मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
31 Jan 2021 - 4:38 pm

aa

श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर.

बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे. त्या पर्यटनाला चालल्या असतानाचा लवाजमा, शाही थाट पाहून ऐश्वर्य, सत्ता आणि सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम झाला असावा. हे सर्व मिळवायला, टिकवायला बरेच काही गमवावे लागते. ते विकीपीडिया वरून कळून येईल. असो.
समजून घ्यायला सोपे जाईल म्हणून चित्राचे ४ भाग सादर केले आहेत.

१. पूर्ण चित्र.

1

२. बेगम सुमरू यांचे शाही पर्यटन

रस्त्यारील सोहळा कौतुकाने? पाहणारे पांढऱ्या रंगाचे कुत्रे, वेगम सामरूंना जाता जाता खायला वेचक शाही भोजन पदार्थ? कावडीतून नेणारा भोई...! रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांना हटकणारा शिपाई दिसतात.

सामरू

३. हत्तीवरून शोभायात्रेची मिरवणूक किंवा संचलन. विदेशी सैन्य पथकांचा रेखीवपणा, उंट, विविध प्रकारचे सुशोभित घोडे, रंगित ध्वज, तोफखाना पथके, घोषवाद्यांचे ताफे, पर्यटनाला लागणारे तंबू, मेणे, पालख्या, पाण्याची सोय, यावरून २६ जानेवारीच्या नवी दिल्लीतील संचलनाच्या आठवण व्हावी अशी शिस्तबद्धता उठून दिसते.

सा

४. चार बैलांचा तोफगाडा

सामरू

५. सहा बैलांचा तोफखाना पथक

सामरू

या संदर्भात मी अधिक माहिती दाणींशी बोलताना समजून घेतली.

सामरू

बेगम सामरू वॉल्टर रेनहार्ट सोमब्रे यांची ही आवडती नर्तिका नंतर पत्नी. काश्मिरी समुदायातील कॅथॉलिक धर्मात गेलेली नाचगाणी करणारी साडे चार फुट बुटबैंगण, (सप्रू, नेहरू या नावांशी साधर्म्य असल्याने ती पंडित असावी. कंस माझा) तिला एक बेगम उमदा नावाची एकुलती मैत्रीण होती. कदाचित ती नातलग किंवा पळवून आणताना काश्मीरातील गाववाली असावी. सोमब्रे वारले नंतर दुसर्‍या फ्रेंच ले व्हेसो सेनान्याशी १७९३ मधे सूत जमवून बेगम सामरू यांनी निकाह केलेल्याची बातमीमुळे मेरठच्या आसपास संस्थानात उठाव झाला. ते दोघे रातोरात पळून गेले. पती मारला गेला हे ऐकून सामरूनी आत्महत्या केली. पण कर्मयोगाने वाचली व पुढे ८५ वर्षे जगून १८३६ मधे वारली. मरे पर्यंत तिने अमाप संपत्ती जमा केली होती. सरधाना, गुरुग्राम मधे वाडे, गढ्या तर दिल्लीत भगिरथ पॅलेस अशा अनेक मालमत्ता तिच्या नावाने आजही ओळखली जाते.

इंग्रजां विरुद्ध मराठे यांच्यतील अस्साये (महाराष्ट्रातील बोकरदन जवळ) ह्या गावाच्या आसपास १८०३ साली झालेल्या लढाईत तिच्या सैन्याने मराठ्यांच्या बाजूने लढा दिला होता असे म्हणतात..असो.

सामरू

बेगम सामरूचा गोतावळा

सामरू

भागिरथ पॅलेस चांदणी चौक दिल्ली, तिची मालमत्ता होती.

अशा मोठ्या लँड स्केप चित्रांतील दर्शवलेल्या घटना, व्यक्तींंवर चित्रकारने डोळेफोड करून घेतलेल्या कष्टांचे चीज व्हावे. बारीक निरीक्षणातून आपल्या कलेला पाहिले जावे अशा माफक इच्छा असेल तर ती यानिमित्ताने पुर्ण व्हायला मदत होईल.

अशाच काही पेंटिंग्जवर वेगळे लेखन करून बारकावे शोधायचा प्रयत्न करावा असे मनात आहे.

मांडणीकलाइतिहासस्थिरचित्रप्रतिसादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

31 Jan 2021 - 4:45 pm | शशिकांत ओक

सामरू

शशिकांत ओक's picture

31 Jan 2021 - 10:25 pm | शशिकांत ओक

मनोज दाणी यांनी पानिपतचा इतिहास या विषयावर प्रणव महाजन यांच्या समावेत युट्यूबवर चर्चा रंगली होती.
https://youtu.be/u6Se1LmSXpA

एक दुरुस्ती - अस्साये च्या जागी असई हवे

ही बेगम महादजी शिंदे यांच्या सैन्यात होती. मेरठ, पानिपत इत्यादी दुआबाच्या आसपासचे भाग, जिथे कालवे काढून बागायत अशी अत्यंत सुपीक शेती त्या काळातही होत होती, तिथे निवडक plum जहागीर या कवायती फ्रेंच सैन्याला दिली होती. त्यांचं भरघोस उत्पन्न हे तिथून आलेले आहे.
दुर्दैवाने हे लोक खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. त्यांच्या कुचराईमुळे जनरल लॉर्ड लेक याने अलीगड आणि नंतर दिल्ली ताब्यात घेतली, ती दौलतराव शिंदे यांचा पराभव करून.

बेगम समरू हिची आलिशान हवेली आजही आहे दिल्लीत पण त्यात इतकी अतिक्रमणे झाली आहेत (पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित असूनही) मूळ हवेली झाकली गेलेली आहे. अधिक तपशील

https://ranasafvi.com/begum-samru-s-palace-in-delhi-then-and-now/

शशिकांत ओक's picture

1 Feb 2021 - 2:47 pm | शशिकांत ओक

गूगलमधील नकाशात जरी अस्साये लिहिले असले तरी असई हेच गावाचे नाव बरोबर आहे. खालील नकाशातील असई हे कोल्हापुरच्या जवळचे आहे हे ते महालक्षी मंदिर वाले कोल्हापुर नाही. पण गूगल नकाशाची झलक दाखवली. असो.
बाकीची माहिती रंजक आहे... असेच मार्गदर्शन मनोज करत राहतील अशी अपेक्षा करतो.

सामरू

रमेश आठवले's picture

1 Feb 2021 - 9:28 pm | रमेश आठवले

सोमब्रे ची बेगम असल्याने हिचे नाव अपभ्रंश होऊन सामरू पडले असेल का ?

ते ठीक आहे. मला वरील चित्रातील काही विशेष जे मला सांगता आले नाहीत किंवा अन्य रितीने त्यांच्या अर्थ लावला जाऊ शकतो. यावर प्रकाश टाकला जावा अशी अपेक्षा आहे. पहा प्रयत्न करून.