प्रश्न मधमाश्या आणि मिपा मोहोळ

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
7 May 2016 - 10:07 am

अनुभव आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा

"नाही नाही ही कुठलीही प्रश्न मंजुषा नाही की सैराट बद्दल महाचर्चासाठी काढ्लेला धागा नाही. सांगतो अगदी शिस्तीने सांगतो,आधी दुसरी गोष्ट शिरस्तयाप्रमाणे सांगतो नंतर पहिली आणि शीर्षकातली गोष्ट सांगतो.

त्याचे असे झाले काल कंपनीतून घरी जाताना,मुलाला त्याचे १०वी च्या क्लासवरून घरी घेऊन जात होतो,मार्ग वल्लींचा परिसर ते मोरे नाट्यगृह मार्गे चिंचवड.मुलगा गाडीवर मागे होताच (नाही आम्ही आलटून पालटून चालवित नव्हतो माझी स्कूटी) नेमका मोरे नाट्यगृहापाशी आल्यावर मुलानेच सांगीतले."बाबा आम्बा महोस्तव दिसतोय इथे लागलेला अत्ताच बोर्ड वाचला, जाऊयात ना."

मुक्तकसमाजजीवनमानअर्थव्यवहारशिक्षणअनुभवमत

सैराट : माझीही एक भर

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जनातलं, मनातलं
7 May 2016 - 2:44 am

हा सैराटचा रिव्ह्यू नाही. या सिनेम्यामुळे आलेले मनातले असंबद्ध विचार तितक्याच असंबद्ध रितीने मांडायचा प्रयत्न समजा.

चित्रपटलेख

दुष्काळ निर्मुलनासाठी ग्राम स्वराज्य अभियानचा खारीचा वाटा व आवाहन

विशाल चंदाले's picture
विशाल चंदाले in जनातलं, मनातलं
6 May 2016 - 5:24 pm

मंडळी,

सध्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. मराठवाड्यात तर फार विदारक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. यावर काही करावं म्हणून ग्राम स्वराज्य अभियान टीम
चे दुष्काळावर आणि एकंदरीतच जल/मृदा संधारणावर कामे करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या दोन ते अडीच वर्ष्यापासून लोकसहभागातून बोरवंड, परभणी येथे काम सुरु आहे.

समाजमाहिती

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
6 May 2016 - 11:42 am

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

दिव्यांना नको तू करु मंद राणी
तुला पाहण्याचा मला छंद राणी

पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले
खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी

मला घे मिठीच्याच कैदेत आणि
नको गे करु तू खुले बंध राणी

तुला मी मला तू असे प्राशवावे..
पुरी रात व्हावी मधू धुंद राणी..

तुला लागला सावळा रंग माझा
तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी

- कानडाऊ योगेशु

कविताप्रेमकाव्यगझल

आधी सोसायचे ,मग हासायचे

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
6 May 2016 - 9:52 am

आधी सोसायचे ,मग हासायचे
आधी रुजायचे, मग फुलायचे

स्वप्न पेरायचे, अश्रू वेचायचे
अश्रू पाजायचे, स्वप्न पोसायचे

खेळ मांडायचे, जरी मोडायचे
मांडणे-मोडणे, एक मानायचे

तारे माळायचे, नभ नेसायचे
आपलेच रूप, मग बघायचे

वाट चालायचे, तुला शोधायचे
स्वत्तःला हळूच , मागे सोडायचे

कविता

बेधुंद (भाग ९ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
6 May 2016 - 1:51 am

परीक्षा जवळ आल्याने अक्षाने 'शिवेकाला' भेटायचे अन अमित चे फोन उचलायचे सोडून दिले ! तसाही काहीही फायदा नव्हता !
त्याच काळात 'MPSC' चा निकाल लागला होता . त्याच्याच जिल्ह्यातील त्याचा एक M.Tech करणारा सिनिअर - सचिन MPSC परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाला होता , वर्ग- २ ची 'पोस्ट' मिळाली तरी त्याचे काही वाईट वाटत नव्हते . त्याचबरोबर M.Sc चे विद्यार्थी ढिगाने पास झाले होते . काहीजण उपजिल्हाधिकारी ,काहीजण मुख्याधिकारी तर काहीजण जिल्हा पोलिस अधिक्षक !
M.Tech करणाऱ्या ११ पैकी ७ जन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले होते .

कथाविरंगुळा

आप की आखों में कुछ .......!

१००मित्र's picture
१००मित्र in जनातलं, मनातलं
6 May 2016 - 1:39 am

आप की आखों में कुछ
मेहेके हुएसे राज हैं
आप से भी खूबसूरत
आप के अंदाज हैं !

काय म्हणावं यार ह्या गाण्याबद्दल ! रेखाला सुरेख म्हणावं , कि विनोद मेहराला ! चित्रीकरणाची तारीफ करावी , की आर डी सारख्या संगीतकाराची ! किशोरच्या सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ ,उमद्या तरीही भाऊक अशा अस्सल मर्दानी आवाजाची तारीफ करावी कि लता बाईंच्या स्वर्गीय पण लाडिक (तशी त्यांची अशी लाडिक गाणी कमी आहेत) आवाजाची ! दिग्दर्शक माणिक चटर्जी हे नाव फार ऐकिवात नाही ,परंतु त्याने ह्या गाण्याला वातावरणाचा इफेक्ट मात्र अतिशय सुंदर साधलाय !

संगीतआस्वाद

भारतीय भौगोलीक अवकाशी माहिती (नकाशां) प्रसारणांवर अतीकडक निर्बंधाचा कायदा येताना

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 May 2016 - 12:33 am

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने भारतीय भौगोलीक अवकाशी माहिती (नकाशां) प्रसारणांवर अतीकडक निर्बंध घालण्याच्या उद्देशाने The Geospatial Information Regulation Bill, 2016 हा मसुदा विचारार्थ (पिडीएफ) ठेवला असून jsis@nic.in या इमेल पत्त्यावर ३० दिवसांचे आत फिडबॅक मागवला आहे.

तंत्र

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) - फोटो - हाइड पार्क

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
5 May 2016 - 11:49 pm

हे फोटो Hyde park चे आहेत आणि एक फोटो Marble Arch चा आहे.

आज इतकेच फोटो टाकता आले त्याबद्दल मी दिलगीर आहे. याच्या पुढच्या भागात आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व भागातील फोटो टाकेन. आणि त्यानंतर क्रमाक्रमाने फोटो टाकत राहीन. पुन्हा एकदा फोटो उशिरा टाकल्याबद्दल मी आपली दिलगीर आहे. तुम्ही सर्वांनी फोटो संदर्भात केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. फोटो मोबाईल वरून काढले आहेत त्यामुळे clarity म्हणावी तितकी चांगली नाही तरी हे गोड मानून घ्यावे हि विनंती :) लौकरच पुढचे भाग आणि फोटो सुद्धा टाकेन.

'सह'ज जमेल

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 11:16 pm

प्रस्तावना -
मनातलं ब्लॉग्वर लिहायला लागले तेव्हा दोन महिन्यांपूर्वी हे दोन लेख लिहिले. लेखाचा सूर उपदेशात्मक आहे हे मान्य! पण ते माझे विचार मंथन आहे. सद्य परिस्थितीत काही खटकणार्या गोष्टींमुळे/वागण्यामुळे मनात आलेले विचार लिहिले आहेत म्हणुन तसा सुर त्या तमाम लोकाना उद्देशून आहे. कदाचित तुम्हालाही ह्या गोष्टी खटकत असतील असे वाटले म्हणुन तुमच्या बरोबर शेअर करते आहे. आणि म्हणुनच हे 'जनातलं मनातलं' ह्या सदराखाली लिहित आहे. :)

पहिला लेख - सहज जमेल असे

समाजविचार