सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 7:26 pm

माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते.

वावरसंस्कृतीकलासंगीतलेख

महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 5:16 pm

४ मुख्य पक्ष

भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही
शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय
राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला
काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे

सरकार पडणे अवघड आहे

पण

१) शिवसेना पुढे विकास पावेल का ?
२) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ?
३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?

राजकारण

बलात्काराच्या तक्रारी : खोट्या की खर्‍या

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 3:35 pm


प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीनं दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित व्यक्तीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

पुढे असंही म्हटलंय

मांडणीमाध्यमवेध

बाबाचं मन!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
31 Jul 2017 - 9:21 am

एवढस पिल्लू... My bundle of joy
हसून म्हणालीस... त्यात तुझे efforts काय?
आईने वाढवलं... जन्माला घातलं!
तुझं नाव लावून
हातात तुझ्या दिलं...
आहेस तू... असणारच आहेस!
माझं सगळं तर आईच बघते आहे..
घर तू चालवतोस?... तुला चालवायचंच आहे!
आपापलं जगणं आपण जगतोच आहे!
खरंय पिल्ला... वेळ नाही दिला..
माझं नाव आणि फक्त पैसा दिला!
आई सांगत होती तुझं लडिवाळ वागणं
तिच्या डोळ्यात दिसत होतं तुझं मोठं होणं!
वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन
मन सारं कधीतरी मोकळं करीन
पिल्लू जसजसं मोठं झालं
आकाश त्याला बोलावू लागलं

भावकविताकविता

मला भेटलेले रूग्ण - ३

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 4:27 am

http://www.misalpav.com/node/40338
६-७ ठिकाणी फिरून आली होती ; ती व तिचा नवरा कंटाळून बसले होते समोर ... त्याच्या बोलण्यात उदासीनता जाणवत होती ....

बरेच महिने झाले , ॲलर्जीचा त्रास काही कमी होत नव्हता बरेच दवाखाने झाले बरीच औषधं घेतली पण फरक पडत नव्हता ... "पहले दवा लेते थे तो जरासा आराम होता था अब तो बिलकुल भी नही " रडवेली होऊन बोलत होती आणि काहीतरी करा पण मला ह्यॅतून बाहेर काढा असा स्वर होता तिचा ...

औषधोपचार