काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
6 May 2024 - 8:43 pm

काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण

मला आठवतं, अलीकडे मी जेव्हा कोकणात
रजा घेऊन गेलो होतो, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्या
नुसार ,चक्क ढगा विरहीत रात्र शोधण्याच्या प्रक्रियेत, यशस्वी होत आहे असं पाहून, त्या रात्री
समुद्राच्या चौपाटीवर वाळूत बसून तारे पहाण्याचा छंद पूरा करण्याच्या इराद्याने, चौपाटीवर गेलो होतो.

योगायोगाने,ती अमावास्येची रात्र होती.उशिरा घरी आल्यावर,जेवण आटोपून झोपण्याच्या उद्देशाने,पाठ टेकून डोळे मिटून मनाने परत चौपाटीवर गेलो.आणि डोक्यात विचार यायला लागले.

आकाशात काळ्याकुट्ट रात्री, म्हणजेच अमावास्येच्या रात्री, ताऱ्यांकडे पाहण्यात,कल्पनेच्या आधाराने त्यांच्या जवळ
पोहोचण्यात,मला मी छंद लाऊन घेतला आहे.

तसं करण्यात मला मजा येते.असं करण्यात अमर्याद शक्यतांच्या विशाल जागेखाली उभं राहून, स्वतःच्या अंतर्मनाशिवाय दूसरं काहीही शोधलं जात नाही. असा माझा विश्वास आहे.

एखाद्या व्यक्तीची सर्व उद्दिष्टं संपूर्ण विश्वात पसरलेल्या ग्रहताऱ्यांपेक्षा जास्त पसरली जाऊ शकतात. किंवा चंद्र पूर्ण झाल्यावर, म्हणजेच पौर्णिमे दिवशी दिसतो, तितकी मोठी ती उद्दीष्टं पसरलेली असूं शकतात.

कोणत्याही प्रकारे,आपण खरोखर कोण आहोत याच्याशी संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे
तारे पहाणं आणि ताऱ्यांपर्यंत कल्पनेनंच पोहोचणं. असं मला वाटतं.

आश्चर्य आणि कल्पनेने भरलेल्या आभाळाखाली राहिल्याने मला हे जाणवतं की आपण ज्या मोठ्या विश्वात राहतो,त्या विश्वाच्या तुलनेत
मी खरोखर किती लहान आहे, हे मला वास्तविकेतून मनाला चटका लावून जातं.

म्हणूनच मी अगदी तारांकित रात्री, त्या कधीही न संपणार्‍या काळ्याकुट्टपणाकडे पहाण्यात स्वारस्य घेतो.
मी माझ्या आयुष्याची तुलना ताऱ्यांशी करून पहातो.

तारा प्रत्यक्षात उजळलेला असतो.
नेहमीच्या व्यवहारात, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला आपण ताऱ्याची पदवी देतो ती पदवी त्याला
विनाकारण प्राप्त झालेली नसते .त्या व्यक्तीने त्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करून ध्येय साध्य करून,मेहनत घेतलेली असते.

लोक त्यांच्याकडे “स्टार” समजून पाहतात. लोकांना त्यांच्याकडे असं पाहणं, ही वास्तविक ताऱ्यांकडे पाहणाऱ्या लोकांशी तुलना करता
येते.

थोडक्यात, मी असं म्हणेन की,ह्या ब्रम्हांण्डाकडे पाहून, मनुष्याची विचार करण्याची शक्ती, मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व्यवहाराशी तुलना करून, कसा समाधान करून घेतो हे कौतुकास्पद आहे.

वावरप्रकटन