मला भेटलेले रुग्ण
काय हो डॉक्टर परत परत यावंच लागतं... केबीन मध्ये शिरत असतांनाच तक्रार करतोय हा गृहस्थ ... मी फाईल हातात घेऊन बघतोय की नेमकं काय म्हणायचं आहे ह्यॅ माणसाला ; तर हा पेशंट आहे COPD चा (स्मोकिंग मुळे होणारा श्वासाचा आजार, दम्याचं अतिभयंकर रूप) दमा ४थ्या पायरीवर आहे कधीही ॲटॅक येऊन आयसीयु मध्ये जायची गरज पडू शकते आणि हा बुवा म्हणतो किती वेळा यायचं ? कधी पर्यंत औषधी घ्यायची ? (हा आजार बरा होत नाही तर हळूहळू वाढत जातो आणि औषधांनी फक्त आजाराचा वेग रोखता येतो....) बरं त्याउपर हा माणूस आजही बिड्या पितो आहेच .. दिवसाला १ बंडल =२५बिड्या तेही गेल्या ३० वर्षांपासून (२,७०,००० बिड्या - आख्खं बिडीचं दुकान भरून जाईल आणि बिड्या बाहेर पडतील)
पण ह्यॅचा मते मी (म्हणजे डाॅक्टरच जणू काही जबाबदार आहे कारण हा तर नियमीत औषधं घेतोय जरी बिड्या बंद नाही केल्यातरी ) कारण परत परत माझ्याकडे यायला नको आहे ना !!
मग मी न राहावल्यामुळे म्हणालो की एक काम करा बिड्या स्वस्त आहेत औषधं आणि माझ्या फिस पेक्षा त्यामुळे तेवढंच चालू ठेवा ....
कसंनुसं हसला गडी आणि मी शांतपणे त्याचं BP घ्यायला सुरू केलं ....
——————•———————
सहा महिने पुर्ण झाले होते .... तिचा TB चा कोर्स पुर्ण झाला होता आज कदाचीत शेवटची व्हिझीट असावी .... मी Xray करून घेतला आणि पेपर वर लिहीलं की ६ महिने औषधं नियमीत घेतली व कोर्स पुर्ण झाला ... मग पेशंटकडे बघून म्हणालो 'अभिनंदन तुमचा आजार बरा झालाय आता औषधं थांबवू तुमची'
(मी TB च्या बऱ्या झालेल्या प्रत्येक रुग्णाचं अभिनंदन करतोच कारण तो/ती लढाई जिंकलेली असतात आणि त्या क्षणी एका नव्या आयुष्याचा साक्षीदार असतो मी)
हि पेशंट रडत रडत केबिन मधून बाहेर पडली .... अगदी तशीच जेव्हा TB चं निदान झालं होतं त्या दिवशी ; मुलगा घेऊन आला होता तिला , मोठी फाईल होती त्यात Xray आणि बरेच रिपोर्टस होते पण न्युमोनिया बरा होत नव्हता आणि काय करायंच ते पण कळत नव्हतं... Xray बघतात कळलं मला काय निदान आहे ते... मग प्रश्न पुढे असतो की काय सांगायचं , कसा ईलाज चालेल काय काय करायचं आणि का कोर्स पुर्ण करायचा ... मी त्या दोघांशी २० मिनीटे बोलत होतो (TB च्या रूग्णाला ईतरांपेक्षा दुप्पट वेळ देणं गरजेचं असतं, जे लिहून दिलेल्या औषधांपेक्षा गरजेचं असतं)...
दिलेल्या प्रत्येक तारखेला पेशंट आणि मुलगा येत होते.. बरी झाली हे declare केल्यावर तिनं ३-३ वेळा thank you म्हटलं तेव्हा मी ठिक आहे ठिक आहे असं म्हणून या म्हटलं आणि पेशंट बाहेर गेल्यावर क्षणभर डोळे मिटून स्वत:चं पण अभिनंदन करून घेतलं....
- मला भेटलेले रुग्ण - २
- मला भेटलेले रूग्ण - ३
- मला भेटलेले रुग्ण - ४
- मला भेटलेले रुग्ण - ५
- मला भेटलेले रुग्ण - ६
- मला भेटलेले रुग्ण - ७
- मला भेटलेले रुग्ण - ८
- मला भेटलेले रुग्ण - ९
- मला भेटलेले रुग्ण - १०
- मला भेटलेले रूग्ण - ११
- मला भेटलेले रूग्ण - १२
- मला भेटलेले रुग्ण - १३
- मला भेटलेले रुग्ण - १४
- मला भेटलेले रुग्ण - १५
- मला भेटलेले रुग्ण - १६
- मला भेटलेले रुग्ण - १७
Book traversal links for मला भेटलेले रुग्ण
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आणि पेशंट बाहेर गेल्यावर
भारी... डॉक फायनली लिहिते
हेच म्हणतो
.
मस्तच अनुभव
जरा अजून अनुभव लिहा साहेब.
छान अनुभव... लिहीते रहा....
लिहीत रहा डॉक्टर! किस्से
लय भारी डॉक्टर ....
मस्त अनुभव..चांगलं लिहीताय.
छान अनुभव. अजून येऊ द्यात.
वा!
सुंदर अनुभव !
मस्त
छान अनुभव !
टी.बी. चे रुग्ण बरे करत
MDR ,XDR & TDR....
सुंदर लिहिलय!! तुमचे अजुन
असंच म्हणते !!
मम
फार छान. अजून अनुभव वाचायला
+1
छान!
छान लेख
मस्त
छान लिहिताय
अस्च म्हणते!
सर्वांचे आभार्स...
जे काही वेगळे किंवा चांगले
लिहीत रहा....
छान !
अजून येऊ द्यात