परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
21 May 2017 - 12:09 pm

सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते.
आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता.
तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते. त्याने अंतराळात कमी खर्चात आणि अतिशय वेगात भ्रमण करता येत होते.

कलाविचारलेखविरंगुळा

ये कश्मीर है - दिवस पाचवा - १३ मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
20 May 2017 - 6:02 pm

'रात गई बात गई' हे वाक्य गुलमर्गने ऐकले नसावे, कारण आज आम्ही उठलो तर हवा अगदी कालसारखीच होती. 'नऊ वाजता गुलमर्ग गोंडोलाची तिकीटखिडकी उघडते, वेळेआधी अर्धा तास तिथे पोहोचायला हवे, नाहीतर रांग मारुतीच्या शेपटीसारखी वाढत जाईल आणि मग रखडपट्टी! गोंडोला उरकून आपल्याला आज पेहेलगामला पोहोचायचे आहे' हे गणित पुरते लक्षात असल्याने मी आळस झटकला आणि आवरायला सुरुवात केली. बाथरूमात गरम पाण्याची वेगळीच गंमत होती. पाणी जेव्हा गरम येत होते तेव्हा ते पुरेसे येत नव्हते आणि जेव्हा पुरेसे येत होते तेव्हा गरम येत नव्हते. तशाही परिस्थितीत आम्ही आंघोळी उरकल्या.

कथुकल्या ८

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
20 May 2017 - 2:27 pm

१. शेवटची इच्छा

"तात्या, पाणी तर वाढतच चाललंय. आता काय करायचं ?"

"चिंता करू नको. निलगिरीचं ते उंचच उंच झाड दिसतंय ना, त्यावर जाऊयात."

कथाशब्दक्रीडाप्रतिभाविरंगुळा

रव्याचे झटपट अप्पे

रुपी's picture
रुपी in पाककृती
20 May 2017 - 6:41 am

अगदी ऐन वेळी ठरवून सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहाच्या वेळी हे अप्पे करता येतात. जितके पटकन होतात, तेवढ्याच लवकर संपतातही :)

अनवट किल्ले ८ : दाजीपुर अभयारण्यात, शिवगड (Shivgad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
19 May 2017 - 6:44 pm

सुस्वागतम मंडळी ! या कोल्हापुरी रांगड्या मातीत सर्व मिपाकरांचे मनापासुन स्वागत. कोल्हापुर हे नाव आले की, महारांजाची धाकटी गादी, नवा आणि जुना राजवाडा, अंबाबाई मंदिर, साठमारी अशी अनेक एतिहासीक स्थळे डोळ्यासमोर येतात. खवय्याना तर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, तर माझ्यासारख्या घासफुसवाल्या मंडळीना मिसळपाव आठवतो. फॅशनप्रेमींसाठी कोल्हापुरी चपला आहेतच व खिसा हलका करायची तयारी असेल तर गुजरीला जाउन कोल्हापुरी साजाची ऑर्डर करुन कारभारणीला खुष करा, तर रसिक मंड्ळीना लावणी व कुस्तीचा आंनंद घेता येईल.

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
19 May 2017 - 2:26 pm

पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती.

धोरणसंस्कृतीइतिहाससमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचार

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग - नेपाळ भाग ९

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
19 May 2017 - 1:51 pm

याआधीचे भाग 'अनुक्रमणिका' वापरून वाचता येतील

आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/39406

सात सालको क्रांती - राणा राजवटीचा अंत आणि नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग!

हे ठिकाणलेख

मँगो पुडींग

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
19 May 2017 - 12:45 pm

aamba
साध्या सरळ शांत स्वभावाच्या नवय्राने एकोणिस वर्ष मला सहन केलं, मी करत असलेल्या प्रायोगिक रेसिपी नावं ठेवता खाल्ल्या म्हणून आज त्याच्यासाठी ही स्पेशल डीश! आंब्याचा सीझन आहे हे काही विसरून चालणार नाही!!
साहित्यः

बर्गर आणि वडापाव.

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
19 May 2017 - 10:29 am

ती : "का रे बोलावलंस मला या बागेत? असं काय महत्वाचं सांगायचं आहे म्हणालास? फोनवर बोलता आलं नसतं का आपल्याला? संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी बॉस काही मला सोडायला तयार होत नव्हता. एक अर्जंट लेटर टाईप करूनच जा म्हणत होता. शेवटी आले मी त्याला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं सांगून. त्यालाही माहीत आहे ना, आईच्या कॅन्सरचं! जा म्हणाला."

तो : "अगं हो! हो! जरा दम खाशील की नाही? बस की जरा या बेंचवर. बघ समोरच्या झोपाळ्यावर कशी लहान बाळं खेळताहेत. आणि ते बघ ती मुलगी फुलपाखराच्या मागे पळतेय. अरे! अरे! बघ कशी धपकन् पडली ना ती!!"

कथालेख