मनातले माझ्या
शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा
मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री
भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले
आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले
निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ
लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या
आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले
कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी
आज आशेचा किरण शोधु लागले.......