योग- ध्यानासाठी सायकलिंग
नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं.