निमशहरी भारताचा बंडखोर नायक : अजय देवगण

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 11:13 am

अजय देवगणबद्दल वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळी मतं आहेत. काही लोक (विशेषतः स्त्रिया) त्याच्या इंटेन्स डोळ्यांच्या प्रेमात आहेत. काही लोकांना तो 'अल्टिमेट अंडरडॉग' वाटतो. काही लोकांना खान त्रयीला आव्हान देणारा 'आपला' माणूस वाटतो. काही लोकांना तो 'अॅव्हरेज' अभिनेता वाटतो. पण माझ्या तालुक्याच्या ठिकाणी वकिली करणाऱ्या मित्राने अजय देवगणला परफेक्ट डिकोड केले आहे.

चित्रपटलेख

उपवासाचे ढोंग

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 8:16 am

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. ( या मुद्द्याबाबत पारंपरिक आरोग्यशास्त्रे आणि आधुनिक वैद्यक यांच्यात मतभेद आहेत असेही दिसून येते). परंतु वास्तव काय दिसते?

संस्कृतीविचार

कुलुप

RDK's picture
RDK in जनातलं, मनातलं
19 Sep 2017 - 11:59 pm

लोणावळयाला उन्हाळयाचे भय कसले?? डोंगराच्या मध्यभागी वसलेल्या या शहराचे सौभाग्य की ग्रीष्माच्या तापत्या उन्हाचा कोप याला कमीच सहन करावा लागत होता. तरीही नाजुक प्रवृत्तिची लोक डोक्यावर छत्र्या धरून निसर्गाने दाखविलेल्या औदार्याप्रती कृतघ्नपना दाखवित होती.

कथासाहित्यिकसमाजजीवनमानkathaa

का पुन्हा???

RDK's picture
RDK in जे न देखे रवी...
19 Sep 2017 - 11:54 pm

ती अनोळखी भावना कागदावर उतरत नाहीये
हा मनातला गुंता सूटता सूटत नाहीये
प्रश्न राहिले आहेत अनुत्तरित माझे
पण तो अस्पष्ट चेहरा पुसला जात नाहिये

शांत हृदयाचे तार छेडले गेले
की भरलेल्या जख्मा उघड्या पडल्या
प्रेमाचे का हे सुर जे हृदयी वाजतात
का वेदना पुन्हा माघारी वळल्या

परिवर्तन अनिवार्य आहे परंतु
क्षणभंगुर कसे काय होते
कोरडे दुष्काळी हृदय माझे
भरूनी लगेच रीते कसे होते

का वाटा पुन्हा पाउलाखाली याव्या
जिथे मी एकटाच घुटमळत उभा
का मग असावी जाणाऱ्याला
सोडूनी पुन्हा परतन्याची मुभा

कविताप्रेमकाव्यविडंबन

आज पुन्हा

RDK's picture
RDK in जे न देखे रवी...
19 Sep 2017 - 11:52 pm

आज पुन्हा

आज पुन्हा जगाच्या पायाशी पडलो
आणि दुःखाभोवती लोटांगण घातले
कोरडे ठणठणीत पडलेले डोळे
पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले

त्या उगवत्या प्रेमाचे किरण
दुःखाची झोप मोडणारच होते
पण भ्रमनिरासेच्या थंडीत कडक
मन माझे पुन्हा घोरत पडले होते
या मोठेपणाच्या गदारोळात खोट्या
माझ्यातले बालक पुन्हा रुसले
कोरडे ठणठणीत पडलेले डोळे
पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले

कविताप्रेमकाव्यविडंबन