La Ruta del Cares
अटलांटिक महासागराला पायाशी घेऊन उभा असणारा उत्तर स्पेन! लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरच्या खर्याखुर्या पाऊलखुणा इथे पाहायला मिळतात, तशीच पस्तीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वी मानवाने रंगवलेली गुफाचित्रंही. पण सोळाव्या शतकात अमेरिका खंडाहून युरोपला परतणार्या खलाश्यांसाठी या भागाचं वेगळंच महत्त्व होतं. जिवावर उदार होऊन केलेल्या सागरसफरीनंतर युरोपच्या भूमीचं प्रथमदर्शन त्यांना होत असे उत्तर स्पेनच्या एका पर्वतरांगेमुळे.