विरह.....5
सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊलं कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ लागत नव्हता मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होतो, मला मन आहे विचारशक्ती आहे याचं भानचं नव्हतं! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरचं वाटतं नव्हतं आपण इतकं काही भोगलय पण आता त्या आठवणी सुध्दा सोबत सोडतील, कळलच नाही चालता चालता घरा पर्यंत येऊन पोहोचलो मी घरात आलो बाजारातुन घेतलेलं सामानं घेतलं आई आणि भाऊ झोपलेले होते मी त्यांना अखेरचं डोळे भरुन पाहिलं आणि मागच्या पाईपने अवनीच्या रुममध्ये प्रवेश केला ती माझीच वाट पाहात होती मी आत आलो, तीने माझा धरुन मला गणपतीच्या मुर्ती जवळ आणलं आणि म्हणाली आपण यांच्याच साक्षीनं लग्न करु!