1

अत्तर

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Sep 2017 - 1:10 am

कपडे
कितीही मळले,
जुने झाले,
रंग उडून गेला
वीण उसवून गेली
घड्या विस्कटून गेल्या
तरी
कधीतरी लावलेले
मायेचे भरजरी अत्तर
मंदपणे दरवळत राहते!
.
.
.
माणसं अशी
अत्तर असती तर..!

शिवकन्या

अदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कवितासांत्वनामांडणीसंस्कृती

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

12 Sep 2017 - 9:23 am | प्राची अश्विनी

सुरेख! शांताबाईंची पैठणी आठवली.

एस's picture

13 Sep 2017 - 12:09 am | एस

अत्तराचं आपलं बरं असतं
बंद दाराआड
कपाटाच्या कुठल्याश्या खणात
भरजरी शालूला
नाहीतर ठेवणीतल्या कोटाला बिलगून
मंदपणे दरवळत राहतं
जुन्या आठवणींच्या
रम्य जगात हरवून जावं तसं
त्याला ना घडीचा सोस
ना उन्हपावसाचा मारा
ना धुण्याचा सासुरवास
नाजूक कळीसारखं
कोमेजतं लग्गेच
.
.
.
.
.
अत्तरही कापडासारखं टिकतं, तर?

सिरुसेरि's picture

14 Sep 2017 - 6:34 pm | सिरुसेरि

कविता आणी प्रतिसाद ..दोन्हीही मस्त .