भूतकथा - कर्णपिशाच्च !
कर्ण पिशाच्च
बांदिवडे गावात रामाचे जुने मंदिर होते. मूर्ती अतिशय प्राचीन आणि सुंदर होत्या . गावातील बाबू मेस्त्री हा सुतारकाम करायचा . त्याची रामावर फार भक्ति होती. पण त्याला मटक्याचा देखील नाद होता . रोज सकाळी रामाचे दर्शन घेवून बाबू कामावर जायला निघे आणि मग रस्त्यात समोर येणार्याो मुलांना थांबवून खाऊ /चॉकलेट द्यायचा अन विचारायचा की तुमचा आवडता अंक सांगा ... मग मुले जो अंक सांगतील तो आकडा तो लांज्याला मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन लावायचा ... जर आकडा लागला ,तर स्वारी खुशीत असायची .... मग रात्री राम मंदिरात भजन काय अन गाव जेवण काय ? सगळी धूमधमाल असायची ....