लागट बोलणं
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली .
धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला
कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं.
तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो.
एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो.