घरात बनू शकणारी नैसर्गिक खते "जीवामृत आणि अमृतपाणी"

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in कृषी
12 May 2017 - 2:48 pm

शेती करायचे ठरवल्या नंतर माहिती गोळा करायला सुरुवात केली.एक शेतकरी भगिनीने, "श्री.सुभाष पाळेकर" ह्यांचा उल्लेख केला.यु-ट्युब वरील त्यांचे व्हिडिओ पाहता पाहता, सहजच जीवामृत बघण्यात आले.

पुढे ज्यावेळी सी.आर.टी. तंत्रज्ञाचे जनक श्री. चंद्रशेखर भडसावळे ह्यांची गाठ त्यावेळी, त्यांनी सांगीतले की, ज्या शेतात बॅक्टेरिया जास्त त्या शेतात काहीही पिकवा.

जीवामृताचे व्हिडिओ बघतांना पण हेच जाणवले की, शेतात बॅक्टेरियांची उपज वाढवायला ह्याच उपयोग होतो आणि मग मी बघीतलेले व्हिडिओ आणि माझी संकल्पना ह्याची सांगड घालून माझे मी प्रमाण ठरवले. ते खालील प्रमाणे.

साहित्य.

अनवट किल्ले ७: वज्रेश्वरीचा शेजारी , गुमतारा (Gumtara )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
12 May 2017 - 1:50 pm

गेल्या आठवड्यात आपण तुंगारेश्वराच्या जंगलातला कामणदुर्ग पाहिला. याच डोंगररांगेला संमातर असणार्या रांगेत असाच एक टोलेजंगी शिखरावर वसविलेला किल्ला आहे, "गुमतारा किंवा गोतारा". या डोंगराच्या उत्तरेला, वज्रेश्वरी आणि गणेशपुरी अशी सुप्रसिध्द पर्यटन स्थळे असूनही हा किल्ला तसा दुर्लक्षितच आहे. अगदी क्वचितच ट्रेकर्सची पावले इकडे वळतात.

मिशीला तूप

अभ्या..'s picture
अभ्या.. in गटसाहित्य
12 May 2017 - 1:44 pm

नमस्कार मंडळी,
मिशीला तूप या अभिनव पाककला स्पर्धेचे सूतोवाच करत आहे,
साधारण सुरुवातीची मांडणी, स्वरुप आणि अपेक्षा अशी करेन, आपण सर्वांनी ह्या उपक्रमाला एक सुघड स्वरुप द्यायचे आहे तेंव्हा सर्व सूचनांचे स्वागत.
१) स्वरुपः मिपाकरांपैकी पुरुष आयडींसाठी पाककला स्पर्धा
प्रश्नः फक्त पुरुषांसाठी हा मुद्दा कसा मांडावा? एखादा आपल्या बायको, गर्लफ्रेंडीकडून बनवून घेऊ शकतो?
२) स्पर्धकः पुरुष म्हनवणारे आयडी
प्रश्न : प्रवेशिकेत परीक्षकांसमोर स्पर्धकांची नावे ओपन की क्लोज? मिपाकरांना, वाचकांना अ‍ॅज अ परिक्षक म्हणून इन्च्लुड करावे काय? (शशक प्रमाणे)

मिरची लागवड

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in कृषी
12 May 2017 - 1:05 pm

आपल्याकडे एक म्हण आहे,"मीठ-मिरचीला महाग नाही" किंवा "माझी मीठ-मिरची मी कशीही कमवीन."

मीठा नंतर आपल्या घरात "मिरची"ला स्थान आहे, हे त्रिकालाबाधित सत्य.

परंतू, मी जेंव्हा शेती हाच व्यवसाय म्हणून स्वीकाराचे ठरवले त्यावेळी "मिरची" डोळ्यासमोर न्हवती.

जालावर जास्त आत-बट्ट्याची न ठरणारी पिके कोणती? ह्याचा अंदाज घेत असतांना "मिरची" ह्या पिकाविषयी माहिती मिळाली.

जमीन : मिरचीला कुठलीही जमीन चालते.दगड आणि वीट, सोडून मिरची कुठेही येते.

झटपट ढोकळा

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
12 May 2017 - 8:20 am

.

साहित्य: १ कप बेसन, २ टीस्पून रवा, १ टीस्पून तेल, ४ टीस्पून साखर, १/२ टीस्पून मीठ, १/४ जरूरेनुसार पाणी.टीस्पून सायट्रिक अ‍ॅसिड, १ रेग्युलर इनो सॅशे, आवश्यकतेनुसार पाणी.

फोडणी साठी - तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि नंतर वरून घालण्यासाठी १ चमचा साखर ३ चमचे पाण्यात विरघळवून.बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.

कसे या मनाला कसे जोजवावे?

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 May 2017 - 3:45 am

कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!

कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!

किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!

कधी ओल जाते कधी ऊल जाते
कळेना कसे या मनाला चिणावे!

तिचे ओठ देतील तपशील नंतर
मुक्याने तिने जर तुला बोलवावे!

विसरणे तसे फार असतेच अवघड
उगां एकमेकां कधी गुणगुणावे!
(असे या मनाला,असे जोजवावे!)

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

खानदेश...!

हर्षु's picture
हर्षु in जनातलं, मनातलं
11 May 2017 - 9:44 pm

काहि दिवसांपुर्वी एका लग्नाच्या निमीत्ताने जळगाव ला जाण्याचा योग आला. मराठवाड्याबाहेर जाण्याची तशी हि तिसरी - चौथी वेळ, पण आधी बघीतलं ते पुणंच. तिथले ते प्रवेश करताच दिसनारे माॅल्स, अजस्ञ रस्ते माझ्या शहरी मनाला खुप भावायचे. पण माझ्या ह्या खानदेश वारीनं माझ्या डोळ्यवरली ती माॅल ची झापडं पार उतरवली. तसं फार काहि नाहि पाहिलं मी तिथं, पण जे दिसलं ते नक्कीच मनाला सुखावनारं होत.

हे ठिकाणअनुभव

भाग ३ श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
11 May 2017 - 9:15 pm

। ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नमः ।
भाग ३ अध्याय १, ओवी ४३ ते ७७
जेवणाअखेरी आपण जसे डेझर्ट घेतो तसा गुरुमहिम्याचा गोड घास हेमाडपंतांनी मंगलाचारणाच्या शेवटी ठेवला आहे. गुरुकृपेचा नवलावा वर्णन करताना त्यांच्या वाणीला अधिकच गोडवा आला आहे. 'मै तेरा तू मेरा, भाव यही दृढ हो' हे हेमाडपंतानी आचरणात उतरवलं आहे.
हेमाडपंत म्हणतात की सद्गुरु आपल्याला मोक्षाकडे कसा नेईल तर 'ढकलत नेईल'. आई जशी लेकराचं कल्याण करणारच मग लेकराची इच्छा असो किंवा नसो! साईमाऊलीसुद्धा आपल्या लेकरांना ढकलत मोक्षाकडे नेईल.
परमात्मसुख परमात्मप्राप्ती । ब्रम्हानंद स्वरूपस्थिती ।

धर्मलेख

इमान... भाग १

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
11 May 2017 - 1:52 pm

"आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या."
डोस्क्यावरून उडणाऱ्या इमानाकडं पाहत गब्ब्या म्हनाला.

"येडा झाला का बे तू..तुले कोन घीन का इमानात?"

"काऊन? तिकीट काडल्यावर तं घ्याच लागीन नं त्याईले."

"असं नाय घेत बे कोनाले. इंग्लिश लोकं असतेत तिथं."

"म्हंजे?? अन तुले काय म्हायती बे?? तिकिट काडून यष्टयीत बसतो तसं इमानात बसाचं."

मुक्तकविरंगुळा