वाट!

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 9:23 pm

कालच्या पावसात एक फांदी तुटली
आपटलीच
मग झाडंच कोसळलं
धप्पदिशी

अजस्त्र सांगाडा जमीनीवर पसरला.
कधीकाळी त्यावर किलबिल पक्षी बसायचे
आजकाल फक्त कावळेच

शतकानुशतके झाड उभं होतं
गुण्यागोविंदाने जगत होतं
संसार करावा तर झाडासारखा
पण एकाएकी खंगूनच गेलं

उन्मळून पडावं असं काही राहीलंच नव्हतं
तरीही पडलं
दु:ख त्याचं नाहीच
पण खाली एक कुत्रं बसलं होतं
गेलं बिचारं

:(

जिलबीमुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Jun 2016 - 9:31 pm | प्रचेतस

अफाट लिहिलंय.

किसन शिंदे's picture

26 Jun 2016 - 10:13 pm | किसन शिंदे

???

मला तर फारसं विशेष वाटलं नाही. अतिशय साधी वाटली. कुठला गुढ-गहन अर्थ दडलाय का कवितेत??

प्रचेतस's picture

26 Jun 2016 - 10:18 pm | प्रचेतस

शैली.

धनंजय माने's picture

26 Jun 2016 - 11:48 pm | धनंजय माने

ख़ास च!

फ़क्त एक विनंती- आपल्या प्रतिभेला थोडं स्ट्रीम लाइन करा मालक

मंजे???
मला आवडली पण ओकेटोके.

Bhagyashri satish vasane's picture

27 Jun 2016 - 12:13 am | Bhagyashri sati...

वेगळ काही तरी.... पण छान :)

चांदणे संदीप's picture

27 Jun 2016 - 9:14 am | चांदणे संदीप

लागली!

Sandy