क्रृष्णमेघ
क्रृष्णमेघ
प्रणयी बरसून गेला
तो क्रृष्णमेघ होता.
. राधेच्या सांजशेल्याशी
हितगुज करूनी आला
म्रृद् गंधी चाहूल त्याची
मनात पसरूनी गेला.
अंग शहारून गेला
तो क्रृष्णमेघ होता.
घनगंभीर गर्जत आला
घनःश्यामाचा पांचजन्य जणू
जलप्रपाती मोहरली ती
तप्त धरेची अधीर तनू
मन वेडावून गेला
तो क्रृष्णमेघ होता.