शी क्षण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज पुन्हा भंडारदरा परिसरात भटकंती होती. पाऊस पडतोय छान... ओलावा जसा मुरायला लागला, तसा एका शाळेत शिरलो.. जि. प. शाळा, सहा वर्गखोल्यांसाठी पाच इमारत. त्यातल्या दोन वापरण्यास अयोग्य अशा अवस्थेतल्या. शाळेला शिक्षक चार, एका शिक्षिकेची गाडी चुकल्यामुळे त्या थोड्याश्या उशिरा येणार होत्या.(खिक) मुख्याध्यापक मिटिंगसाठी केंद्र शाळेत गेलेले
उर्वरित दोघे मग सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवुन सामाजिक सलोखा अनुभवत होते.. शाळेला वेगवेगळ्या चार पद्धतीची स्वच्छता गृह आहेत. एकदम लेटेस्ट असलेले तयार (Prefabricated) बहुतेक अजुन निर्माण अवस्थेत असावे कारण सांगाडा उभा ठेवलाय पण पाइप जोडणी झालेली नाही. एका युनिटचा दरवाजा अजुन बसायचाय ( पोपट मेला नाही,त्याची मान कललीय. दरवाजा तुटुन गेला असं मी अजिबात म्हणणार नाही) अन विदेशी पद्धतीचे शैाचालय असल्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही, म्हणुन विनाकारण व्यवस्था देखिल नाही.. शाळेत लाईट आहे पण सध्या आॅफिस पुरतीच मर्यादित आहे. वर्गखोल्यांमध्ये स्विचबोर्ड बसवुन झालेत, वायरिंग मात्र बाकी आहे. ही मुले कदाचित फोटोफोबिक असावित असे वाटल्याने त्यांच्या भल्यासाठीच थोडासा अंधारच रहावा वर्गात अशी योजना असावी.
आता शैक्षणिक दर्जाच्या मुल्यमापनाचा प्रमाद हातुन घडु नये म्हणुन काढता पाय घेतला, पण एव्हाणा निर्माण झालेली ऊब अनुदानित आश्रमशाळेकडे घेवुन गेली.. प्रयोगशाळेच्या नावाखाली एकमेव मायक्रोस्कोप आणि रद्दीच्या गठ्यामागचा कॅाम्प्युटर अन् उघड्या ओल्यागार फरशीवर दिवसभर बसुन शी क्षण सहन करणा-या माझ्या चिल्यापिल्याच्या शारीरिक छळवणुकीच्या प्रत्यक्ष देखाव्याने पुरती हौस फिटली... बाकी अपु-या प्रकाशाने होणारी नजरेची हानि, वैयक्तिक स्वच्छता सांभाळणारी आरोग्ययंत्रणा यांची चिवतायगिरी पुन्हा कधीतरी........
प्रतिक्रिया
:(
हम्म.
:(
वाचुन अतिशय लाज वाटली....
या व्यवस्थेची
आपली स्वतःची मुलं जेव्हा एका
अश्या कुठल्या सामजिक
माझी मैत्रिण झेड पी च्या
:(
गावाचं नाव लीहा.
हो. गावाचं नाव लिहावे.
:(
परिस्थिती
न बोललेच बरं