पडवळाची सुकी भाजी (भाजणी पेरून)

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
29 Jun 2016 - 11:46 am

साहित्यः
पडवळ अर्धा कि., थालिपीठाची भाजणी किंवा चण्याचे पीठ वाटीभर, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, दोन टेबलस्पून, ओले खोबरे, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा साखर, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार.
कृती:

वणवा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
29 Jun 2016 - 9:53 am

सुखाचा संसार फुलवु नये कुणी
एखाद्याच आयुष्य माती मोल करुन
.
.
नर्सरीत सुरक्षित जीवन जगण्या-या गुलाबाला काय तमा?
जंगलातल्या वणव्यात भाजणा-या रान फुलांची

प्रेमकाव्य

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक

मोदक's picture
मोदक in भटकंती
28 Jun 2016 - 10:39 pm

भाग १ - तयारी

सगळी तयारी झाल्यानंतरकी काही किरकोळ कामे राहिलीच होती म्हणून पहिल्या दिवशी फक्त पुणे ते ठाणे असा पल्ला मारायचे ठरले.

दुपारी दोन वाजता सर्वजण रोहितच्या घरी जमलो.. पुन्हा बॅगा नीट बांधल्या. थोडे फोटोसेशन झाले.

बॅगांची बांधाबांधी सुरू असताना...

.

तयारी झाली...!!!!

कर…!!!

वटवट's picture
वटवट in जे न देखे रवी...
28 Jun 2016 - 4:50 pm

कर…!

काजळलेल्या राती.. पाजळलेली स्वप्नं..
कातरवेळी डोळ्यामधुनी.. पाझरलेली रत्नं..

मग, रत्नांच्या त्या गर्दीमध्ये.. गुरफटलेली धुंदी..
तू मी असता दुःख गं कसलं??... सारे काही आनंदी..

तू असताना दुःख सुद्धा गं रूप बदलते राणी..
वणव्याच्याही ओठी फुलती.. नाजूक फुलांची गाणी..

ऐक गं राणी, फुले सुद्धा ही नाहीत अगदी साधी…
ह्याच फुलांनी बरी होते, शतजन्मांची व्याधी…

शतजन्माची माझी व्याधी, बरी कराया ये ना…
नक्षत्रांवर आपुली नावे, कोराया ये ना…

कविता

उडता पंजाब....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 4:44 pm

चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की.

चित्रपटसमीक्षा

विरह.....2

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 4:08 pm

मी बसलो ती खालच्या स्वरात म्हणाली, सॅारी मी म्हटले का? ती म्हणाली,"मी तुझ्याशी त्या दिवशी फार
रागात बोलले, म्हणून मी तीला म्हणालो अंग ते विसरुन जा मी ते कधीच विसरलो ती म्हणाली मी तुला सम्यंक
म्हटंल तर चालेल, मी म्हटंल हो का नाही. बघता बघता आमची चांगली मैत्री झाली मी दहावी बोर्डाची परीक्षा
पास झालो आणि सायन्सला अॅडमिशन घेतलं अवनी आता आठवीत आली होती, पण तीचं गणित काय सुधरत
नव्हंत मला पण आश्चर्य वाटत होतं की अवनीला रोज गणित समजावून पण तीला ते का कळत नाही, हे कळंत
नव्हत, अशीच दोन वर्ष निघुन गेली, कळलच नाही, अवनी दहावीत आली ती एक दिवस जरी घरी नाही आली

धर्मविचार