वाट पहाणं

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
9 May 2024 - 12:09 pm

वाट पाहाणं

“सखी,मंद झाल्या तारका
आता तरी येशील का?”
हे गाणं माझ्या कानावर पडलं.किती आतुरतेने सखा तिची “वाट” पहात आहे,हा विचार मनात आला आणि वाटलं, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा वाट पाहतअसतो?आपण छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहत असतो. रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी. नवीन चित्रपट पाहण्याकरता तिकिटांसाठी. नव्या फूलांचा सुगंधी वास दरवळून आणणाऱ्या वसंत ऋतु येण्यासाठी. आतुरतेने मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मेलमधील आपल्या स्वीकृत पत्रांसाठी.आपल्या कुटुंबांतील व्यक्ती परदेशी असताना काम झाल्यावर परत घरी येण्यासाठी. आपल्या सेवानिवृत्तीसाठी. करिअरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी.
परंतु,सांगायचा उद्देश हा की अनेकदा जेव्हा आपण वाट पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण वेळ वाया घालवत आहोत.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोक संगणकावर परिचित असल्याने,वाट पाहणं, प्रतिक्षा करणं त्यांना कठीण झालं आहे. टच स्क्रीनवर थांबायला वेळ नाही. ईमेलमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. प्रतीक्षा करण्यासाठी कोणतेही ऍप नाही. प्रतीक्षाचं महत्त्व आपण विसरलो आहोत.

दिवाळी सण येण्याच्या दिवसांची वाट पहाण्यातली मजा, गणपती येण्यतील वाट पहाण्याची मजा, बाहेर जेवायला गेल्यावर ऑर्डर दिल्यावर जेवण येण्याची वाट पहात असताना गप्पाटप्पा आणि कुजबुज करण्यातली मजा आपण विसरत चाललो आहोत.

आजकाल आपण "आयुष्य जगण्यात" इतके व्यस्त झालो आहोत की, बहुतेक आयुष्य हे हळुहळु घ्यायचं, चघळायचं, चघळायचं आणि मग मजा करायची. ह्यातला आनंद विसरलो आहोत.
त्याऐवजी,स्वतःला जीवनाच्या स्थिर लयीत पडू देण्याऐवजी, आम्ही आमचा आवाज वाढवला आहे आणि गाण्याचा वेग वाढवला आहे,
लताताईच्या गाण्यात एक शब्द दुसऱ्या शब्दाकडे जाताना मधली “वाट” म्हणजेच लय ऐकून गाणं
ऐकण्यात येणारी मजा ,आताच्या गाण्यात ही वाट अदृष्य झाल्यामुळे मजाच निघून गेली आहे.
आपल्या सभोवतालच्या प्रतीक्षा करण्याच्या वृत्तीला पारखे होत आहोत.

प्रतीक्षा करणं हा जीवनाचा सर्वोत्तम आतुरतेचा क्षण असतो.
ढग येऊन पाऊस येणार आहे त्यासाठी वर आकाशाकडे पाहण्यासाठी किंवा कानात वाऱ्याचा आवाज ऐकण्यासाठी थांबण्याचा आनंद घ्यायला, वाट पहायला वेळ नसतो.
आशावादी राहून, वाट पहाण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करण्यासाठी आनंद घ्यायला वेळ नसतो.
“वाट पाहणं” हे दोन शब्द गायब झाले आहेत.

"मी तुझी वाट पाहीन," असे आतुरलेले शेवटचे शब्द, प्रेमी युगुलाच्या तोंडातून, यायला कमी पडत आहेत.

प्रतीक्षा करणं म्हणजे स्वतःला बळकट करणं, म्हणजेच आशा करणं, म्हणजेच विश्वास ठेवणं, म्हणजेच प्रेम करणं. आणि म्हणूनच मला
“ वाट पहाणं”
खूप रोमॅन्टीक वाटतं.

समाजप्रकटन