खानदेश...!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काहि दिवसांपुर्वी एका लग्नाच्या निमीत्ताने जळगाव ला जाण्याचा योग आला. मराठवाड्याबाहेर जाण्याची तशी हि तिसरी - चौथी वेळ, पण आधी बघीतलं ते पुणंच. तिथले ते प्रवेश करताच दिसनारे माॅल्स, अजस्ञ रस्ते माझ्या शहरी मनाला खुप भावायचे. पण माझ्या ह्या खानदेश वारीनं माझ्या डोळ्यवरली ती माॅल ची झापडं पार उतरवली. तसं फार काहि नाहि पाहिलं मी तिथं, पण जे दिसलं ते नक्कीच मनाला सुखावनारं होत. सिल्लोड सोडुन जळगावात प्रेश करताच दोन्हि बाजुंना दिसलेली ती विस्तीर्ण पण उजाड माळराणं, पिकाची काढणी होवुन परत नवीन पीकासाठी पाण्याच्या प्रतीक्षेत असणारी ती मोठ्ठाली शेतं, मध्येच बसच्या खिडकीतुन दिसलेला तो आठवडी बाजार, आदल्या दिवशीच कुणीतरी गवत पेटवल्यमुळे लांबवरुन त्या टेकड्यांवर दिसनारी काळपट - तपकीरी रंगाची छटा हे सर्वच माझ्या शहरी मनाला सुखावणारे होते. बसमधुन उतरल्यावर सुद्धा पत्ता सांगण्यासाठी बिलकुल आढेवेढे न घेता आवर्जुन मदत करणारी हि मंडळी माझ्यासाठी तर कुतूहलाचाच विषय होती. बहिणाबाईंच्या कवितेत असणारा गोडवा इथल्या माणसांच्या स्वभावातुनच आलेला आहे हे माञ नक्की. माझा हा प्रवास माझ्या मनात अगदी कायमचा कोरलेला राहिल हे माञ नक्की.......!
प्रतिक्रिया
खूप छान प्रवास झाला तुमचा.
+ १ अगदी अगदी!
प्रवास :) :)
प्रवास :) :)
घ्या
फारच त्रोटक प्रवास वर्णन
गुड. फोटो टाका.