सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
1 Jun 2016 - 8:40 am

सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी राग,कधी अनुराग,
कधी प्रेम, कधी आग
कधी हो, कधी नाही
कधी घरी विचारते,कधी माहीत नाही,
तू तर रोज सखे भेटतीस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग
कधी भांड भांड भांडतेस,
तर कधी गळ्यात पाडून रडते
कधी स्वत:च खरं करतेस,
तर कधी माझ चुकलं म्हणतेस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी अल्लड, पोरसवदा मुलीच वागणं
तर कधी प्रौढे सारखं बोलणं
कधी फोन कट करणं ,
तर कधी,सारखं मिस कॉल देणं
कधी म्हणते, तोंड बघणार नाही,
तर कधी,तुला भेटल्या शिवाय करमत नाही
कधी तू खूप चांगला,तर कधी, खूप वा‌ईट्ट
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
सांगा ना, काय असेल तिच्या मनांत?
.
हे कोड कधी उलगडेल का?
रमणी च मन कधी कळेल का?

कविता

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

1 Jun 2016 - 8:52 am | सतिश गावडे

सुंदरीला मटण आणि बीयर मद्याच्या पार्टीला यायचे असेल.

प्रचेतस's picture

1 Jun 2016 - 8:56 am | प्रचेतस

काय अकुकाका ऑं...जिलब्या पाडायलात रोज.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2016 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै तेव्हा ते तांब्या, बसणे, वगैरे च्या जिलब्या पडतात तेव्हा मात्र धावत येता आणि किती अप्रतिम कविता अशी दाद देता.

असा व्यक्ति पाहुन भेदभाव. हे काय आवडलं नाय. :/

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

1 Jun 2016 - 1:34 pm | प्रचेतस

अहो त्याही जिलब्या, ह्याही जिलब्याच.

जिलब्यांत काय आपलं परकं करायचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2016 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमची सुंदरी जशी विचारते ना ? तसं तीही विचारते बरं का की तुझ्या मनात काय चाललं म्हणून सांग. मला तुमच्या रचनेवरुन एक गाणं आठवलं

''चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोर्‍यात, मोरावाणी
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात
गोड गोड गुपित, तुझ्या मनी, रे"
(दुवा)

-दिलीप बिरुटे

रमेश भिडे's picture

1 Jun 2016 - 3:04 pm | रमेश भिडे

सुंद्री कंफ्युज्ड आहे असे वाटत आहे. लवकरात लवकर डॉक्टर चा सल्ला न घेतल्यास केस हाताबाहेर जाऊ शकते.
एवढे हायपर मूड fluctuations????