आंब्याची कढी

सूड's picture
सूड in पाककृती
1 Jun 2016 - 7:34 pm

साहित्यः
पाऊण लिटर ताक,
दोन मोठ्या हापूस आंब्यांचा रस,
जिरं,
मोहरी,
कडीपत्ता,
हिंग,
दोन मिरच्या बारीक चिरून,
साखर मीठ आवडीनुसार

कृती:

ताक , मीठ , साखर आणि आंब्याचा रस एकत्र करायचा.
साजूक तुपात मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, मिरच्यांची फोडणी करून ताक आणि आंब्याच्या मिश्रणात ओतायची.
थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं.

*फेसबुकावर पूर्वप्रकाशित.

पळता येणार नाही राजकारणापासून दूर

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 5:21 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

मला खुणवायचं नाही कोणत्याही दोन माणसांत
सुरू होणार्‍या राजकारणाबद्दल
मला बोलायचं नाही एखाद्या कार्यालयात
डूक धरणार्‍या सूडकारणाबद्दल
आणि मला टोचायचं नाही एखाद्या गावात
काटा काढणार्‍या राजकारणाबद्दलही.

आत्मप्रौढीने सांगतात लोक,
राजकारणाबद्दल बोलत नाहीत आपण
आवडत नाहीत राजकारणी आणि
राजकारणात जाणारही नाही चुकून कधी...
अशा तमाम तटस्थ प्रवृत्तीबद्दल बोलायचंय इथं.

वाङ्मयलेख

एक संघ मैदानातला - भाग ११

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 4:34 pm

सकाळी ११ वाजून गेले तरी आम्हाला कोणालाही जाग आली नव्हती. ११.३० च्या सुमाराला आधी दार वाजल्यासारखे वाटले मग थोड्यावेळातच दादांचा आवाज आला.
"ऐ जागू...दार उघड ना… ते बघ बाहेर बोंबलतायत…" रूपाने जागूला ढोसलं आणि स्वत: कूस बदलून झोपून गेली.
" च्यायला… काय कटकट आहे... ह्यांना आत्ता काय इथे काय करायचं आहे..." बडबड करत जागुने दार उघडले.
" काय झालं दादा... ? "
"अरे मला आत तर येऊ दे...आणि तुम्ही अजून झोपा कसल्या काढताय? चला बाहेर..." बँग घेऊन दादा खोलीत घुसलेच.

समाजविरंगुळा

जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक!

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 4:01 pm

कूपन घ्या, चेक, डिपाजिट, विड्रोवल, लोन, लाकर्स अणि कित्येक व्यवहारिक धुमाकूळ असतो, त्यात अर्ध्या लोकांना फॉर्म भरता येत नसतात, ती दोऱ्यानी लटकणारी पेनं दर वेळी गळफास लाऊन आत्महत्या करतात असच वाटतं...त्यापेक्षा लोक्स् त्यांना तसं करायला भाग पडतात असं म्हणनं जास्त योग्य!
कारण काम सरो वैद्य मरो हीच भावना ठेऊन लोक्स् त्या पेनाचा अपमान करतात!
आणि कधी कधी तर ते पनही गायब असतं! नेमकं आपल्याकडे पेन नसतं..

मांडणीप्रकटन

सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
1 Jun 2016 - 8:40 am

सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी राग,कधी अनुराग,
कधी प्रेम, कधी आग
कधी हो, कधी नाही
कधी घरी विचारते,कधी माहीत नाही,
तू तर रोज सखे भेटतीस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग
कधी भांड भांड भांडतेस,
तर कधी गळ्यात पाडून रडते
कधी स्वत:च खरं करतेस,
तर कधी माझ चुकलं म्हणतेस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी अल्लड, पोरसवदा मुलीच वागणं
तर कधी प्रौढे सारखं बोलणं

कविता

मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 7:21 am

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964

समाजजीवनमान

सांधण दरी--जिथे एअरटेलचे नेटवर्क गंडते

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
1 Jun 2016 - 12:19 am

फ़ेब्रुवारी मध्ये एक-दोन जोरदार ट्रेक कम भ्रमंती पार पडल्या आणि हळूहळू उन्हाळा तापू लागला .बेडूक जसे भूमिगत होऊन पावसाळा सुरु होण्याची वाट बघत निद्रीस्तावस्थेत जातात तद्वतच आम्हीसुद्धा आता जुलै पर्यंत घरातच पडी मारून बसायचे नक्की केले.पावसाळ्यात भ्रमंतीची जोरदार सुरुवात एक दिवसीय पन्हाळ-विशाल ट्रेकने होणार त्यामुळे या छोट्या ब्रेकचे फारसे दु:ख होत नव्हते. पण स्वस्थपणे घरात बसून राहतील तर ती कसली ट्रेकर मंडळी ? चर्चा तर होणारच...आणि ग्रुपमध्ये चर्चा सुरु झाली सांधण दरी ट्रेकची.

हो...! मला तुमचा पैसा हवाय...-मर्लिन मुनरो

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 12:18 am

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

आठवणीतला हॉलीवुड/तीन

‘हो...! मला तुमचा पैसा हवाय...! पण त्यांत गैर काय...तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला एखाद्या कंगाल, फाटक्या माणसाच्या पदरी घातलं असतं का...? नाही ना...मग मी स्वत:साठी तुमच्या पैसेवाल्या मुलाला पसंत केलं तर त्यांत गैर काय...?’

चित्रपटआस्वाद

लाल इश्क (मराठी चित्रपट परीक्षण)

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 10:00 pm

प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय?? उत्तर आहे होय, जर अनुभव गाठीशी असेल तर बाहेरच्या भाषेतील निर्माताही मराठीत येउन व्यवस्थित सगळं manage करू शकतो........

चित्रपटसमीक्षा