वादळचा उत्तरार्ध

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
25 May 2016 - 6:31 pm

अलीकडेच रातराणीच्या कळते रे फॅनक्लबमध्ये सामील झाल्यावर त्यांच्या जुन्या कथाही वाचून काढल्यात आणि मग त्यांनी सुचविल्याप्रमाणे वादळ (शतशब्दकथा)चा उत्तरार्ध लिहण्याचे ठरवले. पण शतशब्दाच बंधन नाही घालून घेतलं.
रातराणी .. बघा काही जमलंय का ? जास्त टाकावू वाटल्यास संमना धागा उडवायला सांगा बिनधास्त.
---------------------------------------------------------------------

कथाप्रतिसादआस्वादलेख

मायीवाली ग्लोबल कविता

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
25 May 2016 - 4:16 pm

'कविता वृत्तात हवी'
'हओ'
'कवितेला लय हवी'
'हओ
'कवितेत सुयोग्य यमक हवेत'
'हओ
'कविता जगातल्या कुठल्याही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी हवी'
'मंजे?'
'म्हणजे कविता ग्लोबल हवी रे'
'अच्छा! हओ!'

कविता

बारा अमावास्यांचे अंधार

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
25 May 2016 - 4:12 pm

संभोगावेशात मला तू
एकट्याला सोडून गेलीस
तेव्हा
बारा अमावास्यांचे अंधार
भोवती दाटून आले
अन् आठ दिश्यांची वादळे
अंगात भरून राहिली
मग
अनामिक ग्लानीने मी
कोसळून पडलो.

तू दिलेल्या सुगंधी सहवासाची
आवर्तने भोवती रुंजी
घालू लागली
अन्
मनात दाटले वासनामृग
आवेशी गवतांचे भाले
कुरतडू लागले,
सारी हिरवळ नष्ट होवून
मातीला सूर्य दिसू लागला
पण
माझ्याभोवती दाटलेल्या
अंधाराला माझी दया आली नाही.

कविता

ज्याची योग्य तक्रार त्यालाच परतावा....

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
25 May 2016 - 2:33 pm

cOMPLAINTS अनुभव 1 - कोथरुड, पुणे येथे जाण्यासाठी एसटीच्या सात बंगला - जेजुरी गाडीचं तिकिट मी काढलं. बसच्या ठिकाण म्हणून माझ्या घराजवळच्या थांब्याचं नांव दिलं. तिकिट एसटीच्या अधिकृत आरक्षण केंद्रावर काढलेलं असल्यामुळे मला रीतसर संगणकीकृत तिकिट मिळालं.

समाजप्रकटनविचार

एक्सेल एक्सेल - भाग १ - रकान्यांचं जाळं

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
25 May 2016 - 10:54 am

नमस्कार,
एक्सेल हे सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर या दोघांची नाळ इतकी घट्ट आहे की एक्सेलशिवाय कॉम्प्युटरचा विचारही करता येत नाही. विशेषतः आमच्यासारख्या आकडेमोड करणार्‍यांना तर कॉम्प्युटरची प्रत्येक गोष्ट एक्सेलशीच खातात असं वाटतं. पण या सॉफ्टवेअरबद्दल बहुतेकवेळा प्रचंड बाऊ असतो अनेकांच्या मनात. मोठाले डेटा, लांबचलांब फॉर्म्युले हे सगळं काहीतरी अगम्य आहे असं मानून 'ते एक्सेल वगैरे मला जमत नाही' असं डिस्क्लेमर देऊन टाकतात बरीच मंडळी.

जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
25 May 2016 - 9:52 am

***************************************

मी तरी कोठे स्वतःचे मोजतो निःश्वास आता
डाव मांडायास कोठे राहिला सहवास आता

भोवताली गारद्यांचे कृर जथ्थे केवढाले
आरशाला टाळतो, जपतोच मी जीवास आता

मरण झाले यार आता रंगते मैफल स्मशानी
जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता

ऊन्हओल्या सावल्यांचे सोसले चाळे मुक्याने
पावसाचा थेंब नाही कोरडे आभास आता

कोण येतो कोण जातो खूण ना उरते कशाची
'चित्रगुप्ताच्या' सहीला मागणी हमखास आता

***************************************

विशाल २३-५-२०१६

मराठी गझलगझल

वारूळ

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 May 2016 - 8:58 am

गाडी सुटता सुटता टिपला
फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला
तुझा कमळासारखा देखणा चेहरा..
स्लीव्हलेस ब्लाऊज व साडीतला तुझा मादक रेखीव आकृती बंध..
काहीतरी पडलेल उचलण्या साठी वाकली
तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन
अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं....
गाडी सुटता सुटता ओझरतं झालेलं तुझं दर्शन

रात्र झाली की क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर
निरव शांतता करते गप्प सारा कोलाहल..
अश्या वेळी क्षितिजा पालींकडून खुणावत असतो तुझा
देखणा मादक आकृती बंध मला वारंवार
अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत...
अविनाश

कविता

आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-एलिजाबेथ टेलर

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
24 May 2016 - 8:26 pm

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अाठवणीतला हॉलीवुड/ दोन-’नेशनल वेलवेट’

चित्रपटलेख

माझी ज्यूरी ड्युटी - ९

शेंडेनक्षत्र's picture
शेंडेनक्षत्र in जनातलं, मनातलं
24 May 2016 - 8:12 pm

भाग ८
शेवटी दोन्ही वकिलांनी आपापल्या बाजू पुन्हा एकदा मांडल्या. सरकारी वकिलाने असे सांगितले की ह्या महिलेला मारहाण झालेली आहे, जीव घेण्याची धमकी दिली गेली आहे. तिच्यावरील जीवघेण्या आपत्तीमुळे तिच्या जबाबात त्रुटी होत्या पण मानवी मन हे अशा भयंकर घटना विसरायचा प्रयत्न करत असते त्यामुळे तसे घडले. विविध छायाचित्रे आणि डॉक्टरांच्या जबानीवरून हे दिसते आहे ह्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत. तिला न्याय मिळायलाच हवा. तुम्ही तिला न्याय द्या.

समाजअनुभव

एक ओपन व्यथा ३

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
24 May 2016 - 5:47 pm

एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054

एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086

----------------------------

"चहा…

"……. "

"ओ साहेब…"

"………"

"साहेब चहाSSSS…" जोरात चहाचा कप वाजवत कांबळे थोडेस्से ओरडलेच.

"हंह…. हं……." पाटलांनी दचकुन वर पाहिले. तर कांबळे चहा घेऊन उभे.

"अहो काय साहेब… कित्ती वेळ?? पिंट्या येउन कधीचा गेला… चहाचं पार गोमुत्र झालंय बगा… कसल्या तंद्रीत होता?"

कथा