पडवळाची सुकी भाजी (भाजणी पेरून)

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
29 Jun 2016 - 11:46 am

साहित्यः
पडवळ अर्धा कि., थालिपीठाची भाजणी किंवा चण्याचे पीठ वाटीभर, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, दोन टेबलस्पून, ओले खोबरे, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा साखर, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार.
कृती:
पडवळ धुवावे, बिया काढून पातळ काचय्रा कराव्या. कढईत तेल घेऊन नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. पडवळ फोडणीत घालून परतावे. झा़कण ठेवून दहा मिनिटे मंद गॅसवर वाफ काढावी. तोपर्यंत एका डीशमध्ये भाजणी, दाण्याचे कूट, ओले खोबरे, आमचूर, गोडा मसाला, लाल तिखट, पीठापुरते मीठ घालून सर्व नीट एकत्र करावे. पडवळाला वाफ आली की त्यात मीठ, साखर घालावी. नीट धवळून दोन मिनिटे मीठ साखर पडवळाला लागू द्यावी. आता तयार पीठाचे कोरडे मिश्रण घालून भाजीत मिक्स करावे. एक वाफ येऊ द्यावी. या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही. चव बघून मीठ तिखट वाढवावे.
भाजणीमुळे भाजी खमंग होते, पण भाजणी नसल्यास बेसन भाजून वापरावे.
bhaji

प्रतिक्रिया

आपल्याच मिपाचा सदस्य असलेल्या एकाने माझी पाकृ आपलीच म्हणून चेपुवर पोस्ट केलीय, म्हणून हा प्रयत्न. काही बदल हवे असल्यास सुचवा.

त्याच इसमाने माझीही पाककृती फोटोसकट टाकलिये अर्थातच आपलीच म्हणून.खवय्येगिरिचि हौस अशी भागवत आहेत.
बाकी भाजि छान दिसतेय.

त्याच इसमाने माझीही पाककृती फोटोसकट टाकलिये अर्थातच आपलीच म्हणून.खवय्येगिरिचि हौस अशी भागवत आहेत.
बाकी भाजि छान दिसतेय.

पाककृती तीपण पडवळची चोरायची फारच होतंय.

प्रचेतस's picture

29 Jun 2016 - 10:39 pm | प्रचेतस

=))

अनन्न्या's picture

29 Jun 2016 - 1:55 pm | अनन्न्या

म्हणून मी या पाकृवर वॉटरमार्क टाकण्य्चा प्रयत्न केलाय.आता तुम्हाला नाव पण सांगते आम्ही सारे खवय्ये मध्।ऐ घेतलीय पोस्ट!

पडवळ कधीच आणत नाही.तुझी पाकृ वाचून आणावासा वाटतोय.चांगला पडवळ काय बघून घ्यायचा असं काही असतं का?

अनन्न्या's picture

29 Jun 2016 - 6:26 pm | अनन्न्या

त्याला दोर येतात, चिरले जात नाही. कोवळे पडवळ कडक नसते. काहीलोक घेताना त्यात नख खुपसून बघतात्,पण असे करायला भाजीवाले तयार होत नाहीत.

आनंदी गोपाळ's picture

29 Jun 2016 - 2:31 pm | आनंदी गोपाळ

हे अशा चोर्‍या करणारे सद्-गृहस्थ कोण ते सांगून टाका की

सौंदाळा's picture

29 Jun 2016 - 5:02 pm | सौंदाळा

तेच म्हणतो
ते चोर्‍या करायला लाजत नाहीत मग तुम्ही तरी त्यांचे नाव कशाला लपवता. अशा लोकांना उघडे पाडलेच पाहिजे.

मस्त रेसीपी.. करुन बघेन

अनन्न्या's picture

29 Jun 2016 - 6:22 pm | अनन्न्या

प्रमोद तांबे नाव आहे, मिपा आयडी आहे हे समजल्यावर जास्त वाईट वाटले.

त्रिवेणी's picture

29 Jun 2016 - 7:35 pm | त्रिवेणी

अय्यो प्रमोद तांबे?? आणि टी ताक मासल्याची पण yanich ढापली की ते अजुन वेगळे?

अनन्न्या's picture

29 Jun 2016 - 7:53 pm | अनन्न्या

ढापणारे बरेच असतात गं, इशाची पण ढापलीय त्यानीच

उल्का's picture

29 Jun 2016 - 7:39 pm | उल्का

अनन्या मस्त पाकृ.
बरं केलंस मार्क टाकलास ते.

पद्मावति's picture

29 Jun 2016 - 7:48 pm | पद्मावति

मस्तं आहे भाजी.

रेवती's picture

29 Jun 2016 - 10:23 pm | रेवती

मस्त पाकृ! आवडती भाजी.

अनन्न्या's picture

30 Jun 2016 - 12:18 pm | अनन्न्या

बय्राच भाज्या करताना तीच तीच पध्दत वापरून एकाच चवीचा कंटाळा येतो,म्हणून थोडा बदल!

माझ्याही खुप रेसिपीज, फोटो फेसबुकवर चोरीला गेलेत.

जागु's picture

30 Jun 2016 - 12:38 pm | जागु

पडवळ भाजी छान.

पैसा's picture

30 Jun 2016 - 10:23 pm | पैसा

वेगळी पाकृ.

नूतन सावंत's picture

1 Jul 2016 - 1:46 pm | नूतन सावंत

छान लागेल ही भाजी.

विशाखा राऊत's picture

1 Jul 2016 - 4:06 pm | विशाखा राऊत

पडवळ ऑल टाईम फेवरेट पण सासरी खात नाहीत त्यामुळे बरेच वर्ष नाही खाल्ले :(

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 6:45 pm | धनंजय माने

या मागचं लॉजिक समजलं नाही.
एक पडवळ आणखी एक इतरांच्या आवडीची अशा दोन भाज्या करायला काय हरकत असते?

प्रियाजी's picture

6 Jul 2016 - 6:27 pm | प्रियाजी

मी पण पडवळाची भाजी करते पण बेसन घालून. तसेच बिरड्या ( मोड आलेले वाल) घालूनही रस भाजी छान होते.तिखट,मीठ गोडा मसाला व फोडणी नेहमीप्रमाणे करणे. वरून वाढताना ओले खोबरे कोथिंबिर घातली की कलरफूल मस्त भाजी होते.

पिलीयन रायडर's picture

6 Jul 2016 - 6:53 pm | पिलीयन रायडर

मी कधीच पडवळ खात नाही. पण आता हा फोटो पाहुन कदाचित खाईन असं वाटतय.

ते चोरीला गेलेले लेख काढले का त्या ग्रुपवरुन?

अनन्न्या's picture

8 Jul 2016 - 6:48 pm | अनन्न्या

त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळलेय.

विवेकपटाईत's picture

6 Jul 2016 - 6:58 pm | विवेकपटाईत

पडवळाची भाजी आमची सौ. हि मस्त करते. तिच्याच मुळे हि भाजी खायला शिकलो. खरे तर स्वत: कृती केल्या शिवाय कधीच टाकली नाही पाहिजे. टाकण्या पूर्वी ताजी करून बघितली पाहिजे. बाकी चोरी करणार्यांचे नाव जाहीर केलेच पाहिजे. त्यांना जाब हि विचारला पाहिजे.

मयुरा गुप्ते's picture

7 Jul 2016 - 1:22 am | मयुरा गुप्ते

अनन्न्या,

पडवळाची भाजी भाजणी पिठ पेरुन करुन बघितली.. ए वन. खूपच खुमासदार झाली होती.
पडवळ म्हटंल कि कडवे वाल घालुन भाजी हे समिकरण बाजुला ठेवुन पिठ पेरुन भाजी छान झाली होती.

रेसिपी साठी धन्यवाद.

--मयुरा

अनन्न्या's picture

8 Jul 2016 - 6:46 pm | अनन्न्या

कोणी करून पाहिली लगेच की उत्साह येतो नविन नविन करण्याचा!