अविश्वसनीय सत्यकथा - डीएनए मिसमॅच

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
29 Sep 2017 - 12:42 am

मुलांचे (मुलगा आणि मुलगी दोन्हीचा यात समावेश आहे) डीएनए त्यांच्या जैविक मातापित्यांशी जुळतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. त्यातही एखाद्या वेळेस पिता कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट लागेल पण जन्मदाती आई तर कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्टची सुद्धा गरज भासू नये.

समाजजीवनमानमाहितीसंदर्भ

८ आणि ९ ऑक्टोबर - मोदक की सवारी, चली कन्याकुमारी! - ३५०० किमी.. १२ दिवस..! (समाप्त) - Live Updates

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
28 Sep 2017 - 11:04 pm

लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
28 Sep 2017 - 10:37 pm

आज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे.
लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!

कलासंगीतचित्रपटशुभेच्छा

दिमाग का दही (शतशब्दकथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
28 Sep 2017 - 5:50 pm

ऑफिसचा पहिला दिवस.

मस्तपैकी लवकर उठलो...अंघोळ वगैरे आटपून कपड्यांना इस्त्री केली...मग घातले! फॉर्मल शर्ट... इन केला. नवा चेरीचा डबा फोडून बुटपॉलिश उरकलं.

सकाळी ऑफिसात पायधूळ झटकणारा पहिलाच एम्प्लॉयी. कुठे बसायचं माहित नसल्याने रिसेप्शनला सोफ्यावर रेलून मॅगझीन चाळत बसलो.

ऑफिसबॉयने इंटरव्हयूला पाहिलेलं मला. ओळखून हसला, म्हणाला, "काय घेणार सर?" मी खूषच, ऐटीत, "काय मिळत आपल्या ऑफिसात?"

एखाद्या सराईत वेटरसारखा तो उत्तरला...,

संस्कृतीकथाविनोदमौजमजालेखविरंगुळा

बुलेट ट्रेन (भाग ६)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
28 Sep 2017 - 2:56 pm

मागील पाच भागात आपण भारतातला ताजमहाल, अमेरिकेतील हूवर धरण, जपानची शिन्कान्सेन, तैवानची बुलेट ट्रेन, श्रीलंकेचा मटाला राजपक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉंगकॉंगचा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आर्थिक बाजूंचा विचार केला. यातील हूवर धरण, शिन्कान्सेन आणि हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडल्यास इतर प्रकल्प आर्थिक दृष्ट्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरले आहेत हे देखील पाहिले.

अर्थकारणविचार

वर्ष-अखेरच्या सुट्टीसाठी ठिकाण सुचवा

लई भारी's picture
लई भारी in भटकंती
28 Sep 2017 - 2:38 pm

आम्ही दोघे नवरा-बायको आणि दीड वर्षाच्या जुळ्या मुली, कुठेतरी निवांत ठिकाणी जायचं म्हणतोय.

२३ डिसेंबर ते १ जानेवारी असा कालावधी उपलब्ध आहे; तरी त्यातल्या त्यात गर्दी कमी असावी म्हणून २६-३० डिसेंबर असा ४-५ दिवसाचा प्लॅन करावा असं डोक्यात आहे.(मागे पुढे करू शकतो)

पुष्कळ दूध शिल्लक आहे किंवा दिमाग का दही

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
28 Sep 2017 - 2:33 pm

पुष्कळ दूध शिल्लक आहे काय करावे सांगता काय?
पोस्ट पडताच धाग्याकडे मस्क-यांचे वळले पाय

"मांजर पाळा" मुनी म्हणाले, विंटुविं कुत्रा म्हणती
हसत सुटले गंमतजंमत, Ana पनीर सुचविती

आज्जी सांगे फुल्ल रेशिपी अन्  युक्तीचे सहा धडे
कशास इतुके दूध आणावे अभिजिताला प्रश्न पडे

खवा सुचविती सूड , लेखकु, दही लावाया पैताई
उगा काहीतरी करून राहिले आंघोळीची लई घाई

दान करावे मदतनिसेला मनीमौ सुचवू जाई
मापं आणिक ज्ञानेशांना मुलांवरी करुणा येई

या सा-यातच दूध मसाला तेजसजींना आठवले
चहा पाजवा पुणेकरांना  सौराअभ्याने चिडविले

आरोग्यदायी पाककृतीविडंबन

शेअरबाजार :Tips Are for Waiters, Not Traders. भाग II

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in जनातलं, मनातलं
28 Sep 2017 - 9:25 am

“मितरों…..” (ईतना सन्नाटा क्यों हो गया भाई??) शेअरबाजारांतील टीप्स, सल्ले यांतुन हमखास पैसा कमवायचे माझे एक 'टॉप सिक्रेट' (फक्त आपणालाच) सांगुन विषयावरील चर्वितचर्वण एकदाचे थांबविणार आहे. ऐकणार ना ??

मी यासाठी सर्वप्रथम बाजारांत नियमितपणे ट्रेडिंग करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे पत्ते, मोबाईल नंबर, ई-मेल आपणा सारख्यांच्याकडुन मिळवतो. समजा माझ्याकडे किमान काही हजार सभासदांची अशी तपशीलवार माहिती आहे...मी ह्या माहितीची संगणकीकृत पृथ्थ्करण करुन 02 समान गटांत विभागणी करतो..हे अर्थातच काही खुप कठीण काम नाही....

गुंतवणूकलेख

बुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
28 Sep 2017 - 8:10 am

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात मुक्त व्यापाराचे वारे वाहात होते. अॅडम स्मिथने सांगितलेल्या अर्थविषयक अनेक तत्वांपैकी काही काही तत्वे युरोपातील देशांनी स्वीकारायला सुरुवात केली होती. 'देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा' हे तत्व मान्य झालेले होते. सरकारने बाजारात पडू नये, केवळ कायदे करावेत आणि राजनैतिक संबंध सांभाळावेत हे तत्व अर्धेमुर्धे पटलेले होते. अर्धेमुर्धे म्हटलं कारण सरकारने बाजारात उतरू नये हे तत्व युरोपातील बहुतेक सरकारे पळत होती पण अॅडम स्मिथचा ज्याला तीव्र विरोध होता टी मक्तेदारी मात्र सरकारी आशीर्वादाने फोफावत होती.

अर्थकारणविचार