प्रतिशोध भाग 1

कऊ's picture
कऊ in जनातलं, मनातलं
13 Aug 2017 - 10:45 am

प्रसंग पहिला

" शीट यार ,खूपच late झाला.
एवढा ngo चालवतो हा आकाश , पण एका मेंबरला माझ्यासोबत पाठवू शकला नाही का.
मीच मूर्ख जी गेली रांगोळी काढायला.
पुन्हा सकाळी जायचय रांगोळी काढायला.
गुढीपाडवा ना..
रात्री जागून रांगोळ्या काढा मग सकाळी मस्त तयार होऊन Rally मध्ये भाग घ्या.."

स्वतःशीच बडबडत ती चालत होती.[आकाश एका NGO (संस्थेचा) अध्यक्ष..]
आणि ती???बिचारी आकाश साठी अन संस्थेसाठी म्हणून रात्री 10.30 ला गेली,रांगोळी काढायला..
तो बैठकीवरून येईपर्यंत लेट झाला आणि म्हणून तिला रांगोळी पूर्ण करून घरी जायला लेट झाला..
1-1.30 वाजले असतील रात्रीचे...
रस्ता सामसूम...

ती- "चिटपाखरू पण नाही रस्त्यावर....अस का बरं???शी यार मोबाईलची बॅटरीपण लो...LIFE मध्ये BF नसला तरी चालेल पण मोबाईलची बॅटरी ती फुल हवी.."
तशी ती धीटाची अगदी झाशी की राणी नाही पण आज जरा घाबरत घाबरतच जात होती..रांगोळ्या काढताना आकाशने मुद्दामच भूतांचा विषय काढला..
शेवटी तिने ठरवल की Shorcut ने जायचं.
किमान कुठेतरी कुत्रा-मांजर तरी दिसेल.

ती-"सियाल असता सोबत तर किती चांगल झाल असतं...."
( सियाल कदम तिचा सिनीयर एक वर्षाने..दोघ एकाच काॅलेज मध्ये शिकत होते.तिच्यात आणि सियालमध्ये कितीतरी गोष्टी काॅमन होत्या.
दोघपण श्रीगणेशाचे निस्सीम भक्त.
काॅलेजच्या जवळच असणार्या गणपती मंदिरात दर मंगळवारी दोघेपण जायचे..असो ..)

ती - "अशा परिस्थितीत सियाल का आठवतोय मला.
तो पण बाकीच्यांसारखा माझा एक फ्रेंडच आहे ना.
पण इतरांपेक्षा नक्कीच वेगळा आहे..

"चालता चालता ती अचानक थांबते.
त्या भयाण शांतेत तिला कोणाची तरी चाहूल लागली
.कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येत होता.
जणू कोणतरी तिचा पाठलाग करत होतं...त्या शांततेला चिरणारा पावलांचा आवाज थांबला होता.
पण आता तिच्या श्वासाचा आवाज स्पष्ट येत होता..घाबरलेली ती...रात्रीच्या त्या गारव्यात पण तिला घाम फुटला होता...देवाचं नाव घेऊन ती पुन्हा चालू लागली..पुन्हा तेच...

ती- "खरचं कोण माझ्या मागे आहे की मला भास होतोय.."

शेवटी तिने ठरवल जे होईल ते होईल बाप्पाच नाव घेऊन मागे बघायलाच हवं.
आणि अखेर तिने मागे वळून बघितलच..एक थंड हवेची झुळूक तिच्या सर्वांगावरून गेली.तिने तिचे डोळे भीतीने गच्च मिटून घेतले..
क्षणातच तिने डोळे उघडले पण तिच्या डोळ्यात आता भीतीचा लवलेशही नव्हता..

कदाचित तिथे कोणच नव्हतं म्हणून भीती नाहीशी झाली असेल..

प्रसंग दुसरा
स्थळ - कुमारचे घर

एखाद वाईट स्वप्न पडल्यावर माणूस अचानक खडबडून जागा होतो तशीच अवस्था कुमार ऊर्फ कुम्याची झाली होती.घाबरून घामाने अंगावरचा टी-शर्ट पण भिजला होता.घरात अजून कोणच नव्हत...
मग तो आवाज ..
तो आवाज कोणाचा होता...
"हा आवाज कुठून येतोय?कम ऑन कुमार..तू कधीपासून एवढा डरपोक झालास...कोण चोर तर घुसलं नसेल ना घरात..आता option नाही बाॅस उठून बघावच लागेल.."
कुमार मनातच हे बरळत होता.
शेवटी होय- नाही करून उठलाच गडी.
चालताना तोंड जरी बंद होतं तरी मनात मात्र विचारांच काहूर उठलेल होतं...

"Wah गुढीपाडवा आणि इथे आमच्याकडे लाईटच नाही.
नशीब मोबाईल आहे सोबत.."
बिचकत बिचकत कुमार त्या आवाजाच सुगावा घेत होता.आवाज किचन मधून येत होता..
(कुमार त्याची ओळख म्हणजे बडे बाप की औलाद.
मित्रांवर जीव लावायचा पठ्ठ्या.
.एका राजकीय पक्षात युवानेता म्हणून कार्यरत पण होता..आता घरात एवढी संपत्ती म्हणजे घर मोठ असणार ना.घर कसलं बंगलाच होता तो..आणि त्या बंगल्यात आज एकटाच होता कुमार..
खरच एकटा होता की घरात अजून पण कोणाच अस्तित्व होतं ते बघूया आता..)
किचन मध्ये मोबाईलने उजेडात त्याने सगळीकडे बघितलं.
पण काहीच विचित्र अस त्याला दिसत नव्हतं.भास झाला की काय असा विचार करून त्याने किचन कडे पाठ फिरवलीच होती की तेवढ्यातकिचनच्या खिडकीवर काहीतरी आदळल्यासारखा आवाज आला..कुमारने मान मागे वळवली..
आणि त्याने मोबाईलचा प्रकाश किचनच्या काचेच्या खिडकीवर टाकला....

आणि.
त्याला दिसले रक्ताने माखलेले हाताचे ठसे.
हातातला मोबाईल तिथेच टाकून कुमार तडक त्याच्या बेडरूमच्या दिशेने धावत सुटला.
जाताना एकदोन वेळा धडपडला ..
रूम मध्ये गेल्यावर रूमचा दरवाजा खिडकी त्याने लावली.
अंगावर चादर घेऊन तो हनुमान चाळीसा बोलायला लागला ते पण पहाट होईपर्यंत...

प्रतिशोधाची सुरूवात तर झाली..आता या प्रतिशोधाच्या आगीत कोण कोण जळून खाक होतते पुढच्या Part मध्ये.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

13 Aug 2017 - 1:44 pm | ज्योति अळवणी

चांगली सुरवात. पण लिंक लागताना थोडं अडखळल्या सारख होत आहे.