मराठी भाषा प्रेमींचा कट्टा

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
29 Apr 2016 - 10:31 am

नमस्कार मंडळी,

१ मे च्या महाराष्ट्र दिनानिमित्त मायमराठीवर प्रेम करणार्या लोकांचा सर्वसमावेशक कट्टा उद्या संध्याकाळी संभाजी उद्यान, पुणे येथे आयोजीत करण्यात आला आहे, ज्यात मराठी ब्लाॅगर्स, इतर मराठी संस्थळावरील आयडी हजेरी लावू शकतात.

वेळ: शनि. दि. ३० एप्रिल २०१६, संध्याकाळी ५ ते ८

कट्ट्यानंतर रात्री सुकांताला आमरस थाळीचा पर्याय उपलब्ध आहेच.

अधिक माहितीसाठी येथेही पाहावे.

वावरप्रकटन

वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
29 Apr 2016 - 12:27 am
समाजजीवनमानतंत्रशिक्षणमौजमजालेखअनुभवमाहिती

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 10:24 pm

===================================================================

विज्ञानबातमीमाहिती

निर्णय

तुषार जोशी's picture
तुषार जोशी in जे न देखे रवी...
28 Apr 2016 - 7:46 pm

तू विचारशील आईबाबांना सांगितलेस का?
तेव्हा म्हणेल काळजी नको त्यांना मी पटवतो
तू म्हणशील मला त्यांना भेटायचे आहे
तेव्हा म्हणेल मला तर मनभरून भेट त्यांना लवकरच भेटवतो
.
हात धरेल किस करेल भेटताच मिठी मागेल
तुझ्याशिवाय जगात कुणीच नाही अगदी असाच वागेल
तो म्हणेल आता सहन होत नाही संपूर्ण भेट व्हावी
तुलाही वाटेल कित्ती प्रेम आहे प्रेमात दूरी नसावी
.
तुम्ही दोघे एक व्हाल त्याच्या मित्राच्या खोलीवर
तन मन धुंद होईल प्रितीच्या देह बोलीवर
त्यानंतर तुला कळेल तो खरा आहे कसा
देहाची किंमत देऊन मिळेल तुला आरसा
.

कविता

सावली

तुषार जोशी's picture
तुषार जोशी in जे न देखे रवी...
28 Apr 2016 - 7:45 pm

कधी सांजवेळी मनाच्या तळाशी
निनावी क्षणांचे धुके दाटते
तुझ्या आठवांच्या मीठीतून घ्यावी
पुन्हा ऊब थोडी असे वाटते

लपेटून घेता तुझ्या आठवांना
उमेदून येते पुन्हा पालवी
उफाळून येते मनातून प्रीती
उरी जागवे नित्य आशा नवी

कधी खिन्न होतो जगाच्या उन्हाने
तुझे भास आयुष्य देती मला
तुझे शब्द येती क्षणांच्या रूपाने
जगावे कसे हेच सांगायला

तुझ्या सावलीचे कवच दाट आहे
जगाची उन्हे बाधती ना मला
तुला आठवोनी पुन्हा सिद्ध होतो
अनेकांप्रती सावली व्हायला

~ तुष्की नागपुरी
नागपूर, २२ जून २०१३, ११:००

कविता

भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा - IRNSS

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 7:08 pm

मागे GPS वर लिहिलेल्या लेखात संपूर्ण भारतीय बनावटीच्या ग्लोबल पोजीशानिंग सिस्टिमचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलेल्या आयआरएनएसएस (IRNSS) प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीने आज एक मैलाचा दगड पार केला.

जीवनमानतंत्रविज्ञानमाध्यमवेधबातमी

मन

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
28 Apr 2016 - 5:16 pm

मन धावून धावून जातं
आणि बिलगतं -
पानाफुलांना,
वृक्षवेलींना, रानवाटांना,
डोंगरदऱ्यांना.

मन पंख उघडतं
आणि झेपावतं
त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात;
आणि तरंगत, उमलत राहतं
एखाद्या शुभ्र मेघासारखं.

मन चांदण्यात जाऊन बसतं
आणि अबोल रात्रीला पुसतं
तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं.

मन वहिवाट सोडतं
आणि निघतं त्या वाटेने
ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत,
दिशा आणि देशांचे फलक नाहीत;
जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !

मुक्त कविताकविता

एक संघ मैदानातला - भाग २

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 4:52 pm

डायरेक्ट दुपारी ४ ला डोळे उघडले.... मस्त झोप झाली होती. परत जेव्हा संध्याकाळी ग्राउंडवर पोचले तेव्हा एक गुड न्यूज मिळाली... आप्पा फक्त सकाळीच येणार होते. हुशशश..... सुटलो, निदान संध्याकाळी तरी मिलिटरी ट्रेनिंग नसणार हे ऐकून जीवात जीव आणि पायातही जीव आला.

समाजविरंगुळा

नो आय डोन्ट........

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 4:28 pm

तुला लग्न करायचय का नाही हे मला एकदाच आणि स्पष्ट सांग, म्हणजे मी तुझ्या परत परत मागे लागनार नाही, कळ्ल?

आई पुन्हा एकदा त्याच विषयावर येउन थांबली. आता तर हे रोजच झालं होतं. अजुन किती दिवस मी या सगळ्यापासुन पळणार आहे? कधी ना कधी सत्य सांगावच लागनार ना? कधी ना कधी तर आज का नको? बास झालं आता...... मी आहे अशी तर त्यात माझा काय दोष आहे? मी का लपवू सगळ्यांपासून .......... आज सांगायलाच हव. आज नाही तर कधीच नाही.
ह्म्म...................

'आई मला तुला काही सांगायचय.....माझ्या लग्नाबद्दल........................'

कथा

खर तर मीच द्वाड :)

सुजल's picture
सुजल in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 3:50 pm

रात्रीचे आठ - साडे आठ तरी वाजले असतील. आमचं अवाढव्य शिप पोर्ट मध्ये उभ होत पण आजूबाजूच्या शांततेमुळे धडकी भरत होती. आजूबाजूच्या पाण्यावर काळोख तर होताच पण पाण्याचा डुबुक डुबुक असा अधून मधून येणारा आवाज चांगलाच अस्वस्थ करत होता. एक प्रकारची वातावरणात निरव शांतता होती आणि त्या अपुर्या प्रकाशात आम्ही शिप ला लावलेल्या तात्पुरत्या जिन्यावरून आमची दिवस भरात केलेली खरेदी ( दोन अवाढव्य ब्यागा ) शिप वर चढवत होतो. एक प्रकारे खूप मुश्किल काम आणि घाम काढणार काम होत ते. पण नेटाने आम्हाला करण भागच होत.

मुक्तकलेख