मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल (मेथी मलई मटर)

स्वाती राजेश · · पाककृती
मेथी मलई मटर साहित्यः १ जूडी मेथी (२ वाटी पाने) १ वाटी हिरवे मटार (वाफवुन घेणे) मसाला: ४ कांदे मध्यम (मिक्सर मधून बारीक करणे/ किसणे) १ च.लसूण पेस्ट १ च. मिरची पेस्ट १ मसाला वेलदोडा,२ साधे वेलदोडे,४ लवंगा,१ दलचिनी तुकडा हे थोडे गरम करून बारीक पूड करणे. ३ टे.स्पून तेल १टे.स्पून बटर १टे.स्पून क्रीम (दुधाची साय फेटुन घेणे) १ कप कोमट दूध मीठ आणि साखर चवीनुसार १.प्रथम तेल आणि बटर घेऊन त्यात कांदा(सुटलेल्या पाण्यासकट) मंद आचेवर परतणे. त्याचा कच्चा वास गेला की त्यात लसूण आणि मिरची पेस्ट घालून परतणे. नंतर मसाला पूड (वेलदोडे,.....) घालणे. २.त्यानंतर न चिरता मेथीची पाने टाकून परतणे. मेथी शिजल्यावर,वाफवलेले मटार घालणे. ३.नंतर दुध घालून मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर क्रीम घालणे. ४.चवीनुसार मीठ, साखर घालून गरमच सर्व्ह करावे. सर्व्ह करताना वरून थोडे क्रीम, चेरी, डाळींबाचे दाणे घालून सजवणे. टीपः १.पहिल्यांदा तेलात मेथीची पाने न टाकता, प्रथम सांगितल्याप्रमाणे सर्व भाजी करून सर्वात शेवटी म्हणजे सर्व्हीग करताना थोड्या बटर मध्ये फक्त मेथीची पाने परतवुन नंतर भाजीत टाकावीत. मेथीचा रंग छान राहतो. २.ताजी मेथी मिळाली नाही तर कसूरी मेथी वापरली तरी चालते. ३.१टे.स्पून खवा + १ कप कच्चे दुध घोटवून घातले तरी चालते. ४.खव्याऐवजी काजुची पेस्ट घातली तरी चालते. ५. मिरची व लसूण पेस्ट नको असल्यास, ते न घालता प्रथम तेलात २ लाल वाळलेल्या मिरच्या टाकाव्यात.

वाचन 19016 प्रतिक्रिया 0