता? by घोडीवाले वैद्य
In reply to डॉन, मेघना, by श्रावण मोडक
धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.+१, असेच म्हणतो. उपरोक्त गोष्टी ह्या पौरुषेय आहेत आणि जेव्हा त्यांची निर्मीती झाली तेव्हा त्याला स्थळ, काळ, वेळ ह्यांचे परिमाण होते. अशा परिस्थीतीत त्या आजही आहे तशाच योग्य आहेत का ह्याचा उहापोह नको का करायला ? समजा करायला गेलो तर आमच्या नशिबी "अधर्मी" ठरणे आले, भले ते भंपक का असेना. शिवाय भंपक म्हणणारे १० लोक नसतात तर हजारोंच्या संख्येने असतात. इनफॅक्ट आपला हिंदु धर्म ह बराच चिकित्सेला आणि संशोधनाला वाव देतो म्हणुन आम्हाला त्याचे कौतुक आहे. आपण हिंदु धर्मात अवश्य संशोधन करुन कालबाह्य परंपरा आणि रुढी ह्या प्रवाहातुन काढु शकतो म्हणुन तसे करण्याला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. उदा : सति प्रथा, विधवांचे हक्क , जातीभेद ह्यावर बरीच चिकित्सा झाली आणि आज आपण परिणाम आणि सुधारणा पाहतो आहोत. मग हे आता इथेच थांबवायचे का ? आपल्या धर्मातल्या कित्येक उदात्त आणि महान गोष्टी अजुन जनसामान्यांपर्यंत पोहचल्याच नाहीत, बहुतांशी तो वर्ग अजुन खेदाने कर्मकांडातच आणि अंधविश्वासातच अडकुन पडला आहे हे सत्य नाही का ? म्हणुन विष्लेषण हे आवश्यक ठरते, त्याला होणार्या विरोधाची कल्पना आहेच आणि त्यासाठी मानसीक तयारीही आहेच की, इथे फक्त काय काय करता येईल ह्यासंबंधी जार चाचपणी चालु आहे ...
मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.हो , हे सुद्धा मान्य. मात्र हे मला प्रत्येकचवेळी जमेल असे नाही. मी कितपत अलिप्त राहु शकतो हे सांगणे कठिण आहे. खरे सांगायचे तर "तुला करायचे ते कर, मी येणार नाही" हे मला जमत नाही, समोरचा एखादा चुकीचा अथवा अनावश्यक वागतो आहे हे जेव्हा दिसते तेव्हा मी अलिप्तपणे बाजुला होण्याऐवजी त्याला ४ गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न करतो. बहुदा हेच अनावश्यक आणि अनवॉरंटेड ठरत असावे ... शिवाय माझे सामिल न होणे किंवा होणे ह्यावर समजा माझे "सामाजिक स्थान" अथवा "रिलेशनशिप्स" ह्यावर परिणाम होत असेल तर काय करावे ? काही वेळा नुसते "त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव" असे सांगणे शक्यही नसते व बरोबरही नसते. अशा वेळेस मी तुर्तास गुपचुप त्यात सामिल होण्याचा मार्ग स्विकारतो, ते मनाला पटत नाही हे माहित असुनही, तडजोडच म्हणावी लागेल ह्याला, पण करावी लागते.
अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.+१, अगदी परफेक्ट ... समतोल साधणे महत्वाचे आहे ...
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.ह्यावर एक वेगळा, विस्तॄत प्रतिसाद लिहीन ... निमीत्त सत्यनारायणाचे मात्र ह्या अनुषंगाने गरिब वर्गाला आर्थिकदॄष्ट्या परवडत नसतानसुद्धा केवळ सामाजीक कर्तव्य म्हणुन पार पाडाव्या लागणार्या कर्मकांडावर भाष्य करेन ...
पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.ह्यावर बहुदा मला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आपला स्टान्स पटतो आहे मात्र अफार अवघड आहे असे प्रथमदर्शनी दिसत आहे. पाहतो कसे जमते ते ...!!!
उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?:) हा हा हा, ५० जाऊ देत पण अजुन काही जणांकडुन "कन्ट्रक्टिव्ह प्रतिसादांची" अपेक्षा मात्र जरुर आहे ... मोडकसाहेबांचा प्रतिसाद आवडला ..!!! धन्यवाद. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
In reply to खूप वायफळ by मेघना भुस्कुटे
In reply to विचारपूर्ण लेख आणि प्रतिसाद by धनंजय
In reply to हे काय? by अन्वय
In reply to ईश्वरी by विसोबा खेचर
In reply to फुका बाता by अन्वय
In reply to अन्वयराव, by चतुरंग
In reply to वैश्विक सत्य by अन्वय
In reply to फुका बाता by अन्वय
In reply to श्रध्दावान...... by llपुण्याचे पेशवेll
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते.=D> =D> =D> =D> =D> =D> आवडले. असेच म्हणतो. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
In reply to श्रध्दावान...... by llपुण्याचे पेशवेll
In reply to डॉन.. लेख by भाग्यश्री
In reply to मस्त by नंदन
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले. ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? ..... पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, ....अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा :) असे नमस्कार घ्यायला फार सावधानता लागते. ती नसेल तर आपण समोरच्याचा नमस्कार देवाकडे वळवावा आणि लगेच समोरच्याच्या पाया पडून टाकावे. हे उत्तम ! (असे माझे मत) बाकी देव, श्रद्धा याबाबत बरेच काही चांगले लिहिले आहे. काळजीपूर्वक आपली मते तपासत राहणे हे चांगलेच असते. मते बदलतसुद्धा असतात. बदलाचे एकदा जसे स्वागत होते तसे पुन्हा सुद्धा व्हावे. तेव्हा संकोच होऊ न द्यावा. सर्वांचे प्रतिसाद सुद्धा भारी आहेत. सध्या माझ्याकडून भर घालण्यासारखे काही नाही. रामाच्या ईच्छेने तसे काही असेल तर लिहिनच ! -- लिखाळ. जुने ठेवणे मीपणे आकळेना - समर्थ.
In reply to मग मोठ्ठा by लिखाळ
In reply to लिखाळगुरु by विसोबा खेचर
अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?!बरोबर. पण जेव्हा समोरचा विठोबाला नमस्कार करतो आहे असे आपण मानतो तेव्हा (स्वतःसाठी विठोबा अस्तित्वात नसला) तरी समोरच्याच्या असलेल्या विठोबाला आपण क्षणभर मान्यता देतोच ना. त्या नसलेल्या पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा :) (हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही.) -- लिखाळ विठोबासी शरण जावे। निजनिष्ठा नाम घ्यावे - संत तुकाराम (चित्रपटातले)
In reply to अहो पण by लिखाळ
In reply to लेख वाचला, by यशोधरा
In reply to >>>समाजात by नितिन थत्ते
In reply to >>>समाजात by नितिन थत्ते
In reply to छान चर्चा! by धमाल मुलगा
बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटलीमौज नाही वाटली, तर इतके दृढ श्रद्धाळू लोक आहेत हे पाहून छान वाटलं, आणि अशी दृढता माझ्या श्रद्धेमधे केव्हा येईल असा प्रश्नही मनात उत्पन्न झाला. शेवटी श्रद्धा कशावरही असू दे, ईश्वराच्या असण्यावर नाहीतर ईश्वराच्या नसण्यावर, देवावर नाहीतर फक्त स्वतःवर, श्रद्धा असणं महत्वाचं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवलं - 'माणसांमाणसांत जर काही फरक असेल तर तो या श्रद्धेचा. श्रद्धेचं अस्तित्वच माणसाचं लहानमोठेपण ठरवते. तेव्हा श्रद्धा बाळगा.' (हे मूळ विंग्रजी वाक्यांचं तोकडं भाषांतर आहे, तेव्हा चूभूदेघे). - भटोबा
In reply to बाकी, by घाटावरचे भट
In reply to छान चर्चा! by धमाल मुलगा
In reply to चला, आता by नितिन थत्ते
माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसतेनक्की? खात्रीलायक?? अगदी कन्फर्म??? शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ :) >>या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही. नाकारलेलेही कुठे दिसत नाही बॉ. आणि हो, हिंदू धर्मच ह्या अनिष्ट रुढी-परंपरांना हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो. >>पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे. चर्चा थांबवण्याबद्दल कुठे काय म्हणालंय कोण? आम्ही ह्याच धाग्यात इतर धर्मांवर बोला असं म्हणालो आहोत काय? आम्ही फक्त असं म्हणालो की आजवर बर्याचदा हिंदूधर्मावर टिकात्मक लेखन झालंय, इतर धर्मांबाबतही थोर विचारवंताचे ज्ञानकण आम्हा मूढांच्या पदरात घालावे :)
अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे.अशी आणखी किती उदाहरणं आहेत? आणि उठसुठ हिंदूधर्माला बोल लावणारे किती आणि कितीदा 'फुल थ्रॉटल' असतात? पहा, विचार करा, आनंदी रहा :)
कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता.हो ना! मग इथे काय फक्त आणि फक्त हिंदूच आहेत का? की अनुभव विश्व फक्त हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवलंय? तसं असेल तर निधर्मी/सेक्युलरगिरी कुठे गेली? :)
आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल.बरोबर! पण आम्ही कधी म्हणालो की केरळातल्या ख्रिश्चनांबद्दल किंवा उत्तरप्रदेशातल्या मुस्लीमांबद्दल बोला? जिथल्या हिंदूंना नजरेसमोर ठेऊन त्या रुढींवर टिका केली तशीत तिथल्याच अहिंदू रुढींवर बोला की. :) >>इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात. सलमान रश्दी, तस्लीमा नसरीन ही नावं कुठं ऐकल्यासारखी वाटताहेत, नै का बॉ? :) काय झालंय बरं त्यांचं? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
In reply to सोयीस्कर माघार? by धमाल मुलगा
In reply to चला, आता by नितिन थत्ते
In reply to हे सर्व by पक्या
हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच.... ... कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.ब्रह्मांड जर कोणी निर्माण केले तर त्याला/तिला/तेला कोणी निर्माण केलं? एकदा ब्रह्मांड निर्माण झालं हे मान्य केलंत की आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले याचं उत्तर देणारी मोठी लेखमाला मी लिहू शकते. (सॉरी, सध्या अजिबात वेळ नाही, जमेल तसं लिहेन, मागणी असेल तरच!) ब्रह्मांड कसं निर्माण झालं याचंही उत्तर विश्वरचनेचा अभ्यास करण्यार्यांकडे आहे (मला ते समजलं आहे असा माझा दावा नाही). कसं निर्माण झालं याचं उत्तर विज्ञान देतं, पण का निर्माण झालं याचं उत्तर विज्ञानात मिळेलच असं नाही. तिथे मात्र तर्क इ. इ. गोष्टींची गरज पडेल. सृष्टीनिर्माणकर्त्याचं अस्तित्त्व हा मलातरी चक्राकार खेळ वाटतो. कशावरून हे ब्रह्मांड, ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली? आणि मग या निर्मिकाला कोणी निर्माण केलं? आणि निर्मिकाच्या निर्मात्याला कोणी निर्माण केलं .... ही साखळी संपणारच नाही. काही थोडी वेगळी उदाहरणं देते: १. पूर्वी असं मानत एका कासवाच्या पाठीवर (किंवा ग्रीसमधे असाल तर हर्क्युलिसच्या पाठीवर) पृथ्वी आहे असं मानत. मग ते कासव (/हर्क्युलिस) कुठल्या पृष्ठभागावर विसावलं आहे? या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे, की पृथ्वी अंतराळात आहे, आणि सूर्याशी गुरूत्वाकर्षणाने बांधली आहे. २. जेव्हा सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात हे अमान्य होतं, तेव्हा अतिशय किचकट अशा ग्रहांच्या कक्षा आखून (एपिसायकल्स) , ग्रह पृथ्वीभोवती फिरतात असं मानायचे. ६ ग्रहांसाठी २८ (का जास्त) एपिसायकल्स होती. एक चुकीचं गृहीतक हटवलं, आणि ६ ग्रहांसाठी १ नियम लागू करता आला. पुढे तो नियम सगळ्याच गुरूत्वीय बंधक वस्तूंसाठी लागू होतो असं लक्षात आलं. निष्कर्षः आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी. माझी देवाविषयीची धारणा: मी निरोगी असताना, दुसरा आजारी पडू नये; किंवा दुसरा ठणठणीत असताना मी आजारी पडू नये असा काही नियम नाही. आजारी माणसाला औषधं, जास्तीची काळजी इ.ची गरज असते. तसंच काही लोकांना नित्यनियमाने किंवा अडीअडचणीत एका मानसिक आधाराची गरज असते, ती गरज "देव" किंवा "ती विवक्षित शक्ती आहे ही धारणा" भागवतात. देवाच्या अशा प्रकारच्या अस्तित्त्वामुळे काही लोकं, खरंतर बरेच लोकं, सुखात रहातात. (अडचणीच्या काळात माझ्यासाठी हीच गरज मित्रमंडळ, नातेवाईक, कलिग्ज भागवतात.) माझ्यालेखी देव आहे, पण तो या आस्तिक लोकांच्या डोक्यात आहे, अगदी I think, so I am, याच चालीवर! जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. अनेक आस्तिक मित्र-मैत्रिणीही जिवलग आहेत. पण माझ्यावर देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची सक्ती मला चालत नाही.
In reply to चला चक्राचा खेळ खेळू या! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अर्थातच by मेघना भुस्कुटे
In reply to चला चक्राचा खेळ खेळू या! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>जेव्हा by यशोधरा
आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!माझ्या आधीच्या प्रतिसादात व्याकरण आणि/किंवा भाषेची चूक आहे. माझ्यासाठी देव ही काही (बर्याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. एक नुसती संकल्पना असू शकत नाही, तिच्यासाठी एका मेंदूची गरज असते आणि नुसता मेंदूही असू शकत नाही, त्यासाठी एका (मानवी) शरीराची गरज असते. (हाच तर्क "ती शक्ती म्हणजे देव" याही बाबतीत लावता येईल.) मुद्दा हा, की जेव्हा अशी सक्ती होते तेव्हा ती संकल्पना, पक्षी: तो माणूस, मला आवडत नाही. देवाला माझ्या लेखी स्वतंत्र अस्तित्व नाही, त्यासाठी एका मेंदूची आणि (मानवी) शरीराची आवश्यकता आहे (किंवा एखादा शब्दकोषतरी)! आणि यशो, तुझा तर्क मान्य, जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचा रागतरी कसा येणार? थोडं अवांतर: माझं निरीश्वरवादी असणं हे (माझ्यामते) "सिमेट्रीक" आहे. उदा: मला एक झोळी आवडली म्हणून मी ती घेतली, अगदी रोज वापरते. त्या झोळीवर "हरे कृष्ण हरे राम" असं लिहिलेलं असूनसुद्धा मला त्याचा फरक पडत नाही. मला झोळीशी मतलब आहे, त्यावरच्या लिखाणाशी नाही. ते लिखाण नसतं तरी मला फरक पडत नव्हता, तर ते लिखाण आहे म्हणूनही मला फरक पडू नये.
In reply to >>जेव्हा by यशोधरा
संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का?एक गृहीतक चुकतं तेव्हा आख्खा डोलारा कोसळतो, जसा एपिसायकल्सचा डोलारा कोसळला! :-) (किंवा, गणितात जेव्हा एखादी अगदी साधी वाटणारी गोष्ट सिद्ध करतात, उदा. शून्य एकापेक्षा लहान आहे, तेव्हा सुरूवात करताना एक शून्यापेक्षा लहान आहे, किंवा दोन्ही सारखेच आहेत असं मानतात. आणि मग डोलारा कोसळतो ते दाखवतात. असो. माझं वाचन फार काही नाही, त्यामुळे माझ्या मर्यादित माहितीमधून हे एक उदाहरण दिलं.) असो... देव आणि धर्म या दोन गोष्टींचा संबंध नाही असं माझं आणखी एक मत. तेव्हा डॉनराव, चर्चा नक्की कशावर करायची आहे, देवावर का धर्मावर??
In reply to संकल्पना न by ३_१४ विक्षिप्त अदिती
(विषय दिलेला नाही)