एका वेडाला पुनश्च सुरुवात!

mayu4u's picture
mayu4u in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 3:21 pm

“मी पुन्हा सायकलिंग सुरु करणार आहे!" (भीत भीत) अस्मादिक.

“उत्तम कल्पना! चांगलीशी सायकल घे आणि सुरु कर.” तीर्थरूप. (चेहऱ्यावर sadist हसू)

“शाळेत पण नाव घालूया का?” सौ.

“किती पैसे उडवणार आहेस?” मातोश्री.

“साधारण १५ - २० हजार" (पडलेल्या आवाजात) मी.

“एवढे? त्यापेक्षा बँकेत ठेव!” (अर्थातच) मातोश्री.

“त्यापेक्षा घरी टीव्ही घे!” (फणकाऱ्याने) सौ.

===============================================================================

मुक्तकमौजमजाप्रकटन

निरभ्र आकाशातील ' मृग नक्षत्र'

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 11:17 am

'ओरायन ' म्हणजे खगोलीय भाषेत काय ?

आपणांस माहित असेल कि जागतिक मान्यतेनुसार एकूण ८८ तारकासमूह (Constellation)आहेत.
जगात वेगवगेळ्या पुरातन संस्कृतीमध्ये, (जसे ग्रीक, प्राचीन सुमेरियन, चिनी, भारतीय) अनेक तारकांचा बनलेल्या समूहाला वेगवेगळी नावे आहेत. तसेच त्यांची संख्या वेगवेगळी आहे. शिवाय तारकासमूहांतील ताऱ्यांची संख्या पण कमीअधिक आहे. आपल्याकडे नाही कां २७ नक्षत्रे आहेत ?

मांडणीविचार

प्रतिशोध भाग-४

कऊ's picture
कऊ in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 10:03 am

भाग १ -http://www.misalpav.com/node/40584

भाग २ -http://www.misalpav.com/node/40583

भाग ३- http://www.misalpav.com/node/40568

भाग ४

पुढच्या दिवशी
कॉलेज कँटिन मध्ये काव्या स्वतःच्याच तंद्रीमध्ये बसली होती.
आतापर्यंत सियालचे किती कॉल येऊन गेले पण तिने उचलला नाही.

"हाय काव्या, आज एकटीच,गँग कुठे ग तुझी.."स्वरा तिच्या समोरच्या खुर्चीत बसून बोलली.

कथाविरंगुळा

अत्तर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Sep 2017 - 1:10 am

कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!

शिवकन्या

अदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कवितासांत्वनामांडणीसंस्कृती